रूपयाचे चिन्ह अन रूपयाचे अवमुल्यन
रूपयाचे चिन्ह अन रूपयाचे अवमुल्यन
जुलै २०१० मध्ये भारतीय रूपया या चलनाचे नविन चिन्ह स्विकारले गेले. दैनिक सामनाच्या या बातमीनुसार अंकशास्त्रतज्ञ तसेच वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र यांच्या तज्ञांच्या मते हे चिन्ह अशुभ आहे. केवळ या कारणामुळे रूपया या चलनाचे अवमुल्यन अंतरराष्ट्रीय बाजारात होते आहे असेही या तज्ञांना वाटते. हे चिन्ह बदलण्यात यावे व त्याचबरोबर नोटांवर असलेली गांधीजींच्या प्रतिमेचीही दिशा बदलवण्यात यावी असे या तज्ञांनी सुचवलेले आहे.
मुळात देवनागरी वर्णमालेत रू. हे अक्षर सुटसुटीतपणे लिहीता येत असतांना हे नविन चिन्ह स्पर्धेव्दारे निवड केले जाणे हेच मोठे अतार्तीत होते. जुने रू. चिन्ह रदबदली करून अनेक प्रश्न उपस्थीत झाले आहेत. जेथे जेथे रू. हे चिन्ह वापरत होते तेथे तेथे नविन रूपयाचे चिन्ह वापरावे लागले असेल. टांकसाळीत नविन डाईज, नोटांवर नविन छपाई आदींमध्ये बदल करावे लागले असतील.
त्याचबरोबर संगणकाच्या लिपीमध्येही हे चिन्ह तयार करावे लागले. हा नविन फॉन्ट म्हणजे केवळ इमेज म्हणून वापरला गेल्याने बहूतेक ठिकाणी तो ठिगळासारखा दिसतो हे मान्य करावे लागेल.
नाविन्याचा शोध घ्यायला हरकत नाही पण ज्या गोष्टी प्रचलित आहेत, सोप्या आहेत त्या बदल करून काय मिळते?
या बदलाआधी रूपया हे अक्षरात लिहीता येत होतेच की. आणि केवळ चिन्ह बदल केला म्हणजे फार काही मोठी गोष्ट केली असे होत नाही. चिन्हात बदल केल्याने ज्या गोष्टी रूपया किंबहूना भारतीय चलनासोबत होत होत्या व भविष्यातही होत राहतील त्यात काही बदल होणार नाही.
देवनागरी वर्णमाला रूपया हे अक्षर रू. या चिन्हात लिहीण्यासाठी परिपुर्ण असतांना केवळ काहीतरी वेगळे करायचे हे ठसविण्यासाठी रूपयाचे नविन चिन्ह स्विकारले गेले असे म्हणता येईल.
अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र काहीही म्हणोत. भारत सरकारने रू. हे जुनेच चिन्ह कायम करावे कारण तेच जास्त लोक अजुनही वापरतात व त्याद्वारे देवनागरी लिपीची ओळख नष्ट होत नाही.
वाचने
10885
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
हा लेख लिहील्यानंतर रूपयाच्या
In reply to हा लेख लिहील्यानंतर रूपयाच्या by पाषाणभेद
पाभे विषय तर मस्त काढलाहात तर
In reply to पाभे विषय तर मस्त काढलाहात तर by अभ्या..
अभ्या, अत्यंत सुरेख प्रतिसाद!
माझी मतं...
जुलै २०१० मध्ये भारतीय रूपया
सबकुछ गांधी
जुलै २०१०? तुम्हाला जुलै २०११
पाभे, घाबरु नका, आहे तसे
In reply to पाभे, घाबरु नका, आहे तसे by गंगाधर मुटे
हे जरा एक्सप्लेन कराल का ?
महान जोक
आपल्या देशातले भ्रष्ट आणि
हम्म्म्म्म्म.....
सुन रहा है ना तू.... रो रहा
या लेखाबाबत एक निरीक्षण असं
In reply to या लेखाबाबत एक निरीक्षण असं by गवि
गवि, लेख मलाही पटला नाही पण त्या निमित्तानं
लवकरच १ डॉलर =७० रु हे चित्र
In reply to लवकरच १ डॉलर =७० रु हे चित्र by मदनबाण
१ डॉलर = १०० रुपये .
In reply to १ डॉलर = १०० रुपये . by प्रसाद गोडबोले
१ डॉलर = १०० रुपये .
आणि तेवढाच जास्त शेतकर्यांच्या श्रममुल्याचा भाव वधारेल. व दोन पैसे जास्तीचे शेतकर्याच्या पदरात पडेल.
:)काही दिवसापुर्वी चेपुवर
In reply to काही दिवसापुर्वी चेपुवर by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
ठेंगा
In reply to काही दिवसापुर्वी चेपुवर by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तसेच
In reply to तसेच by अनिरुद्ध प
याचे कारण त्यातील धातूची
(No subject)
चर्चेचा उद्देश केवळ एकाचेच मत
सर्वप्रथम रु हे रुपयाचं चिन्ह
In reply to सर्वप्रथम रु हे रुपयाचं चिन्ह by बाळ सप्रे
अज्ञान की आळस?
वाचते आहे
In reply to वाचते आहे by पैसा
अभागी.
रुपयाच्या घसरणीचा शेतकर्याना