नमस्कार मंडळी,
मिपा ला जसे नीलकांत प्रशान्त सारखे तंत्रज्ञ , तात्या, ई. एक्का, गवि, रामदास यांच्या सारखे लेखक,( आयला इतरांची नावे घेतली नाही म्हणून आमच्या नावाने श़ंख नको . बरेच आहेत हे "बेशर्त" कबूल !!! ) तसे सौ उ. स्पा व ( आणि डॉ, काशीनाथ घाणेकर या चालीवर ) अभ्या सोलापूर वाले सारखे ग्राफिक आर्टिस्ट लाभलेयत ! आपले नशीब दुसरं काय ! ( चांगल्या अर्थाने !)
तर सांगायचं काय ! आपल्याला वेळोवेळी लागणारी ब्यानर वेळेत इथे लावणारे श्री अभ्या यांचे कवतिक उर्फ रसग्रहण ईई करण्यासाठी ह्या धाग्याचा उपदव्याप !
चौ रा रसग्रहण मोड ऑन --
मिपाच्या सातव्या वर्षातील पदार्पणाच्या निमित्ताने नुकतेच एक ब्यानर मिपावर आले आहे. त्याचे पहिले वैशिष्ट असे की मिसळीतील शेवेचा पिवळा रंग तसेच तर्रीचा लाल रंग यांच्या विविध छटा वापरून मिपाशी अभ्या यांची प्रतिभा कशी एकरूप झाली आहे हे दिसून येते. मिसळीवर हिरवीगार कोथिंबीर घातल्या शिवाय गार्निशींग होत नाही. सबब त्याचीही काळजी अभ्या यानी किती कल्पकतेने घेतली आहे ते पहा !! आ हा हा ! चित्राच्या वरच्या कडेला पसरलेली कोथिंबीर व त्याच बरोबरचे टमाटो चे चिप्स दिसत आहेत. वर मिपा असे लिहिलेला भाजलेला पापड ही दिसत आहे.वा वा ! बाजूला मिपा अशी अक्षरे असलेले गणपती बाप्पा दिसत आहेत. हाटेल मालक बहुदा परम गणपती भक्त आहेत. त्यानी लावलेला हा गजानन मिपावर कृपा दृष्टी ठेवून आहे. पण त्या नजरेतून जरब ही दिसत आहे. आपले संपादक मंडळ कृपा व जरब यांचा सुरेख संगम साधून आहे याचा अभ्या याना किती 'अभ्या' स आहे हे दिसून येते. ( अभ्या खाजगीत म्हणतात " संम काहींवर ठरवून कृपा करते तर काहींवर जरब ( ठरवून) ठेवते . असो .) शेवे तही गाठी, भावनगरी ,बारीक शेव असे प्रकार असतात त्याची दखलही अभ्या यानी घेतली आहे. आता 'आपल्या मिपाचे; ही ओळ पहा ना त्याला लेअर स्टाईल चा वापर करून चिझलींग केले आहे म्हणजे गाठी तयार झाली. मधली तांबडट लाईन तिखट शेवेची आहे. खालची " गणेशेत्सवाच्या" ही ओळ पहा त्यात तुम्हाला बारीक पिवळ्या रंगाची शेव दिसेल व मधून मधून नारळाच्या खवाचे गार्निशिंग ही ! वा अभ्या जी क्या बात है !
हे सारे ब्यानर म्हणजे नव वधू प्रिया मी बावरते सारखी गूढगुंजनात्मक कविता वाटते आहे.
चौ रा रसग्रहण मोड ऑफ
अभ्या बॅनर मस्त झालेय !
च उ रा ( चहाटळ उचकवू राजा )
वाचन संख्या
6313
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहा. एक नंबर.
अरे हो !
In reply to हाहाहा. एक नंबर. by प्रचेतस
मला ते नुकतेच बिळातुन बाहेर पडत असलेल्या नागासारखि दिसणारी
In reply to हाहाहा. एक नंबर. by प्रचेतस
हे सारे ब्यानर म्हणजे नव वधू
अभ्या अप्रतिम क्यालीग्राफी
अभ्या,
बेष्ट !
संम काहींवर ठरवून कृपा करते तर काहींवर जरब ( ठरवून) ठेवते .अप्रतिम .
रस ग्रहण .........
रसग्रहणाचे रसग्रहण !
जबरदस्त...
मस्तच!
बॅनर मस्त झालायं.
अभ्या आहेच गुणी!!!! त्याचे
मस्त रसग्रहण... विशेषतः
+१११११११११११११
In reply to मस्त रसग्रहण... विशेषतः by डॉ सुहास म्हात्रे
जबरा..
अभ्याचा
अभ्याला आम्ही १००१ चं बक्षिस
सांगिटलो आहे.
In reply to अभ्याला आम्ही १००१ चं बक्षिस by प्यारे१
परतेक्ष भेटून जाहीर सांगिटलो
In reply to अभ्याला आम्ही १००१ चं बक्षिस by प्यारे१
जबरदस्त गुण उधळले आहेत अभ्या.
लई गुणाचे पोर हाय पघा
मस्तच
अभ्याची नेहमीच आम्हाला मदत
मिपाच्या अक्षरांत गणपतीबाप्पा
माणणीय अब्याडब्या ब्यानर कर!
माणणीय अब्याडब्या ब्यानर कर!
;) यांचे हार्दिक अभिनंदन!या अभ्याचे आभार मानवे तितके
मस्त रे..
उत्तम लेख
इस बात पे सलाम!
In reply to उत्तम लेख by श्रीरंग_जोशी
हे बर झाल की अभ्या....साठी एक
हल्लीच खफ वरून कळलं होतं
बॅनर आणि त्याची कल्पना