नही, इंडियन ....!
लेखनप्रकार
…. रझाने मला लॉबीसमोर हॉटेल च्या मेन गेट जवळ सोडलं आणि गाडी पार्क करायला गेला. त्याची ही सवय आहे. गाडी पार्क करून पुन्हा परत येतो. आतमध्ये लिफ्ट पर्यंत येतो आणि तिथे गुड नाईट म्हणुन परत जातो. त्यामुळे गाडीतून उतरून त्याची वाट बघत थांबलो. आजूबाजूला आज प्रचंड संख्येने गाड्या लागल्या होत्या. त्यात पुष्कळ गाड्या पोलिसांच्या आणि त्याहून थोड्या कमी काळ्याशार चकचकीत मर्सिडीज ! मर्क्स वर सात आठ वेगवेगळ्या देशांचे छोटे झेंडे लावलेले. मला अंदाज आला, आज काहीतरी मोठा कार्यक्रम हॉटेल मध्ये असणार. …. आज सकाळीच जाताजाता रझाला मी म्हटलं होतं की पाचशे रूम्सचे एवढं टोलेजंग हे हॉटेल आहे. पण काल अगदी सुनसान होतं. फारसे लोक दिसले नाहीत. त्याआधी बऱ्यापैकी गर्दी होती, पण काल अचानक सगळी जनता गायब. रझा गाडी पार्क करून तेवढ्यात येताना दिसला. मी लॉबीकडे जायला निघालो.
मेनगेट मधून किंचित आत सरकताना रझाला ऐकू जाईल एवढ्या आवाजात किंचाळलोच ! … Reza, what the hell is this ? आत जाताना प्रचंड सिक्युरिटी !!! बाय द वे, रझा माझा इथला म्हंजे इराणमधला सगळा व्यवसाय सांभाळतो. इराणी जनता सॉलिड प्रेमळ. कष्टाळु. आजकाल जरा भेदरलेली. रझा एकदम गुणी बाळ आहे…… नशीब त्या सिक्युरिटीवाल्यांनी अंगावरचे कपडे तेव्हढे बाकी ठेवले. झाडून सगळे चेक करत होते. सामान सुमानासह बेल्ट, बूट, पाकीट आदी सगळं एक्स रे केलं ! आत रझाने चौकशी केली. आणि मला सांगितलं. उद्या रविवारी त्यांचे नवे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांचा शपथविधी कार्यक्रम आहे. त्यासाठी आलेल्यातले आठ देशांचे राष्ट्राध्यक्ष आज हॉटेल मध्ये उतरले होते. पाकिस्तानचे झरदारी ही त्यात होते. त्यांच्या बरोबर त्यांचा सगळा लवाजमा. म्हटलं बोंबला. जातायेता हे अंगावरनं हात फिरवत राहणार आणि हॉटेलमध्ये मोकळेपणाने फिरूही देणार नाहीत.
रूममध्ये निवांत झाल्यावर मेलामेली करावी म्हणुन आयपॅड उघडले, पण वायफाय ची मुदत संपली होती. इथे वायफायचे कुपन घ्यायला हॉटेलच्या आयटी विभागात प्रत्यक्ष जावे लागते. कुढत गेलो. शिक्कुरीटी मेली होतीच. इकडूनच जा. तिकडून नको. वगैरे. आयटी डीपा. मध्ये एकजण त्याच्या कॉम्प मध्ये गुगल सर्च उघडायचा प्रयत्न करत होता. त्याच्या बरोबर एका टेबल भोवती आणखी दोघे बसले होते. कुठल्यातरी अवघड पण हिंदी मध्ये ते संभाषण करत होते. मी माझे कुपन घेतले आणि आणि परतायला निघालो. जाताना मला त्यांची गुगल उघडण्याची केविलवाणी धडपड बघवली नाही. मी त्यांच्या जवळ गेलो आणि सरळ ऑफर दिली.
" क्या मै आपकी कुछ मदद करू ? "
एक बोला " हा, यारा ये ग्गुगल नई, ओपण होरा "
लग्गेच दुसऱ्याने प्रश्न फेकला " क्या आप भी पाकीस्ताण से हो …?"
" क्या मै आपको पाकिस्तान का लगता हुं ?…. ( माझी ती ही थोडी किलकिली जागी झाली होती, अस्मिता !)
कुणीच काही बोललं नाही. ते तिघे किंचित अवघडल्या सारखे.
त्यांची कुचंबणा डुबवण्यासाठी मी थोडं हसत " आपका नेबर हु "
"इंडिया से हो आप" हा झरदारी साहेबांच्या विडीयोवर त्याच्या कॉम्पवर काहीतरी काम करत होता .
"आप हमीद अन्सारी साहब के साथ आये हो क्या …? भारतचे उपराष्ट्रपतीही आल्याचे समजले !
मी मुद्याला हात घातला " इराण में गुगल नही चलता. यहां गुगल पुरी तरहसे बंद है. जीमेल भी नही चलेगा "
तिघे ही एकदम ढूस झाले.
एकजण दुसऱ्याला " अब फिर …?"
मै बोला " आपको सर्च मारना है तो, याहू देखो ना. "
मी त्याना याहू उघडून दिलं. त्याना जे सर्च मारायचं होतं ते मिळालं.
तिघे जाम खूष. " दो घंटे से लगे हुए थे जनाब. मसला हल नई हो रहा था. आपणे हमे हल्का कर दिया " उपकृत झाल्याचा भाव तिघांच्या चेहऱ्यावर .
"आप हमीद अन्सारी साहब के साथ आये हो क्या …इंडियन डेलिगेशण के साथ ? पुन्हा तोच प्रश्न.
"नही. मै धंदे के लिए आया हु.कुछ दिनोके लिए हॉटेल मे रुका हु " त्यांना एकदा सांगून टाकले.
"हम जी पाकीस्ताण टीवी से आये है. पि टीवी. हमारे प्रेसिडेंट साहब के साथ आये है"
" आपका स्टाईल बडा चंगा है जी. मत्थे के बाल उडाये हो और बड्डी काली मुछछे … " हा आता उतराई होण्याचा थोडा प्रयत्न एकाने केला, जो आत्ता पर्यंत बोलला नव्हता. मी हसलो.
आणखी एक प्रयत्न …. "अच्छा आपको मंत्री साहब भी आये है, उनके साथ फोटो निकलवाणी है ?
इंटरेस्टिंग. मै बोला " कैसे ?"
अरे साहब, आपके दूरदर्शनवाले आये है, वो अपने जिगर है. वो खुशिसे मदद करंगे जी.
मै बोला " काघज और कलम है आपके पास ?"
( त्यांच्या स्टाईलने अगदी घशाच्या खाली जाऊन अन्ननलिकेतून कागज मधला "ग" काढताना बाहेर येई पर्यंत त्याचा "घ" झाला होता. पण ठीक आहे. पाकिस्तानच्या "ध" चा "मा" करण्याच्या वृत्ती पुढे हे काहीच नव्हते. )
" हांजी" खरच एक जण कागद पेन घेऊन सरसावला.
"हा लिखिए" मी सुरु झालो. " रूम नंबर 1402"
"इतने उपर रहते है आप ?" पी टीवी
मै बोला " हा, सबसे उप्पर "
हसला.
"अब मेरा नाम लिखिए सुधीर मुतालीक "
"हांजी, मिस्टर सुधीर …. "
"जी नही, मिस्टर नही …"
"क्या जी …? क्यो जी …… ?
"मिस्टर नही, श्री सुधीर मुतालीक, ऐसे लिखो "
तो बुचकळ्यात. मला समजले. त्याला मी "श्री" लिहून दिलं.
" ओक्केजी, आपको मेसेज भिजवा देंगे आपके रूम मे, कब निकलवा सकते है आप फोटो "
फिर मारा मैने धोबी पछाड. मै बोला,
"जी मुझे मेसेज मत दिजिए."
तो पुन्हा बुचकळ्यात
"मेसेज हमारे मिनिस्टर साहब को दिजिए. भारत का एक उद्योजक श्री सुधीर मुतालीक यहां आये है, इराण में. इराण में आके वो आपणा धंदा करते है. अगर मिनिस्टर साहब को श्री सुधीर मुतालीक के साथ फोटो निकलवानि है, तो वो अपने रूम में आज शाम के साडे सात बजेसे साडे आंठ बजे तक उपलब्ध होंगे …… "
"वल्ला, क्या आटूडुट है जी, सरकार " एकजण वेडा झाला होता.
मै बोला " अटीट्युड नही, इंडियन !"
वाचने
11198
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
आयच्या गावात्,लय भारी.....
हाण्ण तिच्यायला!!!
भारी!
पुढे काय झाले.निघाला का फोटो?
हां! हां! हां!
ये हुइ ना बात !
@अगर मिनिस्टर साहब को श्री
हाहाहा!
In reply to हाहाहा! by पैसा
टिव्हीवाले आयटी पेशालिष्ट गं!
In reply to टिव्हीवाले आयटी पेशालिष्ट गं! by धमाल मुलगा
बरोबर आहे!
मान गये!!!
_/\_ किस्सा भारीच.
जबरा..
>>माझी ती ही थोडी किलकिली
लयं भारी !
In reply to लयं भारी ! by मदनबाण
आमचा ठोंब्या तर बाईने पत्र
गुड वन...
ताठ कणा
In reply to ताठ कणा by सार्थबोध
… कुणी काहीही म्हणा… मराठी
In reply to … कुणी काहीही म्हणा… मराठी by काळा पहाड
कित्ती गं बाई ऑर्थोचं भारी
आवडले !!!
वा!! जबरीच एकदम.
मस्तच..
मस्तच..
वावा...
त्या
मस्तच!
क्या बात है.
हाबिणंद्न
लै म्हन्जे लैच भारी
लेख आवडला
बाय द वे, रझा माझा इथला म्हंजे इराणमधला सगळा व्यवसाय सांभाळतो. इराणी जनता सॉलिड प्रेमळ. कष्टाळु. आजकाल जरा भेदरलेली. रझा एकदम गुणी बाळ आहे...Don't Tell My Mother नावाची मालिका आठवली. इराण कसा देश आहे हे माध्यमांपेक्षा तुमच्यासारखे अनुभवी लोक जास्त चांगलं सांगू शकतील. तरीपण इराणमध्ये जाऊन व्यवसाय करण्याचं कौतुक वाटलं.In reply to लेख आवडला by सुधीर
मी सुद्धा हा कार्यक्रम पाहतो
सुप्पर..
In reply to सुप्पर.. by उपास
देशाबाहेर राहून आपल्याच
In reply to सुप्पर.. by उपास
त्यांना चांगल्या गोष्टीची
लै भारी!
:)
In reply to :) by गणपा
+१
इराणी कल्चर, सामाजिक जीवन
In reply to इराणी कल्चर, सामाजिक जीवन by यशोधरा
हो....
वा!
किस्सा आवडला.
एक्दम !
फारच मस्त अनुभव आहे,असे अनेक