Skip to main content

सच्चिदानंद बाबांची गोष्ट

लेखक धन्या यांनी रविवार, 11/08/2013 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट तशी खुप जूनी. जवळपास आठशे वर्षांपूर्वीची. आताच्या आहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नावाचं गाव. गावातील मोहिनीराजाचं मंदीर थेट समुद्रमंथनातील अमृतवाटप आणि विष्णूच्या मोहीनी अवताराच्या कथेशी निगडीत. या गावातील मुख्य रस्त्यातून एका सुंदर सकाळी संन्याशी वाटावीत अशी चार मुलं, तीन मुलगे आणि एक मुलगी मार्गक्रमण करत असतात. चौघांच्याही वयात थोडे थोडे अंतर असल्याचे जाणवत होते. एकमेकांच्या पाठीला पाठ लावून जन्माला आलेली सख्खी भावंडेच जणू. चौघांच्याही चेहर्‍यावर एक अतीव समाधान, शांती विलसताना दिसत होती. वाट चालत असताना या मुलांच्या समोरुन एक प्रेतयात्रा येते. प्रेतयात्रेच्या पुढे चालणारी एक स्त्री यातील एका बाल संन्याशाच्या पायावर भक्तीभावाने डोके ठेवते."अष्टपुत्रा सौभाग्यवती भव", तो बाल संन्याशी स्त्रीच्या चेहर्‍यावर हात ठेवून डोळे मिटून म्हणतो. स्त्री दचकते. दोन पावले मागे सरकते. संन्याशालाही प्रश्न पडतो. "काय झालं माई? दचकलात का?" संन्याशी शांतपणे विचारतो. "महाराज, तुमचा हा आशीर्वाद या जन्मी लाभणे शक्य नाही. ही माझ्या नवर्‍याची प्रेतयात्रा आहे." संन्याशी क्षणभर विचारात पडतो. पुढच्या क्षणी तो खांदा देणार्‍यांना तिरडी खाली उतरायला सांगतो. प्रेत कफनातून मोकळे करण्याची आज्ञा देतो. संन्याशाच्या चेहर्‍यावरील तेज पाहून त्याच्या शब्दाचा अव्हेर करण्याचे धाडस कुणालाच होत नाही. प्रेत कफनातून मोकळे केले जाते. "उठा सच्चिदानंद बाबा", तो बालसंन्याशी प्रेताच्या कपाळावर हात ठेवून म्हणतो. आणि काय आश्चर्य, ते प्रेत जिवंत होते. त्या बाल संन्याशाला नमस्कार करते. या सच्चिदानंद बाबांना पुढे हा बालसंन्याशी आपल्या भगवदगीतेवरील टीकेचा लेखक व्हायला सांगतो. ही त्या बालसंन्याशाची भगवदगीतेवरील टीका या सच्चिदानंद बाबांच्या उल्लेखाने संपते. शके बाराशते बारोत्तरे | तैं टीका केली ज्ञानेश्वरें || सच्चिदानंद बाबा आदरें | लेखकु जाहला || अजून एक गोष्ट. ही गोष्ट अगदी अलीकडची. १९८२ सालातली. मेल्व्हीन मॉर्स हे अमेरिकेच्या सिअ‍ॅटल येथील एका बालरुग्णालयात स्थायी वैद्यकतज्ञ म्हणून काम करत होते. अचानक त्यांना आयडाहोमधील पोकाटेलो येथून तातडीच्या मदतीसाठी बोलावले जाते. क्रिस्टल मेझलॉक नावाची एक आठ वर्षांची मुलगी पोहण्याच्या तलावात बुडाली होती. मॉर्स त्या ठीकाणी पोहचले तेव्हा त्या मुलीच्या हृदयाची धडधड थांबून १९ मिनिटे झाली होती.तिची बुब्बुळे विस्फारीत होउन स्थिरावली होती.मॉर्सनी आपले कौशल्य वापरुन त्या मुलीच्या छातीवर दाब देऊन तसेच इतर उपायांनी तिचे हृदय चालू करण्याचा प्रयत्न केला. आणि ते चालू झालेही. मुलीच्या हृदयाची धडधड चालू होताच पुढचे उपचार स्थानिक वैद्यांवर सोपवून मॉर्स आपल्या रुग्णालयात परतले. त्यानंतर काही आठवडे लोटले. मॉर्स दुसर्‍या एका रुग्णालयात काही कामानिमित्त गेले होते. त्याच रुग्णालयात क्रिस्टलवर उपचार चालू होते. मॉर्सना याची काहीच कल्पना नव्हती. क्रिस्टलला चाकाच्या खुर्चीवरुन एका खोलीतून दुसर्‍या खोलीत नेत असताना समोरुन