श्रद्धा
नमस्कार मंडळी.
आज आम्हि एका कुलीन स्त्रीची फर्याद घेऊन मिपा दरबारी हजर झालो आहोत. या बयेचं नाव आहे श्रद्धा. हिच्या बद्दल आम्हाला अपार सहानुभुती, आदर, प्रेम आणि आपुलकी आहे (... नाहि, 'ति' श्रद्धा वेगळी आहे हो... एव्हाना ति लग्न वगैरे करुन सुखाने नांदत असेल.)
हिचं गार्हाणं असं आहे कि येऊन जाऊन लोकं हिला उगाच टपली मारुन जातात. विचारवंत (अस्सल, आणि खरे अस्सल) हिला "त्या" गल्ली बोळातली असल्यासारखं तुच्छ समजतात, तर अविचारवंत (अस्सल आणि निव्वळ अस्सल) हिच्या नावाने काय वाटेल ते खपवतात. मग हि बिचारी न्याय मागायला इकडे तिकडे वणवण भटकते, तर वैज्ञानीक विचारांची मंडळी (अस्स्ल, स्युडो अस्सल आणि उरले सुरले सगळे) हिचा जीव घ्यायला, हिला संपवायला टपलेले दिसतात.
हिचं रूप कसं, हिचा रंग कसा, हिची चालढाल कशी याबद्दल प्रत्येकाचं एक स्वतंत्र मत आहे (आणि ते फारसा विचार न करता बनवण्यात आलं आहे). त्यामुळे होतं काय, कि जेंव्हा केंव्हा माणासाला भांडायची, लुबाडणुक करायची, आणि इतर नसत्या उठाठेवी करायची गरज पडते तेंव्हा तो अपोझीशन पार्टीला हिच्या मांडीवर बसवतो आणि मग गावकुसाबाहेरच्या या अछुत काफिराला दगड मारायला सर्वांना पर्मीट मिळतं.
तसं बघितलं तर हि ब्रह्मदेवाची कन्या. माणसाला, फॉर दॅट मॅटर कुठल्याही प्राणिमात्राला घडवताना ब्रह्मदेवाने प्रथम त्याला हिच्या मांडीवर बसवलं, हिचं स्तनपान करवलं. त्यामुळे सजीव पृथ्वीतलावर अवतरला तो हिने दिलेल्या अन्नदानातुन घडलेले वैचारीक शरीर घेऊनच. पण माणुस मुळातच कृतघ्न. नो रिस्पेक्ट फॉर द लेडी, यु सी.
आता हरिदासाच्या मूळपदावर येऊ.
श्रद्धा म्हणजे नेमकं काय?? माणसाच्या ज्ञानलालसेमागे त्याची अपूर्णत्वाची जाणिव आहे, आणि माणसाच्या कर्मसंकल्पामागे त्याची पूर्णात्वाची जाणिव आहे. या दोन जाणिवांमधला डेल्टा म्हणजे श्रद्धा. ज्ञानलालसा जेव्हढी तीव्र, आणि/किंवा कर्मसंकल्प जेव्हढा बळकट, तेव्हढा श्रद्धेचा व्हॉल्युम जास्त, डेफ्थ जास्त. या व्हॉल्युम मधेच कर्माची पायाभरणी होते व ज्ञानाच्या मुळांना पोषक तत्व आत्मसात करायला स्कोप मिळतो. श्रद्धा (सो कॉल्ड) देवा-धर्माच्या वळचणीला जात नाहि... देवा-धर्मालाच श्रद्धेच्या नावाखाली खुंटीला टांगण्यात येतं... माणुस आपली विवेकबुद्धी गहाण ठेवतो आणि हिला बिचारीला "अंध" म्हणुन चाबकाचे फटके खावे लागतात. वास्तवीक पाहता, दृष्टीचे आवश्यक असे तिन्ही घटक, कोणि-काय-कसे बघावे, हे श्रद्धेच्याच उबदार पंखाखाली नांदत असतात... मग हिला आंधळी कसे म्हणता येईल?
असो... सांगायचं तात्पर्य हे, कि इतःपर श्रद्धेवर पत्थरफेक करायची उर्मी आलीच तर एकवार पुन्हा विचार करा.
दॅट्स ऑल मिलॉर्ड.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
श्रध्दा प्लासेबोसारखी आहे, नाहि का?
गुगलण्याचा कंटाळा आलाय :)
"औषध आपल्याला बरं करेल"
त्यातल्या काहि जणाना पण 'गुण
तीन मुद्दे लिहिले होते
हा सगळा फारच गमतीदार प्रकार
एक्झॅक्टली!
होमिओपाथि
प्लासिबो इफेक्ट
फेथ हिलिंग.
नाहि तसं नाहिये.
श्रद्धेची व्याख्या आवडली.
त्याच नकाशात ब्रह्मदेश दिसत
पूर्वी होता. आता त्या देशाला
म्यानमार नाव ठेवल्यापासुन
म्यानमार नाव ठेवल्यापासुन
श्रद्धा (सो कॉल्ड) देवा
ब्रम्हदेव कुठे असतात?
ब्रह्मदेवाच्या उल्लेखामागे
आवडलं.
हिचं रूप कसं, हिचा रंग कसा,
'श्रध्दा म्हणजे सकारात्मक विचार करणे' असेही मला वाटते.
एक गंमत सांगू?
ऑलीव्ह ऑइल
सर्वसामान्य जनतेला कोणत्यातरी
धमालरावांनी अगदी बलीवर्दाचा
लाख मोलाची बात
श्रद्धा
कित्येकदा
न संपणारा काथ्याकूट
लय भारी.
श्रद्धा
@ धन्या ...
जरा सविस्तर सांगा की. अशी
@ धनाजीराव आपल्याला
त्यांच्या म्हणण्यानूसार हे
@धन्या
मला कोणत्या मार्गाने समजलंय
जोक्स अपार्ट, तुम्ही माझ्या
श्रद्धा ही श्रद्धा असते
.
कूठला मूहूर्त निवडलात हे असले लिहायला.
@धन्या
हे दोन्ही ग्रंथ मी वाचले आहेत
@धन्या
योगमार्ग समजावून सांगणे आणि
गैरसमज दूर करा...
+१
+२
मेलो...