गोवन थाळी
'अन्न हे पूर्णब्रह्म' ह्या सदरास सुरुवात करून आज १ वर्ष झाले. ह्या वर्षभरात अनेक पाककृती सादरकरण्याची मला मिपाने संधी दिली, मिपा सदस्यांनी कौतुक केले. भरून पावलो. आजच्या ह्या वर्धापनदिनानिमित्त ही 'गोवन थाळी' सादर करताना आनंद होतो आहे. स्विकार व्हावा.
थाळीतील पदार्थ आणि त्यांची पाककृती.
समोर भात आणि तांदूळाच्या भाकरी. भाकरीला लागून कुर्ल्या मसाला. मधली वाटी करंदीची चटणी/भाजी. त्याच्या बाजूला सोलकढी आणि सोलकढीला लागून कांदा-टोमॅटो कोशिंबीर. भाकरी आणि कुर्ल्या मसाला ह्यांच्या मधे लिंबू.
कुर्ल्या मसाला.
साहित्यः कुर्ल्या (खेकडे) - ३ नग. नारळ - अर्धा. सुक्या मिरच्या - ८ नग. धणे - ४ लहान चमचे (टि स्पून) काळीमिरी - ८ दाणे. लवंग - ५ नग. दालचिनी १ इंच. जायपत्री - १ फुल. जायफळ - १/८ कांदे - २ मध्यम. तेल - ४ मोठे चमचे (टेबल स्पून) हळद - १ चमचा. तिखट - २ चमचे. मीठ - चवीनुसार. तयारी: कुर्ल्या साफ करून धुवून घ्या. त्यांचे लहान पाय, पाण्याबरोबर, मिक्सरमध्ये फिरवून पाणी गाळून घ्या. मुख्य नांगे किंचीत ठेचून (तडा जाईल इतपतच) घ्या. मुख्य धडाचे मधून चिरून दोन भाग करून घ्या. कांदे उभे चिरून घ्या. कृती: सुक्या मिरच्या, धणे, काळीमिरी, लवंग, दालचिनी, जायपत्री, जायफळ तेलावर खमंग परतून घ्या. त्यावर उभे चिरलेले कांदे परतून घ्या. शेवटी त्यातच नारळ घालून लालसर रंगावर परतून घ्या. आता हा सर्व मसाला बाजूला काढून थंड होऊ द्या. थंड झाला की मिक्सरवर मुलायम वाटून घ्या. आता ह्या मसाल्यात आवश्यकतेनुसार पाणी मिसळून उकळण्यास ठेवा. त्यात हळद, तिखट घालून मिसळून घ्या. मसाला उकळला की त्यात लहान पाय वाटून, गाळून घेतलेले पाणी घाला. चवीपुरते मीठ घाला. आता ठेचलेले नांगे आणि चिरलेले खेकडे घालून शिजवा.करंदीची चटणी/भाजी.
साहित्य: करंदी - १ वाटी. कांदा - १ मध्यम. टोमॅटो - १ मध्यम. आमसुलं - ४ नग. हळद - अर्धा लहान चमचा (टी स्पून) तिखट - १ लहान चमचा. तेल - २ मोठे चमचे (टेबल स्पून) कोथिंबीर. तयारी: करंदी वाहत्या नळाखाली धुवून घ्या. भिजत ठेवू नका. आता करंदी निथळत ठेवा. कांदा आणि टोमॅटो वेगवेगळे बारीक चिरून घ्या. कृती: करंदी कोरडीच भाजून घ्या. बाजूला ठेवा. तेल तापवून त्यात कांदा परतून घ्या. त्यावर टोमॅटो टाकून परता. टोमॅटो शिजला की त्यात भाजलेली करंदी, मीठ, हळद, तिखट, आमसुल घालून परता. किचिंत पाणी घालून करंदी शिजवून घ्या. पाणी आटे पर्यंत परतत राहून करंदी कोरडी करा. कोरडी झाली की कोथिंबीर घालून सजवा.सुरमई फ्राय.
साहित्यः सुरमई - १ तुकडा. आलं-लसूण पेस्ट - अर्धा लहान चमचा. हळद - अर्धा लहान चमचा (टि स्पून) तिखट - १ लहान चमचा. चिंचेचा कोळ - १ मोठा चमचा. मीठ - चवीनुसार. तांदूळाचे पीठ - वरून लावण्यासाठी. तेल - तळण्यासाठी. कृती: सुरमई तुकडी धुवून एखाद्या फडक्यामध्ये हलक्या हाताने दाबून कोरडी करून घ्या. सुरमईला आल-लसूण पेस्ट, हळद, मीठ चोळून घ्या. नंतर तिखट आणि चिंचेचा कोळ लावून अर्धातास, मुरण्यासाठी, बाजूला ठेवून द्या. अर्ध्या तासानंतर, फ्राईंग पॅन मध्ये तेल तापवून, सुरमईला तांदूळाच्या पिठात घोळून, मध्यम आंचेवर, दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्या.तांदूळाची भाकरी.
