महाभारत युद्धामागील राजकीय समीकरणे
महाभारत युद्धामागील राजकीय समीकरणे
हस्तिनापूरचे राज्य हे तसे छोटेसेच. या एवढ्याश्या राज्याच्या वाटणीवरून जे युद्ध झाले, ते मात्र एवढे विराट. त्यात तात्कालीन भारतवर्षातील जवळ जवळ सर्व राजे आपापल्या सैन्यासह लढायला आले. वस्तुत: हा तंटा एकाच कुलातील दोन शाखांचा असताना दूर-दूरच्या राजांना त्यात काय स्वारस्थ्य होते? या युद्धातून त्यांचा काही लाभ होण्यासारखा होता का? त्यातील काही राजांनी दुर्योधनाची बाजू घेतली, तर काहींनी युधिष्ठिराची. यामागे त्यांची काय भूमिका होती? त्यात काही राजकीय समीकरणे होती का? या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.
* * * * *
महाभारतकालीन भारतवर्षात अनेक लहान-मोठी राष्ट्रे (वा राज्ये) अस्तित्वात होती: पूर्वेकडील कोसल, मगध, चेदि, अंग, विदेह, हैहय, पौंड्र, वंग, वगैरे राष्ट्रे, मध्य प्रांतातील कुरु, पांचाल, भोज, मत्स्य वगैरे राष्ट्रे, तसेच पश्चिम व दक्षिणेकडील अनर्त, विदर्भ, गांधार, अश्मक व अन्य राष्ट्रे.
या राष्ट्रांत आपसातील भांडण-तंटे, लढाया नेहमीच होत असत, शिवाय अधून मधून आर्यावर्ताच्या बाहेरील संस्कृतींशी त्यांचे संघर्ष घडून येत. या राष्ट्रांच्या जडण-घडणीत दोन प्रकारच्या प्रवृत्ती कार्यरत होत्या. पहिल्या प्रवृत्तीचे स्वरूप हे 'एकछत्री साम्राज्य' निर्माण करण्याच्या प्रयत्नातून व्यक्त होत होते, तर दुसरीचे अश्या साम्राज्यापासून स्वतंत्र होण्याच्या/राहण्याच्या प्रयत्नातून.
ही राष्ट्रे एकछत्री साम्राज्याच्या अधिपत्याखाली पाच वेळा आलेली दिसतात:
१. (इक्ष्वाकु कुल) युवस्वानचा पुत्र मांधाता याचे साम्राज्य
२. (इक्ष्वाकु कुल) राजा मरुत याचे साम्राज्य
३. (हैहय वंश) कार्तिवीर्यार्जुनाचे साम्राज्य
४. (इक्ष्वाकु कुल) सागर - भगिरथाचे साम्रज्य
५. (कुरुवंश) राजा भरत याचे साम्राज्य.
यापैकी हैहय साम्राज्याचा काळ हा प्राचीन यज्ञप्रधान वैदिक संस्कृतीच्या वाताहतीचा ठरला...हैहय हे भारतवर्षाच्या पूर्वेकडील लोक असून त्यांचा कल आर्य संस्कृतीपासून असलेले स्वतःचे वेगळेपण जपण्याचा होता. पुढे ब्राम्हणांशी घडून आलेल्या हिंसक संघर्षात, जमदग्नि-पुत्र परशुरामाचे हातून त्यांचा संहार होऊन (एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय इ.) त्यांचे साम्राज्य विलयाला गेले.
हैहय साम्राज्याच्या पतनानंतर इक्ष्वाकु आणि कुरु या दोनच प्रबळ सत्ता उरल्या, आणि भगिरथापासून दाशरथी रामापर्यंतचा काळ इक्ष्वाकु कुळाचे सुवर्णयुग ठरला. त्यानंतर मात्र त्या कुळाचा र्हास होऊन कुरुवंशीय भरताचे साम्राज्य आले.
भरताने स्थापन केलेले कुरु साम्राज्य पुढे खिळखिळे, विघटित होत, शंतनु-विचित्रवीर्य-पंडु च्या काळापर्यंत हस्तिनापुरच्या लहानश्या राज्याएवढेच काय ते उरले होते. असे असले, तरी कुरुवंश हा अद्याप अग्रगण्य मानला जात असे.
या काळापावेतो इतर बरेच राजे सामर्थ्यसंपन्न झालेले होते, उदा. पांचालाधिपती द्रुपद, भोजांचा भीष्मक, चेदींचा प्रमुख शिशुपाल, मगधाधिपती बृहद्रथ व जरासंध, सिंध प्रांतातील जयद्रथ, वंग देशातील पौंड्रवंशी वासुदेव ( हा कृष्णासारखी वेशभूषा करून मीच खरा वासुदेव असे म्हणत असे. याला कृष्णाने अनेकदा "जादा शानपंती दिखानेका नै, वरना इधरिच डाल दूंगा… समझा क्या ? अशी तुंबी दिली होती. तरी तो ऐकेना, म्हणून शेवटी त्याचा गेम केला होता ). तसेच यादवांचे लष्करी सामर्थ्य आणि हुशारी यामुळे तात्कालीन राजकारणात त्यांचे स्थान निर्णायक ठरण्यासारखे असले, तरी त्यांच्यात एकीचा अभाव होता.
सारांश, त्याकाळी अनेक राजे सामर्थ्यसंपन्न असले, तरी कुरूकुलास आव्हान देऊन स्वत:चे मोठे साम्राज्य स्थापित करण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती.
जरासंधाने आपले सामर्थ्य वाढवत नेऊन शिशुपालाच्या सहकार्याने साम्राज्य- स्थापनेचा प्रयत्न चालवला होता. अनेक राजांवर आक्रमण करून त्यांना बंदी बनवले होते, आणि नरमेध यज्ञ करून त्यात त्यांना बळी द्यायचे ठरवले होते. (शतपथ ब्राम्हणादि ग्रंथात वर्णिल्याप्रमाणे-) नरमेध यज्ञ हा अश्वमेध यज्ञापेक्षा वरचढ असून तो करणार्याला अमर्याद सत्तेचा लाभ होतो, असे फळ सांगितले गेलेले होते.
परंतु श्रीकृष्णाने भीमाकरवी जरासंधाचा, आणि स्वत: शिशुपालाचा वध करून त्या साम्राज्याची शक्यताच नष्ट केल्याने आता नवीन साम्राज्याचा उदय झाला, तर तो कुरुवंशातूनच होणार, असेच सर्वांना वाटत होते.
खुद्द कुरुवंशात मात्र, दुर्योधनाने पाडवांना राज्याचा वाटा देण्यास दिलेला नकार, युधिष्ठिराने केलेला राजसूय यज्ञ, द्यूतात झालेली पांडवांची हार, द्रौपदीची कौरवांनी केलेली विटंबना, वगैरे घटनांतून कौरव-पांडवातील वैमनस्य वाढत जाऊन त्यांच्यातील युद्ध अटळ झाले होते, आणि त्या दोन्ही पक्षांनी अन्य राजांची मदत आपणासच लाभावी, असा प्रयत्न चालवला होता.
या राजांपैकी काहींचे कौरव वा पांडवांशी नातेसंबंध होते, जसे पांचाल-नरेश द्रुपद हा द्रौपदीचा पिता, विराट हा अभिमन्यूचा सासरा, यादव हे सुभद्रेचे माहेर, श्रीकृष्ण हा कुंतीचा आतेभाऊ, शल्य हा नकुल-सहदेवांचा मामा, जयद्रथ हा धृतराष्ट्राचा जावई, गांधार हे गांधारीचे माहेर… इत्यादि.
अश्या नातेवाइकांनी त्या त्या पक्षात जाणे साहजिकच असले, तरी याला काही अपवादही होते. उदा. यादवांनी, तसेच शल्याने दुर्योधनाचा पक्ष घेतला, तर कौरवांपैकी विकर्ण हा पांडवांकडे गेला. त्रिगर्ताचा राजा सुशर्मा (याचेकडे 'संशप्तक' हे कडव्या योद्ध्यांचे दल होते) याने अर्जुनाशी असलेल्या वैयक्तिक वैरामुळे दुर्योधनाचा पक्ष घेतला.
श्री अरविंद यांनी (१९०१ च्या सुमारास) मांडलेल्या सिद्धांतानुसार,तात्कालीन राष्ट्रे ही खालील तीन प्रकारच्या विचारांपैकी कोणत्या ना कोणत्याने प्रेरित होऊन युद्धात सहभागी झालेली होती:
१. कांही झाले, तरी स्वत:चे स्वातंत्र्य जपण्याची इच्छा असणारी राष्ट्रे. (शल्य, यादव इ. ??)
२. कुरुकुलाच्या मोठेपणावर मात करून स्वत:चे वर्चस्व स्थापित करण्यास आतुर राष्ट्रे. (मत्स्य, पांचाल ??)
३. पूर्वीच्या वैभवशाली साम्राज्याची स्मृती जपणारी, आणि तश्या एकछत्री साम्राज्याचा पुरस्कार करणारी राष्ट्रे. (चेदी,मगध, कुंतिभोज ??)
यातील पहिल्या वर्गातील राष्ट्रे दुर्योधनाच्या पक्षात गेली. कारण त्यांना असे वाटत असावे, की दुर्योधनाचे राज्य हे फार काळ टिकणारे नव्हे. याउलट युधिष्ठिराचे वर्धिष्णु राज्य मात्र दीर्घकाळ टिकेल... असे वाटण्यामागे दुर्योधनाच्या मर्यादा, तसेच युधिष्ठिराने केलेल्या राजसूय यज्ञातून दिसून आलेले त्याचे वाढते सामर्थ्य, आणि या सामर्थ्यामागे असलेले श्रीकृष्णाचे सूत्र-संचालन या गोष्टी असाव्यात.
श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्व हे काहींच्या मनात भक्तियुक्त आदर निर्माण करणारे, तर काहींच्या मनात तिरस्कार, द्वेष आदि निर्माण करणारे होते. कारण, त्यांच्या मते श्रीकृष्ण हा तात्कालीन नीति, धर्म आणि राजकारणात नको नको ते बदल घडवून आणू पाहणारा धूर्त, कपटी, कावेबाज आणि अविवेकी माणूस होता ( हे शिशुपालाने केलेल्या आगपखडीतून, तसेच भूरिश्रवा सारख्या आदरणीय, सर्वमान्य बाल्हिक राजाने केलेली श्रीकृष्णाची निंदा यातून दिसून येते).
श्रीकृष्ण आणि पांडव यांच्या युतीतून आकारास येत असलेल्या साम्राज्याचे मांडलिक होण्याच्या भीतीने ग्रस्त झालेली, साधारणत: आर्यावर्ताच्या बाह्य परीधीवरील राष्ट्रे (मद्र, सिंधु, अवंती, गांधार, यादव ???), तसेच गंगेच्या दक्षिण खोर्यात वसलेले आर्य राजे दुर्योधनाच्या पक्षात गेले.
जरासंध आणि शिशुपाल यांचे वध भीम-श्रीकृष्ण यांनी केलेले असूनही ( की त्यामुळेच ?) वधानंतर त्यांची राष्ट्रे मात्र पांडवांच्या पक्षात गेली.
भीष्म व द्रोण यांना पांडवांविषयी ममत्व होते, आणि पांडवांचा हक्कही मान्य होता, तरीही युद्धात पांडवांकडून न लढता कौरवसेनेचे नेतृत्व करून त्यांनी पांडव-सेनेचा संहार केला. याचे कारण, त्यांना पांडवांच्या पाठीशी सर्व शक्तीनिशी ठाकलेले द्रुपद आणि विराट हे बलाढ्य राजे भविष्यात सर्व सत्ता काबीज करतील, अशीही भिती वाटत असावी.
* * * * * *
वाचकहो, माझ्या अल्पमति आणि अतिअल्प अभ्यासाच्या आधारे हे सर्व लिहिले आहे. या विषयावर अन्य लेखकांनी काय सांगितले आहे, मूळ महाभारतात याविषयी कोणते उल्लेख आहेत, तसेच श्री अरविंद यांचा सिद्धांत कितपत ग्राह्य मानला जाऊ शकतो, असल्यास त्यानुसार कोणकोणते राजे त्या त्या पक्षात गेले, वगैरेंवर विद्वान अभ्यासक अधिक प्रकाश टाकतील, अशी आशा आहे.
सदर लेखनात काही त्रुटि असतील, तर त्या अवश्य नजरेस आणून द्याव्यात.
काही चित्रे:
बलराम-जरासंध युद्ध:
जरासंधवध:
कृष्णाची द्वारका:
कौरव-पांडव युद्ध:

वर्गीकरण
प्रतिक्रिया
विवेचन अन चित्रे दोन्हीही
सुरेख चित्रे आहेत.
आकलन
ओके.
पुराणेतिहास
अजुन एक उगाचच आपली शंका
आवडला लेख
युद्धानंतर पांडवांनी सुमारे
पणतू
क्रमशः राहील का टंकायच?
आवडला
वर्तमान भूगोल
तरीच
त्याकाळात यादवांचे राज्य होते
@ विवेकः जाट पुणेकर लोकांपेक्षा निश्चित जास्त हुशार असतात ???
__/\__!!
शक्यता...
+
लेख आवडला
उदा. यादवांनी, तसेच शल्याने
+१
- यदूवंशजांना क्षत्रीय समजत
दुर्योधनाचा मुलगा !
नाही हो.
पण युद्धापासून यादवांचा
खरंय. पण पुढची फक्त ३६ वर्षे.
हो पण ते स्वहस्ते स्वतःची घाण
विदर्भ
रुक्मीला त्याच्या
काही संदर्भ असल्यास द्यावेत.
माझ्याकडे मराठी भाषांतर नाही.
हे मूळ महाभारताचे इंग्रजी
"मूळ महाभारत " ही खुप मजेशीर
अगदी अगदी.
तेही खरंच. कॉलेज च्या
फार छान लेख !
नातेसंबंध, तसेच एकमेकांच्या वैरापायी केले गेले स्कोअर सेटलिंग असेच काहीसे वाटते.सगळ्या मानव व्यवहाराचे इंगित "यातून मला काय मिळणार आहे?" या एका प्रश्नाच्या उत्तरात दडलेले असते... कधी ते उत्तर एकदम उघड असते तर कधी मानवी मनाच्या अनेक पदरांखाली दडलेले असते... पण अखेर उत्तर त्याच एका प्रश्नाचे असते. त्याकरिताच महाभारत ही केवळ एक कवीकल्पना नसून इतिहास असल्याच्या वादास बळकटी मिळते. त्याची वर्णनाची पद्धत आणि शब्द काही एक उद्देश समोर ठेवून रंगवलेल्या कथेपेक्षा जास्त "जसे होते तसे" लिहिलेला इतिहास असल्यासारखे आहेत.युगांत.
नेहमीप्रमाणे
विंट्रेष्टिंग!!!
बलराम-जरासंध युध्दाचं चित्र: १७६०-६५
बलराम-जरासंध युध्दाचं चित्र: १७६०-६५
भीष्म नपुंसक ???
जर पितामह भीष्म तृतीयपंथी होते ?
तसं असेल तर कसा काव्यात्म
गंमतच.. भीष्म हिजडा होता, तर
मूळ पुरुष
एक गम्मत.
ही माहिती नवीन समजली. काही
क्रमशः आहे ना?
कोण कुणास्तव जगतो मरतो