दुनियादारी
सुहास शिरवळकर यांच्या "साहित्यकृती" वर आधारित मराठी चित्रपट
हि हेड लाईन वाचली आणि मनात १ शेर रुंजी घालू लागला.
हजारो साल "नर्गिस अपनी बेनुरी पे रोती है
बडी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा ||
इथे "दुनियादारी " हि साहित्यकृती हि नर्गिस
आणि झी सिनेमा आणि संजय जाधव हे दीदावर
मराठी साहित्यिकांनी "सु शी" ना कधीच साहित्यिक मानले नाही
सुशींचे हे दुख: कधी कधी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असे.
काल जेव्हा "दुनियादारी " पाहत होतो तेव्हा सारखी त्यांची आठवण होत होती.(पहिला दिवस ,दुसरा खेळ)
जेव्हा चित्रपट गृहाच्या बाहेर पडलो तेव्हा कान देऊन प्रतिक्रिया ऐकत होतो
एक मिसरूड नुकतेच फुटलेला तरुण जेव्हा म्हणाला " शिरीन चे आडनाव बदलले तेव्हाच मी समजलो कि झी वाल्यांनी स्टोरी बदलली "
सु शी नी जेव्हा दुनियादारी लिहिली त्या नंतर १२/१५ वर्षांनी जन्मलेला एक तरुण हे बोलत होता.
सु शी तुम्ही जिंकलात , मराठी वाचणारा आजचा युवक हि सु शी वाचून मग पुढे आपला वाचनाचा प्रवास करतो यातच सारे काही आले.
त्याला सांगावेसे वाटले अरे आज सु शी असते तर त्यांनी हि हा बदल मान्य केला असता.
हा चित्रपट यशस्वी होईलच पण सु शी ची कोणतीही साहित्य कृती एखाद्या समर्थ हातात पडेल तर त्या वरून बनवलेला चित्रपट नक्की हिट होईल
समांतर , जाई , कल्पांत , निदान , प्राक्तन अश्या बर्याच "नर्गिस" "दीदावर" ची वाट पहात आहेत.
झी मराठी आणि संजय जाधव यांना धन्यवाद आणि सर्व कलाकारांचे , आणि या चित्रपटासाठी ज्यांनी कार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार .
(सध्या सहावा आठवडा सुरु आहे आणि चार वेळा जाऊन तिकिटे मिळाली नाहीत अशी तक्रार एका मित्राने केली आहे )
वाचने
5614
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
"सुशि"..
(सध्या सहावा आठवडा सुरु आहे
(सध्या सहावा आठवडा सुरु आहे आणि चार वेळा जाऊन तिकिटे मिळाली नाहीत अशी तक्रार एका मित्राने केली आहे )कशी मिळणार.. मी दोनदा बघून आलो आणि जेव्हा मी दुसर्यांदा गेलो होतो तेव्हा आमच्यातल्या एकाची चौथी वेळ होती. :) बाकी मला चित्रपट आवडला.. अर्थातच म्हणूनच दुसर्यांदा गेलो.. मी पुस्तक वाचलेले नाही, मात्र ज्यांनी वाचलेले आहे तसेच जे सुशि प्रेमी आहेत त्यांचा बराच नाराजीचा सूर उमटतोय..मराठी साहित्यिकांनी "सु शी" ना कधीच साहित्यिक मानले नाहीहे मात्र मला माहीत नव्हते.. हि खरेच वस्तुस्थिती होती का? कारण वर जो मी नाराजीचा सूर उल्लेखला आहे त्याला हे किंचित विरोधाभास दर्शवते. जर ते होते तर मग हे कसे?हे असं:
In reply to (सध्या सहावा आठवडा सुरु आहे by तुमचा अभिषेक
खल्लास!!!
In reply to हे असं: by आदूबाळ
सविस्तर प्रतिसादाबद्दल
In reply to हे असं: by आदूबाळ
आदूबाळ..
In reply to हे असं: by आदूबाळ
तसल्या पुस्तकांच्या यादीत
In reply to हे असं: by आदूबाळ
चित्रपटात इतक्या सुंदर कथेची
दुनियादारी हा एक स्वतंत्र
सहमत
In reply to दुनियादारी हा एक स्वतंत्र by गुलाम
आमची दुनियादारी
एक मराठी चित्रपट हिंदी
In reply to आमची दुनियादारी by आदिजोशी
दुनियादारी ७-८ आठवडे लोटुन
दुनियादारी पुस्तक तर मस्त
सुशिं ना आज हि साहित्यीक
सु शी ची दुनियादारी
दुनियादारी पुस्तक तर मस्त
सुशीना साहित्यिक म्हणने
QED
In reply to सुशीना साहित्यिक म्हणने by अग्निकोल्हा
असहमत. सुशिंचा मोठा चाहता
In reply to सुशीना साहित्यिक म्हणने by अग्निकोल्हा
सुशिंचा मोठा चाहता वगैरे
In reply to असहमत. सुशिंचा मोठा चाहता by बॅटमॅन
हाण्ण तिच्यायला!!! ROFL...
In reply to सुशीना साहित्यिक म्हणने by अग्निकोल्हा
लेख उत्तम.
दुनियादारी कोटीच्या गल्ल्यात मानधनाची मुठ मात्र लाखाची
बातमी वाचली..
In reply to दुनियादारी कोटीच्या गल्ल्यात मानधनाची मुठ मात्र लाखाची by भ ट क्या खे ड वा ला