या विषयावर प्रत्येकाचे आपापले विचार असतात. ते एकत्र मांडण्याचा हा प्रयत्न.
काही आणखीही मते/कारणे असू शकतील, नाही असे नाही. ते प्रतिसादांतून समजतीलच. :)
माझे मत मी चौथ्या कारणास दिलेले आहे.
मुमुक्षु
काही ठरावीक देवळात तेथे शांत वाटते म्हणुन कधीतरी जातो चुकुनमाकुन.
पुर्वी दर शनिवारी मारुतीच्या देवळांत मित्र भेटतात म्हणुन जायचो .
कधीकधी प्रसाद खायला मिळतो म्हणुन पण जातो
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
जिवंत गर्दीची देवळे असली तर लोकांच्या उत्स्फूर्त भावनेतून मलाही चैतन्य मिळते. म्हणून जातो.
देवळे भग्न असलीत तरी आपल्या संस्कृतीचा आणि कलेचा वारसा आहेत, म्हणून जातो.
तसे भावनाशून्य असेल (तुरळक 'टाकणे टाकणारे' भक्त असतील), कलात्मक नसेल, तर बाहेरच्या बाहेरून निघून जातो.
माझा निबंध : देवुळ.
आमच्या गावात गणपतीचे मोठे देवुळ आहे.
देवळात उतरायला १४ पायर्या आहेत.मी त्या १ मिनीटात उडी मारत मारत उतरतो.
माझी व अभिषेकची तिथे बर्याच वेळेला रेस होते पण आपण त्याला लै वेळा हरवतो.
देवळाला लागुनच एक नदी आहें. नदीवर मोठा घाट आहे. तिथे लोक आंघोळ करतात व बायका कपडे धुवत असतात.
मी एकटा असलो कि पाण्यात पाय न घसरता दोन पायर्या खाली उतरतो. अभिषेक फक्त एकच पायरी उतरतो.
तो घाबरट आहे.
"पुजा व आरतीला" बघायला मी रोज न चुकता देवळात जातो.
मला पुजा आवडते.पुजा आमच्या कॉलनीतच राहते. आरती पण मला आवडते. पण ती सगळ्यांनाच आवडते.
म्हणुन आपण तिच्याशी जास्त भाव खातो. अभिषेक हा पुजाचा भाऊ आहे.
पण तो साला सारखा मधे मधे करत असतो. मी एकदा त्याच्या कानाखाली निरंजन काढणार आहे.
दर संकष्टीला देवळात मोठी जत्रा भरते.दुर्दुर्हुन लोक गणपतीच्या पाया पडायला येतात.
मी पण न चुकता जत्रेतिल गंमत बघायला जात असतो. बाबांना न सांगता आइ मला भेळ खायला दोन रुपये देते.
जत्रेत रेवडि पण छान मिळते. चंदुची भेळ फार तिखट असते म्हणुन मी एक रुपयाची भेळ खातो व एक रुपायाची रेवडि खातो.
पुजाला पाणिपुरी आवडते. मला पाणिपुरी पण आवडते.
या सर्वांमुळे मला देवळात जायला आवडते.
अभिज्ञ.
इ.चौथी ब.
मोरया प्राथमिक विदयालय.
शिकागोमधील देवळांत जात असू. तिथे कुरकुरीत मसाला डोसा, इडली आणि वडा सांबार मिळते म्हणून.
रेस्टॉरंटात तेवढे ताजे, चवदार आणि स्वस्त मिळत नाही म्हणूनही.
देवळात जाण्याचे हे सर्वात पहिले कारण दुसरे कारण देवळात जाण्यासाठी वरीलपैकी कोणतेही चालेल.
मूर्ती पूजेवर तितका विश्वास नाही. किंवा देव देवळातच भेटतो यावरही विश्वास नाही. (संत ज्ञानेश्वरांचा बहुतेक जास्ती पगडा आहे माझ्यावर) देव विश्वात सामावलेला आहे. पण देवळात जाते ते तिथलं पवित्र वातावरण आवडतं म्हणून. त्यातही मार्लेश्वर सारख जर एखादं मंदिर असलं तर त्यातली गूढ शांतता आवडते म्हणून जाते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मंदिरांना भेटी देऊन तेथे पूजा-अर्चनाकरून हिमतीने लढा देण्याचे, संधीचे सोने करण्याचे, निश्चय करणे अपेक्षित आहे. भक्तांची मनस्थिती उच्च विचारांची, संकल्प, निश्चय करण्याची होण्यासाठी मंदिर प्रांगणातील स्थापत्याचा आस्वाद घेणे, चित्रे, मुर्ती यामधून इतिहासाची कल्पना करणे, दीप लाऊन काळाच्या अंधारात दडलेला मार्ग शोधणे, प्रदक्षिणेच्या फेऱ्या मारताना मनात स्तोत्रे, काव्य, जप- साधना करून आपली मनस्थिती सकारात्मक व निश्चयी करण्याचे काम होते. त्यावेळी मंदिरातील वातावरणात सत्प्रवृत्तींच्या लहरींना, अनुकंपनांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य येते. असे प्रत्येक भाविकाच्या सत्प्रवृत्तींचे प्रक्षेपण परस्पर घडते. मंदिरांच्या आसमंतातील धीरगंभीर शांतता, आल्हाददायक वाटते ती याच कारणाने. आसपासची अस्वच्छता, गोंगाट, कोंदटपणा आदि गोष्टी अशा वेळी गौण करून मनाची सकारात्मक स्थिती जो ठेवतो, सहानुभूतियुक्त स्पंदने, अनुकंपने जो निर्माण करतो, त्यालाच देव पावतो.
गर्भ जसा मातेच्या गर्भाशयाशी नाळेने जोडला गेलेला असल्याने त्या गर्भाची व धारण करणाऱ्या मातेची इच्छा एकच बनते. (त्यालाच डोहाळे म्हणतात) त्याच प्रमाणे मानव ईश्वर रुपी मातेच्या विश्वरूप शरीराला श्रद्धेच्या, भक्तीच्या नाळेने जोडला गेला तर त्याची इच्छा व ईश्वराची इच्छा सहानुभूतियुक्त अनुकंपनाच्या (sympathetic Vibrations) नियमानुसार एकच बनते व तो ईश्वर श्रद्धा्युक्त मानवाची इच्छा पूर्ण करतो. प्रार्थनेला फळ का मिळते, नवसाला देव का पावतो, थोडक्यात खऱ्या श्रद्धेने, भक्तीने केलेली कोणतीही कृती फलद्रूप का होते याची शास्त्रीय उपपत्ती कॅमरर, युंग, पॉप आदि पाश्चात्य शास्त्रज्ञांनी शोधलेल्या अनुक्रमे क्रमबद्धतेच्या (seriality) व अर्थपूर्ण घटनात्मकतेच्या (synchronicity) ईश्वरनिर्मित विश्वाच्या अंगभूत गुणामुळे सफल होते. हे आता विज्ञानानेही मान्य केले आहे.
.... शास्त्रीय उपपत्ती कॅमरर, युंग, पॉप आदि पाश्चात्य शास्त्रज्ञांनी शोधलेल्या अनुक्रमे क्रमबद्धतेच्या (seriality) व अर्थपूर्ण घटनात्मकतेच्या (synchronicity) ईश्वरनिर्मित विश्वाच्या अंगभूत गुणामुळे सफल होते. हे आता विज्ञानानेही मान्य केले आहे.
ओकसाहेब, यांचे संदर्भ देऊ शकाल का? मला वाचायला आवडेल.
काही जन हे नास्तिक असतात. तर काही गोधळलेले देव आहे की नाही या कल्पनेने तर काहीच्या अपेषा अवास्तव असतात त्या पूर्ण होत नाहीत आणि ते देवाला दोषी करतात स्वतकडे
न पाहता देवाला नावाने बॉबं मारतात
“दाल में काला” शोधणाऱ्यांसाठी –
फॉइड आणि युंग हे दोघे मानसशास्त्रज्ञ प्रारंभी एकमेकांचे सहकारी होते. पण नंतर सैद्धांतिक कारणांवरून त्यांच्यात मदभेद निर्माण झाले. फ्रॉइडचा दृष्टीकोन बुद्धिवादी होता, तर युंग हा सर्व मानसिक घटनांकडे अध्यात्मिक दृष्टीकोनातून पहात असे.
Synchronicity – An Acausal Connecting Principle (1955) C.J. Jung and Wolfgang Pauli. या विषयावर युंग बरोबर संयुक्तपणे ग्रंथ लिहिणारे वुल्फगॅग पॉली हे नोबेल पारितोषक विजेते शास्त्रज्ञ होते. पॉली यांच्या ज्या तत्वाच्या शोधाबद्दल त्यांना भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषक मिळाले आहे ते तत्वही भौतिक पदार्थ–अणुरेणु-भौतिक जगात अर्थपूर्ण रीतिने वागतात, हे दाखवून देणारेच तत्व आहे. त्यांच्या ग्रंथाला - एककालिक घटनात्मकताः कार्यकारण हा बाहेरचा संबंध जोडणारे तत्व - असा मथळा दिला आहे.
युंग माशाच्या प्रतिकावर संशोधन करत असताना दोन दिवसात किमान लहा संदर्भ त्याच्या पहाण्यात आले. त्याच दिवशी समुद्राकाठी फिरायला गेले असताना त्यांना एक मोठा मासा मेलेला आढळला त्या अनुभवाचे वर्णन युंग यांनी . ‘numinous’ या शब्दाने केले.(ibid p.14) या घटना कालातीत अशा अतींद्रिय शक्तीकडून कालात घडवल्या जाण्याऱ्या योजनाबद्ध घटना असून त्या एखाद्या मानवी मनाच्या संबंधाने (युंगच्या मनात घडल्या तशा) म्हणजे अर्थपूर्ण रीतीने – आणि एककालीय रीतीने घडतात.* म्हणून युंगनी अशा घटनांना एककालीय घटनात्मकता (synchronicity) असे नाव दिले आहे व त्या अर्थपूर्ण संबंध दाखवणाऱ्या असतात असे म्हटले. (अशा एककालीय घटना मानवी मनाच्याच संबंधाने नेहमी घडत असल्याने त्या सर्व अर्थपूर्णच असणार म्हणून त्यांना एककालीय म्हणण्याऐवजी फक्त अर्थपूर्ण म्हणणे प्रस्तूत लेखकाने जास्त पसंत केले. मानवी आत्मा व जड जगत यांच्यातील सारख्याच रीतीने भरलेल्या या अर्थालाच सहानुभूतियुक्त अनुकंपन(resonance or sympathetic vibrations) किंवा सर्व वस्तूंचा परस्पर सहवेदना(sympathy of all things or signature of God) म्हणतात. पण मानवी आत्मा व निसर्ग य दोन्होत हा अर्थ सारखाच ईश्वराने का भरला हे मात्र पॉली वा अन्य पाश्चात्य विचारवंताना माहीत नाही कारण त्यांना कर्मसिद्धांताची ओळख नाही.
युंग व पॉली यांच्या ही पुर्वी कॅमरर या जीवशास्त्रज्ञाने (seriality) ‘ क्रमबद्द घटनात्मकता’ नावाचे तत्व मानव व त्याच्या सर्व क्रिया विश्वाचे अविभाग्य अंग कसे आहे हे सांगते असे म्हटले होते. उदा. कॅमरर म्हणतो, “(seriality is ) ubiquitous and continuous in life nature and cosmos. It is umbilical cord that connects thought, feeling, science and art with the womb of the universe that gave birth to them.” {Janus: A Summing Up - (1978), Arthur Koestler, p.262}
याचा अर्थ असा की क्रमबद्ध घटनात्मकतेचे तत्व जीव, जगत, निसर्ग आणि विश्व या सर्वामधे सगळीकडेच व अखंडपणे वास करणारे तत्व आहे. ज्या जगाच्या (जगरूपी जगदंबेच्या) कुशीने मानवाचे विचार, भावना, विज्ञानशास्त्र आणि कला यांना जन्म दिला आहे. त्या जगाच्या (जगदंबेच्या) कुशीशी त्या सर्वांना जोडणारी ती नाळ आहे.
गर्भ आणि त्याला धारण करणाऱ्या मातेची इच्छा एकच बनते त्यालाच डोहाळे म्हणतात. हे सर्वश्रुत आहे. उदा. संत तुकारामांचा अभंग - गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथिचा जिव्हाळा तेथ बिंबे।।
वरील लेखन प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. पो. भोज. जि. बेळगाव. कर्नाटक. ५९१२६३. फोन ०८३३८-२९३३३९९ यांच्या ‘विज्ञान आणि चमत्कार’ ग्रंथातील आहे. मी संकलित करुन सादर केले आहे.
• * मला असाच एक अनुभव आठवतो. मी तांबरमला असताना रमणी गुरुजींच्या आश्रमात थंपी नावाचे एक ग्रहस्थ येत. ते इंडियन पोटॅश कंपनीत उच्चपदावर होते. एकदा त्यांना त्यांच्या कामाच्या एका विषयावर प्रबंध लिहायचा होता. अत्यंत निष्णात लेखनपटू असून ही त्यांना योग्य संदर्भ मिळत नव्हते. सादर करण्याची वेळ अगदी समीप आली, तेंव्हा रमणी गुरुजींना त्यानी आपली चिंता फोनवरून सांगितली. गुरुजींनी त्यांना ताडपट्टी पाहून सांगितले की हा शोध घेत असताना जे एक पुस्तक आपसुक खाली पडले होते. त्या मधेच अमुक अमुक पानावर संदर्भ पहावेत. त्या प्रमाणे ते पुस्तक मिळाले. त्यातून त्यांना हव्या त्या संदर्भासह प्रबंध तयार केला गेला. त्याला योग्य तो सन्मानही मिळाला. मी अत्यंतिक कळकळीने केलेली प्रार्थना-हाक महर्षींनी प्रतिसाद देऊन फळाला आली असे त्या घटनेचे वर्णन श्री. थंपी करत.
• प्रस्तूत लेखकाच्या संदर्भातील रमणीगुरुजींच्या नाडीवाचनाचे तमिळ मधून इंग्रजीत रूपांतर करण्याचे कार्य गुरुजी फक्त त्यांनाच देत असत. एकदा त्यांचा फोन आला की कमांडर, नाडीवाचनाच्या वेळी काय घडले जरा सांगणार का? जेंव्हा मी त्यांना सांगितले, ‘वाचताना मधेच थांबून गुरुजींनी त्या पट्टीवर जे आशीर्वादात्मक कुंकू अचानक अवतरित झाले ते पट्टीवरून काढून बोटाने कपाळावर लावले. असे त्यावेळच्या वाचनात एकदा नाही तर दोनदा झाले होते’. त्यावर ते म्हणाले होते – ‘शंकेखोर विंग कमांडर, आता भौतशास्त्रीय सार्वजनिक स्वरूपाचा पुरावा तुला मिळाला आहे. आता तरी वैचारिक, बुद्धिवादी, गणिताने उत्तर शोध करण्याचे थांबव. श्रद्धा आणि भक्तीतूनच या प्रश्नाची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा नाही’. कदाचित माझ्या आर्त विनवणीमुळे फेब्रुवारी २००८ मधे मी आजारी असताना महर्षींनी रमणी गुरुजींमार्फत एक अदभूत वाचन चेन्नईहून येऊन पुण्यात येऊन मला दिले होते. त्या वाचनाची सीडी मी वैयक्तिक संग्रहासाठी नंतर बनवली आहे. रमणी गुरुजींकडील नाडीतून मार्गदर्शन फुकट असते. फुले किंवा फळे या शिवाय अन् काहीही तेथे स्वीकारले जात नाही.
• असे पुरावे अकिंचन व्यक्ती देखील आपल्या साध्या लहान घरात केवळ श्रद्धेच्या व भक्तीच्या बळावर करून दाखवते. कोट्यावधी डॉलर्स खर्चून शेकडो मैल अणुविदलनाच्या (Accelerators) प्रचंड प्रयोगशाळातून अणुचे गुपित शोधणाऱ्या संशोधनाने ते सापडणारे (सापडलेले) नव्हे.
• मला आलेले अनुभव प्रत्येकाला येतील असे नाही, पण माझ्या अनुभवांशी मी बेईमानी करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यापुरता तरी अनुभव घ्यावा व मग काय ते वैचारिक बांधिलकीतून खरे-खोटे ठरवावे.
या विषयावर
अन्य
>>२ आणि ३ या
अन्य
गणामास्तर
अन्य
माझा निबंध : देवुळ.
अन्य
माझा..
मंदिरांना
संदर्भ
In reply to मंदिरांना by शशिकांत ओक
सुखी होण्यासाठी..........
आता का जात नाही याविषयी
“दाल में काला” शोधणाऱ्यांसाठी
अन्य
२ आणि ३ या