✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आठवणी सवाईग॑धच्या...

M
mina यांनी
Tue, 09/16/2008 - 20:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3333 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

अ
अभिज्ञ Tue, 09/16/2008 - 21:19 नवीन

थोडे चित्र

थोडे चित्र मोठे करता येइल का? बहुतेक पु.ल. व भीमसेनजी आहेत. अजून काहि माहिती दिलीत तर बरे होइल. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/16/2008 - 22:14 नवीन

चित्र नीट

चित्र नीट दिसत नाही... उजवीकडचे अण्णा आहेत का?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 09/16/2008 - 22:16 नवीन

हो, पु. ल.

हो, पु. ल. आणि पंडितजीच दिसत आहेत, मोठे चित्र अजून छान वाटले असते बघायला..
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 09/16/2008 - 23:07 नवीन

हा घ्या जालावरुन घेतलेला फोटू!

भाईकाका आणि आण्णाच आहेत! (नुसता फोटो डकवण्यापेक्षा, हा कोणत्या सवाई गंधर्वच्या वेळचा आहे? ह्या फोटोचा काही वेगळा इतिहास आहे का? तुमची मौल्यवान भेट असे म्हणता आहात तर तुम्ही हा काढलेला आहे का? मीनाताई, त्याबद्दलही जरा टिप्पणी असली तर बरे होईल!) Image removed. चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/16/2008 - 23:54 नवीन

धन्यवाद रे

धन्यवाद रे रंगा, आता हा फोटू छान दिसतो आहे! :) (नुसता फोटो डकवण्यापेक्षा, हा कोणत्या सवाई गंधर्वच्या वेळचा आहे? ह्या फोटोचा काही वेगळा इतिहास आहे का? सांगतो, सांगतो....! :) भाईकाकांच्या अमृतमहोत्सवी वर्षी सवाईगंधर्व महोत्सवात अण्णांच्या हस्ते भाईकाकांचा सत्कार झाला त्यावेळचा हा फोटू आहे. मला त्या कार्यक्रमाला उपस्थित रहायचं भाग्य लाभलं आहे! भाईकाका हे सवाईगंधर्व महोत्सवाच्या अगदी सुरवातीपसूनचे साक्षिदार. अण्णांनी १९५२ साली जेव्हा हा महोत्सव सुरू केला तेव्हा त्यात भाईकाकांचा मोलाचा वाटा अन् पुढाकार होता. सत्कारसमारंभाला उत्तर देतांनाच्या भाषणादरम्यान भाईकाकांनी सांगितलेली आठवण.. (त्यांचे शब्द आता अचूक आठवत नाहीत,) भाईकाका म्हणाले होते, "सवाईगंधर्व महोत्सव जेव्हा सुरू झाला तेव्हा त्यात जवळजवळ अर्धा डझन देशापांडे होते. वसंतराव देशपांडे, पु ल देशपांडे, दत्तोपंत देशपांडे इत्यादी! तेव्हा काही खवचट पुणेकर म्हणाले होते की या देशपांडे मंडळींनी स्वत:ला पुढे पुढे करायला मिळावं म्हणून केवळ हा उत्सव सुरू केला आहे झालं! दुसरं काही नाही!" पण रसिकहो, आज हा महोत्सव इतका मोठा झाला आहे की आम्ही केवळ पुढे पुढे करण्याकरता ह्या महोत्सवाची सुरवात केली नव्हती हे आतातरी पुणेकरांनी लक्षात घ्यावं!" :) भाईकाकांच्या सत्काराआधी तिथे नुकतंच अश्विनी भिडे-देशपांडेचं गाणं झालं होतं. तोच धागा पकडून भाईकाका पुढे म्हणाले, आत्ताच आपण सर्वांनी अश्विनीचं गाणं ऐकलं. किती छान गायली अश्विनी! हे पुन्हा ती केवळ एक 'देशपांडे' आहे म्हणून मी म्हणत नाहीये बरं का! :) असं म्हणून भाईकाकांनी आपल्या नेहमीच्या थाटात हशे-टाळ्या घेतल्या.. :) आपला, (सवाईगंधर्व महोत्सवाच्या खूप आठवणी बाळगून असणारा!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
M
mina Wed, 09/17/2008 - 21:26 नवीन

चतुर॑गजी चुकल॑ माझ॑...

चतुर॑गजी आपण बरोबर म्हणालात..नुसता फोटो डकवण्यापेक्षा, हा कोणत्या सवाई गंधर्वच्या वेळचा आहे? ह्या फोटोचा काही वेगळा इतिहास आहे का? हे माहीत असणे गरजेच॑ असत.जे मी दिले नाही,चुकच झाली. हा फोटो मला २००७ मधील सवाई गंधर्वच्या छायाचित्र प्रदशनात मिळाला आहे. ४ फेब्रुवारी २००८ रोजी अण्णा॑ना जन्मदिनाच्या शुभेच्छा द्यायला गेले,तेव्हा मला साक्षात स्वराधिराजा॑चा (अण्णा॑चा) आशि॑वाद मिळाला.माझे सौभाग्य की मला साक्षात स्वराधिराजा॑चे चरण स्पश॑ करता आले. अण्णा॑ची कोणती ही आठव ण माझेसाठी माझी मौल्यवान भेट राहील. ८ डिसे॑बर २००७ ला 'रस के भरे तोरे नैन' ही ठुमरी सादर केली..तेव्हाचे छायाचित्र खास आपल्यासाठी.हा फोटो मी काढला नाही. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Wed, 09/17/2008 - 21:30 नवीन

धन्यवाद मीनाताई!

तुम्हाला आण्णांचे आशीर्वाद मिळालेले वाचून आनंद झाला! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mina
य
यशोधरा Tue, 09/16/2008 - 23:56 नवीन

खुसखुशीत

खुसखुशीत आठवण! :)
  • Log in or register to post comments
क
केशवराव Wed, 09/17/2008 - 00:25 नवीन

आठवणी दाटतात . . .!

तात्या, मी पण या प्रसंगाचा साक्षीदार आहे. अशी दिग्गज व्यक्तीमत्वें एकाच व्यासपिठावर पहायचे दिवस गेले. फक्त आठवणींच रहातात. अश्वीनी त्यावेळी बागेश्री गायली होती. 'सवाई गंधर्व ' चा वारकरी -- केशवराव.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 09/17/2008 - 00:36 नवीन

अशी दिग्गज

अशी दिग्गज व्यक्तीमत्वें एकाच व्यासपिठावर पहायचे दिवस गेले. फक्त आठवणींच रहातात. खरं आहे.... अश्वीनी त्यावेळी बागेश्री गायली होती. करेक्ट..! अवांतर - अश्विनी तशी गुणी आहे. तयारी चांगली आहे, आवाज छान आहे, गाण्यात भाव आहेत. परंतु तरीही तिचं गाणं कॅल्क्युलेटेड वाटतं. तिनं थोडी क्रिसच्या पुढे येऊन बॅटिंग केली पाहिजे. अजून मजा येईल... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवराव

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा