✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मखर, अर्थात मकरतोरण

प
प्रचेतस यांनी
Sun, 09/15/2013 - 12:32  ·  लेख
लेख
मिपा गणेशोत्सव स्पर्धेतील मिपाकरांनी केलेल्या विविध सुंदर सजावटी, मखरे पाहून मलाही कैतरी फोटू द्यावेसे वाटू लागले. पण सजावट करायच्या कामात मी अगदीच ढ आणि त्यातून उत्साहाने असे काही करायचा प्रचंड कंटाळा. त्यामुळे स्वतः कै करायच्या ऐवजी मध्ययुगीन कालखंडात निर्मिती झालेल्या काही मंदिरांवर असलेल्या मखरांचे फोटू द्यायचा विचार केला. मखर, याचा उगम मकर अथवा मगरापासून होतो. मगरीच्या (मकराच्या) मुखातून निघालेले तोरण म्हणजे मकरतोरण. याचाच पुढे अपभ्रंश होत जाऊन आजचे मखर तयार झाले. काळानुरूप बदल होत जाऊन हल्ली तोरणाचा उगम मूळ मकरमुख जरी फारसे दिसत नसले तरी नक्षी मात्र अगदी तशीच आहे. १. वेरूळच्या कैलास लेण्यातील गंगा. बघा ही मकरावर आरूढ असून तिच्या दोन्ही बाजूंच्या स्तंभांवर मकरतोरण आहे. a २. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील महावीराची प्रतिमा. मस्तकी असलेल्या कळसावर मकरतोरण आहे. a ३. खिद्रापूरच्याच मंदिराच्या बाह्यभिंतीवरील अजून एक मकरतोरण a ४. खिद्रापूरच्याच मंदिराच्या बाह्यभिंतीवरील अजून एक मकरतोरणांकित प्रतिमा a ५. सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील स्तंभावरील माहेश्वरी (प्रतिहारी) a ६. गोंदेश्वराच्याच स्तंभावरील अजून एक मकरतोरण a ७. अंजनेरीच्य विष्णूमंदिरातील वैष्णव प्रतिहार a ८. अंजनेरीच्या विष्णूमंदिराच्या बाह्य भागावरील मकरतोरणात असलेला विदारण नरसिंह a ९. नारायणपूरच्या नारायणेश्वराच्या राऊळातील शैव प्रतिहार a १०. भुलेश्वर मंदिरातीलल मकरतोरण सभोवती असलेला भैरव प्रतिहारी a ११. भुलेश्वरातील मकरतोरणांकित मूषकारूढ विनायकी, नंदीवर आरूढ असलेली माहेश्वरी आणि मयुरारूढ कौमारी a १२. भुलेश्वरातील मकरतोरणांकित प्रेतवाहिनी चामुंडा, गजारूढ ऐन्द्री a १३. सिन्नरच्या ऐश्वर्येश्वर मंदिरातील अत्यंत देखणे मकरतोरण. मध्यभागी शिवतांडवनृत्य a १४. हे मकरतोरण मात्र सर्वात अर्वाचीन. पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिराच्या दर्शनी भिंतीवर. १८ व्या शतकातील. a
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती

प्रतिक्रिया द्या
35968 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

वा..

स्वाती दिनेश
Sun, 09/15/2013 - 12:55 नवीन
माहिती आणि शिल्पे दोन्ही आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

पैसा
Sun, 09/15/2013 - 12:55 नवीन
मखराची कूळकथा आवडली. तोरणात मकराला स्थान द्यायचं काय विशेष कारण असावं? मकर हे गंगेचं वाहन मानलं गेलं. गजेंन्द्र मोक्षाची कथा मकराशी संबंधित. तसाच "सुंदर ते ध्यान" अभंगात "मकर कुंडले तळपती श्रवणी" असा उल्लेख विठोबाच्या बाबत आहे. यात कुंडलांनाही मकराचा आकार आहे का?
  • Log in or register to post comments

तोरणात मकराला स्थान द्यायचे

प्रचेतस
Sun, 09/15/2013 - 15:16 नवीन
तोरणात मकराला स्थान द्यायचे नक्की कारण माहीत नाही बहुतेक शिल्पात येणारी लयबद्धता हेही कारण असावे किंवा मकर पवित्र मानले जात असावे. बाकी मकर हे गंगेबरोबरच वरूणाचेही वाहन आहे. बाकी विष्णूच्या कानात मकर कुंडले असतात त्यामुळे विठोबाच्याही ती असल्यास त्यात काही नवल नाही. हा वेरूळ लेणीतील मकरारूढ वरूण Image removed. आणि ही दिवेआगरमधली विष्णूच्या कानातील मकरकुंडले (१२ वे शतक) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मखराची नवीन ओळख आवडली.

त्रिवेणी
Sun, 09/15/2013 - 13:07 नवीन
मखराची नवीन ओळख आवडली.
  • Log in or register to post comments

वल्लीबुवा सुरेख तोरण लावलेत

अभ्या..
Sun, 09/15/2013 - 13:41 नवीन
वल्लीबुवा सुरेख तोरण लावलेत तुम्ही कलादालनात. धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे. भुलेश्वरातील तोरणावरील डिझाईन अप्रतिम, सिन्नरच्या ऐश्वर्येश्वर मंदिरातील तोरण पाहून हे दगडात कोरलेले मानवनिर्मित काम वाटतच नाही. सध्या दिसणार्‍या मंदिरातील सोनेचांदीच्या प्रभावळीतपण मकर आहेच. पण या तोरणाच्या शीर्षस्थानी असणार्‍या मुखासंबंधी सांग ना. काही म्हणतात तो वीरभद्र तर काही महिष.
  • Log in or register to post comments

तोरणाच्या शीर्षस्थानी

प्रचेतस
Sun, 09/15/2013 - 15:17 नवीन
तोरणाच्या शीर्षस्थानी किर्तीमुख असते. थोडक्यात सिंहमुख. मंदिरात येऊ पाहणार्या दुष्ट शक्तींना किर्तीमुखे रोखत असतात अशी मूळ धारणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

वल्ली साहेब,

नि३सोलपुरकर
Tue, 09/17/2013 - 12:31 नवीन
खुपच छान माहिती दिलीत मकर आणी सिंहमुखाबाबत. साउथ मध्ये बर्याच घरांवर/ मंदिरांवर सिंहमुखाची प्रतिमा दिसते. अवांतर:आपल्या अभ्यानेही लावलेले आहे"सिंहमुखाची प्रतिमा "त्याने घरी गणपतीसाठी केलेल्या सजावटीवर...हो की नाही रे अभ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अ‍ॅज युज्वल छानच लेख!

प्यारे१
Sun, 09/15/2013 - 14:38 नवीन
अ‍ॅज युज्वल छानच लेख!
  • Log in or register to post comments

+१

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/15/2013 - 17:37 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

+२

मोदक
Mon, 09/16/2013 - 00:52 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

व्वा. छानच

चित्रगुप्त
Sun, 09/15/2013 - 14:47 नवीन
व्वा. छानच. अगदी पूर्वी वास्तु लाकडाच्या असत, त्यातील अवश्यक बाबी (उदा. लाकडी खांबांवर तुळया टाकताना दिलेले रुंद टेकू, तसेच तुळयांची भिंतींच्या बाहेर निघणारी टोके इ.) पुढे लेणी खोदताना आवश्यक नसूनही त्या खोदल्या जात. याची उदाहरणे आहेत का काही तुमच्या फोटोंमधे? Image removed...Image removed.
  • Log in or register to post comments

तशी बरीच उदाहरणे आहेत.

प्रचेतस
Sun, 09/15/2013 - 15:23 नवीन
तशी बरीच उदाहरणे आहेत. हे पहा वेरूळचे सुतार लेणे. हे चैत्यगृह आहे. पण याची रचना हुबेहूब लाकडी कामासारखी केलीय. Image removed. हा पहा अजिंठ्याचा चैत्य. इथे छतावरील लाकडी फासळ्यांची जागा अखंड कोरीव दगडी फासळ्यांनीच घेतलीय. Image removed. आणि तुम्ही वर दिलेत तशा शैलीत असणारा देवगिरी किल्ल्यातील हा दगडी सज्जा. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अतिव सुंदर ! तुमचा जुन्या

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 09/15/2013 - 15:41 नवीन
अतिव सुंदर ! तुमचा जुन्या शिल्पकलेचा अभ्यास आणि त्यांच्या चित्रांचा खजिना आश्चर्यचकीत करणारा आहे. मकर आणि नाग (आणि काही ठिकाणी सिंहसुद्धा) अतिपूर्वेला जाता जाता त्यांचा काल्पनिक संकर होऊन ड्रॅगन बनला असावा काय? ड्रॅगनही असाच प्रवेशद्वारावर अथवा घरावर पहारा देत दुष्ट शक्तींना पिटाळून लावतो असे तिकडे समजतात.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

प्रचेतस
Sun, 09/15/2013 - 19:41 नवीन
मकर आणि नाग (आणि काही ठिकाणी सिंहसुद्धा) अतिपूर्वेला जाता जाता त्यांचा काल्पनिक संकर होऊन ड्रॅगन बनला असावा काय?
त्याबद्दल नक्की काही सांगता येत नाही. पण जगातील बहुतेक प्राचीन संस्कृतींमध्ये काही ना काही गोष्टी समान आहेत. ड्रॅगनचे मूळ कितपत जुने ते काही माहित नाही. पण हा अजिंठा लेणीतील १७ च्या क्रमांकाच्या विहारातील हे चित्र रोचक ठरावे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

यावरून आठवले

चित्रगुप्त
Sun, 09/15/2013 - 16:35 नवीन
यावरून आठवले, मी बरेच वर्षांपूर्वी नाशिकची लेणी बघत एकटाच फिरत होतो, अजिबात गर्दी नव्हती. एका लहान खोलीत असणार्‍या दगडी पलंगावर आडवा झालो तेंव्हा अगदी सिनेमातल्या प्रमाणे मला भास झाला, की मी पूर्वी (पूर्वजन्मी??) याच खोलीत रहात असे, आणि माझी काहीतरी महत्वाची वस्तु खोलीबाहेरच्या लहानश्या खोबणीत राहून गेली होती. बाहेर येऊन बघतो तो आधी नजरेस न पडलेली लहानशी खोबण खरोखरच तिथे होती. मी यंत्रवत त्या खोबणीत हात घालून काही शोधण्याचा प्रयत्न करत राहिलो. नंतर एका मोठ्या दालनात गेल्यावर माझा तिथे भर सभेत वध झाल्याचा भास झाला...
  • Log in or register to post comments

तुमी ना काका लगीच सुरू

पाषाणभेद
Sun, 09/15/2013 - 19:43 नवीन
तुमी ना काका लगीच सुरू व्हत्यात. बाकी वेगळाच विषय अन फोटोही वेगळेच. या लेणी खोदणार्‍यांची कमाल आहे. दिवेआगरमधली विष्णूच्या कानातील मकरकुंडले (१२ वे शतक) असलेला फोटो तर कमाल आहे. आजकालच्या नट्या मेकअप करून चेहेरा गुळगुळीत करतात. ही तर दगडी मुर्ती असून किती गुळगुळीत चेहेर्‍याची आहे. कमाल आहे अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अहो खरेच घडले होते असे.

चित्रगुप्त
Sun, 09/15/2013 - 21:39 नवीन
अहो खरेच घडले होते असे. चेष्टा नव्हे. पार विसरून गेलो होतो, हा धागा वाचताना एकदम आठवले म्हणून लिहिले.
  • Log in or register to post comments

सुंदर..

चिगो
Sun, 09/15/2013 - 22:27 नवीन
वल्ली म्हणजे एक कलंदर माणूस आहे.. कामाच्या रहाटगाड्यात अशी चिकीत्सक वृत्ती आणि सौंदर्यदृष्टी जिवंत ठेवायची म्हणजे काही साधेसुधे काम नाही.. धाग्यातील माहिती आणि छायाचित्रे अत्यंत आवडली..
  • Log in or register to post comments

फोटो अप्रतिम , माहिती पण

sanjivanik१
Sun, 09/15/2013 - 22:33 नवीन
फोटो अप्रतिम , माहिती पण intresting
  • Log in or register to post comments

अप्रतिम

साती
Mon, 09/16/2013 - 08:42 नवीन
अप्रतिम चित्रे आणि माहिती. वल्ली, धन्यवाद. मखरचा अर्थं खरेच माहिती नव्हता.
  • Log in or register to post comments

देवा! डोळे मिटुन परंपरा

स्पंदना
Tue, 09/17/2013 - 07:13 नवीन
देवा! डोळे मिटुन परंपरा पाळणारे आम्ही मूढ! उगा वल्ली बाबा सांगतात म्हणुन नजर जाते, नाहीतर "लय भारी" म्हणा अन व्हा पुढे!
  • Log in or register to post comments

तुझ्या अभ्यासाला दंडवत.

मृत्युन्जय
Tue, 09/17/2013 - 12:50 नवीन
तुझ्या अभ्यासाला दंडवत. फोटोही सुरेख.
  • Log in or register to post comments

+१

विटेकर
Tue, 10/08/2013 - 18:30 नवीन
दंडवत ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अप्रतिम चित्रे!!!! खिद्रापूर,

बॅटमॅन
Tue, 09/17/2013 - 18:03 नवीन
अप्रतिम चित्रे!!!! खिद्रापूर, सिन्नर आणि भुलेश्वर येथली तोरणे निव्वळ थोर!!!! वल्लीच्या अभ्यासाला एक कडक सॅल्यूट _/\_
  • Log in or register to post comments

वल्ली साहेब, खरच ऐकदम सुंदर. तुम्ही ही व इतर अजुन काही लेख

निश
Tue, 09/17/2013 - 18:18 नवीन
वल्ली साहेब, खरच ऐकदम सुंदर. तुम्ही ही व इतर अजुन तुमचे काही लेख पुस्तक रुपात संकलित का करत नाहीत. ह्यात तुम्ही दिलेली माहीती व फोटो फार ऊपयुक्त व ईतिहासाची आवड असणार्‍या लोकांना फार मोलाची मदत करु शकतील.
  • Log in or register to post comments

+++++१११११

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/18/2013 - 22:36 नवीन
+++++१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

अप्रतिम

kalpana joshi
Tue, 10/08/2013 - 17:49 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

खूपच

सुमीत भातखंडे
गुरुवार, 10/10/2013 - 10:45 नवीन
छान. सगळीच चित्रं सुरेख
  • Log in or register to post comments

उत्तम चित्रे.

सस्नेह
गुरुवार, 10/10/2013 - 12:28 नवीन
शिल्पे नुसती पाहणे अन संकलन -विश्लेषण यांसहित पाहणे यात किती फरक आहे हे जाणवले. बादवे, मखराचे महत्त्व काय होते हे जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

एक अप्रतिम संग्रह!

आयुर्हित
Wed, 03/05/2014 - 23:16 नवीन
बरीच मेहनत करावी लागलेली आहे हे सर्व ठिकाणे भेट देण्यासाठी..... उत्कृष्ट आणि माहितीपूर्ण लेख व एक अप्रतिम छायाचित्रे संग्रह! धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अजोड ......

सुधीर कांदळकर
Sun, 03/09/2014 - 07:09 नवीन
या दर्जाची इतक्या संख्येने, एवढ्या विविध ठिकाणाहून काढलेली छायाचित्रे? वा! व्यासंग असावा तर असा!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा