गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व मिपाकरांना :)
साहित्यः
एक लिटर फुल फॅट दुध
३-४ टेस्पून पिठीसाखर (आवडीप्रमाणे कमी - जास्तं)
२ टेस्पून लिंबाचा रस
१/४ टीस्पून केशर
१/४ टीस्पून वेलचीपूड
१/२ टीस्पून पिस्त्याचे काप
बर्फाचे तुकडे
पाकृ:
मध्यम आचेवर कढईत दूध तापवायला ठेवावे.
दूधाला उकळी आली की त्यात लिंबाचा रस थोडा-थोडा करून घालावा व सतत ढवळावे.
दूध फाटायला / नासायला लागून त्याचे पाणी (व्हे) वेगळे होऊ लागेल.
त्यात बर्फाचे तुकडे घालून गॅस बंद करावा व बर्फ पूर्ण वितळेपर्यंत ढवळत रहावे.
चाळणीत स्वच्छ कापड ठेवून त्यात तयार केले पनीर गाळून घ्यावे.
कापडाची पोटली तयार करून शक्य तेवढे पाणी पिळून काढून टाकावे.
थंड पाण्याच्या नळाखाली पोटली धुवावी म्हणजे लिंबाचा वास जाईल.
१ तास पोटली टांगून ठेवावी.
एका तासानंतर पनीरला एका ताटात काढून, केशर घालून चांगले ४-५ मिनिटे मळावे. पनीर अगदी मऊसूत झाले पाहीजे.
त्यात पिठीसाखर घालून एकत्र करावे.
मंद आचेवर नॉन-स्टीक पॅनमध्ये पनीरचे मिश्रण ४-५ मिनिटे परतून घ्यावे. (ह्याला नोरोम पाक म्हणतात)
मिश्रण पॅन सोडू लागले कि ताटात काढून , गरम असतानाच मळावे. (हाताची काळजी घेणे)
मिश्रणात वेलचीपूड घालावी, थोडे पिस्ते ही घालावे व पुन्हा थोडे मळावे.
मी मोदक बनवण्यासाठी पेढे मोदकांचा साचा वापरलाय तसेच बंगाली लोकं साँदेश मिठीई बनवण्यासाठी टेराकोटा किंवा दगडी साचा वापरतात, तो ही वापरलाय.
साच्याला तुपाचा हात फिरवून, मिश्रण कोमट असताना साच्यात घालून मोदक तयार करुन घेणे.
पिस्त्याचे काप लावून सजवावे व बाप्पाला नैवेद्य दाखवून खावे :)
टीपः
पनीर + साखरेचे मिश्रण फार वेळ परतायचे नाही , परतले गेले तर तर साँदेश चिवट व कडक होतात. अशा प्रकाराला कोरा पाक साँदेश असे म्हणतात.
पनीर + साखरेचे मिश्रण न परतता सर्व्ह केले तर कांचागोला साँदेश असे म्हणतात.
साखरेऐवजी खेजुर गुर (खजुराचा गुळ / साधा गुळ) वापरुन साँदेश बनवता येतं.
साचा नसेल तर गोळे बनवून ही साँदेश सर्व्ह करता येतील.
एका तासानंतर पनीरला एका ताटात काढून, केशर घालून चांगले ४-५ मिनिटे मळावे. पनीर अगदी मऊसूत झाले पाहीजे.
त्यात पिठीसाखर घालून एकत्र करावे.
मंद आचेवर नॉन-स्टीक पॅनमध्ये पनीरचे मिश्रण ४-५ मिनिटे परतून घ्यावे. (ह्याला नोरोम पाक म्हणतात)
मिश्रण पॅन सोडू लागले कि ताटात काढून , गरम असतानाच मळावे. (हाताची काळजी घेणे)
मिश्रणात वेलचीपूड घालावी, थोडे पिस्ते ही घालावे व पुन्हा थोडे मळावे.
मी मोदक बनवण्यासाठी पेढे मोदकांचा साचा वापरलाय तसेच बंगाली लोकं साँदेश मिठीई बनवण्यासाठी टेराकोटा किंवा दगडी साचा वापरतात, तो ही वापरलाय.
वाचने
10357
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै भारी...! त्या माश्याच्या
व्वा व्वा ! काय सुरेख आहे
अहाहा!
का गो? मत्स्यावतार हाच ना
In reply to अहाहा! by पैसा
@अॅवटॅर? =))
In reply to का गो? मत्स्यावतार हाच ना by यशोधरा
ह्सता काय स्मायल्यापंत?
In reply to @अॅवटॅर? =)) by अत्रुप्त आत्मा
ते अॅवटॅर... उच्चारी वाचताना
In reply to ह्सता काय स्मायल्यापंत? by यशोधरा
एनाराय लोकांशीसांवाद होतो
In reply to ते अॅवटॅर... उच्चारी वाचताना by अत्रुप्त आत्मा
@क्षीण प्रयत्न हो! >>> असा
In reply to एनाराय लोकांशीसांवाद होतो by यशोधरा
हा हा हा
In reply to ते अॅवटॅर... उच्चारी वाचताना by अत्रुप्त आत्मा
ते मासे नाहीत... नदीची फळं
In reply to अहाहा! by पैसा
हाहाहा!
In reply to ते मासे नाहीत... नदीची फळं by डॉ सुहास म्हात्रे
साँदेश भीषण भालो!
In reply to ते मासे नाहीत... नदीची फळं by डॉ सुहास म्हात्रे
अप्रतिम....
हो नुसतेच
In reply to अप्रतिम.... by दिपक.कुवेत
टोकवाले नॉरम नॉरम मोदक आवडले.
मस्त...
खुप मस्त... एकदा करुन बघायला
मस्त!
क्लास्स्स्स!
सोपे
व्हिनीगार
व्हिनेगर चालेल
In reply to व्हिनीगार by मीनल
सह्हिच !! कसल भारी दिसतय लगेच