Skip to main content

बळी आणि कत्तलखाना

लेखक अत्रन्गि पाउस यांनी रविवार, 25/08/2013 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
(तथाकथित) धार्मिक कार्यासाठी पशू पक्ष्यांचा 'बळी' देणे ह्यात आक्षेप नेमका कशाला आहे ? सर्वसाधारण पूजा, अर्चा, नवस, व्रत वैकल्ये ह्या वरचे आक्षेप आणि त्यात 'बळी - दान' आले कि येणारे आक्षेप हे एकदम वेगळ्या लेव्हल जाते... नेमके काय होते? जर केवळ हिंसा हा मुद्दा असेल तर व रोज खाटिकखान्यात अश्या पशु पक्ष्यांची कत्तल होणे हा त्याच्या कितीतरी पट मोठा मुद्दा व्हायला हवा ना ? बाय द वे, काही यज्ञ विधींमध्ये कोहोळा एका घावात कापणे असा विधी बघितला आहे...तो काही बळी सदृश प्रकार (प्राणी नाही तर फळ) असावा कि काय असे हि वाटते?

वाचने 24342
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

In reply to by मालोजीराव

त्या बेर ग्रिल ला हाना रे कुनीतरी... तो जिभेचे चोचले पुरावायसाठी हाणत नाय ना, जिवंत साप किडे. तो बिचारा तर चोचले पुरवलेल्या पोटासाठी खातो, तेव्हडेच ते किडे नशिबवान, नाय तर कोण ईच्चारतो त्याना जंगलात बॅटमॅनला कशाला ? ते काय खातात ? आणि समजा खात ही असतील तर 'बॅट ' म्हणल्यावर हक्क आहे त्यांचा तो, :)

की मी माणूस झालो. अ‍ॅनिमल किंग्डम मधे फोटोसिंथेसिस करून जगणारे, व फक्त सूर्यप्रकाश व जमीनीतून शोषलेली मूलद्रव्ये वापरून लाईफ सस्टेनन्स मिळवणार्‍यांत माझा समावेश व्हायला हवा होता.. पण काये ना, >> हिंसा कोणत्याही कारणासाठी केलेली असो व कोणत्याही जातीधर्माच्या व्यक्तिने केलेली असो, ती वाईटच. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी जिवंत प्राणी मारून खाणे हे जितके वाईट तितकेच धर्माच्या नावाखाली जिवंत प्राण्यांचा बळी देणे हेही वाईट. >> गाईपासून वासराला तोडून मिळवलेले 'अहिंसक' खरवस वा दूध. दुधाळ हुरडा हवा म्हणून धाटातून तोडलेली कणसे, वा कोवळ्या शेंगा वेलीवरून खुडणे, अन अंडी खाणे वा कोवळे बकरू मारून खाणे यात तौलनिक फरक मला तरी दिसत नाही. साहेबा, जीवो जीवस्य जीवनम, हे सत्य मानायला शिकलेच पाहिजे..

In reply to by आनंदी गोपाळ

'मुळासकट'उपटलेले कांदे बटाटे...निर्घृण पणे कापलेली तरारलेली उभी पिके..हे सगळे.'सात्विक आणि अहिंस.'???

In reply to by अत्रन्गि पाउस

गळ्याशी नख खुपसून, अंदाज घेत क्रूर पणे त्वचा सोलली जातीये दुधी भोपळ्याची, सपासप सुरी चालवत कांद्याची कापा काप चालली आहे, डोळ्याची आग आग होतीये, शहाळ्या-नारळावर कोयत्या ने दरोडा घातला आहे, हे भाजलं जात आहे वांग, निथळतंय त्वचेतून पाणी, टप टप, तडतडल्या मोहोरी, हा खेळ चा फड फडात, कडीपत्या च्या पंखांचा उकड्त्या तेलात, आणि तिखट टाकला जात आहे, भाजीच्या अंगावर डोळ्यात, धारेवर खिसली जात आहे गजर, पिळवणूक चालली आहे आंब्याची, सर्व हारा बनलीये कोय, वर्वान्त्या खाली चिरडली जाते आहे मीठ मिरची, बत्ता घातला जातो आहे वेलदोड्याच्या डोक्यात, फडक्याने गळा ओढून मुसक्या बांधून दह्याला फासावर चाडवला आहे चक्का बनवण्यासाठी, हे भरडले जाताहेत गहू, लाही लाही होतीये मक्याची ज्वारीची, भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडा च्या पोटात, पोलीस नुसतेच बघतायत, संत्र्या मोसंबी केळ्यांची वस्त्र उतरवली जातायत, हे काय चाललायं, हे काय चाललायं…. - अशोक नायगावकर

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मजेशीर तर आहेच पण एकदम सत्यही आहे. असं पहा. मांसाहारी लोक्स कधीही मांसाहाराचा प्रचार करत नाहीत. शाकाहारी करतात. शाकाहारी मांसाहाराविरुद्ध बोलताना १. आहारशास्त्रीय २. उत्क्रांती ३. मानववंशशास्त्रीय ४. धार्मिक ५. तामसी आहाराने मनही तामसी ६. हिंसा व्हर्सेस अहिंसा असे अत्यंत विविध मुद्दे काढून कोणत्यातरी एकाने का होईना पण मांसाहार सोडावा अशा मताचे असतात. यातला हिंसेचा मुद्दा हा प्राणी विरुद्ध वनस्पती या सोयीस्कर विभागणीवर अवलंबून असतो. प्राणी मारताना तडफड / ओरडणं / वेदना / रक्त दिसतं म्हणून ती हिंसा. वनस्पती मारताना एक जगू इच्छिणार्‍या जीवाचं जीवन संपवणे असा सरळसरळ मामला असतानाही ते तुलनेत अहिंसक कारण वनस्पती तर बिचार्‍या आवाजही करत नाहीत. म्हणजे मग काही हरकत नाही मारायला. बाकी त्यांना वेदना होत नसणारच.. कारण त्यांना सेंट्रल नर्व्हस सिस्टीम नसते.. अशा दिशेने मात्र सोयीस्कर "सायन्स"मधे शिरलं जातं. यामधे अर्थातच वनस्पती या प्राण्यांच्या (सोयीसाठी ही दोन नावं वेगळी घेतोय) तुलनेत अगदीच कनिष्ठ दर्जाचे जीव मानलेले असतात शाकाहाराला हिंसा न ठरवण्यामधे. मुंगीला मारताना थोडाच आपण विचार करतो? क्षुद्र जीव तो. त्यात मुख्य लक्षात घेतलं जात नाही ते हे की खाल्लं तर आपल्याला पाहिजेच.. आणि अन्य जीवांना मारुन खाणं हा केवळ आपापल्या पूर्वग्रहांचा भाग आहे. लहानपणापासून मासे खातो तर खातो..म्हणून क्रौर्य / घृणा वगैरे नाही वाटत. हिंसा वगैरेच्या पलीकडे जाऊन हा एक सवयीचा भाग आहे. प्राणीहत्येतलं क्रौर्य हाही एक आपापल्या पूर्वग्रहांचाच भाग आहे. आजोबांच्या काळापासून असलेला एक वटवृ़क्ष तोडायची वेळ आली तर आपण हळहळतो. तोडणं टाळतो. कारण आपल्याला त्याची सवय झालेली असते. पण मेथीची रोपटी मात्र आठवड्यापूर्वी बागेत उगवली तर ती लगेच तोडून त्याची भाजी करतो.. कारण त्यांच्याशी मानसिक "लगाव" झालेला नसतो. शिवाय ते क्षुल्लक रोपटं असतं.. भाजीच तर आहे ती.. त्यासाठीच लागवड केली होती...मेथी म्हणजे वृक्ष नव्हे.. आणि आपण मेथी खाण्यासाठी तोडतोय.. सोयीसाठी नव्हे.. वगैरे आपण स्वतःला समजावूच अशा वेळी. असो.

In reply to by दादा कोंडके

अंगावर काटा आला हे अमानुष क्रौर्यवर्णन वाचून.. त्या मुक्या भाजीपाल्यांच्या किंकाळ्या मनात उमटल्या आणिवहादरलो मी.. :-(

जर मांसाहार वाईट नसता व शाकाहार व मांसाहारात काहीच फरक नसता, तर गांधीजी, टॉलस्टॉय, संत तुकाराम/ज्ञानेश्वर/रामदास इ. सारखे महान संत इ. महान व्यक्तींनी फक्त शाकाहाराचे समर्थन न करता स्वतः मांसाहार देखील केला असता. टॉलस्टॉय एकदा म्हणाले होते की माझ्यासारखी आध्यात्मिक व्यक्ती मृत प्राण्याचे मांस कधीही खाणार नाही. गांधीजींची सून एकदा खूप आजारी पडून दुर्बल झाल्यावर डॉक्टरांनी तिला अंडी द्यायला सांगितल्यावर गांधीजींनी अंड्यात सुद्धा जीव असतो असे सांगून अंडी देण्यास विरोध केला होता.

In reply to by श्रीगुरुजी

मग असे असेल तर व्याध गीतेची कथा कशी काय आली असती? प्राणी मारण्याला विरोध नसून निव्वळ चोचल्यांना विरोध आहे. मग त्यात तंदुरी चिकन आले तशीच बासुंदीपुरीही आली. बाकी मग वसिष्ठ ऋषींसाठी आपली गाय मारली म्हणून शिव्या देणारा उत्तररामचरितातला सौधीतकी, मांस खाणारे राम व कृष्ण हे पाहिल्यास त्याचा अध्यात्माशी तादृश संबंध नाही.

In reply to by बॅटमॅन

पोटची पोरे चिरून दारी आलेल्या अतिथीला शिजवून खाऊ घातल्याच्या कथा आहेत, अन बुद्धाचा मृत्यू सूकरमद्दव खाऊन झालयाच्या ही आहेत. बाकी गांधी म्हटले म्हणून अंडी खाऊ नका अन आसाराम म्हटले म्हणून ६ मुले झालेली अमेरिकन स्त्री ६ पुरुषांची सोबत करत असेल असे म्हणणे हे इक्वली बावळटपणाचे आहे. धन्यवाद.

In reply to by आनंदी गोपाळ

टॉलस्टॉय, गांधी इ. ना बाबा बनवून शाकाहारी कॉण्टेक्टसाठी व तेवढ्या पुरता त्यांचा बाबा वाक्यं प्रमाणं साठी वापर करण्याच्या प्रयत्नांचा निषेध.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुर्जींकडून गांधीबाबाचा महान संत म्हणून उल्लेख झालेला पाहून ड्वाले पानावले ;) (सद्गदित) सुनील

In reply to by सुनील

हरकत नाही. पण यापेक्षा खाटकाची सुरी प्राण्यांच्या मानेवर फिरल्यानंतर त्यांना होणार्‍या वेदनांमुळे डोळे पाणावेत असे वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

या पैकी काय पाहिल्यानंतर आपले डोळे पाणावतील? - मुंग्यांच्या बिळात भस्सकन डिडिटी किंवा रॉकेल टाकल्यावर - पेस्ट कंट्रोलींग करताना पिशवीभर झुरळं मारल्यावर - खाण्याचं आमिष दाखवून किंवा न दाखवता उंदीर मारल्यावर - मॉस्क्टीटो किलर वापरल्यावर - इलेक्ट्रीफाइड फ्लाय किलर्सने माश्या मारल्यावर - अनेक प्राण्यांचे जीव घेउन तयार केलेली औषधं वापरताना - शेतात पिकांवर जंतुनाशक फवारल्यावर

In reply to by दादा कोंडके

दादा…ह्येच ल्हिनार होतो…धन्यवाद

In reply to by दादा कोंडके

जबरी हो दादा....हा दुटप्पीपणा नेहमीचाच आहे. तथाकथित हिंसेचा निषेध करणारे अहिंसावादी शाब्दिक हिंसेत मात्र कायम पुढे असतात.

In reply to by श्रीगुरुजी

तर गांधीजी, टॉलस्टॉय, संत तुकाराम/ज्ञानेश्वर/रामदास इ. सारखे महान संत इ. महान व्यक्तींनी
त्या त्या व्यक्तिंचे विशेष गुण, विचार नक्कीच जवळ करावेत पण त्यांना सरसकटपणे देवपण देउ नये. त्यांनी केलेले सर्व योग्य असे सरसकटपणे ठरवू नये. उदा. गांधींचे ब्रह्मचर्य, कुटुंब नियोजनाविषयीचे विचार , भूकंप म्हणजे देवाने केलेली शिक्षा इ खरच विचार आजच्या विचारसरणीवर पूर्णपणे अयोग्य वाटू शकतात हे स्वीकार करावे. म्हणून सगळ्यांनीच मांसाहार करावा असे नव्हे. पण करणार्‍यांवर हिंसकतेचा शिक्काही मारु नये.

In reply to by श्रीगुरुजी

शाकाहारी प्राण्यांना सपाट असे पटाशीचे दात असतात. मांसाहारी प्राण्यांना सुळे असतात. माणसांनाही सुळे दात असतात. सशाचे आणि मांजर/कुत्रा या प्राण्यामध्ये नखांमध्ये (क्लॉज्) सारखेपणा असतो. पण ससा कुणालाही फाडून खात नाही. मांसाहारी प्राण्यांचे दोन्ही डोळे समोर असतात. त्याने त्रिमितीय दॄष्टी मिळते. अंतराचा अचूक अंदाज घेऊन हल्ला करायला मदत होते. शाकाहारी प्राणी हे "शिकार" असतात. त्यामुळे त्यांना त्रिमिती दृष्टीपेक्षा मोठ्या "व्ह्युविंग अँगल"ची गरज असते. त्यामुळे त्यांचे डोळे समोर नसून चेहर्‍याच्या २ बाजूंना असतात. "माणसाचे डोळे चेहर्‍यावर समोर असतात, त्यामुळे माणसाला त्रिमिती दॄष्टी असते.

भारत सोडून उर्वरित जगात ९९% विचारवंत, तरल प्रतिभेचे लेखक, कवी, चित्रकार, शिल्पकार, शास्त्रज्ञ, नोबेल विजेते, संशोधक, कलाकार, चित्रपटदिग्दर्शक, समाजसुधारक हे मिश्राहारी आहेत. भारतात हे प्रमाण ८०-८५ % पडेल. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद,(आणि त्यांची सर्व बंगाली शिष्यपरंपरा), भारतीय वंशाचे नोबेल विजेते, रवीन्द्रनाथ ठाकुर, नंदलाल बसु, सुभाषचंद्र बसु,सत्यजित राय आणि चित्रपट्सृष्टीतले अनेक दिग्गज, गायक, वादक, गिरीश कार्नाड, विजय तेंडुलकर, अमिताभ बच्चन (वैद्यकीय कारणांमुळे प्रथिनसंपृक्त अन्न टाळावे लागले ती वेगळी गोष्ट.) इ. इ. इ. यात मुसलमान आणि क्रिस्टिअन समाजाचे योगदानही आलेच. चित्रसृष्टीतील आपल्या एकुलत्या एक ऑस्कर विजेत्या भानु अथय्या वगैरे. एक-दीड हजार वर्षांपूर्वीचे सर्व क्षेत्रांतले धुरीण वगैरे. (म्हणजे कालीदास वगैरे). सर्व ऋषि-मुनि वगैरे. रामकृष्णादि सर्व महापुरुष वगैरे.

In reply to by राही

सहमत.. श्रीराम, लक्ष्मण, सीतामैया, सर्व पांडव, द्रौपदी, कर्ण, भीष्म, गौतम बुद्ध आणि (बहुदा) शिवाजी महाराज! श्रीकृष्णाच्या मांसाहारी असण्याबाबत शंका आहे. व्यासमुनी, अरूंधती, धृवबाळ यांबाबत माहिती नाही. दुर्वास मात्र पक्के मांसाहारी असावेत!! :-D

In reply to by राही

मंगेशकर / पु ल देशपांडे / जयवंत दळवी पण आहेतच कि

शाकाहारी पाण्यात तोंड बुचकळून पितात मांसाहारी जिभेने लपक लपक पितात... (पण शार्क/ गरुड ...माहित नही) :)