✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गेट आयडीया !

च
चाफा यांनी
Wed, 08/28/2013 - 02:44  ·  लेख
लेख
" कल्पना सर्व्हीसमध्ये आपलं स्वागत आहे सर, मी आपली काय सेवा करू शकतो ? " " माझी सेवा नका करू हो, तुम्ही समाजसेवक नाही आहात, माझ्या तक्रारीचं काय झालं ? " " कोणती तक्रार सर ? " " मी गेले तीन दिवस फोन करून सांगतोय माझ्या नेटसेटरचा स्पिड कमी झालाय म्हणून" " सर कृपया आपण शेवटचा रिचार्ज कधी केला हे सांगू शकाल का ? " " ही तुमच्या नेटवर्क बद्दलची खात्री आहे की माझ्या जिवनरेषेबद्दल संशय ? " " मी समजलो नाही सर" " नाही, शेवटचा रिचार्ज असं विचारताय म्हणून म्हंटलं " " त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो सर, पण मला पुन्हा एकदा आपला प्रॉब्लेम सांगू शकाल का ? " " माझा नेटसेटर गेले तीन दिवस अत्यंत सावकाश चालतोय" " सर आपण आपला पिसी चेक केला आहात का ? त्यात व्हायरस असेल तरी नेट स्लो होऊ शकतं " " मी माझा पिसी तर चेक केलाच आहे पण तुमच्या नेटसेटरची दोन्ही बाजूची कव्हरही भिंगातून तपासलीत कुठे तुटली वगैरे नाहीत " " सर नेटसेटरच्या कव्हर तुटण्याचा संबंध त्याच्या स्पिडशी नसतो " " असं कसं ? समजा तुमच्या पायातली चप्पल तुटली तर तुम्ही धावाल की आहे त्यापेक्षा हळू चालाल ? " " सर तुमच्या जवळपास तीन किलोमीटरच्या परीसरात कल्पनाचा टॉवर आहे का ? " " आहे पण तुम्ही कितीही म्हणालात तरी आख्खा पिसी घेऊन मी त्या टॉवरवर चढू शकणार नाही" " नाही सर, आपला नेटसेटर थ्रीजी आहे " " म्हणजे तीन गावं फिरून येतं का नेटवर्क माझ्याकडे ? " " सर, थ्रीजी म्हणजे थर्ड जनरेशन " " मागच्या की पुढच्या ? मागच्या तीसर्‍या पिढीतला नेटसेटर असेल तर परत घेऊन जा, अचानक एक्सपायर झाला तर .." " तसं नाही, कधी कधी वातावरणामुळे थ्रीजीच्या स्पिडवर परिणाम होतो, पाऊस वगैरे पडत असला तर.. " " खरंच की, पाऊस पडत असताना नेट चांगलं चालतं हो, पण घेताना हे नाही सांगितलं की थ्रीजीची कनेक्टीव्हीटी पावसाच्या थेंबांनी मिळते " " तसं नाही सर, वातावरण ढगाळ असलं की नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो कधी कधी " " मग तर नाहीच चालणार, घरात पुरेसा वेळ देता येत नाही म्हणून माझ्या घरातलं वातावरण कायम ढगाळच असतं " " घरातलं नाही सर, मी ओव्हर ऑल वातावरणाबद्दल बोलतोय " " अच्छा म्हणजे देशातल्या वातावरणाबद्दल, ते तरी कुठे धड आहे सध्या ? सगळं ढगाळ हो " " सर देशातलं नाही हो, प्रत्यक्ष वातावरण जे तुमच्या खिडकीतून दिसतं ते " " माझ्या खिडकीतून समोरच्या आज्जींचं घर दिसतं, पण त्याचं नांव साईकृपा आहे, `वातावरण' नाही काय " " सर तुम्ही माझी चेष्टा करत आहात का ? " " मी नाही तुम्हीच चेष्टा लावलेय माझी, नेटसेटर घेताना जाहिरात अशी केलीत की जणू याच्या सहाय्यानं मी भविष्य पाहू शकेन, पण इथे आजचं इमेल पहाता येईल की नाही याची खात्री नसते मला " " सर, तुम्ही आमच्या सेवेबद्दल नाराज आहात का ? " " नाही हो, उलट तुमच्यामुळे माझ्या नावावर थोडंफार पुण्य जमा होत असेल वरती, रोज `देवा आज तरी नेट सुरू असू दे' चा धावा केल्यानं " " सर याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो " " देवाचा धावा केल्याबद्दल तुम्ही दिलगीरी व्यक्त कशाला करताय ? ऑलरेडी माझ्या अकाऊंट मधे देवाचं दिलगिरीचं इमेल येऊन पडलंय, `इथे मी काही मदत करू शकत नाही' असं " " सर, मी आपली अडचण समजू शकतो, मी ताबडतोब आपल्या तक्रारीची नोंद घेतो " " पुढे ?? " " पुढे काय ? सर ? " " नुसती नोंद घेणार ? आणि नेटवर्क मिळत नसेल तर नंतर काय निषेध व्यक्त करणार आहात का ? " " सर आपल्या माहितीसाठी सांगतो, आपला कॉल रेकॉर्ड होत आहे " " काय सांगता ? एक काम करा, आपलं संभाषण मला ताबडतोब पाठवा, त्याचं काय आहे मी अजूनपर्यंत माझा आवाज फोनवर कसा येतो हे ऐकलेलंच नाहीये " " या व्यतिरीक्त मी आपली काही मदत करू शकतो का सर ? " " आहे हा प्रॉब्लेम न सोडवताच अजून एखादा प्रॉब्लेम यायची अपेक्षा करताय का ? " " कल्पनामधे कॉल केल्याबद्दल धन्यवाद सर, आपला दिवस शुभ जावो " शप्पत सांगतो त्यानं शुभ ऐवजी अशुभ म्हंटलेलं मला स्पष्ट ऐकू आलं. बरं आता आणखी कुठली वायरलेस इंटरनेट सेवा महाराष्ट्रात आहे हे सांगितलंत तर बरं होईल, कारण पुढची पोष्ट कदाचित दुसर्‍या कंपनीच्या नेट वरून टाकायची वेळ येईल माझ्यावर.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
5018 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

किती तो संयम!

स्पंदना
Wed, 08/28/2013 - 05:39 नवीन
किती तो संयम! अगदी फ्रीझरमध्ये बसुन बोलत होता राव तो. :)) :))
  • Log in or register to post comments

%) %)

लॉरी टांगटूंगकर
Wed, 08/28/2013 - 09:26 नवीन
%) %) :| :| =] =]
  • Log in or register to post comments

आयडियाची कल्पना भारी आहे.

मनीषा
Wed, 08/28/2013 - 09:47 नवीन
आयडियाची कल्पना भारी आहे.
ऑलरेडी माझ्याअकाऊंट मधे देवाचं दिलगिरीचं इमेल येऊन पडलंय, `इथे मी काही मदत करू शकत नाही' असं "
:D
  • Log in or register to post comments

हा हा हा , आयडियचया कल्पना

माझीही शॅम्पेन
Wed, 08/28/2013 - 10:02 नवीन
हा हा हा , आयडियचया कल्पना खुपच खुमसदार , मज्जा आली वाचून
  • Log in or register to post comments

हाहाहा... आवडेश... भारतात

Mrunalini
Wed, 08/28/2013 - 10:07 नवीन
हाहाहा... आवडेश... भारतात असताना नेट साठी नेहमी फोन करायला लागायचा... तेव्हा सुद्धा हे लोक माझ्या जाम डोक्यात जायचे.
  • Log in or register to post comments

जब्राट लिवलय वो..

नानबा
Wed, 08/28/2013 - 10:17 नवीन
भन्नाट लेखनशैली, खुसखुशीत विनोद... धमाल आली वाचायला.. :)) :)) :))
  • Log in or register to post comments

मस्त..

कोमल
Wed, 08/28/2013 - 10:21 नवीन
मस्त.. अगदी खुसखुशीत.. एक शंका - बोलत होतं ते पाव्हनं पुन्याचं ए का वो?
  • Log in or register to post comments

कोमले,

नानबा
Wed, 08/28/2013 - 10:25 नवीन
कसलं करेक्ट वळखिलंस गं.... :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

कुनी बी न्हाई

चाफा
Sat, 08/31/2013 - 19:28 नवीन
दोनपैकी एक पन पाव्हनं पुन्याचं नाहीत, कस्टमर केअर वाले असंच मराठी बोलतात आणि मी फारचं वैतागून फोन केलेला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

Got an idea sirji...

नित्य नुतन
Wed, 08/28/2013 - 11:38 नवीन
Got an idea sirji... एकदम खुसखुशीत .... दिवसाची सुरुवात चांगली झाली ..
  • Log in or register to post comments

सुरेख !

विटेकर
Wed, 08/28/2013 - 11:53 नवीन
चान्गली आहे लेखन शैली आप्ली. पुलेशु
  • Log in or register to post comments

हाश!! ।।।उश्स

बासून्दी
Wed, 08/28/2013 - 12:16 नवीन
कल्पनाचा ओपरेत्अरः थेवला एक्दाचा फोन!!!!! सदाशीव पेथेत्ला दिस्तोय
  • Log in or register to post comments

चांगला कल्पनाविलास

आदिजोशी
Wed, 08/28/2013 - 12:34 नवीन
चांगला कल्पनाविलास
  • Log in or register to post comments

जमलाय..

चिगो
Fri, 08/30/2013 - 12:07 नवीन
कल्पनाविलास झक्कास.. पण तुमचा 'बीएसएनएल'वाला धागा जबराट होता.. त्याला तोड नाही.
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
गुरुवार, 09/05/2013 - 14:22 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

हह पुवा

कपिलमुनी
Fri, 08/30/2013 - 14:09 नवीन
आत्म्या.. इथे तुझ्या हसून लोळण्याच्या स्मायल्या मिसतोय
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी :)

चाफा
Sat, 08/31/2013 - 19:31 नवीन
प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद, ही आमच्याकडची आयडियाची खरोखरची आवस्था आहे हो ! :(
  • Log in or register to post comments

@ माझ्या खिडकीतून समोरच्या

यसवायजी
Sat, 08/31/2013 - 19:38 नवीन
@ माझ्या खिडकीतून समोरच्या आज्जींचं घर दिसतं लै हसलो.. :)) भारी लिवलय राव..
  • Log in or register to post comments

जबरा!

अग्निकोल्हा
Sat, 08/31/2013 - 19:47 नवीन
हे साले सगळे असेच असतात. मध्यंतरी वायरफ्रि नेटचा चांगलाच खराब अनुभव घेतल्याने आपल्या दुखात सहभागी. अन संभाषणाला पुरेपुर दाद.
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
गुरुवार, 09/05/2013 - 14:10 नवीन
लै भारी! पण माझ्याकडे संचारी ध्वनीयंत्रांच्या गलबल्यात "कल्पनाशक्ती" च फक्त चालते हो! "हवापुच्छ" तर कायम "कल्पने"वरच भटकत असतं! आता "बटाटा" चालतोय का बघा. मी मध्यंतरी त्यांना वैतागून तुमचा नंबर दुसर्‍या कंपनीकडे नेते म्हटलं तर मला ६ महिन्यांसाठी कॉल रेट्स कमी करून दिले. तेवढं सोडलं तर सगळे मेले इथून तिथून सारखेच!! आमच्या घरात "विश्वास" आणि "वडापाव" यांचेही नंबर्स घरातल्या सदस्यांकडे आहेत आणि कोणत्याही कॉल सेंटरला कॉल केल्यास यापेक्षा वेगळे संभाषण आजपर्यंत मला ऐकायला मिळालेले नाही हे इथे नमूद करते. तसंच त्या "तारामुक्त" जोडण्यांपेक्षा सर्कारी दूरसंचार ची तारायुक्त जोडणी बरीच बरी चालते हा अनुभव.
  • Log in or register to post comments

+१

अनिरुद्ध प
गुरुवार, 09/05/2013 - 17:40 नवीन
+१ सहमत्,मुम्बैत म टे नि ली ची तारा जोडणी खरच उत्तम (स्वस्त आणि मस्त)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

माझ्याकडेही हेच असते. असेच

उद्दाम
गुरुवार, 09/05/2013 - 14:16 नवीन
माझ्याकडेही हेच असते. असेच सगळे संभाषण आमचेही झाले होते. शेवटी कंटाळून बी एस एन एल घेतले.
  • Log in or register to post comments

ब्येसेनेल ला वैतागुन त्याचा

चाफा
गुरुवार, 09/05/2013 - 17:13 नवीन
ब्येसेनेल ला वैतागुन त्याचा पत्ता कट केला आणि एम टी एस घेतलं, पण ते अल्पायुषी निघालं नाईलाजास्तव कल्पनाकडे वळावं लागलं, परत बिएसएनएल कडे जावं तर ऑफीसात भिंतीवर ते उंदिरवालं मुक्तक चिकटवून ठेवलंय त्यांनी..गंमत म्हणून असेल पण लाज वाटते हो :(
  • Log in or register to post comments

मस्त

अनिरुद्ध प
गुरुवार, 09/05/2013 - 17:41 नवीन
खुमासदार लेख पुलेशु.
  • Log in or register to post comments

समोरचा मणुक्ष तुझं ईतकं बोलणं

गणपा
गुरुवार, 09/05/2013 - 20:27 नवीन
समोरचा मणुक्ष तुझं ईतकं बोलणं (सहन करत) ऐकत होता, त्या बद्दल त्याचा जाहीर सत्कारच करायला हवा. :)
  • Log in or register to post comments

खतरनाक. जाम मजा आली वाचतांना.

पाषाणभेद
Fri, 09/06/2013 - 09:14 नवीन
खतरनाक. जाम मजा आली वाचतांना.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा