मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भरली वांगी.....जरा वेगळया पध्दतीने!

दिपक.कुवेत · · पाककृती
आपल्या लाडक्या 'अन्न हे पूर्णब्रम्ह' ह्या दालनास एक वर्ष पूर्ण झाल्याबद्द्ल सर्वांचे हार्दिक अभिनंदन! चला तर मग आज लुफ्त घेवुया भरल्या वांग्यांचा! पोकळ वांगी: Pokal wangi सारण/स्टफिंगः Stuffing आणि फायनली भरली वांगी: Bharli wangi साहित्यः १. मध्यम आकाराची छोटि वांगी - ४ ते ५ २. कांदे - २ मध्यम ३. आलं/लसुण पेस्ट - १ चमचा ४. टोमॅटो - २ मध्यम ५. तेल ६. चवीनुसार मीठ ७. काश्मीरी तिखट - १.५ चमचा स्टफिंगसाठि: १. बारिक चिरलेले मशरुम्स - ४ २. पाव तुकडा प्रत्येकि लाल/केशरी सीमला मिरची बारिक चिरुन (नसल्यास हिरवी वापरु शकता) ३. ब्रोकोलीचे छोटे तुरे - २ चमचे ४. मनुका - १ चमचा ५. २ बारिक चीरलेल्या हिरव्या मिरच्या ६. चेडार चीज - २ चमचे ७. तेल १ चमचा ८. चवीनुसार मीठ सजावटिसाठि: बारिक चीरलेली कोथिंबीर, पारमेझान चीज कॄती: १. वांग्यांना देठाकडुन काप देउन स्कुपर किंवा पिलरच्या सहाय्याने आतुन पोकळ करुन घ्या. पोकळ झालेली वांगी जरा वेळ मिठाच्या पाण्यात घालुन ठेवा म्हणजे आतुन काळि पडणार नाहित. वांगी पोकळ करण्याआधी फोर्कने त्याना हलकेच टोचे मारा जेणेकरुन ग्रेव्हि आतपर्यत मुरेल. माझे टोचे मारायचे राहिले :D २. एका छोटया पॅन मधे १ चमचा तेल तापलं कि मशरुम्स, सिमला मिरच्या, ब्रोकोलीचे तुरे घालुन एक ३-४ मि. परता. मिश्रण कोरडं झालं कि एका बाउल मधे काढा. गार झाल्यावर त्यात मनुके, हिरव्या मिरच्या, चीज आणि चवीनुसार मीठ घालुन सारखं करा. ३. पाण्याला उकळि आली कि टोमॅटोना वरुन अधिकचं चिन्ह देउन एक २-४ मि. उकळत्या पाण्यात ठेवा व लगेच गार पाण्यात घाला; थोडया वेळाने टोमॅटोची सालं अलगद निघतील. आता त्याच उकळत्या पाण्यात सोललेले कांदे घाला. कांदा मउ झाला कि पाणी गाळुन बाजुला ठेवा. पाणी फेकुन देउ नका...हेच पाणी ग्रेव्हि सारखं करायला वापरता येईल. दोन्हि गार झालं कि मिक्सर मधे त्यांची बारिक प्युरी करुन घ्या (वेगवेगळ्या). ४. वांगी स्टफ करण्याआधी पेपर टॉवेल, टिश्यु किंवा कोरडया फडक्याने हलकेच आतुन टिपा म्हणजे आतलं अतिरिक्त पाणी शोषलं जाईल आणि सारण नीट भरलं जाईल. आता त्यात तयार केलेलं स्टफिंग भरा. ५. मंद आचेवर एका नॉनस्टिक कढईल २ पळ्या तेल तापलं कि आलं/लसुण पेस्ट घाला. पेस्टचा कचा वास गेला कि उकडलेल्या कांद्याची पेस्ट घालुन परतत रहा. ६. कांद्याचा रंग बदलला कि टोमॅटो प्युरे घाला. बाजुच्या कडेने तेल सुटु लागलं कि काश्मीरी तिखट, चवीनुसार मीठ घालुन स्टफ केलेली वांगी हलकेच सोडा. ७. मधे मधे ग्रेव्हि ढवळत रहा जेणेकरुन खाली लागणार नाहि. ग्रेव्हि जर कोरडि वाटत असेल तर वरचच उकळलेलं पाणी घालुन सारखी करा. एक ४-५ मि. जर स्टफिंग/सारण उरलं असेल तर ग्रेव्हित घाला जेणेकरुन ग्रेव्हि आपसुक घट्ट होईल. ८. वांग्यांमधे हलकेच सुरी खुपसुन बघा. जर मउ लागली तर गॅस बंद करा नाहितर वाफेवर अजुन शीजवा (अंतीम पायरीला वांग्यांच पार मेण होता कामा नये). ९. सर्व करण्याआधी वरुन बारीक चीरलेली कोथिंबीर आणि पारमेझान चीज भुरभुरा. १०. गरमागरम वेगळ्या पध्दतीच्या भरल्या वांग्यांचा पोळि, फुलका किंवा नान (गर्लिक उत्तम) बरोबर आस्वाद घ्या!

वाचने 12491 वाचनखूण प्रतिक्रिया 24

In reply to by सूड

दिपक.कुवेत Mon, 08/12/2013 - 18:13
पनीर नक्किच घालायचा विचार होता पण मुद्दाम टाळला. पण माउ म्हणते त्याप्रमाणे सारणात पनीर घालु शकतोस.

अनन्न्या Mon, 08/12/2013 - 18:36
पण वांगी आवडत नाहीत. त्यामुळे फक्त पाहिली, छान लागत असणार!