Skip to main content

गृहमंत्री श्री शिवराज पाटील यान्नी दिवसात ३ वेळा बदललेल्या कपड्यांबद्दल मिडीयाने घेतलेले आक्षेप व वॉचडॉगची भूमिका कितपत योग्य?

गृहमंत्री श्री शिवराज पाटील यान्नी दिवसात ३ वेळा बदललेल्या कपड्यांबद्दल मिडीयाने घेतलेले आक्षेप व वॉचडॉगची भूमिका कितपत योग्य?

Published on 17/09/2008 - 13:10 प्रकाशित मुखपृष्ठ

याद्या 943
प्रतिक्रिया 11

मिडीया आणि वॉचडॉगच्या भूमिकेऐवजी शिवराज पाटलांचं वागणं बरोबर आहे का याबद्दल चर्चा झाली (सुरू) असती तर ती जास्त अर्थपूर्ण होती!

अयोग्य! मिडीया तद्दन बाजारी गल्लाभरू पद्धतीने प्रकरण हाताळत आहेत ला मत दिले आहे. वर अदिती यांच्याशी सहमत. गृहमंत्री म्हणून शिवराज पाटील यांचे कर्तुत्व याविषयी चर्चा होती तर ती अधिक अर्थपूर्ण ठरली असती. मग ते दिवसात तीन वेळा कपडे बदलतात की तीन दिवसातून एकदा, हा वादच निर्माण झाला नसता! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

>>गृहमंत्री श्री शिवराज पाटील यान्नी दिवसात ३ वेळा बदललेल्या कपड्यांबद्दल मिडीयाने घेतलेले आक्षेप व वॉचडॉगची भूमिका कितपत योग्य? हा आपेक्ष योग्य आहे असे मला वाटतं ! विस्फोट होऊन एक तासाच्या आत त्यांनी कपडे बदलले ह्याला माझा आपेक्ष आहे, कारण जे त्यांनी कपडे बदलले (तीन वेळा - एक तासाच्या आत ) ती वेळ चुकीची होती, तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात देशाच्या राजधानी मध्ये पाच-पाच विस्फोट झाले आहेत व तुम्ही जनतेला योग्य मार्गदर्शन / कारण देणे सोडून आपण कसे दिसत आहोत हे महत्वाचे ठरवून तीन वेळा कपडे बदलले हे गरजेचे होते की जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या परिवाराला दिलासा देणे गरजेचे होते ? तुम्हाला काय वाटते ते सांगाल का ? एखाद्याच्या घरात कोणी मेलं आहे व तो ते प्रेत सोडून आपले कपडे व भांग निट पडला आहे का नाही हे आरशामध्ये बघत बसणे योग्य :? राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

In reply to by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

कारण जे त्यांनी कपडे बदलले (तीन वेळा - एक तासाच्या आत ) ती वेळ चुकीची होती, तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात देशाच्या राजधानी मध्ये पाच-पाच विस्फोट झाले आहेत व तुम्ही जनतेला योग्य मार्गदर्शन / कारण देणे सोडून आपण कसे दिसत आहोत हे महत्वाचे ठरवून तीन वेळा कपडे बदलले हे गरजेचे होते की जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या परिवाराला दिलासा देणे गरजेचे होते ? सहमत आहे! बाँबस्फोट होऊन हाहाका:र उडालेला असताना पाटील साहेब तीन तीन वेळा कपडे बदलण्यात मग्न होते याची पाटलांना खरे तर शरम वाटायला पाहिजे. मिडियाने हा मुद्दा एरणीवर आणला हे बरेच केले! मी दुसर्‍या पर्यायाला मत दिले आहे! तात्या.

गृहमंत्री श्री शिवराज पाटील एक अपयशी गृहमंत्री म्हणुन चर्चा प्रस्ताव टाकावा असा विचार चाललेला होता. पण, आपल्या कौलाच्या निमित्ताने विषयांतर असेल, पण विक्षिप्त अदिती आणि सुनील म्हणतो तसे आपण गृहमंत्र्याच्या कार्यपद्धतीवर,कर्तुत्वावर चर्चा करावीच असे वाटते, चर्चा करु की नका करु, पण आम्ही मात्र यानिमित्ताने त्यांना ठोकून घेतो. :) माझे या पर्यायांपेक्षा वेगळे मत आहे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची एका मुलाखतीत पोलादी पुरुषाशी तुलना मुलाखतकर्त्याने केली होती, मात्र ती तुलना ती त्यांनी विनयाने नाकारली. खरंच माजी गृहमंत्र्यांशी ही तुलना होऊ शकते का ? मी तर नाहीच असे म्हणेन. समस्यांच्या ढिगांवर बसलेला गृहमंत्री म्हणुन मा. शिवराज पाटील यांचे नाव घेतले पाहिजे. मराठी माणुस अपयशाचा धनी होतो तेव्हा मराठी माणूस म्हणुन आम्हाला प्रचंड वाईट वाटते. दिल्लीत मराठीत माणसाला सन्मान मिळत नाही असे म्हटल्या जाते, मात्र सन्मान मिळाल्यानंतर दुर्दैवाने ते काहीच करत नाही असेही वाटायला लागले आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सन्माननीय गृहमंत्र्याकडे पाहिलं पाहिजे. आठव्यांदा निवडणूक जिंकले असते तर त्यांना सोनिया मॅडम यांनी त्यांना पंतप्रधान केले असते ( मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावर असता तर आम्हाला आनंदच झाला असता. ) असे पाटील समर्थक म्हणतात तेही पटतंय. श्रेष्ठींवर कोणती जादू केली आहे कोणास ठाऊक तिथे त्यांची उंची उंचावत चाललेली आहे, मात्र सार्वजनिक निर्णयाच्या बाबतीत त्यांच्या इतका अपात्र गृहमंत्री हे मिळतो हे आपलं दुर्दैवच. गृहमंत्रालयाच्या कामकाजाची चर्चा जाहीर होत नसली तरी त्याचा दबदबा जाणवावा इतके काम नक्कीच या विभागाला करता आले असते. अनेक निर्णय घेण्याची क्षमता या विभागाकडे आहे, पण दुर्दैवाने शिवराज पाटील या व्यक्तिमत्वाला परिस्थितीचा अभ्यास करता येत नाही की निर्णय घेता येईना कोणास ठाऊक. या विभागात सध्या पेंडींग प्रश्नाचा पसार फार मोठा आहे, जसे काश्मीर,अतिरेकी, नक्षलवाद, संघटीत गुन्हेगारी, कितीतरी प्रश्न भिजतच पडले आहे. एका दैनिकातल्या बातमीनुसार छत्तीसगढ मधे तर म्हणे, कोणत्या तरी नेत्याचे ऐकुन मा. महोदयांनी नक्षलवाद्यांबरोबर स्थानिक लोकांनाच भिडवलं आहे. काट्याने काटा काढणे म्हणतात ते हे असे. ते सारं जाऊ द्या, केंद्रातील मराठी माणसाने कमीत-कमी मराठी माणूस महाराष्ट्राच्या बाबतीत तरी पक्षपात केला पाहिजे, असे वाटत असते. महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाच्या बाबतीत गृहविभागाच्या वतीने शपथपत्र न्यायालयात दाखल केलं आहे, त्यात ते म्हणतात हा प्रश्न केव्हाच सुटला आहे, आता बोला !!! या पदावर अनेक माननिय व्यक्तिंनी काम केलंय, पण सन्माननीय गृहमंत्री त्यांच्या पासांगाला पुरतात की नाही कोणास ठाऊक . ३ वेळा बदललेल्या कपड्यांबद्दल मिडीयाने घेतलेले आक्षेप खरं तर बाँबस्फोटानं दिल्ली हादरलेली असतांना असे करावे का ? याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. पण कपड्यांपेक्षा कृती महत्त्वाची आहे, त्यामुळे या प्रश्नाला विनाकारण मिडियाने पेटवले आहे, असे वाटते. बरं ! शिवराज पाटलांचा मागचा पराभव पाहता, आता भविष्यातही त्यांना मराठवाड्यातून कोणी निवडून देतील असे वाटत नाही. ते लोकांचे नेते राहिलेले नाहीत, निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी राहिलेली नाही आणि लोकांमधे त्यांच्यासंबधी विश्वास नसल्यामुळे लोकसभेकडे जाणारा त्यांचा दोर केव्हाच कापला गेला आहे. फक्त पक्षाच्या मुख्यालयात कोणाच्या शेजारी बसायचं आणि कोणाची हुजरेगीरी करायची हे त्यांना माहित असल्यामुळे, आमदार ते गृहमंत्री असा त्यांच्या आतापर्यंतचा प्रवास सुरळीत झाला. सोनियाच्या दरबारी वजनदार दरबारी म्हणुन वाढता नावलौकीक पाहता आणि लातूर हा मतदारसंघ हा राखीव झाल्यामुळे त्यांच्यासाठी त्यांनी राज्यसभेत जागा पक्की करुन ठेवली हे त्यांचे गृहमंत्री म्हणुन कारकिर्दीचे यश मानले पाहिजे. ( पाहा हे यश ) महत्वाचे पद असून जर सार्वजनिक हिताच्या कामाबरोबर सामान्य माणसात विश्वास वाढवता येत नसेल , तर अशा अपात्र माणसाने अशा महत्वाच्या पदावर हक्क सांगूच नये, त्यांनी राजिनामा द्यावा, असे प्रामाणिकपणाने वाटते. -दिलीप बिरुटे (गृहमंत्र्याच्या कामकाजावर नाराज आणि भडकलेला एक मराठी माणूस )

वर वर जरि कपड्या बद्दल आक्षेप वाटत असला तरि त्यातुन त्याना घटनेचे गांभिर्य किति आहे ते कळते. मला ह्या संदर्भात एक टिव्हि वर पाहिलेलि गोष्ट आठवते. सुनामि च्या वेळेस हे महाशय पहाणि करायला गेले होते. सगळि कडे हाहाकार होता, घरांचि , लोकांचि वाताहात झालेलि होति. त्या सर्वा मधे हे मात्र कडक कपड्या मधे पहाणि करत होते , आणि रुबाब असा कि जणू काहि मान वंदना स्विकारत आहेत. चेहर्‍या वर दु:खाचा मागमूस हि नाहि.

In reply to by मराठी_माणूस

चेहर्‍या वर दु:खाचा मागमूस हि नाहि. अहो, आदरणीय, माननीय महोदयांच्या मख्ख चेहर्‍यावर काहीच भाव नसतात म्हणजे ते भाव वाचताच येत नाही. आनंदाच्या, दुखा:च्या प्रसंगात चेहरा सतत पडलेलाच असतो. हसतातही रडल्यासारखेच :)

मिडीयाने घेतलेला आपेक्ष बरोबर आहे की नाही.. ह्यापेक्षा पाटलांनी चुक केली की नाही हे बघणे गरजेचे आहे... मी योग्य! मिडीयाचे येवढे बारीक लक्ष असल्याबद्दल आभार ह्याला मत दिले आहे , व तुम्ही सुध्दा मत देताना वरील काही प्रतिसादांचा विचार करा.. मिडियामध्ये अनेक मुद्दे गाजतात त्यामुळे तो मुद्दा चुकीचा आहे असे नाही.... आजच एक बातमी विस्फोटाबद्दल लिहता लिहता बच्चन रडला... व त्याने आपला रडण्याचा फोटो आपल्या ब्लोग वर चिटकवला... ~X( (भिका*चोट पणा करु लागला आहे हा बच्चन देखील आजकाल) ह्यावर देखील मिडिया गरादोळ माजवेलच की... ;) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

बॉम्ब्स्फोट झाले आता मंत्रीपद जाणार याचा धसका बिचार्‍याने घेतला असेल आणि लागले असतील कपडे बदलायला.. ;) समझता नही है यार! मिडीया पण वेड** आणि तो मंत्रीपण तसलाच.. आणि म्हणायला प्रचंड दु:ख होत आहे. आपला देश पण षंढत्त्वाकडे वेगाने जातो आहे. राजधानीत बॉम्बस्फोट होतो आणि आपण फक्त निषेध करतो.

आपल्या बहुमुल्य व अभ्यासू प्रतिक्रियान्सोबत केलेल्या मतदानाबद्दल सहभागी मिपाकरान्चे आभार! :) खर तर, मला सगळ्यान्चच पटतय! :) आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P