✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पु.ल.देशपांडे उद्यान (पुणे)

म
म्हैस... यांनी
Sun, 08/18/2013 - 19:19  ·  लेख
लेख
.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण

प्रतिक्रिया द्या
40102 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

मस्त

मुक्त विहारि
Sun, 08/18/2013 - 22:37 नवीन
छान
  • Log in or register to post comments

झकासच!

नावातकायआहे
Sun, 08/18/2013 - 22:59 नवीन
वाचनखुण साठवली आहे..
  • Log in or register to post comments

लेखाचे शीर्षक आणि सदस्यनाम

बॅटमॅन
Mon, 08/19/2013 - 08:27 नवीन
लेखाचे शीर्षक आणि सदस्यनाम पाहून एकदम वेगळेच वाटले क्षणभर, मग लक्षात आले. =))
  • Log in or register to post comments

+१

आनन्दिता
Tue, 08/20/2013 - 19:26 नवीन
+१ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

-

अमोल केळकर
Mon, 08/19/2013 - 11:10 नवीन
एक दोनदा गेलो होतो इथे, उद्यान छान आहे अमोल केळकर
  • Log in or register to post comments

सिंहगड रोडवर आहे तेच का हे

नानबा
Mon, 08/19/2013 - 11:24 नवीन
सिंहगड रोडवर आहे तेच का हे उद्यान?? बाहेरून गाडीवर जाताना पाटी वाचल्यासारखं आठवतंय, पण कधी आत जाण्याचा योग आला नाही.
  • Log in or register to post comments

होय.........

म्हैस...
Mon, 08/19/2013 - 11:55 नवीन
होय...सिंहगड रोडवर आहे तेच.. एकवेळ अवश्य भेट द्यावी असे आहे उद्यान......
  • Log in or register to post comments

नक्की..

नानबा
Mon, 08/19/2013 - 12:01 नवीन
पुढल्या पुणे भेटी दरम्यान करण्याच्या कामांमध्ये नोंद करण्यात आलेली आहे.. :)
  • Log in or register to post comments

एकाच छायाचित्राने उद्यानाची

प्रभाकर पेठकर
Mon, 08/19/2013 - 14:25 नवीन
एकाच छायाचित्राने उद्यानाची नीट कल्पना येत नाही. छायाचित्रांबाबत एवढी कंजूषी का? कमीतकमी ८-१० वेगवेगळ्या छायाचित्रांनी पुलं उद्यानाला न्याय देता आला असता. पुलंचं नांव दिले आहे पण उद्यानात पुलंचा पुतळा आहे का? तिथे लाल महाला समोरून हलविलेला दादोजी कोंडदेवांचा पुतळा प्रस्थापित केला आहे असे बातम्यांमध्ये ऐकले होते. त्याची छायाचित्रे. तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची काय सोय आहे? ज्येष्ठ नागरीकांसाठी गप्पा-टप्पा करण्यासाठी बसण्याची काय सोय आहे?, जॉगींग ट्रॅक सारख्या अत्याधुनिक सोयी आहेत का? पाळीव प्राण्यांना आंत आणण्यास परवानगी आहे का? वगैरे वगैरे माहिती दिली तर उद्यानाचे सर्वांगिण आकलन झाले असते. अजूनही वेळ गेली नाही. प्रतिसादातून जास्तीची छायाचित्रे आणि माहिती दिलीत तरी चालेल. माझ्या लहानपणापासून अनेकदा बडोड्याला भेट देण्याची संधी मला मिळाली. तिथली रावपुरा विभागतली 'सूर्यनारायण बाग' तसेच रेल्वे स्थानकाजवळील 'कमाठी बाग' आणि अहमदाबादेतील 'कांकरीया तलाव' ह्या सर्व बागांमधून खांबाखांबांवर स्पीकर्स लावून मंद आवाजातील संगीत आणि रेडीओवरील बातम्या वगैरे लागतात. आवाज जवळच्या बाकालाच फक्त ऐकू येईल एवढा कमी असतो. त्यामुळे कोणालाही त्रास होत नाही. अशी ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त सोय आपल्या इथे कुठे दिसत नाही. ज्येष्ठांना (आणि इतरांनाही) मनावरील ताणतणाव दूर करण्यासाठी, मनाच्या सैलावण्यासाठी ही सोय खुप चांगली आहे. मी तर माझ्या लहानपणी अनेकदा ह्या उद्यानांमध्ये जाऊन रेडिओ आणि मंद संगीत ऐकत बसायचो. त्या सकारात्मक गोष्टीने मनांत कायमस्वरूपी घर केले आहे. आपल्या प्रशासनास समज येउन किंवा एखाद्या समाजसेवी संघटनेच्या लक्षात येऊन आपल्या इथल्या उद्यानांमध्ये अशी सोय कोणी केल्यास आनंद होईल. अन्यथा, निवृत्ती नंतर, मीच पुढाकार घेऊन एखाद्या उद्यानाचा उद्धार करेन.
  • Log in or register to post comments

सहीच !

कपिलमुनी
Tue, 08/20/2013 - 18:56 नवीन
>>बाखांबांवर स्पीकर्स लावून मंद आवाजातील संगीत आणि रेडीओवरील बातम्या वगैरे लागतात. आवाज जवळच्या बाकालाच >>फक्त ऐकू येईल एवढा कमी असतो. मस्तच कि ओ ! रसिक सरकार दिसतय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

नोईडाच्या बागांत क्लासिकल

arunjoshi123
Tue, 08/20/2013 - 19:05 नवीन
नोईडाच्या बागांत क्लासिकल मुझिक चालतं. फारच सुखद अनुभव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

ह्या सर्व बागांमधून

जॅक डनियल्स
Wed, 08/21/2013 - 09:41 नवीन
ह्या सर्व बागांमधून खांबाखांबांवर स्पीकर्स लावून मंद आवाजातील संगीत आणि रेडीओवरील बातम्या वगैरे लागतात
सहकारनगरच्या (पुणे) बागूल उद्यानामध्ये तशी सोय केली होती, आणि तशी गाणी ऐकलेली मला आठवत आहेत. पण नंतर त्याचे काय झाले मला माहित नाही, बहुतेक पावसाने स्पीकर्स बंद पडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अवांतर

आदूबाळ
Wed, 08/21/2013 - 11:20 नवीन
कलमाडी रेल्वेमंत्री होते तेव्हा सिंहगड एक्स्प्रेस पुणे स्थानकातून निघायच्या वेळेस (सकाळी ६ वाजता) सनई लागत असे. त्यामुळे कायम लग्नाचं वर्‍हाड निघालं आहे असं वाटायचं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

एक सुधारणा

श्रीरंग_जोशी
Wed, 08/21/2013 - 21:35 नवीन
सुरेश कलमाडी रेल्वे राज्यमंत्री होते. ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री कधीच नव्हते. पुढील लोकसभा निवडणूकीत राष्ट्रीय काँग्रेसतर्फे पुन्हा एकदा विजयी झाल्यास व संपुआचेच सरकार पुन्हा आल्यास एक बरेच अनुभवी खासदार म्हणून कॅबिनेट दर्जाचे मंत्री बनण्यास प्रबळ दावेदार असतील; विशेषकरून भारी उद्योग मंत्री पदासाठी ;-). # म्हैस - छायाचित्र आवडले पण एकोळी लेख जसे प्रकाशित करू नये तसेच एकचित्री पण करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

बॉडीगार्ड मूव्हीमधला एक सीन

क्रेझी
Tue, 08/20/2013 - 12:52 नवीन
बॉडीगार्ड मूव्हीमधला एक सीन ह्या उद्दानामधे शूट केलेला आहे. खरंच बघण्यासारखं आहे हे उद्दान.
  • Log in or register to post comments

दुनियादारी चित्रपटातील

म्हैस...
Wed, 08/21/2013 - 08:56 नवीन
दुनियादारी चित्रपटातील सीनदेखील ह्या उद्यानातच चित्रीत केले आहेत असे समजते............
  • Log in or register to post comments

वर पेठकर काकांनी जो सल्ला

गणपा
Wed, 08/21/2013 - 13:15 नवीन
वर पेठकर काकांनी जो सल्ला दिलाय तो आमलात आणला तर बरं होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस...

मी प्रकाशित केलेल्या

म्हैस...
गुरुवार, 08/22/2013 - 11:59 नवीन
मी प्रकाशित केलेल्या छायाचित्राला दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद! मिपा ची सभासद झाल्यानंतर प्रथमच प्रकाशित केलेल्या छायाचित्राला मिळालेल्या प्रतिसादावरुन आणि पेठकर काकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आणखी काही छायाचित्रे देत आहे. दोन दिवसांपासून देण्याच्या प्रयत्नात होते परंतु काही तांत्रिक अडचणी येत होत्या. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

याही चित्रांना प्रतिसाद मिळेल

म्हैस...
गुरुवार, 08/22/2013 - 12:00 नवीन
याही चित्रांना प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा
  • Log in or register to post comments

(No subject)

म्हैस...
गुरुवार, 08/22/2013 - 12:11 नवीन
Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

म्हैस...
गुरुवार, 08/22/2013 - 12:13 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

म्हैस...
गुरुवार, 08/22/2013 - 12:14 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

अप्रतिम फोटो. स्वारगेटवरुन

धन्या
गुरुवार, 08/22/2013 - 12:16 नवीन
अप्रतिम फोटो. स्वारगेटवरुन कसे जायचे हे उदयान पाहायला?
  • Log in or register to post comments

स्वारगेट वरुन सिंहगड रोडकडे

म्हैस...
गुरुवार, 08/22/2013 - 12:31 नवीन
स्वारगेट वरुन सिंहगड रोडकडे जाण्यासाठी रिक्शा किंवा सिक्स सीटर मिळते ना........ वाटेतच आहे उद्यान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

राजाराम पुल.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 08/22/2013 - 12:34 नवीन
स्वारगेटकडून सिंहगड रस्त्यावर आल्यावर, राजाराम पुलाआधी, डाव्या बाजूस 'पु. ल. देशपांडे उद्यान' आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस...

(No subject)

म्हैस...
गुरुवार, 08/22/2013 - 12:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हे फटू मस्त आवडले.

बॅटमॅन
गुरुवार, 08/22/2013 - 12:19 नवीन
हे फटू मस्त आवडले.
  • Log in or register to post comments

भरपूर छायाचित्रे.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 08/22/2013 - 12:29 नवीन
व्वा! आता भरपूर छायाचित्रे आली. धन्यवाद. हे उद्यान बाहेरून पाहिले आहे पण आतून पाहण्याचा योग नाही आला. आता रजेवर आल्यावर 'पु.ल. देशपांडे उद्यान' हे 'पाहण्याच्या' यादीत सर्वांत वर असेल. सर्व छायाचित्रे पाहता, एकूणच उद्यानात गर्दी अज्जिबात जाणवत नाहीए. शांततेच्या दृष्टीने हे उत्तम असले तरी उद्यान, अजून दुर्लक्षित असल्याचे खेदजनक चित्र मनांत उभे राहात आहे. पण असो. तुमच्या लेखाने मिपास्थित पुणेकरांना तरी उद्यानभेटीची ओढ निर्माण होईल अशी आशा बाळगतो.
  • Log in or register to post comments

छायाचित्रे सकाळची आहेत.......

म्हैस...
गुरुवार, 08/22/2013 - 12:34 नवीन
छायाचित्रे सकाळची आहेत...........त्यामुळे गर्दी नाहिये संध्याकाळी गर्दी असते असे ऐकले आहे....... पुणेकरांकडून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

धन्यवाद.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 08/22/2013 - 12:38 नवीन
ओ.के. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस...

हो

दादा कोंडके
गुरुवार, 08/22/2013 - 13:30 नवीन
आणि बक्कळ तिकिट ठेवल्यामुळे आमच्यासारखी फुकटी लोकं तिकडे फिरकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस...

तिकिट?

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 08/22/2013 - 16:41 नवीन
बक्कळ तिकिट ठेवल्यामुळे .....
कुठे तिकीट आहे? पुल देशपांडे उद्यानाला? मला वाटतं ताथवटे उद्यानाला तिकीट आहे. पण उद्यानाची स्वच्छता आणि इतर सोयी सुविधा पुरवायच्या असतील तर माफक तिकीट असण्याला कोणाची हरकत नसावी. मोफत पण गलिच्छ उद्यानास भेट देऊन मन प्रसन्न होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हो..

