http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-gangrape-juvenile-guilty…
दिल्लीच्या खळबळजनक सामूहिक बलात्कारातील एका आरोपीला अल्पवयीन आहे म्हणून केवळ ३ वर्षाची शिक्षा झाली आहे.
एका स्त्रीवर अत्याचार करुन तिचा खून करणार्या आरोपीला अल्पवयीन म्हणून अशी सूट देणे योग्य आहे का?
भारतीय कायद्यात एखाद्याला अल्पवयीन असताना प्रौढ म्हणून खटला चालवायची तरतूद नाही का?
पोलिस तपासात असे दिसते की बलात्कार प्रकरणात सगळ्यात नृशंस कृत्य ह्या तथाकथित अल्पवयीन व्यक्तीने केले. त्या अभागी मुलीला अत्यंत क्रूर पद्धतीने जखमी करणाराही हाच नराधम. अल्पवयीन व्यक्ती दुबळी, स्वतःचे निर्णय घेऊन न शकणारी वगैरे असते म्हणून तिला वेगळी वागणूक मिळते. पण इथे ह्या अल्पवयीन व्यक्तीचे वागणे दुबळे, अडाण्यासारखे वाटत नाही. तरीही कोर्टाचा न्याय असा का?
मुंबईतील बलात्कार प्रकरणातही हीच पळवाट वापरुन एका आरोपीला सोडणार (वा किरकोळ शिक्षा देणार) असे दिसते आहे.
अशाने सामूहिक बलात्कार करणारे एक अल्पवयीन पोरगा आपल्या गँगमधे ठेवतील व संबंधित बळीचा निकाल लावण्याचे काम त्याच्यावर ठेवतील.
अशाने समाज कायदा हातात घेऊन स्वतःच न्यायनिवाडा करणे सुरु करेल असे वाटते. या बाबतीत तमाम लोकांचा इतका असंतोष दिसतो आहे तरी त्याविरुद्ध कायदा बदल करण्याची राज्यकर्त्यांची इच्छा नाही हे दुर्दैव.
वाचने
2252
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे वचा.
प्रचलित कायद्यानुसार योग्य तो
हं! एकूण अजुन जबाबदार्या
लोकप्रतिनिधी
कडकडीत बहिष्कार
हे होणे नाही
In reply to कडकडीत बहिष्कार by पुण्याचे वटवाघूळ
+१. त्याचे काहीही होणे नाही.
In reply to हे होणे नाही by सुनील
कोर्ट कायद्याच्या नियमांनीच
इथे दोष कोर्टाचा नाही.
सहमत.
In reply to इथे दोष कोर्टाचा नाही. by म्हैस
"लैगिक हल्ला" प्रकरणात