Skip to main content

शोध

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 09/08/2013 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
शोध..... टकटक दार वाजले, काऊदादांनी उघडले बाहेर उभी चिऊताई, तिची फ़ारच घाई काऊदादा काऊदादा हे नाणे घे पिल्लाला खायला भरपूर दाणे दे रागावला काऊ म्हणे इतकी महागाई अन नाण्यात बाजार करते ही खुळाबाई चल हो चालती वेळ नको खाऊ भरपूर पैसे आण ओरडला काऊ पिलू आहे भुके, मी करू तरी काय? नाण्यात काही मिळेना, कारण तरी काय? मला काय पुसतेस, खर्च कोण देणार? वीज पाणी गाडी नोकर भाडे घरदार बाकी सारे तू वाण्याला्च विचार तेथूनच आणतो मी पैसे देऊन फ़ार चिमणी गेली वाण्याकडे, वाणीदादा करू काय? नाण्यात काही मिळेना, याचे कारण तरी काय? मला काय पुसतेस, खर्च कोण देणार? वीज पाणी गाडी नोकर भाडे घरदार बाकी सारे तू घाऊकशेठला्च विचार तेथूनच आणतो मी पैसे देऊन फ़ार चिमणी गेली घाऊकशेठकडे, शेठदादा करू काय? नाण्यात काही मिळेना, याचे कारण तरी काय? मला काय पुसतेस, खर्च कोण देणार? वीज पाणी गाडी नोकर भाडे घरदार बाकी सारे तू अडत्याला्च विचार तेथूनच आणतो मी पैसे देऊन फ़ार चिमणी गेली अडत्याकडे, अडत्यादादा करू काय? नाण्यात काही मिळेना, याचे कारण तरी काय? मला काय पुसतेस, खर्च कोण देणार? वीज पाणी गाडी नोकर भाडे घरदार बाकी सारे तू शेतक-याला्च विचार तेथूनच आणतो मी पैसे देऊन फ़ार चिमणी गेली शेतात, शेतकरीदादा करू काय? नाण्यात काही मिळेना, याचे कारण तरी काय? मला काय पुसतेस, खर्च कोण देणार? वीज पाणी खते बियाणे हमाली घरदार बाकी सारे तू मंत्र्यालाच विचार श्रमासाठी मला शिल्लक नाणी फ़क्त चार चिमणी गेली राजधानीत, मंत्रीदादा करू काय? नाण्यात काही मिळेना, याचे कारण तरी काय? मला काय पुसतेस, कर्ज दिले मी दान फ़ुकट सुविधा देऊन कमावला मी मान बाकी सारे तू तलाठ्यालाच विचार तो वाटतो खिरापत, मला मिळतात हार चिमणी गेली तालुक्याला, तलाठीदादा करू काय? नाण्यात काही मिळेना, याचे कारण तरी काय? मला काय पुसतेस, खर्च वजा दिले अनुदान मलाही ठेवावे लागते वरच्या लोकांचे भान बाकी सारे तू बीडीओलाच विचार वरचे खातात खिरापत, मला चपलांचे हार चिमणी गेली जिल्ह्याला, बीडीओदादा करू काय? नाण्यात काही मिळेना, याचे कारण तरी काय? मला काय पुसतेस, नेते लोकांचे आचरण गावगुंड, पोलीस, चॆनलवाले, सा-यांचे कुरण बाकी सारे तू नेत्यालाच विचार राजकारणातले मला कळत नाही फ़ार चिमणी गेली पार्टीकडे, नेतेदादा करू काय? नाण्यात काही मिळेना, याचे कारण तरी काय? मला काय पुसतेस, होतेय जनतेचे शोषण? त्यांच्यासाठी करी्न मी आमरण उपोषण बाकी सारा तू स्वत:च कर विचार पिल्लु उपाशी आहेच, हो उपोषणाला तैयार चिमणी बसली उपोषणाला दुमडून तंगडी पिल्लाचे अश्रू विकून चॆनेलने भरली तुंबडी हजारो कोटी जाहीर करून सरकार झाले दूर संत्रा रसावर ढेकर देऊन नेता गेला भूर नाण्यात काहीच मिळत नाही, चिमणीला उमगते मिळेल तेथून दाणे वेचून ती पोट भरीत असते. **********************************************
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1504
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

सही !

आई.. गं!

ह्म्म्म! हृदयस्पर्शी की काय म्हणतात तशी आहे कविता.