Skip to main content

मला एक प्रश्र्न पडला आहे "दाभोळकर की दाभोलकर" ?

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 23/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
गेले ३ दिवस डॉ. नरेंद्र दाभोळकर ह्यांचे आडनांव बदलले आहे का? व्याकरणाच्या द्रुष्टीने दाभोलकर हे चूकीचे आडनांव वाटते. जसे नेरुळकर,परळकर,परुळेकर, ह्या आडनांवात जसा "ळ" येतो तसाच "ळ" , "दाभोळकर" ह्या आडनांवात पण यायला पाहिजे. विकिपेडिया आणि लोकसत्ता आणि इतर मराठी व्रुत्तपत्रांत पण दाभोलकर असाच उल्लेख आहे.

वाचने 6500
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

मलाही असाच प्रश्न पडला होता. जालावर इतरांच्या प्रतिक्रिया वाचून खालील माहिती मिळाली. दाभोळ या गावावरून ज्यांचे आडनाव आहेत ते दाभोळकर व दाभोली या गावावरून ज्यांचे आडनाव आहेत ते दाभोलकर. डॉ. नरेंद्र दाभोळकर / दाभोलकर यांचे आडनाव पूर्वी अनेकदा 'दाभोळकर' असेच वॄत्तपत्रांतून वाचले आहे. त्यांच्या हत्येनंतर मात्र दोन्ही प्रकारे लिहिले जात आहे. मागे कुणीतरी एका कार्यक्रमात दत्तप्रसाद दाभोलकर यांचे आडनाव त्यांच्या उपस्थितीमध्ये दाभोळकर असे म्हंटल्यावर दत्तप्रसादांनी त्यावर आक्षेप घेतल्याची बातमी वाचली होती. महाराष्ट्रात असे इतरही काही आडनावांवरून होते. उदा कुलकर्णी हेच जवळजवळ निम्म्या राज्यात कुळकर्णी असे उच्चारले व लिहिले जाते. शेवटी नावात काय आहे? :-)

In reply to by श्रीरंग_जोशी

नावात शेवटी महाराष्ट्रात आडनांव आहे . दक्षिण भारतात शेवटी नाव आहे . बाकी चीन मधे काय येते माहीत नाही.... येनी येक्स पर्ट ... देअर... ऑं ?

आम्ही सातारकर त्यांना व त्यांच्या सर्व डॉक्टर नातेवाईकांना गेली अनेक वर्ष डॉ. दाभोळकर म्हणुनच ओळखतो....

खालील लिन्कवर नरेन्द्र दभोळ(ल)कर यान्ची मुलाखत निखिल वागळे घेत आहेत. बोलतान ते दाभोळकर असा उच्चार करत आहेत पण नाव मात्र दभोलकर असे दाखवले आहे. http://www.youtube.com/watch?v=bhPcNM70z50

डॉक्टरांच्या हत्येनंतर झालेल्या मुलाखतीत त्यांच्या मुलीने (मुक्ता?) स्वतःच्या आडनांवाचा उच्चार 'दाभोलकर' असाच केला आहे. तेंव्हा 'दाभोलकर' हेच बरोबर असावे.

डॉ. दाभोलकरांच्या दोन्ही मुलांशी झालेल्या गप्पा ऐका, त्यात दोघेही त्यांचं आडनाव दाभोलकर आहेत असं म्हणतात. शुद्धलेखन, व्याकरण हे माणसांच्या नावांच्या बाबतीत लागू पडत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इथे लेखि "दाभोळकर" तर मौखिक "दाभोलकर" आहे.. तर "खटपट्या" ह्यांच्या लिंक मध्ये उलटच... मज्जाच मज्जा..

दाभोलकर कुटुंब हे मूळचे वेंगुर्ल्याजवळच्या दाभोली गावातले, म्हणून ते दाभोलकरच. हे गाव फारसे कुणाला माहीत नसते. त्याउलट दाभोळ हे गाव आधीपासून व आता एन्रॉनमुळे पुष्कळांना ठाऊक आहे. म्हणून कदाचित् दाभोळकर हेच खरे आडनाव असावे असे अनेकांना वाटते. धाग्यात उल्लेखिलेल्या परळकर, परुळेकर, नेरुळकर या नावांपैकी परळ आणि परुळे या ग्रामनामांत मूळ 'ळ'च आहे. पन नेरुळकर बाबतीत मात्र दोन गावे संभवतात. त्यातले नव्या मुंबईतले नेरुळ हे जास्त प्रसिद्ध आहे पण नेरुळकर आडनाव फार कमी सापडते. दक्षिण कोंकणातले नेरूर त्या मानाने अप्रसिद्ध पण नेरूरकर मात्र पुष्कळ आहेत. मुंबईतल्या सुप्रसिद्ध आयडिअल बुक डेपोचे मालक नेरूरकर आहेत. या शिवाय डॉ. मीना नेरूरकर, प्र.श्री.नेरुरकर असे अनेक आहेत.

In reply to by राही

आंबा घाट उतरुन लांज्याला जाताना दाभोळे नावाचेदेखिल एक गाव लागते. बोलीभाषेत दाभोळं म्हणतात त्याला.

नावात काय आहे ? असे कुणी तरी ( हो त्याच्याही नावात काय आहे :) ) म्हणल्याचे स्मरते. असो अमोल केळकर

In reply to by अमोल केळकर

"माळी", "कोळी", ह्या आडनावांचे "माली", "कोली" असे का करावे?

In reply to by मुक्त विहारि

ठाकुरलीविषयी ठाउक नव्हते. माहीत करून दिल्याबद्दल आभार. पण दाभोलीमध्ये अशी कुठलीही 'आळी' नाहीय. ती दाभोलीच आहे.

In reply to by मुक्त विहारि

काकुस तेजाला ..ठाकुर्ली नाय ,आमी चोल्यांचे हाव

नावे आडनावे ही विषेशनामे आहेत. ती कशी लिहावी यात चुक/बरोबर योग्य/अयोग्य असे काहिहि नसते. विवक्षित व्यक्ती आपले जाव जसे लिहिते तेच त्याचे योग्य नाव असते. डॉ.दाभोलकर आपले नाव दाभो'ल'कर असे लिहित असत (त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे लेखक म्हणूनही त्य्यांचे नाव तसेच आले आहे). त्यामुळे किमान त्यांच्यासाठी तेच योग्य नाव आहे.

In reply to by ऋषिकेश

यावरून आठवले. माझे नाव 'ऋषिकेश' लिहिणे कसे चुकीचे आहे किंवा त्याचे स्पेलिंग 'Rushikesh' करणे कसे अयोग्य आहे हि सांगणारी अनेक संभाषणे झाली आहेत. त्यांना मी नेहमी सांगतो हे 'माझे' नाव आहे ते मी मला योग्य वाटेल तेच लिहिणे मला संबोधताना योग्य आहे. नाव म्हणजे मला संबोधन करण्याची मान्यताप्राप्त (माझ्याकडून मान्यता असलेली) ओळख/खूण. ती मी कोणती व कशी ठेवावी हा सज्ञान झाल्यानंतर माझा प्रश्न आहे! :)

In reply to by ऋषिकेश

आणि हा वाद बहुतेक लिहिण्यापुरताच मर्यादित असतो. बोलताना कोणी "हृषिकेश" असे धड बोलू शकत असेल तसे वाटत नाही. मी तरी पाहिले नाही.

सचिन तेंडुलकर हा गेली २४ वर्षे क्रिकेट जगतात प्रसिद्ध आहे. तो जगभर "सचिन तेंडुलकर" या नावानेच ओळखला जातो. विदेशी समालोचक, विदेशी खेळाडू देखील त्याच्या आडनावाचा उल्लेख "तेंडुलकर" असाच करतात. परंतु भारतातील हिंदी वृत्तवाहिन्या त्याचे नाव अजूनही "तेंदुलकर" असेच दाखवितात व त्याच्या आडनावाचा उच्चारही तसाच करतात. हिंदी भाषेत "ड" या अक्षराचा उच्चार "ड" असाच होतो. नावात "ड" असलेल्या इतर खेलाडूंच्या नावाचा उच्चार (उदा. राहुल द्रविड, दांडी यात्रा, वडोदरा इ.) नावाप्रमाणेच होतो. परंतु सचिनच्या बाबतीतच नावाचा अनुच्चार का? लोकमान्य टिळकांचे नावही हिंदीत "तिलक" असे लिहिले व सांगितले जाते. हिंदीत कदाचित "ळ" नसेल, पण "ट" नक्कीच आहे. तरीसुद्धा चुकीचा उच्चार का? का हा मराठी माणसांविषयीचा आकस आहे?

In reply to by श्रीगुरुजी

अहो आकस वगैरे काही नाही. प्रत्येक भाषिकांची उच्चाराची पद्धत वेगळी असते.. मराठी लोकं नाही का सिन्न्हा असा उच्चार करत सिन्हा या आडनावाचा. आता आपल्याला सिन्हा उच्चार करता येत नाही असं थोडच आहे. पटना चा पाटणा करतो.. शक्य तिथे सांगायच असा नाही असा उच्चार आहे.. म्हणून काही या कारणाने सरसकटपणे उत्तर भारतीयांचा मराठी लोकांवर आकस आहे असा ग्रह करुन घेण्याची गरज नाही..

In reply to by बाळ सप्रे

>>> अहो आकस वगैरे काही नाही. प्रत्येक भाषिकांची उच्चाराची पद्धत वेगळी असते.. हिंदीत "ड" हे अक्षर वापरले व लिहिले जाते व त्याचा उच्चार "द" असा न करता "ड" असाच केला जातो व ते अक्षर "द" असे न लिहिता "ड" असेच लिहिले जाते. राहुल द्रविडचे नाव हिंदी वाहिन्या "राहुल द्रविद" असे न दाखविता "राहुल द्रविड" असेच दाखवितात व त्याच्या नावाचा उच्चार "राहुल द्रविद" असा न करता "राहुल द्रविड" असाच करतात. असे असताना "सचिन तेंडुलकर" हे नाव अजूनही "सचिन तेंदुलकर" असे चुकीचे दाखविले जाते व त्याच्या नावाचा उच्चार "सचिन तेंदुलकर" असाच चुकीचा केला जातो. यामागे दुसरे कोणते कारण असणार? रतन टाटांचे नाव "रतन टाटा" असे दाखविले जाते व उच्चारही नावाप्रमाणेच केला जातो. पण लोकमान्य टिळकांच्या बाबतीत मात्र ते नाव "तिलक" असे दाखवून उच्चारही चुकीचा केला जातो. यामागेही दुसरे कोणते कारण असणार?

In reply to by श्रीगुरुजी

"तेंडुलकर - बरोबर.. तेंदुलकर - चूक" असे सचिनने सांगितले तर नक्कीच बदलता येईल.. उच्चार/ लिखाण चूकच आहे पण it's more of ignorance than आकस. असं म्हणायचय मला.. मराठीत पाटणा म्हणणे, लिहिणे यासारखेच.. यात कोणी अस म्हणेल का की चेन्नई बरोबर लिहिता आणि उच्चारता मग पटना का नाही? बिहारींवर आकस आहे..

In reply to by श्रीगुरुजी

सहमत आकस नसावा कहाणी ह्या सिनेमात विद्या आपले नाव तो बंगाली पोलिस अधिकारी बिद्या असा करतो म्हणून वैतागते तर अब तक छप्पन मध्ये नाना त्याच्या हिंदी भाषिक सहकार्याला त्याच्या उच्चारांवरून असेच टोमणे मारतो.

त्यांच खर नाव दाभोलकर कारण ते माझ्याच गावचे व माझ्याच आडनावाचे आहेत. आमच्या दोघांचे नाव दाभोलकर आहे. ते माझा वडिलांचे लांबचे भाऊ लागत होते. पण मी त्याना प्रत्यक्ष कधी भेटलो हि नाही व पाहिलेलही नाही. आता तरी तुमच्या मनातील शंकाच उत्तर मिळाल असेल. आमच गाव दाभोली.

काही दिवसांनी हे नाव पण गत स्मृतीत जाईल मग त्यावर उगाच चर्चा कशाला ता, क कुलकर्णी हे देब्रा तर कुळकर्णी असा उच्चार व लिहिणे हे सी के पी करतात , जाणकारांनी ह्यावर अधिक प्रकाश टाकावा.

In reply to by निनाद मुक्काम …

विदर्भ व शेजारील खानदेश व मराठवाड्याच्या भागांत कुलकर्णी हे आडनाव नसल्यातच जमा आहे. तिकडच्या लोकांचा असाही समज असतो की मूळ आडनाव कुळकर्णी असेच असून कुलकर्णी हा त्याचा आंग्लाळलेला / इंग्रजी स्पेलिंगनुसार असलेला उच्चार आहे.