दादा कोंडके
गुरुवार, 08/22/2013 - 16:54 नवीन
कुठे तिकीट आहे? पुल देशपांडे उद्यानाला?
हो. चांगले पाच-दहा रुपडे तिकिट आहे. कितीतरी वेळी बागेच्या गेटजवळ जाउन खिश्यातल्या चिल्लर कडे बघत परत जावं लागलय. :(
पण उद्यानाची स्वच्छता आणि इतर सोयी सुविधा पुरवायच्या असतील तर माफक तिकीट असण्याला कोणाची हरकत नसावी.
मग ट्याक्स कशाला घेतात?
मोफत पण गलिच्छ उद्यानास भेट देऊन मन प्रसन्न होत नाही.
पण आमच्यासारख्यांना स्वच्छ उद्यानाचा पैसे गेल्याच्या चुटपुटीमुळे आनंदपण घेता येत नै ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

समस्या निवारण.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 08/22/2013 - 17:35 नवीन
हो. चांगले पाच-दहा रुपडे तिकिट आहे.
हं! जाताना पैसे घेऊन गेलेले बरे.
मग ट्याक्स कशाला घेतात?
ह्या प्रश्नात, नविन धागा सुरु करण्याची क्षमता आहे. जसे आपण रेल्वेचे तिकिट काढतो, रस्त्याचा टोल भरतो, एस्टीचे तिकिट काढतो त्याच भावनेने उद्यानाच्या सेवेकडे पाहावे. मनस्ताप कमी होईल.
आमच्यासारख्यांना स्वच्छ उद्यानाचा पैसे गेल्याच्या चुटपुटीमुळे आनंदपण घेता येत नै ना.
If yoiu don't get what you like, you must like what you get. एक तर गलिच्छ उद्यानांमध्ये आनंद मिळवा किंवा उद्यान स्वच्छते बाबत लोकांचे प्रबोधन करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

छान माहिती

अनिरुद्ध प
गुरुवार, 08/22/2013 - 14:43 नवीन
छायाचित्रे व माहीती आवडली
  • Log in or register to post comments

फोटो अप्रतिमच आहेत.

sanjivanik१
गुरुवार, 08/22/2013 - 16:24 नवीन
फोटो अप्रतिमच आहेत. पण तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो ... तशी म्हैस मला पण आवडते , पु. ल. ची चांदी वाचल्यापासून त्यात आणखी भर पडली आहे पण … तरीही तुम्हाला ते नाव का घ्यावस वाटल??
  • Log in or register to post comments

फोटो आवडले

कुसुमावती
गुरुवार, 08/22/2013 - 17:48 नवीन
बादवे म्हैस पु. ल. ची कथा आहे आणि चांदी हा त्यावर आधारित चित्रपट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sanjivanik१

कुसुमावती यांस ,

sanjivanik१
Sat, 08/24/2013 - 21:15 नवीन
कुसुमावती यांस , मी पु. ल. च्या वाचलेल्या म्हशीलाच चित्रपटाच्या म्हशीच्या नावाने संबोधले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुसुमावती

हा हा....मोठा भाऊ या नावाने

म्हैस...
गुरुवार, 08/22/2013 - 19:24 नवीन
हा हा....मोठा भाऊ या नावाने हाक मारतो...म्हणून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sanjivanik१

हा, हा, हा, कारण खरोखरच

sanjivanik१
Sat, 08/24/2013 - 21:17 नवीन
हा, हा, हा, कारण खरोखरच मजेशीर आहे. पण पैसा यांच्या मताशी मी पण सहमत आहे. तुम्हाला त्या नावाने संबोधताना खरच खूप अवघड जाणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस...

मस्त फोटो!

पैसा
गुरुवार, 08/22/2013 - 23:42 नवीन
पु ल देशपांडे उद्यानाचे फोटो "म्हशीने" द्यावेत हा मस्त योगायोग! पण तुम्हाला इथे हाक मारताना आम्हाला जरा अवघड वाटणार आहे!
  • Log in or register to post comments

मस्त..

मॅन्ड्रेक
गुरुवार, 02/20/2014 - 14:52 नवीन
मस्त..
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा