✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अजुन एक बालकथा : शतशब्दकथा

प
प्रसाद गोडबोले यांनी
Sat, 08/10/2013 - 21:27  ·  लेख
लेख
एक होता ससा एक होतं कासव . त्यांची लागली शर्यत आंब्याच्या झाडापर्यंत पळण्याची पण चिऊचं घर होतं मेणाचं अन काऊचं घर होतं शेणाचं म्हणुन म्हातारी म्हणाली " लेकीकडे जाऊ तुपरोटी खाऊ मस्त जाडजुड होवु ". उंदीरानं काय केलं छोटे कापडाचे तुकडे जोडुन मस्त सुंदर टोपी बनवली अन सगळ्यांना चिडवत सुटला आणि मग ससा मग टुणुक्टुणुक उड्या मारत जोरात पुढं निघुन गेला अन कासव मात्र हळु हळु चालायला लागलं तेवढ्यात जोरात पाऊस आला अन काऊचं घर गेलं वाहुन मग काऊ चिऊच्या घरी आला आणि म्हणाला " चल रे भोपळ्या टुणुक टुणुक " म्हातारी घाबरली आणि म्हणाली " प्रधानजी जा ताबडतोब त्या उंदराला कैद करुन आणा अन त्याची टोपी जप्त करुन मला द्या. प्रधानजी निघाले तेव्हा सशाला दिसलं गाजरांचं शेत .कासवांनं गाजरं खावुन झोपलेल्या सशाला पाहिलं अन विचार केला " चिऊ ताई चिऊ ताई दार उघड . " चिऊताई म्हणाली " लेकीकडे जाते तुप रोटी खाते मग तु मला खा" काऊ म्हणाला " राजा भिकारी , माझी टोपी घेतली राजा भिकारी माझी टोपी घेतली " राजा चिडला अन हळु हळु चालत चालत आंब्याच्या झाडापाशी पोचला अन म्हणाला " थांब माझ्या बाळाला नाहु घालु दे , टीट लाऊ दे मग लेकीकडे जाते तुप रोटी खाते मग तु मला खा " मग कासवानं ती भिकारडी टोपी म्हातारी कडे फेकुन दिली .मग ससा हसत हसत म्हणाला " भोपळा मला घाबरला माझी टोपी परत दिली हा हा हा." अशा तर्हेने म्हातारीने शर्यत जिंकली पण तेवढ्यात..... . . कबुतराच्या मागे लागला बहिरी ससाणा ...घाबरलेलं कबुतर उडत उडत सिंव्हासमोर आलं आणि म्हणालं ह्या जंगलात तुमच्यापेक्षा मोठ्ठा सिंव्ह आहे ." मग म्हातारी सिंव्हाला एका खोल विहीपाशी घेवुन गेली (कारण ससा कसा घेवुन जाणार तो तर गाजर खावुन झोपला होता ना !) मग शिबीराजा उंदराला म्हणाला "ह्या भोपळ्याच्या वजना इतकं मांस मी तुला देतो" पण चिंऊताईने दार काही उघडलंच नाही बिच्चारे प्रधानजी म्हणाले "कोल्होबा कोल्होबा बोरं पिकली " रडत रडत शिबीराजा म्हणाला " नको गं म्हातारे ढुंगी पोळली " मग लबाड माकडाने केक चे दोन भाग केले एक भाग सशाण्याला दिला एक भाग भोपळ्याला दिला एक भाग स्वतःल ठेवुन घेतला .श्रावणबाळाने हळुच विहीरीत डोकावुन पाहिले बघतो तर काय सेम टु सेम कासव तशीच भली मोठ्ठी आयाळ असलेलें ...पण तेवढ्यात..... . . . एक म्हातीरी आली एक टोपी घेवुन गेली ".... (क्रमशः ) डिस्केलमर : सदर कथा स्वतःच्या जबाबदारीवरच लहान मुलांना (दुसर्‍यांच्या) ऐकवावी . सदर कथा ऐकुन पेंगुळलेली कार्टीही जागी होवुन रडायला लागतात अन त्यांच्या आयांची बोलणी खावी लागतात असा शिबीराजाचा अनुभव आहे .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
3984 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

भारी..

सामान्य वाचक
Sat, 08/10/2013 - 21:30 नवीन
गाई वरच्या निबंधाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

वा वा!

पैसा
Sat, 08/10/2013 - 21:51 नवीन
पु भा प्र. पण तेव्हा म्हातारीला कोण भेटले ते सांगायला विसरू नका बरं!
  • Log in or register to post comments

आवडलं!

आदूबाळ
Sat, 08/10/2013 - 22:13 नवीन
आवडलं! माझ्या स्वतःच्या गोष्टीत ऑन डिमांड खारूताई पासून व्हॅक्युम क्लीनर पर्यंत वाट्टेल त्या वस्तू घुसतात त्याची आठवण झाली :)
  • Log in or register to post comments

आयला....कितवा पेग

टवाळ कार्टा
Sat, 08/10/2013 - 22:17 नवीन
आयला....कितवा पेग ;)
  • Log in or register to post comments

बरं झालं आताच विचारलंत...

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/10/2013 - 22:19 नवीन
बरं झालं आताच विचारलंत... क्रमशः मध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणं कठीण आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अब रुलायेगा क्या पगले ?

प्रसाद गोडबोले
Mon, 08/12/2013 - 01:09 नवीन
अब रुलायेगा क्या पगले ? दारुच्या पेग सोडा , थेंबा थेंबा साठी तरसलोय मी इथे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अस्सं होय... म्हणजे हा

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 08/13/2013 - 21:03 नवीन
अस्सं होय... म्हणजे हा विथड्रॉवल सिंड्रोम आहे तर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मजा आली वाचायला.

कवितानागेश
Sat, 08/10/2013 - 23:13 नवीन
अवांतरः २२९ आणि १२९ :)
  • Log in or register to post comments

माझी अडिच वर्षांची भाची अशीच

प्रीत-मोहर
Sun, 08/11/2013 - 08:08 नवीन
माझी अडिच वर्षांची भाची अशीच गोष्ट सांगते :)
  • Log in or register to post comments

गैरफायदा.

प्रभाकर पेठकर
Sun, 08/11/2013 - 12:34 नवीन
लहान मुलांना 'शत' शब्दाचा अर्थ कळत नाही त्याचा इतका गैरफायदा घेऊ नये.
  • Log in or register to post comments

मग शिंप्याने शिवले कपडे, ते

स्पंदना
Sun, 08/11/2013 - 13:30 नवीन
मग शिंप्याने शिवले कपडे, ते सिंहाने घातले, अन उंदिर म्हणाला भोपळा नंगु आहे.
  • Log in or register to post comments

वाचायला सुरुवात केली तेव्हाच

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/11/2013 - 18:52 नवीन
वाचायला सुरुवात केली तेव्हाच मी ओळखलं की ही सायबेरियातील कायबेरिया जमातिच्या काहिबाहिया या भाषेतली कहाणी आहे... कारण त्या भाषेत: शत = ३५९ ;)
  • Log in or register to post comments

आज मुलीला हीच गोष्ट सांगणार

भडकमकर मास्तर
Sun, 08/11/2013 - 21:38 नवीन
आज मुलीला हीच गोष्ट सांगणार आहे..
  • Log in or register to post comments

मिपा वरील अध्यात्माच्या

प्रभाकर पेठकर
Mon, 08/12/2013 - 00:04 नवीन
मिपा वरील अध्यात्माच्या अत्याचारी लेखापासून प्रेरणा घेतलेली दिसते आहे. सर्व डोक्यावरून गेले.
  • Log in or register to post comments

लै म्हन्जे लैच भारी

अनिरुद्ध प
Tue, 08/13/2013 - 19:07 नवीन
लै म्हन्जे लैच भारी,पु भा प्र (असेल तर)
  • Log in or register to post comments

एक नम्बर

दिप्स
Wed, 08/14/2013 - 12:20 नवीन
एक नम्बर
  • Log in or register to post comments

अय्यो !

ब़जरबट्टू
Wed, 08/14/2013 - 13:11 नवीन
ही कथा वाचून मला रडू येतेत हो, बिचारी लहान मुले कशी नाही रडणार. बालकथामध्ये सहसा काही बोध द्यायचा प्रयत्न असतो, तुम्ही भराभर चिन्द्या केल्या की ताई... आईनस्ताईनच्या घराण्याच्या का काय तुम्ही :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा