✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३

स
संपादक मंडळ यांनी
Sun, 09/08/2013 - 23:42  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, गणपती हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा! अंत्यत श्रध्देने आणि मोठ्या भक्तीभावाने हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या बरोबरीने महाराष्ट्रात घरोघरही जवळपास १२ ते १५ लाख बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यांच्या आगमनापुर्वीच घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येकजण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो, मग ते दिव्यांची आरास असो वा फुलांची तोरणे, थर्माकॉलचे आकर्षक मखर असो वा गणेशाची सुंदर मुर्ती! हि सजावट अगदी मनोभावे आणि जोरदार केली जाते. घरगुती गणपतींना होणारी ही सजावट लक्षात घेता मिपा व्यवस्थापनाने यावर्षीपासून घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. आपणा सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल, त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या घरात गणपतीभोवती केलेल्या सजावटीचा फोटो इथे टाकायचा आहे. येणार्‍या सजावटींमधून सर्वोत्तम तीन सजावटींना मिपा व्यवस्थापनातर्फे पुस्तक स्वरूपात पुरस्कार दिले जातील. त्यासंबधीची इतर माहिती नंतर कळवण्यात येईलच. चला तर मग!! होऊन जाऊ द्या घरातली सजावट एकदम जोरदार !! स्पर्धेचे नियम आणि अटी खालीलप्रमाणे :- १) स्पर्धेचा सहभाग सर्वांना खुला असेल. २) प्रत्येक स्पर्धकाने फक्त आपल्याच घरातल्या सजावटीचा फोटो टाकायचा आहे. ३) स्पर्धकाला प्रत्येकी २ फोटो टाकता येतील. ४) आपले फोटो इथेच प्रतिसादामध्ये टाकायचे आहेत. ज्या स्पर्धकांना फोटो टाकण्यात अडचण येईल, त्यांनी व्यक्तिगत निरोपाद्वारे संपादक मंडळ या आयडीला कळवायचे आहे. ५) आलेल्या सजावटींमधून सर्वोत्तम तीन निवडण्याचा अंतिम निर्णय परिक्षकांकडे राहील.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
277764 वाचन

💬 प्रतिसाद (138)

प्रतिक्रिया

अभ्या,

किसन शिंदे
गुरुवार, 09/12/2013 - 12:07 नवीन
अभ्या, स्पर्धेसाठीचे निकष हे फक्त तू सजावट कशी केलीयेस याच्यावर आहेत, मग ती इकोफ्रेंडली असो किंवा आणखी वेगळ्या तर्‍हेची. गणपतीभोवती कलात्मकतेने केलेल्या सजावटी बरोबर घरी बनवलेल्या सुंदर आणि कलात्मक मखरांचाही या स्पर्धेसाठी विचार केलाही जाईल. परिक्षणाची जबाबदारी काही जेष्ठ मिपाकर पाहत आहेत.
↩ प्रतिसाद: अभ्या..

टाकाउतून शोभा ....

चौकटराजा
Wed, 09/11/2013 - 18:55 नवीन
Image removed. Image removed. यावर्षी देशाची आर्थिक घसरण होत असल्याने काटकसरीचा मेसेज आमच्या पुढच्या पिढीला देण्यासाठी वरील प्रकारे सजावट केलीय. मखरासाठी जुन्या लग्न पत्रिकांचा वापर केला आहे. मागचा गुलाबी पडदा हा जुन्या तलम ओढणीतून विरळ झालेला भाग बाजूला करून उरलेला भाग वापरलेला आहे. तो ज्याच्यात अडकविला आहे ती धातूची नळी जुन्या वाकलेल्या अ‍ॅल्युमिनियमच्या हँगर पासून बनविली आहे. बाप्पाचा मुकुट त्यावरील चमकते खडे सर्व जुन्या वापरलेल्या वस्तूंपासून मिळवले आहेत.लोडात दोरा संपलेली रिळे टाकून त्यावर कापूस गुंडाळला आहे. व जुन्या जॅकॉर्ड साडीचा तुकडा खोळीसाठी वापरला आहे. बाप्पाचा प्रसाद मात्र ताज्या मालापासून बनविला आहे.

पहील्या चीत्रातील प्रकाश

खटपट्या
गुरुवार, 09/12/2013 - 03:50 नवीन
पहील्या चीत्रातील प्रकाश योजना आवडली
↩ प्रतिसाद: चौकटराजा

सर्वच स्पर्धकांचे फोटो आवडले

मदनबाण
Wed, 09/11/2013 - 20:42 नवीन
सर्वच स्पर्धकांचे फोटो आवडले ! :) @आत्माराव :- रांगोळी लयं भारी ! @मृत्युन्जय :- मोराची आणि कोयरीची नक्षी सुरेख आहे. :) @जय - गणेश :- काळ्या पार्श्वभुमीवर फिरणारे रंग सुंदर दिसत आहेत. @केदार-मिसळपाव :- अशी समई पहिल्यांदाच पाहिली. @अनन्न्या@:- दुसरा फोटो आवडला,बाप्पा आणि मखर दोन्ही गोड. @मीनल :- देव्हार्‍याची नाजुक सजावट आवडली. बाप्पा समोरची उदबत्ती "मसाला" श्रेणीतली वाटते. मला स्वतःला मसला उदबत्तीच आवडते,आणि सेंटेड मी कधीच घेत नाही. उदबत्यांमधे मला म्हैसुर किंग आणि वुड्स फार आवडते. @आश :- जबराट ! :) @gaikiakash :- मस्त. @sneharani :- फुलचामधला छोटासा बाप्पा आवडला. :) चौकटराजा :- खरयं ! मंदीचा परिणाम जाणवण्या इतपत वातवरण आहे खरे. बाप्पाची मूर्ती आवडली.

मिपा मस्तच.

प्यारे१
गुरुवार, 09/12/2013 - 03:40 नवीन
छान उपक्रम. सग्गळेच 'गणपती' आवडले, सजावटींसकट! (आशचा गणपती डाएटवर नि स्नेहाराणी चा गणपती फुलांनी झाकला गेला असल्याने 'गुप्त' दिसतोय. उसेन बोल्टला सोंड नसल्यानं त्याला गणपती मानत नाहीये. ;) सग्गळ्या फोटोंचा विचार केल्या गेला आहे. :) )

गणपती बाप्पा मोरया

दीपा माने
गुरुवार, 09/12/2013 - 04:09 नवीन
सर्वच गणपती सुंदर आणि सजीव वाटतात. आपल्या मनातल्या भावाप्रमाणे ते आपल्याला दिसतात. माझ्यामते सर्वच स्पर्धक विजयी आहेत.

माझ्या घरचा गजानन!

स्पंदना
गुरुवार, 09/12/2013 - 07:23 नवीन
Image removed. Image removed. Image removed. बरीचशी सजावट (फुलांची) मुलीने केली आहे.

हा आमच्या घरचा बाप्पा.

सस्नेह
गुरुवार, 09/12/2013 - 08:11 नवीन
Image removed. Image removed. एक शिक्रेट सांगते. ते महिरपीचे खांब आहेत ना ? ते म्हणजे चक्क मच्छरदाणी स्टँड आहे !

माझा बाप्पा...

जोशी 'ले'
गुरुवार, 09/12/2013 - 09:40 नवीन
माझा बाप्पा... Image removed. Image removed. Image removed. Image removed. थर्माकोल वापरुन हि बाप्पा ची सजावट केलीय व मेटॅलीक पेस्टल कलर्स वापरलेत :-) बाप्पा मात्र इकोफ्रेंडली आहेत :-)

सहिये एकदम .... आवडली सजावट !

जेनी...
गुरुवार, 09/12/2013 - 10:22 नवीन
सहिये एकदम .... आवडली सजावट !
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

झाकच की...

केदार-मिसळपाव
गुरुवार, 09/12/2013 - 13:08 नवीन
छान आकार दिलाय..प्रत्यक्ष बघतांना अधिक सुंदर दिसत असेल फोटोत दिसतोय त्याच्यापेक्षा हे मात्र नक्की सांगु शकतो.
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

सुंदर !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 09/12/2013 - 17:03 नवीन
सुंदर !
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

मस्त

सुमीत भातखंडे
गुरुवार, 09/12/2013 - 09:52 नवीन
आहेत सजावटी. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया!!!

एकापेक्षा एक , मस्तच

अमोल केळकर
गुरुवार, 09/12/2013 - 12:56 नवीन
एकापेक्षा एक , मस्तच :) सर्वांना ( बाप्पांना ) साष्टांग नमस्कार ! अमोल केळकर

गणपती बाप्पा मोरया!

विटेकर
गुरुवार, 09/12/2013 - 15:31 नवीन
Image removed. Image removed. सारी सजावट घरीच केली आहे. मगचे मोर थर्माकोलचे विकत आणले आहेत. माझ्यापेक्षा सहधर्मचारिणीचा सहभाग जास्त आहे.. माझा आपला खारिचा वाटा !

.

दादा कोंडके
गुरुवार, 09/12/2013 - 16:22 नवीन
असल्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणार्‍या संपादक मंडळाचा निषेध!

गणपती बाप्पा मोरया !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 09/12/2013 - 17:04 नवीन
गणपती बाप्पा मोरया !
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

.

दादा कोंडके
गुरुवार, 09/12/2013 - 17:20 नवीन
गणपतीच्या बैलाला उंदराला हो!!!
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

गणपती बाप्पा मोरया !!!!!

जेनी...
गुरुवार, 09/12/2013 - 18:59 नवीन
गणपती बाप्पा मोरया !!!!!
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

.

दादा कोंडके
गुरुवार, 09/12/2013 - 19:41 नवीन
" सबका पती ' पती ' :) ... तेरा परी ' गणपती ' :P "
↩ प्रतिसाद: जेनी...

मोरया!

पैसा
गुरुवार, 09/12/2013 - 19:56 नवीन
गणपतीबाप्पा मोरया!
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

घ्या..

दादा कोंडके
Sun, 09/15/2013 - 11:33 नवीन
आता पार्वतीकाकूच अल्या की! ;)
↩ प्रतिसाद: पैसा

पारवतीच्या बाळा

अभ्या..
Sun, 09/15/2013 - 14:24 नवीन
पारवतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा ;)
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

आमच्या घरचे बाप्पा

स्मिता चावरे
गुरुवार, 09/12/2013 - 17:22 नवीन
Image removed. Image removed. Image removed.

छान आहे

केदार-मिसळपाव
गुरुवार, 09/12/2013 - 18:27 नवीन
कमळ सुंदर झाले आहे.
↩ प्रतिसाद: स्मिता चावरे

सुंदर

सुधीर
Sun, 09/15/2013 - 13:59 नवीन
कमळ सुंदर आहे. इतर मिपाकरांचेही फोटो आवडले.
↩ प्रतिसाद: स्मिता चावरे

सुंदर सजावटी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/12/2013 - 18:49 नवीन
आनंद वाटतोय सर्वांच्या सजावटी पाहतांना. -दिलीप बिरुटे

+१

विकास
गुरुवार, 09/12/2013 - 19:20 नवीन
१००% सहमत! खुपच सुंदर! सर्वांचेच (त्यात असे उत्साही भक्त मिळाले म्हणून बाप्पा पण आले :) ) अभिनंदन!
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्या घरचे गौरी-गणपती बाप्पा.

मानस्
गुरुवार, 09/12/2013 - 19:17 नवीन
Image removed.Image removed. Image removed.

अरे वा!

विकास
गुरुवार, 09/12/2013 - 19:20 नवीन
आता गौरीपण आल्या! खुपच छान!
↩ प्रतिसाद: मानस्

+१

दादा कोंडके
गुरुवार, 09/12/2013 - 19:43 नवीन
खुपच छान!
सहमत. - (गणपतीत 'गौरी' बघायला जाणारा) दादा
↩ प्रतिसाद: विकास

या वर्षी घरी काही बनवायला

मानस्
गुरुवार, 09/12/2013 - 19:26 नवीन
या वर्षी घरी काही बनवायला वेळच नाही झाला. मग बाहेरून तयार मखर आणले. गणपती बाप्पा सधिभोळी भक्ती मानून घेओत ही प्रार्थना.
↩ प्रतिसाद: मानस्

जाम धमाल येतेय सर्वांच्या

स्पा
गुरुवार, 09/12/2013 - 20:26 नवीन
जाम धमाल येतेय सर्वांच्या घरच्या गणपतींचे दर्शन घेऊन

आमच्या घरचा गणपती

अजया
गुरुवार, 09/12/2013 - 22:53 नवीन
आमच्याकडे मखर करण्याची पद्धत नाही. त्यामुळे साधीशीच सजावट आणि लायटींग केले जाते!Image removed.

सुंदर

जेनी...
Fri, 09/13/2013 - 10:03 नवीन
सुंदर :)
↩ प्रतिसाद: अजया

काय मस्त वाटतय पहायला. माझ्या

स्पंदना
Fri, 09/13/2013 - 07:06 नवीन
काय मस्त वाटतय पहायला. माझ्या मुलांना दाखवते. मग पुढच्या वर्षी बक्षीस माझ्च. ए अभ्या....टाक की फोटो लवकर किती वाट पहायची ते?

हे आमचे बाप्पा आणि गौराई..

नानबा
Fri, 09/13/2013 - 09:47 नवीन
आमच्या बाप्पाला बंदिस्त राहणं आवडत नसल्यामुळे मखर किंवा सजावट नसते. फक्त फुलांची आरास करतो. Image removed. Image removed. गौराई.. Image removed.

आणखी एक..

नानबा
Fri, 09/13/2013 - 09:53 नवीन
आमचे बाप्पा, गौरी आणि त्यांची सजावट संपूर्णपणे इको फ्रेंडली असते. बाप्पांची मूर्ती संगमरवरी असल्यामुळे विसर्जन केलं जात नाही. उत्तरपूजेनंतर स्वच्छ करून झाकून ठेवली जाते आणि पुढच्या वर्षीच बाहेर निघते. गौरींच्या बाबतीत तेच. पितळी मुखवटे आणि मातीची सुगडं यापैकी कशाचंही विसर्जन होत नाही. प्लॅस्टीक आणि थर्माकोलचा सजावटीत वापर शून्य. या दिवसांत जमा होणारं निर्माल्य एकत्र करून घरातल्याच एका मोठ्या कुंडीत मातीत दाबून टाकतो. काही महिन्यांत त्याचं खत बनतं जे गॅलरीतल्या झाडांमध्ये टाकतो... पर्यावरणाचा कमीत कमी र्‍हास होईल याची काळजी घेतली जाते.. :)

स्पर्धेसाठी अभ्याने पाठवलेला

किसन शिंदे
Fri, 09/13/2013 - 23:59 नवीन
स्पर्धेसाठी अभ्याने पाठवलेला फोटो Image removed.

आभारी आहे किसना.

अभ्या..
Sat, 09/14/2013 - 01:38 नवीन
आभारी आहे किसना. नेट चा थोड़ा प्रॉब्लम असल्यान इमेज अपलोड करता येत नव्हती. :-( हे फ्लेक्स प्रिंट्स मधील वेस्ट वापरून केले आहे. श्री अम्बाबाई चे चित्र नसून त्रिमीत आहे. मूर्तीच्या चित्राला दागिने व् साडी नेसवली आहे. मागील प्रभावल अशाच एका फ्लेक्स मधील तुकडा वापरून केली आहे. बॉक्स आहेत ते रद्दी कंटेनर वापरून त्यावर जादा झालेली फ्लेक्सची इंक रंग म्हणून वापरली आहे. आवश्यक तिथे प्रिंट मतेरिअलचा वापर केलाय जे मला सहज उपलब्ध असते.
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

माताय!!

सूड
Sat, 09/14/2013 - 02:00 नवीन
>>श्री अम्बाबाई चे चित्र नसून त्रिमीत आहे. मूर्तीच्या चित्राला दागिने व् साडी नेसवली आहे. मग तर ग्रेटच. देवळात देवीला साडी नेसवताना तिथल्या लोकांची किती गडबड होते हे पाह्यलंय. अगदी हुबेहुब महालक्ष्मी साकारलीय. दंडवत स्वीकारा !! ;)
↩ प्रतिसाद: अभ्या..

मस्त रे जरा डिटेल्स चे फोटो

जोशी 'ले'
Sat, 09/14/2013 - 13:12 नवीन
मस्त रे जरा डिटेल्स चे फोटो टाक ना...
↩ प्रतिसाद: अभ्या..

हा माझ्या घरचा बाप्पा आणि

Mrunalini
Sat, 09/14/2013 - 01:07 नवीन
हा माझ्या घरचा बाप्पा आणि गौरी.. :) Image removed. Image removed. Image removed.

मस्त आहे .

प्यारे१
Sat, 09/14/2013 - 02:38 नवीन
मस्त आहे . अवांतरः गणपती आहे तर गौरी नाही नि गौरी आहे तर गणपती नाही... असं कसं? दीड दिवसाचा गणपती का? अतिअवांतरः आमच्याकडे गौरी गणपती भाऊ बहिण मानतात. गौरी येऊन गेल्याशिवाय गणपती जात नाही. काय खरं खोटं दोघांनाच ठाऊक.
↩ प्रतिसाद: Mrunalini

हो... दिड दिवसाचा गणपती...

Mrunalini
Sat, 09/14/2013 - 16:13 नवीन
हो... दिड दिवसाचा गणपती... त्यामुळे गौरी सोबत गणपती नाही आहे.
↩ प्रतिसाद: प्यारे१

आमचा होममेड गणपती

रिकामटेकडा
Sat, 09/14/2013 - 15:46 नवीन
Image removed. Image removed. मुर्ती माझ्या पत्नीने शाडुच्या मातीपासून घरीच बनवली आहे. धोतर व उपरण्यासाठी वेल्व्हेट च्या कापडाचे तुकडे वापरले. मागील देखाव्यासाठी कार्डबोर्ड व कागदाचा वापर केला आहे.

आमचा होममेड गणपती

रिकामटेकडा
Sat, 09/14/2013 - 15:52 नवीन
Image removed. Image removed. मुर्ती माझ्या पत्नीने शाडुच्या मातीपासून घरीच बनवली आहे. धोतर व उपरण्यासाठी वेल्व्हेट च्या कापडाचे तुकडे वापरले. मागील देखाव्यासाठी कार्डबोर्ड व कागदाचा वापर केला आहे.

अभिनंदन!

पैसा
Sat, 09/14/2013 - 16:07 नवीन
खूपच मेहनत घेतली आहे! खूप छान!
↩ प्रतिसाद: रिकामटेकडा

मनापासुन अभिनंदन !

जेनी...
Sat, 09/14/2013 - 16:18 नवीन
मनापासुन अभिनंदन ! अतिशय देखणा देखावा आणि मुर्तिहि एकदम सुबक खरच खुप मेहेनत घेतलिय . गणपती येन्या आधी अशी सजावट करायला घेणं ... म्हणजे गणपतीची अगदि उत्स्फुर्तपणे अन आतुरतेन वाट पहाणं ... हे सगळच तुमच्या कलाक्रुतीत दिसतय . पून्हा एकदा अभिनंदन !
↩ प्रतिसाद: रिकामटेकडा

खुप मस्त....

आनन्दिता
Sun, 09/15/2013 - 04:59 नवीन
खुप मस्त....
↩ प्रतिसाद: रिकामटेकडा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा