Skip to main content

रक्षा बंधन स्पेशल...

लेखक पुष्कर जोशी यांनी मंगळवार, 20/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मी पा वर एकही लेख नाही असे कसे ..... त्यामुळेच ... आज रक्षा बंधन मराठीत राखी पौर्णिमा हो... भारतीय संस्कृतीतील एक प्रमुख सण.. ज्याने घर्माची बंधने कधीच तोडली आहेत ... इतिहासात सापडेल.... मुख म्हणजे आज बहिणीने भावाला ओवाळायचे आणि भावाने तिला गिफ्ट द्यायचे... आणि म्हणायचे मी तुझी आजन्म रक्षा करेन असे आजचे आधुनिक स्वरूप... ह्याचाशीच मिळता जुळता सन म्हणजे भाऊबीज सेम म्हणजे ओवाळणी गिफ्ट वगैरे .... पण ... सद्याच्या परिस्थितीत मला काही प्रश्न पडलेत ... का फक्त भावानेच बहिणीस गिफ्ट द्यायचे असे का ? आहो आम्हास ५-७ बहिणी आहेत सगळ्या येतात हक्काने गिफ्ट मागायला आणि साधे सुधे गिफ्ट कसे चालनार आवडीनुसार द्यावे लागते ना.. म्हणजे आली का नाही ३५०० ते ७००० पर्यंत कात्री खिशाला .. आणि हो काही बहिणी तर आमच्या पेक्षा ( सध्या समानतेच्या युगात ? ) ५ पट जास्त कमवितात (डॉक्टर)... तरीही आपणच का ? आता आपण नवीन युगात नवीन सण सुरु करूयात ज्यात बहिण भावास गिफ्ट देईल म्हणजे कशी फिट्टम फाट होईल कि नाही ... काय म्हणता ? सर्व बहिणीना रक्षा बंधनाच्या शुभेच्छा

वाचने 1884
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

आम्ही तर भाउबीजेला आणि वाढदिवसाला गिफ्ट देतो बहीणीला. राखी पोर्णिमेला ऐकले नाही कधी. मिठाई / चॉकलेट मात्र देतो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पण तुम्हास कधी मिळते का ? हाच खरा प्रश्न आहे... आमच्या कडे राखी ला पान देतात .... एक सोहळाच असतो मामा मावची काका सगळे जण भेटतात ...

रिटर्न गीफ्ट मला तरी मिळते,(बहीणी कडुन बायको कडुन नाही)

आमच्या घरी आहे पध्दत.जेंव्हापासून भाऊ-बहीण दोघे कमवायला लागले तेंव्हापासून दोघांपैकी जो लहान आहे त्याला गिफ्ट/रिटर्न गिफ्ट मिळते. सध्या माझ्यापेक्षा सगळेच भाऊ लहान आहेत त्यामुळे माझ्याच खिशाला कात्री बसते :(