✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बिननावाची कथा - १

आ
आजानुकर्ण यांनी
गुरुवार, 11/29/2007 - 11:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11857 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर गुरुवार, 11/29/2007 - 11:45 नवीन

हम्म..

कथा चांगली वाटते आहे, इंटरेस्टींगही वाटते आहे. परंतु भाषा साधी, सहजसोपी, संवाद साधल्यासारखी असती तर बरे झाले असते. लेखन काही ठिकाणी उगाचंच शब्दबंबाळ आणि वर्णनबंबाळ वाटते आहे.. माझ्यासारख्याला अशी भाषा फारच जड जाते, वाचायला कठीण जाते... असो, पुढील भागांकरता अनेकानेक शुभेच्छा... आपला, (सहजसोप्या, साध्यासुध्या भाषेतल्या लेखनाचा फ्यॅन) तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 11/29/2007 - 12:04 नवीन

छान

कथाबीज तगडे असेल असे वाटते आहे. ओघावती भाषा आली तर अजुन छान होइल कथा. कुटीसमोरील औदुंबराच्या झाडाच्या तिसर्‍या फांदीवरील अगदी बुंध्याजवळच्या पानांना सूर्यकिरणे सोनेरी मुलामा चढवत होती. बाकी असे वाक्य वाचतांना उगाचच अभ्यास केल्यासारखे वाटते. कुटीसमोरील औदुंबराच्या झाडावर उन आले होते. असेही चालले असते, पण हे अगदी वैयक्तिक मत बरका, आधी म्हटल्या प्रमाणे कथाबीज तगडे असेल असे वाटते आहे. (उत्कृष्ट कथा असेल अशी आशा असणारा) आनंदयात्री
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव गुरुवार, 11/29/2007 - 13:10 नवीन

सुरुवात

... छान झाली आहे. पुढील लेखनाला शुभेच्छा. अवांतरः बाकी, जीए शैली जमतिये :) -- ध्रुव
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 11/29/2007 - 13:27 नवीन

स्मरणाचा उत्सव जागून

सुरुवात चांगली झालीय. जी.एं.ची शैलीही जमते आहे. विस्मृतीसंबंधात कथा आहे असं वाटतंय, तेव्हा 'स्मरणाचा उत्सव जागून' हे शीर्षक चालू शकेल का? (ग्रेसच्या कवितेतली ओळ - अंधार असा घनभारी, चंद्रातून चंद्र बुडाले, स्मरणाचा उत्सव जागून जणू दु:ख घराला आले.) पुढील भागांची वाट पाहतो आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 11/29/2007 - 13:55 नवीन

मस्त

खूपच सुंदर ओळी. स्मरणाचा उत्सव जागून जणू दु:ख घराला आले. - आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ज
जुना अभिजित गुरुवार, 11/29/2007 - 13:36 नवीन

अर्थातच

अर्थातच जीएंची भ्रष्ट नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःच्या शैलीत लिहिली तर कथेत अधिक इन्वॉल्व(!) होता येईल. लिहिणार्‍यालाही आणि वाचणार्‍यालाही. दुसर्‍याच्या शैलीत लिहिणे म्हणजे एक तर त्याचे विडंबन केल्यासारखे वाटते किंवा आपली शैली विकसित होत नाही. हे माझे अगदी वैयक्तिक मत आहे. कथा एकदम सशक्त आहे. वातावरणनिर्मिती छान झाली आहे. पुढच्या भागात कथा कशी वळणार आहे माहित नाही तरी 'गुरुदक्षिणा' नाव(डोहकाळिमा, रमलखुणा, पिंगळावेळ धर्तीवर ;-)) सुचवतो. अन्यथा आहे हे नाव उत्तम आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 11/29/2007 - 13:45 नवीन

शैली

स्वतंत्र शैली विकसित करायला अजून वेळ आहे. ;) सध्या चांगल्या अक्षरांवर गिरवलेले उत्तम. ;) गुरुदक्षिणा नाव योग्य ठरणार नाही. कारण गुरु निमित्तमात्र आहेत. मूळ कथा स्मरण किंवा विस्मरणावरच आहे. बिननावाची कथा हे चुकून बिनपावाची कथा असे मीच वाचले ... मिसळपाव मनात घोळत असल्यामुळे असेल ... ;) - आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
म
मनिष गुरुवार, 11/29/2007 - 14:05 नवीन

कथा छान वाटतेय...

पुढे काय होते त्यावर नाव ठरेल. अल्झायमर वर आहे का?
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 11/29/2007 - 15:26 नवीन

चांगली कथा

आजानुकर्ण, आपल्या सांगण्यानुसार मूळ लेख वाचला. आपली कथा चांगली रंगतदार होते आहे. पुढचे भागही लवकर टाका. 'स्मरणकळा' किंवा 'आठववेणा' कसे वाटेल? (मलाही एखादी कथा लिहाविशी वाटली.;))
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित गुरुवार, 11/29/2007 - 15:31 नवीन

लिहाविशी

मलाही एखादी कथा लिहाविशी वाटली.;) लिहावीशी की प्रसवावीशी? :) मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
द
देवदत्त गुरुवार, 11/29/2007 - 20:07 नवीन

येऊ द्या...

शैलीमुळे जरा वेळ लागतोय समजायला. असो, पूर्ण कथा हळू हळू उलगडेल असे वाटते. बिननावाची कथा हे चुकून बिनपावाची कथा असे मीच वाचले . होऊ शकते. कविता आणि आजकाल तर लेख/कथांचेही लगेच विडंबन होते. त्यामुळे असे वाटणे स्वाभाविक आहे :)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 11/29/2007 - 21:17 नवीन

आहे ते नाव ठीक आहे

जी.एं.ची शैली साधली आहे खास. स्मृतीविषयी ही कथा असू शकेल हे नंदन यांचे मत पटते. तसे असल्यास "बिननावाची कथा" हे शीर्षक ठीक आहे. एखादी वस्तू स्मृतीत ठेवण्यासाठी पुष्कळदा तिचे नाव लक्षात राहाणे सोयीचे असते. नाहीतर अमुक दृश्य, तमुक गंध, ढमुक ध्वनी असलेली ती अनुभूती स्मरणात एकत्र नोंदली जात नाही. (संगणकावर फाईलला नाव असावे असा संकेत आहे. फाईलसिस्टिमचा विदा असतो, त्यातील नावाची नोंदणी खोडली की फाईलच पुसून टाकली असे मानले जाते.) या बाबतीत आठवते लुइस कॅरॉलने "ऍलिस" पुस्तकांत एका वनाचे वर्णन केले आहे, त्या वनात कोणालाच/कशालाच नावे नाहीत. http://www.cs.indiana.edu/metastuff/looking/ch3.html.gz त्यात ऍलिसला एक हरिणशावक भेटते. "आपण कोण" हे ठाऊक नसल्यामुळे शावक तिच्याबरोबर निर्भयपणे बागडते. वनातून बाहेर पडताच आपण "भित्रे हरिणशावक" असल्याची त्याला जाणीव होऊन, ते धूम पळून जाते!
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 11/30/2007 - 01:08 नवीन

उत्सुकता

उत्सुकता वाढली आहे. अवांतरः नावे का अशी? यनावालांच्या कोड्यांची आठवण झाली :-)
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 11/30/2007 - 09:51 नवीन

नावे

थोडीशी वेगळी व अपरिचित वाटावीत म्हणून अशी नावे घेतली. - आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
ध
धनंजय Fri, 11/30/2007 - 04:15 नवीन

तर्कक्रीडा आहे खरी

> ज्याचा घोडा सर्वात मागे राहील तो या स्पर्धेचा > विजेता आणि भेटवस्तू प्रथम निवडीचे स्वातंत्र्य त्यालाच. हे वाक्य वाचण्यापूर्वी घोड्यांच्या आदलाबदलीने स्पर्धा कशी बदलली ते कळले नाही. पण ही युक्ती चालण्यासाठी सर्वंजयाला माघार घेणे जरुरीचे नव्हते. तिघे आपला सोडून वेगळ्या घोड्यावर बसले असते, तरीही हिरिरीने पुढे गेलेच असते. कारण आपण दुसरा घोडा आधी पोचवला, किंवा दुसर्‍या क्रमांकावर पोचवला, तर आपला मुळातला घोडा "जिंकायची" शक्यता ५०% असते. आपण शेवटी राहिलो तर आपला घोडा "जिंकायची" शक्यता ०% असते, म्हणून तिघेही शेवटी राहाण्यापेक्षा पुढेपुढे नेटाने जात राहातील.
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Fri, 11/30/2007 - 08:46 नवीन

सविस्तर

पण घोड्यासह त्यावर बसलेला स्वारही जिंकला पाहिजे. स्पर्धा घोड्यांची नाहीये असं मला वाटतं. उद्या शुमाकर दुसर्‍याच्या गाडीत बसुन जिंकला तर ती गाडी जिंकली का शुमाकर? मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
आ
आजानुकर्ण Fri, 11/30/2007 - 09:51 नवीन

स्पर्धा

सर्वंजयाच्या मते स्पर्धा अतिशय पांचट असल्याने त्याने माघार घेतली. आणि तो म्हणजे घोडेस्वार. घोडा नव्हे ;) - आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/30/2007 - 18:09 नवीन

मस्त !!!

कथेची सुरुवात आवडली आहे, पुढे कथा कोणती वळणे घेईल याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा