Skip to main content

प्रतिज्ञा, दाभोळकरांचा मारुती आणि सान्ताक्लॉज

लेखक पुष्कर जोशी यांनी रविवार, 25/08/2013 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
भारत माझा देश आहे। सर्व भारतीय माझे बांधव आहेत। माझ्या देशावर माझे प्रेम आहे। माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन। मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन। माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे। त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे। आपण लहानपणी शाळेत असताना हि प्रतिज्ञा रोज म्हणत असू .. आमच्या शाळेत तर मराठी हिंदी इंग्रजी आणि संस्कृत अशा४ भाषामधून प्रतिज्ञा म्हटली जात असे .. त्यामुळे शालेतील सर्वाना ४ भाषांमध्ये प्रतिज्ञा पाठ आहे .... पण... आज कोण प्रतिज्ञा पाळते का ? कि संविधानातील आदर्शांप्रमाणे विसरून जायचा विषय झालाय प्रतिज्ञा म्हणजे ....असेच वाटते ... आता पहा प्रतिज्ञेतील ४थे वाक्य माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। म्हणजे काय ? परंपरा कशास म्हणाव्यात ... प्रतिज्ञा म्हणताना आपणास त्याचा अर्थही समजावून सांगीताला पाहिजे... अशातच काही बातम्या येत आहेत २४ कोस परिक्रमेवर बंदी... हैद्राबाद मध्ये भाग्यलक्ष्मी मंदिरात आरती करण्यावर बंदी ... आता ह्या परंपरा नव्हेत काय ? कि हे सगळे कायदा सुरक्षेचे प्रश्न आहेत ... आणखीन एक बातमी ... लोकसत्ता मध्ये वाचली दाभोळकारांचा मारुती ... ह्यांनी पोतराजांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वाचे काम केले .... पोताराजांचे सद्य आयुष्य भले बिकट असेल पण ती एक परंपरा नव्हे काय .. ती टिकवण्यासाठी आपण काय करतो ? जाता जाता मला पोतराज हे मराठी सान्ताक्लोज वाटतात ? तो मान दिला तर परंपरा पण टिकेल आणि त्यांचे जीवन पण सुसह्य होईल... काय म्हणता बरोबर का ? कोणकोण तयार आहे करिअर इन पोतराज करायला ?

वाचने 3228
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

पोतराज म्हणजे देवदासींसारखी देवाला सोडलेली मुले आहेत तर अशा परंपरा नष्ट झालेल्या चांगल्या. प्रतिज्ञेत ज्या परंपरांचा उल्लेख आहे त्या समृद्ध परंपरा आहेत. अशा माणसाला हीन बनवणार्‍या परंपरा सांभाळायची काही गरज नाही.

कोणकोण तयार आहे करिअर इन पोतराज करायला ?
आयसिआयसिआय बँकेत निसत पाउल टाकताच ५० लाखाचे प्रिअ‍ॅप्रुव्ह्ड होमलोन, २-४ गोल्ड प्लाटिनम क्रेडिट कार्ड्स, व्हॅलुएबल कस्टमरशिप ऑफर होत असेल तर माझि तयारी आहे करिअर इन पोतराज करायला .

जोशी, सती सुद्धा परंपराच होती मग त्याचे काय करावेसे वाटतेय तुम्हाला ? तुमच्या परंपरा मानण्याचे ठीकच आहे पण दुसऱ्याच्या जीवाचे काय? मारुतीवरचा लेख वाचूनही जर तुम्ही परंपरा परत सुरु करायचे म्हणतायत तर अवघड आहे ! बाय द वे सांताक्लॉज काल्पनिक असतो आणि पोतराज मात्र खरा खुरा माणूस असतो हे माहित आहे ना तुम्हाला ? -निखिल

In reply to by निखिलचं शाईपेन

सांताबाबा काल्पनिक असतो. आणि समजा कुणी बनलाच सांता, तर तो एका रात्रीपुरताच असतो. पोतराज मात्र जन्मभर असतो. सांताबाबाला लहान मुले प्रेमाने जवळ करतात. पोतराजाला लहान मुले चिडवतात. इतके फरक असुनही याना दोन्ही सारखेच वाटते !

जोशी, सती सुद्धा परंपराच होती मग त्याचे काय करावेसे वाटतेय तुम्हाला ? तुमच्या परंपरा मानण्याचे ठीकच आहे पण दुसऱ्याच्या जीवाचे काय? मारुतीवरचा लेख वाचूनही जर तुम्ही परंपरा परत सुरु करायचे म्हणतायत तर अवघड आहे ! बाय द वे सांताक्लॉज काल्पनिक असतो आणि पोतराज मात्र खरा खुरा माणूस असतो हे माहित आहे ना तुम्हाला ? -निखिल

तुम्ही तुमच्या घरी सांगा की तुम्हाला "पोतराज" या फील्डमध्ये करीयर करणार आहात. आणि घरच्यांच्या प्रतिक्रिया इथे लिहा. अवांतरः तुम्ही कितवीला आहात? :)

माझ्या कडून चूक झाली... मी वासुदेव पहिला आहे पण पोतराज नाही... मला पोतराज आणि वासुदेव एकाच वाटत होते... औरंगाबाद मध्ये... तमिळ भाषिक काही गायक/भिक्षुकी दरवर्षी येतात... आणि इतक्या सुंदर आवाजात मराठीत अभंग, भजन, कीर्तन म्हणतात कि बस कानाला मनाला खूप छान वाटते... जसे गायक हे करिअर होऊ शकते तसे अभाग कीर्तन गाणारे असे का करिअर होऊ शकत नाही... मी हे सगळे प्रातिनिधिक घेतले होते ... जाता जाता आईने व बाबांनी अशातच य.च.मुक्त.वि. चा योग डिप्लोमा केला... त्यातील एक पुस्तक हातात लागले... पहिल्याच पानावर... दुवा मुळ मुद्दा असा आहे कि १. आपणास सर्व भारतीय परंपरा माहित आहेत काय ? २. त्यातील समृद्ध, चांगल्या, टाकाऊ कशा ठरवायच्या ? कोणते परिमाण लावायचे .. का फक्त विज्ञान आणि तर्क ? ३. त्या टिकवण्यासाठी काय करता येईल ? ४. सरकार नावाची अजस्त्र यंत्रणा काही करते का ? ५. त्या आपले जीवने ध्येय असू शकतात का (जसे डॉ., engg) असते तसे.. ? काही सापडले.. http://www.stephen-knapp.com/

In reply to by पुष्कर जोशी

१. आपणास सर्व भारतीय परंपरा माहित आहेत काय ? तुम्हाला वासुदेव आणि पोतराज एकच वाटला. अज्ञान बाळगायचा तुम्हाला एकट्यालाच मक्ता दिलेला नाही. २. त्यातील समृद्ध, चांगल्या, टाकाऊ कशा ठरवायच्या ? कोणते परिमाण लावायचे .. का फक्त विज्ञान आणि तर्क ? ते ज्याने त्याने ठरवावे. ४. सरकार नावाची अजस्त्र यंत्रणा काही करते का ? सरकारने काही केले की सरकारने खाजगी आयुष्यावर आक्रमण करावे का, असा धागा तुम्हीच काढला असता. सरकारने काय करावे अशी अपेक्षा आहे? तीर्थ्क्षेत्राना जायला सरकार गाड्य सोडते, रस्ते करते, नदीत हगले मुतले तरी गप्प बसते, रस्त्यावर कडकलक्ष्मी, पोतराज, वासुदेव मुस्तपणे फिरु शकतात. ते कोणत्याही देवाची भक्ती करु शकतात. काम करु शकतात, किंवा काम न करता धर्माच्या नावाने भिक्षाही मागू शकतात. जुनी पोथ्यापुराणे आता पुस्तके, इंटरनेट या रुपात निघत आहेत. तुम्हीच वर लिवले आहे, डिप्लोमा इन योगा ... वगैरे.... म्हणजे तेही उपलब्ध आहे. अजुन काय हवे आहे? सर्व धार्मिक सणाना सुट्ट्ञा असतात. दिवाळीला दिवे लावायला बोनस मिळतो. साखर रुपयाभर स्वस्त होते. मुलाना संस्कृती समजायला सुट्ट्या देतात. शाळेत बालसंस्कारांच्या नावाने हिंदु देव, पूजा, विधी यांचा भडिमार सुरु असतो. अजुन काय कमी पडले आहे तुम्हाला?

In reply to by उद्दाम

असा अभ्यासक्रम असलेली शाळा कुठे आहे हो माझ्या माहितीत अशी एकही शाळा दिसत नाही.

या विषयावरचे आपले मनोगत वाचले -आमचा मान पहिला ही अट असो सावकाश मत नोंदवेन