Skip to main content

मोरया मोरया (चेन्नई एक्सप्रेस इश्टाईल)

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 05/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
फिल्लमी गाण्यांवर देवादिकांची भजनं (?) ऐकायला येणं तुम्हा आम्हाला नवीन नाही. कुठल्याही 'फेमस' देवळाच्या परिसरात अशा कलाकृती ऐकायला मिळतात. तर या संगीतप्रकारात माझ्याकडून एक भर पडण्याचा योग असावा; म्हणून मला हे जे गणपतीचं भजन (हा शब्द योग्य न वाटल्यास जो शब्द योग्य वाटेल तो इथे वाचावा) स्फुरलं, ते आपणापुढे मांडत आहे. चूक भूल माफ असावी. चेन्नई एक्सप्रेस च्या लुंगी डान्स या रचनेच्या चालीवर आधारित. कपाळावर; लावुनि गंध बाप्पाचा; घेऊनि छंद सेवा करू प्रेमभावाने म्हणू सारे एकमुखाने तूच अमुची शान... (रे बाप्पा) तूच अमुचा प्राण...(रे बाप्पा) तूच अमुची शान... (हे) तूच अमुचा प्राण... (रे बाप्पा) मोरया मोरया मोरया मोरया * ४ सोहळा हा; सा-या जगात जोश भरतो; मनामनात भक्तांची; माउली तूच मायेची; साउली तूच तूच अमुची शान... (रे बाप्पा) तूच अमुचा प्राण...(रे बाप्पा) तूच अमुची शान... (हे) तूच अमुचा प्राण... (रे बाप्पा) मोरया मोरया मोरया मोरया * ४ भेटशी तू; दहा दिवस पूर्ण करशी; सारे नवस कौतुके; ताल धरितो गातो आणि; नाच करितो ढोल ताशा बूम!... (रे बाप्पा) आसमंती धूम.. (रे बाप्पा) नाद येतो दूर... (हे) एकचि; सूर... (रे बाप्पा) मोरया मोरया मोरया मोरया * ४ ------------------------ अपूर्व ओक #सर्व हक्क सुरक्षित#
लेखनविषय:

वाचने 1228
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

काय म्हणू कळत नाहीये! ऐकायला चांगलं वाटेलही. पण आम्हाला भजन वगैरे पारंपरिक ऐकायची सवय आहे ना! आरडाओरडा, मस्ती अशा ठिकाणी नको वाटते. म्हणजे हे तुमच्या भजनाबद्दल म्हणत नाहीये. एकूणच गणपतीत वातावरण पारंपारिक असावं असं वाटतं.