✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कॉकटेल..

अ
अभिज्ञ यांनी
गुरुवार, 09/18/2008 - 17:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4524 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

व्हर्जिन पिनाकोलाडा

मनिष
गुरुवार, 09/18/2008 - 18:03 नवीन
व्हर्जिन पिनाकोलाडा माझे अतिशय आवडते मॉकटेल, करायला सोपे आणि चवीला..........यम, यम!!!! ५०० मि.ली. पाइनॅपल ज्यूस (ताजा घेऊ नये, टेट्रापॅकमधला घ्यावा) ५०० मि.ली. व्हॅनिला आईस्क्रीम २००-२५० मि.ली. नारळाचे दूध (डाबरचे टेट्रापॅक) हे चवीप्रमाणे कमी-जास्त घालावे, आधी पाइनॅपल ज्यूस आणि व्हॅनिला आइस्क्रीम एकत्र करून ते एकजीव करून घ्यावे, ह्यात नारळाचे दूध टाकून मिश्रण छान घुसळून घ्यावे, थंडगार सर्व करावे. जास्ती हवे असल्या हेच प्रमाण वाढवावे (जसे ज्यूस १ लि, आईस्क्रीम ७५० मि.ली. आणि नारळाचे दूध ४०० मि.ली. असे) कितीही जास्त झाले तरी काळजी करू नका - ह्यातील एक थेंबही दुसर्‍या दिवशी उरत नाही हा माझा गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव आहे! ;)
  • Log in or register to post comments

हे माझंही

भाग्यश्री
Fri, 09/19/2008 - 00:07 नवीन
हे माझंही अतिशय आवडतं पेय! :) असात्विक करायचे असल्यास त्यात व्हाईट रम मिसळणे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

सहज चाळले असता...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/18/2008 - 18:07 नवीन
सहज गुगल वर चाळले असता डझनभर संकेतस्थळे मिळाली जी कॉकटेल्स संबंधी आहेत. मजा करा: http://en.wikipedia.org/wiki/Cocktail http://www.cocktail.com/ http://cocktails.about.com/ http://cocktails.cocktaildb.com/ http://www.youtube.com/watch?v=Uj417erX2W8 http://www.cocktailmaking.co.uk/ http://www.tulleeho.com/recipes/ http://supercocktails.com/ http://allrecipes.com/Recipes/Drinks/Cocktails/Main.aspx http://www.webtender.com/ http://www.mixeddrinkrecipes.net/ http://www.cocktail.uk.com/
  • Log in or register to post comments

काका, लिंक्

अभिज्ञ
गुरुवार, 09/18/2008 - 18:27 नवीन
काका, लिंक्स बद्दल धन्यवाद. परंतु काय होते ना कि ह्यात दिलेल्या रेसिपीतले बरेचसे पदार्थ झेपत नाहित. त्यांना भारतीय पर्याय काय असावा, ह्यातले कुठले पदार्थ भारतात मिळु शकतात वगैरे....काहि कळत नाहि. एकाच ठिकाणी जर चर्चा करून काहि माहिती गोळा करता आली तर बरे असा ह्या धाग्यामागचा उद्देश आहे. अन जी मंडळि स्वतः घरी कॉकटेल्स बनवून पितात त्यांचे अनुभव शेअरिंग व्हावेत असे वाटते. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पेठकरकाका,

भडकमकर मास्तर
गुरुवार, 09/18/2008 - 18:26 नवीन
पेठकरकाका, एक रिक्वेष्ट मी आधी खूप संस्थळांवर कॉकटेल्स्चा अभ्यास केला पण त्यात काय काय अवघड अवघड पदार्थ असतात...त्या बर्‍याचशा वस्तू समजतच नाहीत.... इथल्या साध्या लोकांसाठी भारतात उपलब्ध वस्तूंमधून सोपी सोपी कॉकटेल्स सांगा आधी... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

व्हिस्की वुईथ बिअर...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/18/2008 - 22:31 नवीन
माझी आवडती कॉकटेल व्हिस्की वुईथ बिअर आहे. (हाय कॅलरी कंटेन्ट मुळे हल्ली हे काँबिनेशन करत नाही.) एक लार्ज पेग आवडत्या व्हिस्कीचा घेऊन तो चिल्ड बिअरने फुल्ल करायचा. एक पेग व्हिस्की आणि एक कॅन बिअर. सुरुवातीला आख्खी बिअर मावत नाही ग्लासात पण जसजसे ग्लासातील द्रव्य कमी होत जाईल तस तसे उरलेली बिअर त्यात ओतत जायची. सगळी बिअर संपली आणि ग्लासही रिकामा झाला की पुन्हा एक पेग व्हिस्की आणि एक चिल्ड बिअर घ्यायची. असे झेपेल तितक्या वेळा करावे. सवधगिरीची सुचना: चव खूप छान लागते पण २ पेग व्हिस्की आणि २ चिल्ड बिअर आख्खी बिल्डींग हलवायला पुरेशी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

हे ट्राय करा

चंबा मुतनाळ
गुरुवार, 09/18/2008 - 22:08 नवीन
मला ह्याचे नाव आठवत नाही, पण पनामा, होंडुरास मधे बार्समधे शहाळ्यांमधे डार्क रम घालून सर्व्ह करतात, लय बेश लागते. पण काळी रमच पाहिजे, बकार्डी वगैरेनी काय मजा नाय! - म्हातार्‍या साधूचा भक्त चंब्या
  • Log in or register to post comments

मिसळपाव

विसोबा खेचर
गुरुवार, 09/18/2008 - 22:37 नवीन
मिसळपाव संकेतस्थळावर विविध विषयावरील चर्चा, पाहता धन्यवाद, परंतु येथील काही सदस्यांचं अजूनही असं म्हणणं आहे की मिपा हे एक उथळ संकेतस्थळ आहे! :) असो, विषयांतराबद्दल क्षमस्व! बाकी चर्चा चालू द्या.... आपला, (सिंगलमाल्ट प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

साधे गणित आणि कला

धनंजय
गुरुवार, 09/18/2008 - 23:15 नवीन
हे वर्णन "आंबट"कॉक्टेलना लागू आहे. १. कुठलीतरी डिस्टिल दारू (रम, जिन, वोदका, वगैरे) २. आंबट द्रव (लिंबाचा किंवा संत्र्याचा रस) ३. गोड पाणी (साधारणपणे साखरेचा कच्चा पाक वेगवेगळ्या नावांनी) (४. बर्फ) दारूचे हवे तितके प्रमाण बर्फावर घ्यायचे, त्यात आंबट रस "चांगला आंबट होईल" इतपत घालायचा, साखरेचा पाक दारूचा कडवटपणा झाकेल इतका कमीतकमी घालायचा. खसाखसा मिसळायचे - झाले. हे गणित झाले - त्यात थोडा-थोडा फरक करून बहार आणणे ही कला! स्रोत : http://www.nytimes.com/2008/06/25/dining/25mini.html?_r=1&oref=slogin GIMLET (१) Gin (traditionally) or vodka (more recently), (२, ३) with sugar and lime (or Rose’s Lime Juice). TOM COLLINS (१) Gin with (२) lemon instead of lime, (३) sugar and club soda. There are also bourbon, rum, or vodka collinses. अशाच प्रकारे पुढील कृती वाचाव्यात. SLOE GIN FIZZ Tom Collins with sloe gin. DAIQUIRI Gimlet with rum, more or less. MARGARITA Gimlet with tequila, with triple sec instead of sugar. KAMIKAZE Margarita with vodka. COSMO Kamikaze with a splash of cranberry juice. SIDECAR Margarita with cognac and lemon instead of lime.
  • Log in or register to post comments

अवांतर - कामिकाझे, मार्गारिटा इ.

बेसनलाडू
Fri, 09/19/2008 - 00:19 नवीन
येथे कंपनीच्या विविध इमारतींमधील कॉन्फरन्स रूम्सना एका समान 'थीम्'ला अनुसरुन नावे देतात. आमच्या हापिसातील कॉन्फरन्स् रूम्स साठीची थीम् ही कॉ/मॉक् टेल्स् किंवा इतर मदिरा अशी आहे. कामिकाझे, मार्गारिटा, लाँग आयलन्ड्, सन् राइज्, मिमोसा, व्हाइट् रशियन्, ऍलबामा स्लॅमर् अशा नावांच्या विविध कॉन्फरन्स रूम्स् आहेत :) कंपनीच्या भारतातील एका इमारतीतील कॉन्फरन्स् रूम्स् ना शास्त्रीय संगीतातील रागांची नावे देण्यात आली आहेत, असे कळाले. जसे गंधार, भैरव, यमन, मालकंस इ. :) (माहीतगार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

वावा.. बेला

भडकमकर मास्तर
Fri, 09/19/2008 - 00:58 नवीन
वावा.. बेला काय सुंदर नशीली नावं आहेत बुवा... मजा आली... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा