रॉयटर्सचा वार्ताहर मोदींची मुलाखत घेत आहे. मुलाखतीचे थेट प्रक्षेपण सुरू आहे.
वार्ताहरः मोदीजी, तुमचे आवडते फळ कोणते?
मोदी: आंबा
क्षणार्धात सर्व वाहिन्यांवर ब्रेकींग न्यूज येते.
"मोदींना पेरू आवडत नाही" . . .
पुढच्या क्षणी प्रतिक्रिया येऊ लागतात.
जितेंद्र आव्हाडः महात्मा गांधींना केळ्यासारखे साधे आणि स्वस्त फळ आवडत असे. मोदी हे मुळातच महात्मा गांधींच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांच्या आवडत्या फळात केळ्याचा उल्लेख नाही याचे आश्चर्य वाटत नाही. ज्या गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली त्याच गोडसेचे मोदी हे प्रतिनिधी आहेत.
मनीष तिवारी: मोदींना पेरू हिरव्या रंगामुळे आवडत नाही. ही त्यांची मुस्लिमविरोधी मानसिकता आहे.
अजय माकनः मोदींना आंब्यासारखे महागडे फळ आवडते. त्यांनी गरीबांची थट्टा केली आहे.
अमूल बेबी उर्फ पप्पू: मला मोदींसारख्या ठराविक गोष्टीच आवडत नाही. माझा आहार सर्वसमावेशक आणि सर्वधर्मसमभावी आहे. मला जसा केशरी आंबा आवडतो तसाच हिरवा पेरू आणि पांढरा आवळा पण आवडतो. मी उद्याच उत्तर प्रदेशातल्या एका दलिताच्या झोपडीला भेट देऊन केळी खाणार आहे.
डॉग्विजयः मोदी स्वतःच एक नासका आंबा आहेत. हा नासका आंबा अढीतून बाहेर नाही काढला तर संपूर्ण अढी नासेल. अशा नासक्या आंब्यांना उदारमतवादी भारतीय समाजात काहीही स्थान नाही.
रात्री १० वाजता आयबीएन-लोकमत वर निखिल वागळे: नमस्कार. आयबीएन्-लोकमतवर आपलं स्वागत आहे. आजचा नवा दिवस आणि नवा चर्चेचा नवा विषय. मोदींनी आपल्याला केशरी आंबा आवडतो असे सांगून आपला जातीयवादी भगवा चेहरा उघड केला आहे. त्याचवेळी आपल्या आवडत्या फळात हिरव्या पेरूचे नाव मुद्दामच टाळून आपली मुस्लिमविरोधी मानसिकता दाखवून दिली आहे. आज आपल्याबरोबर चर्चेमध्ये आहेत भाजपचे माधव भंडारी, काँग्रेसचे सचिन सावंत आणि ज्येष्ठ विचारवंत मार्केंडेय काटजू. आपण सुरूवात करूया माधव भंडारींपासून. माधव भंडारी, तुम्ही उत्तर द्यायला हवं. काय म्हणायचंय तुम्हाला मोदींच्या या खळबळजनक वक्तव्याबद्दल?
. . . चर्चा सुरू होते.
वाचने
17020
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्या
In reply to काल एक विरोधाभास लक्षात आला. by श्रीगुरुजी