पुरुष विभाग धागा क्र.३---- संसार देवाची कहाणी-----
माझे मित्र म्हणतात की तुझा संसार सुखाचा आहे.असेल,कदाचित तसेही असेल.कारण मी "संसार देवाची" रोज पुजा करतो.माझे लग्न झाल्यावर, माझ्या वडीलांनीच मला हे व्रत करायला सांगीतले.मी तर सुखी झालो (मित्र खोटे बोलत नाहीत, हे मी आधीच पु.वि.धा.क्र.२ मध्ये स्पष्ट केले आहेच.... http://www.misalpav.com/node/24546 )
नमनाला इतके तेल खूप झाले. तर आता कहाणीला सुरुवात करतो.
---------------------------------------------------------------------------------
एक आटपाट नगर होते.त्यात एक गरीब माणूस रहात होता.त्याचा संसार काही चांगला होत नसे.त्याची बायको इतर बायाकांसारखीच होती.त्यामुळे घरात रोज भांडणे असायची.एकदा तो असाच दुखी-कष्टी होवून बसला होता…सुदैवाने त्याची आणी आमची गाठ पडली.त्याने त्याची सर्व कहाणी मला सांगितली.मग मी त्याला संसार देवीची आराधना करायला सांगितली.त्याने ते व्रत केले आणि त्याचा संसार सुखाचा झाला.
सकाळी लवकर उठावे आणि खालील गोष्टी रोज कराव्यात.
१. आजन्म बायकोची खोटी स्तुती करणे. (तू सुंदर दिसतेस,कामसू आहेस इ. ह्याला थापा म्हणत नाहीत. असे खोटे बोलले तरी पाप लागत नाही)
२.सासरच्या मंडळींची निंदा न करणे.(तुझा भाव्वू किती हुशार.तिसरी नापास १० वेळा झाला तरी....शिक्षक फालतू आहेत असे म्हणावे.सासरे किती बोल-घेवढे आहेत असे म्हणावे.भांडकुदळ आहेत, असे स्पष्ट म्हणू नये मेव्हणीची स्तुती करू नये.ती (म्हणजे मेहुणी) रंभा आणि बायको टूनटून असली तरी,मेहुणीकडे बघू नये,मेहूणीबरोबर गप्पा तर अजिबात मारू नयेत.नाहीतर संशय-पिशाच्य मागे लागते,आणि ह्या संशय-पिशाच्यावर उपाय नाही.
३. तिच्या स्वैपाकाला नावे न ठेवणे (हॉटेल्स असतातच जवळ,नसेल तर हॉटेल जवळ जागा घ्या.पण मुलं झाली की अशा हॉटेलजवळच्या जागा सोडा.मुले झाली की बायकांचा स्वैपाक सुधारतो.आता ही जादू कशी होते ते फक्त ब्रम्ह देवालाच माहित)
४. कचेरीतून रोज उशिरा घरी जा.थोडे दिवसांनी होईल सवय.
५. शक्यतो तो रोज एखादी बरी गजरेवाली बघून गजरा विकत घ्या.सगळ्यात स्वस्त आणि मस्त उपाय.साडीचा खर्च वाचतो.
६. सुट्टीच्या दिवशी लवकर उठून चहा करून द्या (म्हणजे बायको माहेरी गेली तरी बिघडत नाही...सवय राहते)
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे
७. शांत रहा.(देव प्रत्येक वेळी हजर होऊ शकत नाही म्हणून त्याने आई व साहेब प्रत्येक वेळी हजर होऊ शकत नाही म्हणून त्याने “बायको” निर्माण केली आहे.
तर वत्सा असा हा साधा सरळ व सोप्पा बिन खर्चिक मार्ग आहे.जो कोणी हा वसा आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न होई पर्यंत (आपल्या मुलांचे लग्न झाले की बायकोचे सासूत रुपांतर होते आणि मग ती "जावयाच्या किंवा सुनेच्या घरांत प्रवेश करते") करेल त्याचे सदरे (म्हणजे मराठीत शर्ट).सुखी माणसा सारखे होतील.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त व्रत आहे. मी थोडी भर
भाबडा आशावाद
धन्यवाद!
ज्यो ताई, मनातले बोललीस, इथे
इथे बायकाहि हा लेख वाचत आहेत
+१११
पुरुष विभाग बंदिस्त नसल्याने
पण
रोज एखादी बरी गजरेवाली बघूनबरी गजरेवाली ??? आणि तरी फक्त गजराच घ्यायचा म्हणत्ताय ? ;)या धाग्याएव्हढा उपयुक्त धागा
आपली रेषा मोठी करता येत नसेल
+१
जिला बहीण नाही ..
यात एक मोठा धोका आहे. जर काही
जरी एकुलति
'' कारण मी "संसार देवाची" रोज