पेपरात आणि माध्यमांमधे आलेल्या अंधश्रद्धाविरोधी वटहुकूमातली काही कलमं घेऊन त्यावर मतप्रदर्शन करतोय. ही मतं अर्थातच वैयक्तिक आहेत, पण इतरांची मतं समजून घेण्यासाठी आणि चर्चेला चालना म्हणून ही बाजू मांडली आहे. "अंधश्रद्धा" म्हणून ढोबळपणे जे काही मानलं जातं त्याला पाठिंबा दूरान्वयानेही नाही. ही चर्चा फक्त त्याविषयी "वेगळा कायदा" करण्याबद्दल आहे.
१) भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला बांधून मारहाण करणे, त्याचा विविध प्रकारे छळ करणे, चटके देणे, मूत्रविष्ठा खायला लावणे अशी कृत्ये गुन्हा ठरतील. (भूत उतरविण्यासाठी प्रार्थना, मंत्र म्हटले, पूजा केली तर तो गुन्हा ठरत नाही.)भूत उतरविण्याच्या बहाण्याने हे शब्द काढून टाकल्यास उरलेला भाग : "एखाद्या व्यक्तीला बांधून मारहाण करणे, त्याचा विविध प्रकारे छळ करणे, चटके देणे, मूत्रविष्ठा खायला लावणे अशी कृत्ये" ही भूत उतरविण्याखेरीज अन्य कारणाने केली तरी गुन्हाच आहेत ना? कोणत्या ना कोणत्या कलमाखाली गुन्हेच ना हे? की भूत नव्हे पण मला केवळ अत्यंत राग आल्याने मी एखाद्याला मारहाण केली, चटके दिले किंवा मूत्रविष्ठा खायला लावली तर सध्या अलाउड आहे?
२) एखाद्या व्यक्तीने चमत्काराचा प्रयोग करून फसविणे, ठकवणे, आर्थिक प्राप्ती करणे गुन्हा ठरेल.चमत्काराचा प्रयोग म्हणजे काय? कलमातच "चमत्कार" असा शब्द आल्याने व्याख्येची बरीच मोठी समस्या उभी राहतेय. चमत्कार भासेल अशी हातचलाखी असा अर्थ घेऊ. आर्थिक प्राप्ती करणं हे सरळ डिटेक्टेबल आहे. पण फसविणे / ठकवणे हे नेमकं काय आहे? "ठकवणे" याबाबत फिर्याद कोण करणार? "ठकलेल्या" व्यक्तीला ती ठकली आहे असा प्रकाश पडणं हाच तर मुख्य रोडब्लॉक आहे ना.
३) जिवाला धोका निर्माण होतो, अथवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात, अशा अमानुष अघोरी प्रथांचा अवलंब करणे हा गुन्हा.पुन्हा तेच. कोणतीही जखम पोटेन्शियली जीवघेणी असते. इन्फेक्शन, मुख्य शीर कापली जाणे, रक्त न गोठण्याची आधी माहीत नसलेली मेडिकल कंडिशन अशा अनेक कारणांनी कोणतीही जखम जीवघेणी ठरु शकते. शिवाय जीवघेण्या नसलेल्या पण वेदनादायी जखमांबद्दल काय? सुया टोचून आजार बरे करतो असं म्हणतात काही "तज्ञ". आजार बरा होण्याची खात्रीपूर्वक कायदेशीर मान्यता नसताना सुया टोचण्याची वेदना ही जीवघेणी नाही म्हणून वेदनाही नाही का? पुन्हा "अघोरी" म्हणजे कायद्याने काय? खूपच भावना-बेस्ड शब्द असतात हे (अघोरी, अशुभ, अघटित, अपशकुनी, अभद्र)
४) गुप्तधन, जारणमरण, करणी, भानामती या नावाने अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य करणे किंवा नरबळी देणे.अमानुष, अनिष्ट, अघोरी.. वरीलप्रमाणेच..
५) अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे व न ऐकल्यास वाईट परिणामाची धमकी देणे, फसविणे, ठकविणे. हा गुन्हा असेल पण केवळ अंगात येणे हा गुन्हा नाही.एखाद्याच्या केवळ अंगात आल्यानेच समोरचे अनेकजण घाबरतात आणि अंगात आलेल्या देवीचं न ऐकल्यास वाईट परिणामांची भीती बाळगतात. त्यात त्या अंगात आलेल्याने थेट एक्स्क्लुजिव्ह धमकी दिली किंवा नाही हे कसं ठरवायचं. घुमता घुमता प्रश्नोत्तरे करणे आणि समाधान झाल्यावर किंवा आपोआप अंगातले उतरणे हे सर्व "अंगात येणे" या प्रक्रियेचे अविभाज्य भाग आहेत. अंगात येऊन नुसते गप पाच मिनिटे घुमला / घुमली आणि परत ठीकठाक झाला असं कधी होत असल्यास ऐकण्यात नाही.
६) एखादी व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते, भूत लावते, जनावरांचे दूध आटवते, अपशकुनी आहे, सैतान आहे असे जाहीर करणे.असं जाहीर करण्यापेक्षा, त्यावर विश्वास ठेवणं जास्त गुन्हासदृश मानलं गेलं पाहिजे ना? कारण जाहीर करणं म्हणजे काय? त्या जाहीर करणार्याला तितपत ऑथॉरिटी असेल तरच गावगाड्यात ते मान्य होतं. कोणीही उठून कोणालाही जाहीर नोटीशीद्वारे चेटकीण / सैतान घोषित करु शकत नाही. एखादी व्यक्ती करणी करते हे मान्य करणं हाच गुन्हा नव्हे काय? अन्यथा "तसं माझं प्रामाणिक मत आहे" असं म्हणून मतस्वातंत्र्याच्या आड हे कलम येत असल्याची ओरडही लवकरच आणि नक्कीच होईल.
७) चेटूक केल्याच्या नावाखाली मारहाण करणे, नग्नावस्थेत धिंड काढणे, रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणे.क्र. १ प्रमाणेच. धिंड काढणे इटसेल्फ इज क्राईम. चेटूक सोडून अन्य कोणत्याही कारणाने काढली तरी. ती बळजबरीच आहे. आत्ताही त्याला शिक्षा करता येईलच. वेगळ्या कायद्याने काय नवीन होणार? जास्तीची शिक्षा का? मग आहे त्याच कायद्यात वाढवावी. नाहीतर धिंड काढल्याबद्दल अटक झाली की ती धिंड चेटकासाठी नव्हती ही सोपी पळवाट काढून शिक्षा कमी होईल का? अंतिम गुन्हा "धिंड" असताना तो चेटकी समजून केला की व्यभिचारी समजून केला की चोर समजून केला याने शिक्षेत मोठा फरक पडावा का?
९) कुत्रा, साप, विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे किंवा त्याऐवजी मंत्रतंत्र-गंडेदोरे असे उपचार करणे.वैद्यकीय उपचार म्हणजे कोणते? कुत्रा चावल्यास अंगारा किंवा भाकरतुकडा उतरवणे ही अंधश्रद्धा, कारण त्याचा उपयोग होत नाही असं कायदेशीर मत आहे. पण त्याऐवजी कोणी आयुर्वेदिक मुळी, युनानी लोशन, होमिऑपथीक गोळ्या यापैकी काही घेतलं तरी रेबीजवर त्याचा उपयोग होत असल्याचं नि:संशय सिद्ध झालेलं नाही. तेव्हा आधुनिक वैद्यकीय उपचारांची व्याख्या हवीच. कावीळ झाल्यावर गळ्यात माळा घालणे किंवा तत्सम उपायही यापैकीच. आता तर रोज वर्तमानपत्रात होलिस्टिक आणि अन्य गोलमाल शब्द वापरुन डायबेटिसवर, किडनी फेल्युअरवर, कॅन्सरवर उपचार होतात हेही म्हटलं जातं. त्यावर बंदी येणार का? की या मात्र खर्या वैद्यकीय थेरपीज - (कारण त्यावर अमुक लाख लोक विश्वास ठेवतात आणि त्या अमुक हजार वर्षे चालत आलेल्या आहेत) - ?? अमुक लाख लोकांचा विश्वास आणि अमुक शे / हजार वर्ष अस्तित्व या कंडिशन्स तर गंडेदोरे, मंत्रतंत्र, अंगारा, उतारा, यांनाही लागू पडतात. मग "उपचार" याचा "तर्काधारित" अर्थ कोणता? की हे कलम हा देखील एक उपचारच? मुळात कायद्याने अंधश्रद्धा दूर होतील का या अत्यंत मूलभूत प्रश्नाविषयीच माझ्या मनात मोठ्ठं प्रश्नचिन्ह आहे. अशा कायद्याने केवळ कारवाईसाठी हत्यार म्हणून आणखी एक कायदा अस्तित्वात असणे, याखेरीज काय साध्य होईल? प्रसूतिपूर्व लिंगचाचणी, अंधश्रद्धा हे "प्रिवेन्शन स्वरुपाचा कायदा" करण्याचे विषय आहेत का? सरकारने "अंधश्रद्धा" अशा अत्यंत "अॅम्बिग्वियस" शब्दावर आधारित कायदा बनवावा का? सरकारचा हस्तक्षेप लोकांच्या आयुष्यात कितपत असावा? की अंधश्रद्धांचे घातक आउटपुट्स हे कोणत्याही इतर शोषणाच्या / पिळवणुकीच्या / फसवणुकीच्या घातक परिणांमासारखेच असतात हे मान्य करुन आणि चालू कायद्याच्या केवळ अंमलबजावणीने त्याला आळा घालण्याची इच्छाशक्ती दाखवणं इतकंच योग्य ठरेल??
वाचने
20198
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म...
स्वताला फसवुन घेण्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत आहे.
In reply to हम्म... by दादा कोंडके
लोकप्रभेची कव्हरस्टोरी... माझी प्रतिक्रिया
In reply to स्वताला फसवुन घेण्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत आहे. by प्रसाद१९७१
किरपा करणार्या आणि खिशात
काही डॉक्टर पण गरज नसताना अँजिओप्लस्टी, टेस्ट वगैरे करायला लावता
कुठल्याही प्रकारची सक्ती
स्वतः अशा ठिकाणी जाउन फसणारे
गोरी करणारी क्रीम, साबण वगैरे ह्यात समाविष्ट आहेत का?
ते ग्राहक संरक्षण कायद्याखाली
In reply to गोरी करणारी क्रीम, साबण वगैरे ह्यात समाविष्ट आहेत का? by प्रसाद१९७१
ते ग्राहक संरक्षण कायद्याखाली
In reply to ते ग्राहक संरक्षण कायद्याखाली by बाळ सप्रे
ते या कायद्यात येत असतील तर
In reply to ते ग्राहक संरक्षण कायद्याखाली by प्रसाद१९७१
त्या क्रीम,
In reply to ते ग्राहक संरक्षण कायद्याखाली by बाळ सप्रे
@प्रसूतिपूर्व लिंगचाचणी,
प्रसूतिपूर्व सोनोग्राफी करणं
In reply to @प्रसूतिपूर्व लिंगचाचणी, by यसवायजी
तुमचा प्वाईंट बरोबर आहे.
In reply to प्रसूतिपूर्व सोनोग्राफी करणं by गवि
.
In reply to प्रसूतिपूर्व सोनोग्राफी करणं by गवि
आधिच आपल्याकडे लोकं
In reply to . by दादा कोंडके
बडग्याने सगळे बदलणार अशी
In reply to प्रसूतिपूर्व सोनोग्राफी करणं by गवि
+१
In reply to बडग्याने सगळे बदलणार अशी by बाळ सप्रे
+१००
In reply to बडग्याने सगळे बदलणार अशी by बाळ सप्रे
बापरे...
In reply to प्रसूतिपूर्व सोनोग्राफी करणं by गवि
हा उपाय तर मुळ प्रश्ना पेक्षा
In reply to बापरे... by पिलीयन रायडर
असा बडगा का असावा?
In reply to प्रसूतिपूर्व सोनोग्राफी करणं by गवि
वर तुमच्या प्रश्नाचं उत्तर
In reply to असा बडगा का असावा? by वामन देशमुख
अगदी सुंदर उत्तर.
In reply to वर तुमच्या प्रश्नाचं उत्तर by आनन्दिता
ज्या समाजात
In reply to असा बडगा का असावा? by वामन देशमुख
जादूचे प्रयोग
....चमत्काराचा प्रयोग करून (.
In reply to जादूचे प्रयोग by चित्रगुप्त
अजून एका गोष्टीवर बंदी
जावू द्या हो....
गवि, इज दॅट यू?
1) to perform Karni,
In reply to गवि, इज दॅट यू? by संजय क्षीरसागर
काही जास्त "भोळ्या" लोकांना
In reply to 1) to perform Karni, by llपुण्याचे पेशवेll
गरज
In reply to 1) to perform Karni, by llपुण्याचे पेशवेll
मुळात
In reply to गरज by विकास
मुळात कायद्याने अंधश्रद्धा
या न्यायव्यवस्थेचा कोडगेपणा नाहि काय?
In reply to मुळात कायद्याने अंधश्रद्धा by राजेश घासकडवी
पुन्हा तेच !
In reply to या न्यायव्यवस्थेचा कोडगेपणा नाहि काय? by अर्धवटराव
ते चुक आहे
In reply to पुन्हा तेच ! by मराठे
आत्तापर्यंत बऱ्याच वेळा
In reply to ते चुक आहे by अर्धवटराव
आधिचा कायदा असताना...
In reply to आत्तापर्यंत बऱ्याच वेळा by राजेश घासकडवी
माणासाच्या जीवाची किंमत
In reply to आधिचा कायदा असताना... by अर्धवटराव
साहेब
In reply to आधिचा कायदा असताना... by अर्धवटराव
न्यायव्यवस्था.
In reply to साहेब by सुबोध खरे
कुणाचा खून झाला या भावनिक
उत्तम चर्चा
मांत्रिक आणि डिक्लरेशन
कायदा आवश्यकच
दोन प्रसंग
बैलावरील उपचार
In reply to दोन प्रसंग by आनन्दा
आमच्या घरचा बैल एकदा आजारी
हायलाईट केलेल्या भागातच आपल्या सर्वांची गोची आहे.
In reply to आमच्या घरचा बैल एकदा आजारी by गवि
होमिओपथी आणि अन्य उपचार चालले
In reply to हायलाईट केलेल्या भागातच आपल्या सर्वांची गोची आहे. by अनिरुद्ध प
धन्यवाद
In reply to होमिओपथी आणि अन्य उपचार चालले by गवि
प्रत्यक्ष फिल्ड वर असे नसते..
In reply to होमिओपथी आणि अन्य उपचार चालले by गवि
एक कल्पनाप्रयोग सांगतो.
In reply to प्रत्यक्ष फिल्ड वर असे नसते.. by आनन्दा
माझ्या गावात संधीवातावर औषध
येथे बर्याच जणांनी पारंपारिक