पानकी हा गुजराथी पदार्थ आपल्य मराठमोळ्या पानगी सारखाच आहे. आपण पानगी बनवताना तांदूळाच्या पिठीत चवीपुरते मीठ घालून भाकारीपेक्षा थोडे पातळ पिठ दुध घालून भिजवून घेतो. केळीच्या पानावर थापून, पानासकट तव्यावर टाकून, वरुन दुसरे पान लावून भाजून घेतो. गोडाची पानगी करायची असल्यास पिठात गुळ मिक्स करून वरीलप्रमाणे भाजून घेतो.
गुजराती पानकी तांदळाच्या पिठाची ही बनवतात फक्त पद्धत वेगळी आहे , आपण मुगाच्या डाळीची बनवणार आहोत.
साहित्यः
१ वाटी पिवळी मुगाची डाळ ४-५ ताज भिजवून घेणे
२ टेस्पून बेसन
दीड टेस्पून दही
२-३ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
चवीप्रमाणे मीठ
१/४ टीस्पून हिंग
१ टीस्पून लिंबाचा रस
१ टेस्पून तेल
२ टीस्पून फ्रुट सॉल्ट
बारीक चिरलेली कोथींबीर
केळीची पाने (स्वच्छ धुवून, पुसून घेणे)
पाकृ:
मिक्सरच्या भांड्यात मुगाची डाळ, दही व मिरच्या एकत्र करुन, थोडे पाणी घालून मुलायम वाटून घ्यावे.
वाटलेल्या मिश्रणात हिंग, मीठ, कोथींबीर, तेल व बेसन घालून एकत्र करावे. बेसानाच्या गुठळ्या राहता कामा नये.
त्यात लिंबाचा रस व फ्रुट सॉल्ट घालून हलक्या हाताने एकजीव करावे.
केळीच्या पानाला तेलाने ग्रीज करावे व पान नॉन-स्टीक तव्यावर ठेवावे.
त्यात डावभर मिश्रण घालून पान मधून घडी करावे व अलगद दाबावे.
एका बाजूने पूर्ण भाजले गेले की उलटवून दूसरी बाजू ही भाजून घ्यावी.
हवे असल्यास पानातून पानकी अलगद काढून सर्व्हिंग प्लेटमध्ये ठेवावी किंवा असेच पानासकट ठेवावे.
गरम पानकी पुदिनाच्या चटणी बरोबर किंवा आंब्याच्या लोणच्याबरोबर सर्व्ह करावे.
नाश्त्यासाठी पौष्टीक असा पदार्थ आहे :)
गरम पानकी पुदिनाच्या चटणी बरोबर किंवा आंब्याच्या लोणच्याबरोबर सर्व्ह करावे.
नाश्त्यासाठी पौष्टीक असा पदार्थ आहे :)
वाचने
9967
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
ए ए ए …. खल्लास, सानिकाचा
नेहमी प्रमाणे मस्त फोटो, पण
?????
In reply to नेहमी प्रमाणे मस्त फोटो, पण by त्रिवेणी
मस्त!
मस्त पाकॄ
पहिल्या फोटोत उजवीकडे वरच्या
मला पानगी खूप आवडते.
वा.... मस्तच गं... तुला हि
चायनीज किंवा
In reply to वा.... मस्तच गं... तुला हि by Mrunalini
अमदावाद मध्ये पानकी
अंमळ जळजळ झाली.
त्रिवार वंदन.
मस्त....!
मस्त.
हे राम!!!!
काय बोलावे !!!!
मस्तय पदार्थ. नक्की करुन बघेन
सानिका
वा मस्तच.
पानकी अगदी पाना सारखी पातळ
मुगाची पानकी