✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३

स
संपादक मंडळ यांनी
Sun, 09/08/2013 - 23:42  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, गणपती हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा! अंत्यत श्रध्देने आणि मोठ्या भक्तीभावाने हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या बरोबरीने महाराष्ट्रात घरोघरही जवळपास १२ ते १५ लाख बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यांच्या आगमनापुर्वीच घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येकजण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो, मग ते दिव्यांची आरास असो वा फुलांची तोरणे, थर्माकॉलचे आकर्षक मखर असो वा गणेशाची सुंदर मुर्ती! हि सजावट अगदी मनोभावे आणि जोरदार केली जाते. घरगुती गणपतींना होणारी ही सजावट लक्षात घेता मिपा व्यवस्थापनाने यावर्षीपासून घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. आपणा सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल, त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या घरात गणपतीभोवती केलेल्या सजावटीचा फोटो इथे टाकायचा आहे. येणार्‍या सजावटींमधून सर्वोत्तम तीन सजावटींना मिपा व्यवस्थापनातर्फे पुस्तक स्वरूपात पुरस्कार दिले जातील. त्यासंबधीची इतर माहिती नंतर कळवण्यात येईलच. चला तर मग!! होऊन जाऊ द्या घरातली सजावट एकदम जोरदार !! स्पर्धेचे नियम आणि अटी खालीलप्रमाणे :- १) स्पर्धेचा सहभाग सर्वांना खुला असेल. २) प्रत्येक स्पर्धकाने फक्त आपल्याच घरातल्या सजावटीचा फोटो टाकायचा आहे. ३) स्पर्धकाला प्रत्येकी २ फोटो टाकता येतील. ४) आपले फोटो इथेच प्रतिसादामध्ये टाकायचे आहेत. ज्या स्पर्धकांना फोटो टाकण्यात अडचण येईल, त्यांनी व्यक्तिगत निरोपाद्वारे संपादक मंडळ या आयडीला कळवायचे आहे. ५) आलेल्या सजावटींमधून सर्वोत्तम तीन निवडण्याचा अंतिम निर्णय परिक्षकांकडे राहील.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
277762 वाचन

💬 प्रतिसाद (138)

प्रतिक्रिया

खूप खूप सुंदर

मीनल
Mon, 09/16/2013 - 16:08 नवीन
मूर्ती, सजावट खूप आवडली. यालाच कला म्हणतात !!!!
↩ प्रतिसाद: रिकामटेकडा

धोरण

प्राजक्ताची फुले
Sun, 09/15/2013 - 03:29 नवीन
माझ्या माहेरचे गौरी आणि गणपती.. सगळी सजावट घरीच केलेली आहे. साई बाबा मंदिरातल्या गाभ्र्याची प्रतिकृती तयार केली आहे. वडीलांनी टरबुजावर गणपती कोरला आहे. आणि विठ्ठल - रखुमाई ची रांगोळी काढली आहे. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.

अतिशय छान!

पैसा
Sun, 09/15/2013 - 08:38 नवीन
तुमच्या घरात सगळेच कलाकार दिसताहेत!
↩ प्रतिसाद: प्राजक्ताची फुले

+१

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 09/15/2013 - 10:58 नवीन
+१ सगळेच सुंदर आहे. टरबूजावरचा गणेश काढायची कल्पना आवडली !
↩ प्रतिसाद: पैसा

हाय क्लास

मीनल
Mon, 09/16/2013 - 16:10 नवीन
मस्त! साई गणेश तर खूप छान. रांगोळी अप्रतिम!!!
↩ प्रतिसाद: प्राजक्ताची फुले

आमचा गणपती....

महाईश
Sun, 09/15/2013 - 11:19 नवीन
Image removed.

आमचा गणपती....२..

महाईश
Sun, 09/15/2013 - 11:20 नवीन
Image removed.

आमचे पण बाप्पा...

मनिम्याऊ
Sun, 09/15/2013 - 17:13 नवीन
गणेशोत्सव म्हणजे वर्षातील सर्वात आनंदाचा, उत्साहाचा काळ. सासरी गणपती बसवत नसल्यामुळे सजावटीची सगळी हौस मग माहेरीच पुरवून घ्यावी लागते. त्यात बाप्पा आमचे (माझ्या माहेरचे) कुलदैवत. त्यामुळे विसर्जनाची पद्धत नाही आणि बाप्पांची मुर्ती धातूची असते. दरवर्षी पितळी मूर्ती आणि रोज़च्या पूजेतली लहान गणेशमुर्ती ज़रा बाजूला मांडून आरास केली जाते. यावर्षी बाप्पांची सजावट पूर्णपणे कागद वापरून केली आहे. अगदी गणेशाच्या आवडत्या 'रक्तपुष्पा' पासून तर 'प्राजक्त-फुलांच्या' माळेपर्यन्त तसेच सभोवतलचे पुष्‍पमंडळ आणि चारी कोपर्‍यातील 'फूल-छड्या' अस्मादिकानी टिशुपेपर/ क्रेपपेपर वापरून घरीच बनवल्या.. Image removed. Image removed.

सुंदर सजावट !

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 09/15/2013 - 20:12 नवीन
सुंदर सजावट ! सगळी सजावट कागदाची केलीत हे तर फारच आवडले... टोटली बायोडिग्रेडेबल्. अभिनंदन !
↩ प्रतिसाद: मनिम्याऊ

मस्त!

पैसा
Sun, 09/15/2013 - 20:29 नवीन
ती प्राजक्ताची फुले कागदी वाटतच नाहीयेत!
↩ प्रतिसाद: मनिम्याऊ

उत्तम सजावट

केदार-मिसळपाव
Mon, 09/16/2013 - 19:02 नवीन
मस्त...
↩ प्रतिसाद: मनिम्याऊ

!! गणपती बाप्पा मोरया !!

माझीही शॅम्पेन
Sun, 09/15/2013 - 20:08 नवीन
!! गणपती बाप्पा मोरया !! हा आमच्या घराचा बाप्पा , खरतर लहान पणी पासून एको-फ्रेन्डली कडे कटाक्ष पण मागच्या वर्षी ओळखीचे एकजन हे थर्मा-कोलच मखर फेकून देत ,होते त्यांना म्हंटल आम्हाला द्या , हे परत वापरून आम्ही रीसायकल करतो , आता पुढच्या वर्षी एका मित्राला देवून परत रीसायकल करणार , पुढच्या वर्षी नक्कीच कागदच / फुलंच मखर करणार :) Image removed. थोड जवळून Image removed.

माझा बाप्पाचा फोटो टाकता येत नाही आहे.....

स्मिता शितूत
Sun, 09/15/2013 - 21:10 नवीन
काय करु????

लिंक द्या

पैसा
Sun, 09/15/2013 - 21:36 नवीन
पिकासा/गूगल्/फेसबुक कुठेही असेल तर लिंक द्या.
↩ प्रतिसाद: स्मिता शितूत

आमचा पण बाप्पा.....

नन्दादीप
Mon, 09/16/2013 - 13:02 नवीन
Image removed. Image removed.

बाप्पा

त्रिवेणी
Mon, 09/16/2013 - 14:10 नवीन
हे आमच्या घरचे बाप्पा Image removed. मी बाप्पांना रोज फुलांचा हार नाही घालत, त्या हाराच्या आड बाप्पा लपतात.

बाप्पा२

त्रिवेणी
Mon, 09/16/2013 - 14:14 नवीन
Image removed.

वाह ! एकाहुन एक सरस.

गणपा
Mon, 09/16/2013 - 16:22 नवीन
वाह ! एकाहुन एक सरस.

वाह ! एकाहुन एक सरस.

गणपा
Mon, 09/16/2013 - 16:27 नवीन
वाह ! एकाहुन एक सरस.

गणपती बाप्पा मोरया!

दिपक.कुवेत
Mon, 09/16/2013 - 19:54 नवीन
सर्वच बाप्पा छान आणि सगळ्या सजावटिहि सुंदर.....तमाम स्पर्धकांना बेस्ट ऑफ लक! पुजा आज्जी तु परीक्षक मंडळावर तर नाहिस ना? नाहि सगळ्यांना प्रतिसाद देतेस म्हणुन आपलं विचारलं बरं.

दीपु काका कट्टी फुये

जेनी...
Mon, 09/16/2013 - 20:58 नवीन
:-/ दीपु काका कट्टी फुये तुमच्याशी :-/
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

पुजा आज्जी >>>

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/17/2013 - 00:34 नवीन

पुजा आज्जी

>>> Image removed.
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

सगळ्याच सजावटी फार सुंदर

कवितानागेश
Mon, 09/16/2013 - 22:16 नवीन
सगळ्याच सजावटी फार सुंदर झाल्यायत. इथे बसल्या बसल्या सगळ्यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन झाले. :)

दरवर्षीप्रमाणे आम्ही याही

पेरु
Tue, 09/17/2013 - 09:21 नवीन
दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी पर्थ, ऑस्ट्रेलियात गणपती बसवला. सगळी सजावट घरी केली आहे. एक निरुपयोगी गिफ्ट पेपर होता तो आधी मागे चिटकवुन घेतला. फर्निचर बरोबर थर्मोकोलचे तुकडे आले होते. त्यातल्या दोन चोकोनी तुकड्यांना रंग देउन एकावर एक चिटकवले आणि मागे लावले. कागदावर काही ग्लिटर स्टिकर्स लावले. एक घरात ओढणी होती ती वरती लावली. इथवर आमची सजावट संपली होती. मग चहा ब्रेक झाला. काही उत्साही मंडळी येउन मिळाली आणी मंदिराची आयडिया सुचली. मागच्या वर्शीही मंदीर केले होते पण साधेसे. यावेळेस थोडे वेगळे केले. बेसला काहि नव्हते म्हणुन मग पाटच ठेवला. थर्माकोलचे दोनच खांब होते हे मागे लावले मग उरलेल्या दोन खांबांसाठी संपलेल्या फॉइल पेपरचा जो शेवटचा गोल रिळ उरतो तो वापरला. त्यावर तो एकुलता एक लाल गिफ्ट पेपर चिटकवला. परत कमानिला तोच पेपर (कारण घरात तोच एक प्लेन गिफ्ट पेपर होता ). कमानीवर परत ग्लिटर स्टिकर्स आणि मग शेवटी लायटींग. आणी वर सिलिंगपर्यंत रंगबेरंगी कागद(? त्याला काय म्हणतात बरे?) Image removed. Image removed.

गौरीचे फोटो पण दिलेत तर

पेरु
Tue, 09/17/2013 - 09:23 नवीन
गौरीचे फोटो पण दिलेत तर चालतील का?

आमच्या घरच्या गौरी

नाटक्या
Tue, 09/17/2013 - 09:56 नवीन
Image removed. Image removed. Image removed.

शेवटची तारीख काय आहे?

ऋषिकेश
Tue, 09/17/2013 - 11:21 नवीन
शेवटची तारीख काय आहे? आमच्या मामच्या घरी आम्ही केलेल्या फर्मास सजावटीचा फोटो नेमका मामेभावाच्या क्यामेरात आहे आणि तो कधी पाठवेल हे तो गणरायच जाणे ;)

मंडळी....अवांतर म्हणुन घ्या...

केदार-मिसळपाव
Tue, 09/17/2013 - 22:13 नवीन
तर गेल्या वीकांताला आमच्या घरी गणपती असल्या कारणास्तव सर्व बायरॉइथकरांना (आमच्या गावातल्या मित्रांना) संध्याकाळचे आरतीचे आमंत्रण होते. त्या निमीत्य प्रसाद म्हणुन मोदक आणि मिसळपाव असा बेत होता...आपण तर ब्वा लै खुश झालो होतो. Image removed. Image removed. Image removed. गणपती बाप्पा मोरया....मोदक आणि मिसळपाव खायला या...

माझ्या घरचे बाप्पा .

लौंगी मिरची
Wed, 09/18/2013 - 00:58 नवीन
Image removed. . . . Image removed. . . . Image removed.

मूषक-महाल

जातीवंत भटका
Wed, 09/18/2013 - 01:15 नवीन
दोन आठवडे खपून केलेला बाप्पाचा मूषक महाल. हा महाल थर्माकोल मधे केलेला असून त्यावर अ‍ॅक्रेलीक रंग लावण्यात आला आहे. रंग-संगतीसाठी लाल रंगाच्या वेल्वेट कागदाचा वापर केला आहे. महालाची उंची साधारण ३.५ फूट आणि रूंदी ३ फूट आहे. १. महालाची आकार घेताना. Image removed. २. महाल पूर्ण झाल्यावर .. बाप्पांच्या प्रतिक्षेत.. Image removed. ३. बाप्पा आपल्या मूषक महालात विराजमान झाल्यानंतर ... Image removed. गणपती बाप्पा ! मोरया !

सुन्दर

खटपट्या
Wed, 09/18/2013 - 01:37 नवीन
अतीशय सुन्दर
↩ प्रतिसाद: जातीवंत भटका

सुन्दर.....

मनिम्याऊ
Wed, 09/18/2013 - 14:31 नवीन
खुप सुन्दर
↩ प्रतिसाद: जातीवंत भटका

+१

अविनाश पांढरकर
Wed, 09/18/2013 - 15:01 नवीन
खूप सुन्दर आहे ही सजावट!!!
↩ प्रतिसाद: जातीवंत भटका

आमच्या घरचा गणपती बाप्पा

kanchanbari
Wed, 09/18/2013 - 01:43 नवीन
Image removed.Image removed.

बाल गणेशा

नितिन काळदेवकर
Wed, 09/18/2013 - 14:26 नवीन
हा पहा आमचा बाल गणेशा Image removed. Image removed.

अप्रतिम!

अनन्न्या
Wed, 09/18/2013 - 16:41 नवीन
साय्राच सजावटी पाहत राहाव्या अशा झाल्यात!

मोरया

ब्रिज
Wed, 09/18/2013 - 17:34 नवीन
Image removed. Image removed.

आमचा पण बाप्पा.....

स्मिता शितूत
Fri, 09/20/2013 - 11:14 नवीन
Image removed.Image removed. टाकाऊ पासून टिकावू..........
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा