गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया असे घोष आता कानावर ऐकू येत आहेत. बाप्पाच्या आगमनाची आपण सारेच जण इतक्या आतुरतेने वाट पाहत असतो कि १५ दिवस आधीपासूनच आपली जय्यत तयारी सुरु होते. पूजेची तयारी, सजावटीची तयारी आणि मुख्य म्हणजे वेगवेगळ्या नैवेद्याची तयारी. उकडीचे मोदक मुख्य असले तरी रोज अनेक गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. असाच एक गोड पदार्थ आई ने गणपती बाप्पा साठी केला आणि तोच मी इथे शेअर करतेय.
साहित्य:
१ वाटी रवा
१ वाटी बेसन
१/२ वाटी नारळ
१/२ वाटी खवा
१ १/२ वाटी साखर
१/२ वाटी तूप
वेलची पूड
सजावटी साठी काजू बदामाचे काप
कृती:
१. एका मोठ्या पातेल्यात साखर आणि ती भिजेल इतके पाणी घ्यावे व बाजूला ठेवून द्यावे. वड्या थापायच्या ट्रे अथवा ताटाला तूप लावावे.
२. प्रथम तूपावर बेसन भाजून घ्यावं. फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे बेसन छान खमंग भाजावं.
३. नंतर दुसऱ्या कढईमध्ये थोडं तूप घेऊन रवा भाजावा. तूपाचे प्रमाण असे घ्या कि रवा ओलसर झाला पाहिजे. मंद आचेवर ढवळत रवा भाजावा. रवा छान भाजला गेला कि त्यात नारळ घालावा. रवा नारळ एकत्र झाले आणि नारळ नीट भाजला गेला कि गॅसवरून उतरवावे.
४. आता खवा भाजून घ्यावा. खवा सुद्धा मंद गॅस वर ढवळत भाजावा.
५. साखरेचा एक तारी पाक करावा. त्यासाठी साखर पाणी मिश्रण गॅस वर ठेवावे. साधारण साखर पाण्यामध्ये विरघळली आणि जराशी उकळी आली कि पाक दोन बोटांमध्ये घेऊन बोटांची उघड मिट करावी. जर पाकची एक तार दिसली तर समजावे कि एक तारी पाक तयार झाला.
६. मगाशी भाजलेले सर्व जिन्नस एकत्र करावे. हे मिश्रण पाकामध्ये घालून ढवळावे. या Stage ला हे मिश्रण थोडेसे पातळ असेल. १० - १५ मिनिटांनंतर मिश्रण ढवळून पहावे. थोडे घट्ट वाटल्यास तूप लावलेल्या ताटामध्ये वाटीला मागील बाजूस तूप लावून थापावे. वरून काजू बदामाचे काप घालावे व परत थापावे.
७. अर्ध्या तासाने त्याच्या वड्या पाडाव्यात. शाही वड्या नैवेद्यासाठी तय्यार आहेत.
मला तेवढा धीर धरवला नाही त्यामुळे… :)
काही महत्वाचे:
१. रवा नारळ भाजताना काळजी घ्यावी. भांड्यात खाली करपण्याची जास्त शक्यता असते.
२. पाक करताना सतत लक्ष ठेवावे. एक तारी पाक झाला कि लगेच gas बंद करावा.


वाचने
9943
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
तोंपासू..
छान आहे
पाक
पाकाचे प्रकार असतात
छानच आहेत वड्या.
खासच!
वा.. बर्फी आवडली.
झक्कास!!
करून बघून मगच सांगणार होते...
छान
वा!
मॉस्तच ऑमॉमॉमॉ झॉलीये बॉर्फी!
अहो आधी खा
In reply to मॉस्तच ऑमॉमॉमॉ झॉलीये बॉर्फी! by प्यारे१
@लीमाउजेट नक्कि माहित नाही पण
मावा पावडर म्हणजे मिल्क पावडर
In reply to @लीमाउजेट नक्कि माहित नाही पण by टक्कू
बर्फी जामच आवडली. तुमची
रवा, बेसन,नारळ अन खवा या