साहित्यः तांदूळाचे पीठ - १ कप. पाणी - १ कप. मीठ - चवीनुसार. तेल - १ मोठा चमचा (टेबल स्पून). पाणी उकळण्यास ठेवा. पाणी उकळताना त्यात मीठ आणि तेल घाला. पाणी उकळले की त्यात पीठ मिसळून कलथ्याच्या दांड्याने ढवळत राहा. पीठाचा गोळा झाला की झाकण ठेवून मंद आंचेवर एक वाफ येऊ द्या. गॅसवरून उतरवून पीठाचा गोळा परातीत काढून घ्या. जरा थंड झाल्यावर पण अजून सहन होईल इतका गरम असतानाच भरपूर मळून मऊ करून घ्या. मध्यम आकारांचे गोळे करून, लाटून भाकरी तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. गरम गरम वाढा.सोलकढी:
साहित्यः नारळ - अर्धा. लसूण - ४ पाकळ्या. हिरव्या मिरच्या - ३ नग. मीठ - चवी नुसार. बीट रुट - सुपारी एवढे. आमसुलं - ७-८ नग. कोथिंबीर - सजावटीसाठी. तयारी: आमसुलं अर्ध्या तासाकरीता पाण्यात भिजत घाला. पिळून त्यांचा रस काढून घ्या. कृती: नारळ, लसूण, मिरच्या, मीठ, बीट रूट मिक्सर मध्ये पाणीघालून एकदम बारीक वाटून घ्या. हे मिश्रण पातळ कपड्यातून गाळून/पिळून त्याचा रस काढून घ्या त्यात आमसुलाचा रस मिसळा आणि कोथिंबीर घालून सजवा. बाकी भात, कांदा-टोमॅटो कोशिंबीर ह्यांची कृती सर्वांना माहित असतेच. शुभेच्छा...!
वाचने
104628
वाचनखूण
प्रतिक्रिया
68

थाळी चक्क ...
मस्तच
क्या बात है!
आहाहाहाहा...
नुसत ताट? पाट कुठाय? मी बसायच
In reply to नुसत ताट? पाट कुठाय? मी बसायच by स्पंदना
पाटावर मी आधीच बसले आहे..
Tumhala danDawat aahe Kaka!
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
मस्तच एकदम पेठकर काका.
आहाहाहाहा...झकास. एक्दम भारी
मस्त
चित्र बघूनच खल्लास ! सगळे
In reply to चित्र बघूनच खल्लास ! सगळे by डॉ सुहास म्हात्रे
+१
गतप्राण....
झक्कास, काका!
भारी!
पेठेकर काका का आमच्या आईसाहेबांचा मार खायला लावताय ?
फोटो बघुनच मन तृप्त झाले.
वा काका!!! खुप सुंदर दिसते
मनीच्या बाता : का का का? का
मग
काय मस्त थाळी आहे हो, बघूनच
In reply to काय मस्त थाळी आहे हो, बघूनच by बॅटमॅन
+१
धन्यवाद.
मस्त!
In reply to मस्त! by पैसा
येऊ देत नवनविन पाककृती.
In reply to येऊ देत नवनविन पाककृती. by प्रभाकर पेठकर
:)
In reply to येऊ देत नवनविन पाककृती. by प्रभाकर पेठकर
पेठकरकाका
'माझ्याच पाककृती सर्वोत्कृष्ट, मीच सर्वोत्तम आणि सर्वज्ञानी आहे, तुम्ही माझ्याकडून पाककला शिकून घ्या तुमचे आयुष्यात भले होईल' असा दुराग्रह माझ्याजवळ नाही.पेठकरकाका, बहुधा तुमचा अध्यात्माचा अभ्यास कमी पडतोय. (कृपया हलके घेणे) :)खतरनाक !!
अहाहा!
अप्रतिम
आईग्ग जबरदस्त.. तांदळाच्या
धन्यवाद.
त्रासदायक
In reply to त्रासदायक by विसुनाना
ताजा कलम
In reply to ताजा कलम by विसुनाना
मस्कत.
In reply to मस्कत. by प्रभाकर पेठकर
मस्कत मध्ये!
In reply to मस्कत मध्ये! by भाते
पुण्यात नक्की.
In reply to पुण्यात नक्की. by प्रभाकर पेठकर
केव्हा आहे कट्टा ?
In reply to केव्हा आहे कट्टा ? by डॉ सुहास म्हात्रे
सप्टेंबर २०१३.
In reply to सप्टेंबर २०१३. by प्रभाकर पेठकर
पॉइंट नोटेड युरॉनर.
जीवघेणे आहे हे सर्व
काका माझी तुमच्याशी कट्टी फू.
मस्तच
In reply to मस्तच by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तिवळ मस्त अस्ते हां बाकी.
करंदी काय आहे?
एक तरी शाकाहारी ??
In reply to एक तरी शाकाहारी ?? by सूड
+१
In reply to +१ by भाते
येत आहेत...
चला, आज जूम्मा!
काय टाईपावे तेच सुचत नाही
विसुनाना, भाते, सुहास..,
In reply to विसुनाना, भाते, सुहास.., by प्रभाकर पेठकर
मस्त थाळी... काय कोम्बिनेशन
गोवन थाळी आणि ती मालवणी थाळी
व्वा...
मस्त...
वाह
धन्यवाद.
खल्लास..
bhook lagalee
पेठकर सर, फारच सुदंर व अप्रतिम थाळी.
पुन्हा
In reply to पुन्हा by राही
बीटरूट आणि सोलकढी.
पेठकर काका, सोलकढीला तुपाची व ओव्याची फोडणी देऊन बघा...
In reply to पेठकर काका, सोलकढीला तुपाची व ओव्याची फोडणी देऊन बघा... by निश
फोडणी..
तुपाची फोडणी जर आवडत नसेल तर काका ....
धन्यवाद.
पंख होती तो उड आती रे......