मॉर्स गेले. त्यावेळी त्यांच्याकडे बोट दाखवून क्रिस्टल ओरडली, "हीच ती व्यक्ती, जिने माझ्या नाकात नळ्या खुपसल्या आणि त्यातून पाणी बाहेर काढलं." हे ऐकून मॉर्सना धक्काच बसला. कारण मॉर्सनी त्या मुलीवर जेव्हा उपचार केले तेव्हा ती मुलगी तांत्रिकदृष्ट्या म्रुतावस्थेत होती. त्यामुळे तिला आपल्यावर कोण उपचार करत आहे याची जाणिव होणे शक्यच नव्हते. मॉर्स यांनी क्रिस्टलच्या अनुभवाचा अभ्यास करायचे ठरवले. थोडयाच काळात या प्रकाराला मृत्यूसमीप अनुभव (नियर डेथ एक्स्पेरियन्स) म्हणतात हे ल़क्षात आले. या प्रकारावर तोपर्यंत जरी विपुल लेखन आणि नोंदी झाल्या असल्या तरी त्या सार्‍या नोंदी प्रौढांच्या होती. आतापर्यंत लहान मुलांच्या बाबतीत अशी कुठलीच नोंद झालेली नव्हती. मॉर्स यांनी या विषयावरचे वाचन तर वाढवलेच परंतू स्वतःही इतर लहान मुलांच्या अशा मृत्यूसमीप अनुभवांची नोंद करायला सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सार्‍या मुलांच्या अनुभवात समानता होती.काळोखी बोगदे, मृत नातेवाईकांशी भेट, देव-देवता पाहणे असंच वर्णन सार्‍या मुलांनी केलं होतं. याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या या आठवणींमध्ये चक्क त्यांच्यावर उपचार होत असतानाच्याही आठवणी होत्या. आणि उपचार चालू असताना ती मुलं तांत्रिकदृष्ट्या मृत झाली होती. विज्ञानाने या अनुभवांचा पाठपुरावा चालूच ठेवला. वैज्ञानिकांनी बरेच सिद्धांत मांडले. त्यातील सामायिक कारणे काहीशी अशी आहेतः रक्तप्रवाह थांबणे, डोळ्यांना ऑक्सीजनचा पुरवठा थांबणे, शरीर मृत्यूशी झुंज देत असताना एपिनेफ्राईन आणि अ‍ॅड्रनलाईन अतिरिक्त प्रमाणात शरीराबाहेर स्त्रवणे. हा प्रश्न अगदी सर्वमान्य पद्धतीने निकाला निघाला नसला तरी वैज्ञानिकांनी माणसांवर संप्रेरकांचे प्रयोग करुन कृत्रिमरीत्या मृत्यूसमीप अनुभव निर्माण करण्यात यश मिळवले आहे. विज्ञान नविन असं काहीच निर्माण करत नसतं. ते फक्त निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल करत असतं. आता या क्षणी ज्या गोष्टी अतिंद्रीय, चमत्कार वाटत आहेत त्या तशा नाहीत. फक्त त्यामागचा कार्यकारणभाव आज तरी विज्ञानाला आपल्याला माहिती नाही. आणि या विश्वात निसर्ग नियमांपलिकडे जाऊन काहीही होत नसतं. त्यामुळे सच्चिदानंद बाबांची गोष्ट आपल्याला त्या बालसंन्याशाच्या योगसामर्थ्याचा चमत्कार वाटत असला तरी त्यामागेही अशीच काहीतरी वैज्ञानिक कारणे असतील. त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्‍या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा. ज्यावेळी माणसाची मती कुंठीत होते, समोर घडलेल्या घटनेचं आकलन होत नाही त्यावेळी त्या घटनेला तो चमत्कार म्हणून मोकळा होतो. ही घटना एका पीढीकडून दुसर्‍या पीढीकडे गोष्ट स्वरुपात हस्तांतरीत होत असताना त्यावर अद्भुततेचा मुलामा अधिक अधिक दाट होत जातो आणि मग आपणही शाळेत विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये जडत्व, गती, न्युटनचे गतीविषयक नियम अभ्यासलेले असतानाही आळंदीला गेल्यावर निरागसपणे विचारतो, "ती भींत कुठे आहे हो?"
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 44750
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

गुरुदेव रानडे कोण आहेत ? जरा माहिती दिल्यास उपक्रुत होइन.

In reply to by अनिरुद्ध प

ही लिंक बघावी. http://www.gurudevranade.com/home.html असामान्य बुद्धिमत्तेचा माणूस. उपनिषद्रहस्य, मराठी-हिंदी-कन्नड भाषांतील संत वाङ्मयातला परमार्थमार्ग, ग्रीक आणि भारतीय तत्वज्ञानाचा तौलनिक आढावा-तोही मुळातून प्राचीन ग्रीक ग्रंथ वाचून घेणारे थोर तत्त्वज्ञ. जितके बुद्धिमान तितकेच भक्तिमार्गी. त्यांच्याबद्दल बोलावे तितके थोडेच आहे.

In reply to by बॅटमॅन

साठी धन्यवाद्,परन्तु सद्ध्या अग्नी भिन्त आड येत आहे आणि घरचा सन्गणक नादुरुस्त असल्याने जसे जमेल तसे पहाण्या येइल.

In reply to by धन्या

तस्मात मी इथेच थांबतो. "अवतारी" पुरुष/स्त्री बरोबर अध्यात्म किंवा विज्ञान या विषयांवर चर्चा करण्याची कुवत माझ्यात नाही.
धन्या पहिले वाक्य एकदम झकास. दुसरे वाक्य जर्रा बदलून लिही
"अवतारी" पुरुष/स्त्री बरोबर अध्यात्म किंवा विज्ञान या विषयांवर चर्चा करण्याची कुवत माझ्यात नाही.
या ऐवजी "अवतारी" पुरुष/स्त्री बरोबर अध्यात्म किंवा विज्ञान या विषयांवर इंटेलेक्च्युअल मास्टर्बे** करण्याची इच्छा माझ्यात नाही> असे लिही. एखाद्याशी चर्चा करण्याअगोदर त्याचा अधिकार काय आहे ( म्हणजे नक्की काय ते मात्र सांगायचे नाही ) बाकी आम्ही अध्यात्म वाले म्हणजे एकदम बेष्ट असे म्हणायचे. त्याबद्दल शंका घेणारे मात्र तथाकथीत इंटेलेक्च्युअल मास्टर्बे** करतात असे म्हणून चर्चा टाळायची. मुद्द्यावर कोणी आले की आपण बरेच फाटे फोडायचे. मुद्दा खोडता आला नाही की समोरच्याचा अधिकार काढायचा. Do While अधिकार= 0>

In reply to by विजुभाऊ

हा हा .. मुद्द्यावर बोलायला जमलं नाही की बोलणार्‍याचा अधिकार काढायचा आणि मूळ मुद्दा इंटेलेक्च्युअल मास्टर्बे** म्हणून दुर्लक्षित करायचा.. +११११

अनिरुद्ध प - अहो साहेब ती माझी स्वाक्षरी आहे. तो प्रतिक्रियेच भाग नाहीये. मला तसा वाटतं म्हणून tashi स्वाक्षरी ठेवलीये.

In reply to by म्हैस

आपल्या लिन्का पुस्तकान्ची यादि याची वाट पहात आहे,बघुया अर्धवट ज्ञानात काही भर पडते का (क्रुपया हे उपरोधाने लिहीले नाही आहे याची नोन्द घ्यावी) ज्ञान लालसा असलेला अनिरुद्ध

कोणीतरी म्हणाला होतं वाचायला लागला कि डोळे जड होतात. म्हणून मी शोधण्याचा त्रास घेतलाच नाही. बरं ते असो. फार आनंद झाला कोणाच्या तरी मनात कुतूहल निर्माण झालं. तसे गीतेत अनेक प्रकारचे मार्ग सांगितले आहेत. त्यातला मी निवडलेला योगमार्ग आहे. हा गीतेतल्या १६ व्या अध्यायात आहे. आणि ज्ञानेश्वरीतल्या ६ व्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी ह्याचा छान निरुपण केलं आहे. तिथे वाचायला बोर होत असेल तर इथे थोडक्यात सांगते. जास्त detail मध्ये नाही सांगता येणार. एकूण सव्वा लाख प्रकारचे योग आहेत. हठ्योगात यम, नियम, आहार , प्रत्याहार, असणे, मुद्रा , बंध असं काय काय आहे. हा मार्ग खूप अवघड आहे. ह्याला फार वेळ लागू शकतो. ह्याला काटेकोर नियम पालन , योग्य गुरुंच मार्गदर्शन लागतं. एवढं करूनही अध्यात्मिक शक्ती (ज्याला आपण कुंडलिनी म्हणतो) जागृत करायला फार वेळ लागतो. अनेक ठिकाणी एकाच प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी माझ्या प्रतिक्रिया 'सचिदानंद बाबांची गोष्ट' ह्या लेखावर दिल्या आहेत. कृपया तिथे वाचावे. भक्तीयोग मार्गात नामस्मरण, शास्त्र निहित ग्रंथ, लीला चरित्र वगेरे वाचणे. हे सगळा अत्यंत श्रद्धेने करणे ह्या गोष्टी येतात. इथेही वेळ लागतोच. आणि भगवंताची कृपाही. कर्मयोग वगेरे मध्ये मी फारसं शिरत नाही आता. पण माझा मार्ग आहे तो क्रीयायोगाचा (ज्याला सिद्धयोग, महायोग असं सुधा म्हनला जाता.) ह्या मार्गावर भगवान श्री क्रीश्नांनी विशेष जोर दिला आहे. इथे गुरु आवश्यक आहेत. गुरूंच्या शक्तिपात दिक्षेने शिष्याची अध्यात्मिक शक्ती (कुंडलिनी) जागृत होते. हठ्योगामध्ये शक्ती जागृतीसाठी जे कष्ट घ्यावे लागतात ते इथे घ्यावे लागत नाहीत. परंतु योग्य असे सिद्ध सद्गुरु आवश्यक आहेत.

In reply to by म्हैस

जरा सविस्तर लिहु शकाल काय ? रजनिकांथच्या "बाबा" चित्रपटात "महावतार बाबाजींचा" वावर वॉइसओवरमधुन दाखवला आहे, ते आधुनिक जगात क्रियायोगातिल सर्वोच्च जाणकार/गुरु मानले जातात. नक्कि आहे काय हा क्रियायोग ? व्यनि करावा, इथे चर्चा टाळायची असल्यास.

@ धन्या . आपल्या बोलण्यातला उपहास समजला. चांगली गोष्ट आहे आपण प्रतिक्रिया थांबव्ल्यात. विनाकारण वाद घालण्यात काहीच अर्थ नाही हे समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. .

व्यनि म्हणजे? चित्रपटात काय दाखवलाय हे मला माहित नाही. आणि चित्रपटावर माझा इतका विश्वास नाही. होय हे खरं आहे. कलीयुगामध्ये गेली २००० वर्षे महावतार बाबाजी मोठे जाणकार सिद्ध गुरु आहेत. तसे गुरु अजूनही आहेत परंतु ते ढोंगी बाबांसारखे स्वताला लोकांसमोर आणत नाही म्हणून त्यांची माहिती फारच कमी लोकांना असते. आज esakal मध्ये बातमी आली आहे. "योगविद्येवर अमेरिकी मोहोर ". किती दुर्दैव आहे .इतर देशातल्या लोकांना ह्याचं महत्व कळतंय आणि आपल्या देशातले लोक मात्र योग, देव, धर्म ह्याची टिंगल करण्यातच धन्यता मानतात आणि मनुष्य जन्म वाया घालवतात.

In reply to by म्हैस

कलीयुगामध्ये गेली २००० वर्षे महावतार बाबाजी मोठे जाणकार सिद्ध गुरु आहेत.
आहेत म्हणजे ते अजूनही हयात आहेत असं म्हणायचे आहे का तुम्हाला?
तसे गुरु अजूनही आहेत परंतु ते ढोंगी बाबांसारखे स्वताला लोकांसमोर आणत नाही म्हणून त्यांची माहिती फारच कमी लोकांना असते.
त्यांनी स्वतःला लोकांसमोर आणले नसेलही परंतू परमहंस योगानंद यांनी आपल्या "ऑटोबायोग्राफी ऑफ योगी" या पुस्तकात खुप वेळा उल्लेख केला आहे. क्रिया योगाचे उद्गाते म्हणून ते जगाला ज्ञात आहेत.
आज esakal मध्ये बातमी आली आहे. "योगविद्येवर अमेरिकी मोहोर ". किती दुर्दैव आहे .इतर देशातल्या लोकांना ह्याचं महत्व कळतंय आणि आपल्या देशातले लोक मात्र योग, देव, धर्म ह्याची टिंगल करण्यातच धन्यता मानतात आणि मनुष्य जन्म वाया घालवतात.
भारतीयांना जसे पाश्चिमात्य जीवनशैलीचे अप्रुप तसेच पाश्चिमात्यांना भारतीयांच्या अध्यात्म, योगा, ज्योतिष वगैरे गोष्टींचे अप्रुप असते हे स्वानुभवाने माहिती आहे. ईट इज जस्ट अनदर फॅन्सी थिंग फॉर देम. त्यात विशेष काही नाही.

In reply to by धन्या

आहेत म्हणजे ते अजूनही हयात आहेत असं म्हणायचे आहे का तुम्हाला?
निसर्गसुलभ प्रश्न वाटतो.
त्यांनी स्वतःला लोकांसमोर आणले नसेलही परंतू परमहंस योगानंद यांनी आपल्या "ऑटोबायोग्राफी ऑफ योगी" या पुस्तकात खुप वेळा उल्लेख केला आहे.
खात्रि आहे हे पुस्तक आपण वाचुन काढलेले नाहि याचि. ("बाबा" मि बघितलाय त्यातलं "बाबा सिल्वर सिल्वर बाबा" गाण मला फार आवडते)
क्रिया योगाचे उद्गाते म्हणून ते जगाला ज्ञात आहेत.
जगाला म्हणजे कोणाला ?
भारतीयांना जसे पाश्चिमात्य जीवनशैलीचे अप्रुप तसेच पाश्चिमात्यांना भारतीयांच्या अध्यात्म, योगा, ज्योतिष वगैरे गोष्टींचे अप्रुप असते हे स्वानुभवाने माहिती आहे. ईट इज जस्ट अनदर फॅन्सी थिंग फॉर देम. त्यात विशेष काही नाही.
:) फॅन्सी थिंग व महत्व कळणे यात फरक आहे. उदा. इबुक रिडर माझ्यासाठि फँन्सि थिंग आहे पण यातुन कागदाचा व परिणामी मानवाचा वेळ्,कश्ट्,पैसा,जागा याचा अपव्यय टळतो हे याचे (विषेशतः पर्यांवरणाच्या द्रूश्टिने) महत्व कळणे आहे.

आहेत म्हणजे ते अजूनही हयात आहेत असं म्हणायचे आहे का तुम्हाला?
होय. ते अजूनही आहेत.ते अजूनही २४ वर्षांच्या तरुणासार्खेच दिसतात. चांगदेव नाही का १४०० वर्षे ह्या मृत्यूलोकात होते. सामान्य माणसे ७०-८० वर्षे जगात असताना योग्यांना इतकं दीर्घायुष्य कसा लाभतं ह्याचा उत्तर 'योगी कथामृत' (Autobiography of a yogi ) ह्या पुस्तकात दिलं आहे.
त्यांनी स्वतःला लोकांसमोर आणले नसेलही परंतू परमहंस योगानंद यांनी आपल्या "ऑटोबायोग्राफी ऑफ योगी" या पुस्तकात खुप वेळा उल्लेख केला आहे. क्रिया योगाचे उद्गाते म्हणून ते जगाला ज्ञात आहेत.
होय. जगाच्या कल्याणासाठी त्यांना प्रकाशात आणणा गरजेचं असतं. परमहंस योगानंदांनी ते कार्य केला आहे. महावतार बाबाजींनी स्वताचा उल्लेख कुठेही केलेला नाहीये. एकदा एका अश्रद्ध माणसाला त्यांची महती पटवून देण्यासाठी त्यांच्याच एका शिष्याने एका बंद खोलीत त्यांचं आवाहन केलं. बाबाजी तिथे प्रगट झाले पण शिष्याला रागावले. पुन्हा मला असल्या गोष्टींसाठी बोलावत जावू नको म्हणून. हा किस्सा पुस्तकात आहे.
भारतीयांना जसे पाश्चिमात्य जीवनशैलीचे अप्रुप तसेच पाश्चिमात्यांना भारतीयांच्या अध्यात्म, योगा, ज्योतिष वगैरे गोष्टींचे अप्रुप असते हे स्वानुभवाने माहिती आहे. ईट इज जस्ट अनदर फॅन्सी थिंग फॉर देम. त्यात विशेष काही नाही.
नुसतं अप्रूप वाटणं आणि महत्व पटण ह्यात फरक आहे. त्यांना ते पटलय म्हणून शाळेपासून योग हा विषय त्यांनी अभ्यासाला ठेवलाय.

महावतार बाबाजींच्या शिष्याचे शिष्य परमहंस योगानंद यांनी खुप लेखन केलय क्रिया योगावर.
महावतार बाबाजींचे शिष्य शामाचरण लाहिरी. त्यांचे शिष्य युक्तेश्वर मुखी. त्यांचे शिष्य परमहंस योगानंद