आपल्याला राष्ट्रीय चारित्र्य आहे का ?
हि १९९९ च्या मी महिन्यातील गोष्ट आहे.मी विशाखापटणमच्या नौदलाच्या कल्याणी या रुग्णालयात काम करीत होतो. कारगिलचे युद्ध ऐन जोरात होते. त्यावेळेला काश्मीरच्या लष्करी रुग्णालयात युद्धात जखमी झालेले जवान मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत होते त्यामुळे ती रुग्णालये(श्रीनगर, उधमपूर आणि जम्मू येथील) भरून गेली होती.त्यातून त्या जखमी रुग्णांचे नातेवाईक तेथे येऊ लागले होते. या सर्व गर्दीमुळे तेथील व्यवस्थेवर ताण पडू लागला होता. म्हणून आता नंतर येणाऱ्या रुग्णांवर जलदगतीने उपचार करण्यासाठी वैद्यकीय प्रशासनाने एक निर्णय घेतला कि जे जे जवान प्रवास करू शकणार होते आणि ज्यांची जायची तयारी होती. त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्या त्यांच्या मूळ राज्यातील लष्करी रुग्णालयात स्थानांतरीत करण्यात यावे. या प्रणालीत एक हवालदार श्रीनिवास राव म्हणून एक जवानाला (तेलुगु असल्याने) विशाखापटणमच्या नौदलाच्या कल्याणी या रुग्णालयात स्थानांतरीत(trasnfer) केले होते. हा श्रीनिवास राव पोटात गोळी लागल्याने श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात शल्यक्रिया करण्यासाठी आला होता. सुदैवाने त्याची जखम वरवरचीच होती त्यामुळे शल्यक्रियेत आत मध्ये फारशी हानी झालेली नाही असे आढळले होते.त्यामुळे त्याला फारसा त्रास न होता तो आमच्या रुग्णालयात आला होता. त्याच्या शल्य क्रियेला ७ दिवस झाल्यावर त्याची जखम भरत आल्यावर आमच्या सरांनी(सर्जन कमांडर ओबेरॉय) यांनी त्याला ४ आठवड्याची विश्रांती(sickleave) देण्याचा निर्णय घेतला.पण श्रीनिवास राव त्यावर अजिबात आनंदी नव्हता. त्याचा मावस (का मामे) भाऊ (cousin) वेंकट राव आमच्या रुग्णालयात माझा वैद्यकीय सहाय्यक म्हणून होता. त्यामुळे वेंकट माझ्या कडे श्रीनिवास रावला घेऊन आला.श्रीनिवास चे घर काकिनाडा च्या जवळ कुठल्या तरी गावात होते पण तो घरी जाण्यास मुळीच तयार नव्हता. त्याचे म्हणणे असे होते कि माझी रेजिमेंट तिथे युद्धात रत असताना मी घरी जाऊन आराम कसा करू शकतो?
मी त्याला विचारले कि तू तर आताच शल्यक्रियेतून उठला आहेस तर तू युद्ध कसा करणार आहेस? त्यावर त्याचे म्हणणे हे होते कि युद्ध सामग्रीचे हिशेब आणि लेखाजोखा ठेवायला माणूस लागतोच. हे काम मी करू शकेन म्हणजे रेजिमेंटचा एक सैनिक युद्धासाठी मोकळा होईल. मला मुळात असा नुकताच शल्यक्रियेतून उठलेल्या माणसाला परत युदधावर पाठवणे पटत नव्हते पण श्रीनिवास इतक्या निग्रहाने सांगत होता कि मी ओबेरॉय सरांशी रदबदली करायला तयार झालो. ओबेरॉय सरांची अवस्था सुद्धा माझ्यासारखीच होती त्यामुळे ते पण तयार नव्हते पण केवळ श्रीनिवासच्या निग्रही बोलण्याने ते अतिशय अनिच्छेने तयार झाले. त्यावर श्रीनिवास अतिशय आनंदात होता.श्रीनिवास मला परत परत धन्यवाद देत होता आणी मला अतिशय शरम वाटत होती कि युद्धावर तो जाणार होता आणी तो मला धन्यवाद देत होता त्याला ओबेरॉय सरांनि रुग्णालयाच्या ऑफिसातून वार्रंट घेऊन आपले जम्मू पर्यंत आरक्षण करायला सांगितले. त्याप्रमाणे त्याने आपले वार्रंट घेतले पण मुळात मी महिना असल्याने लष्करी कोटा आधीच फुल होता. त्याची विनाआरक्षण जायची तयारी होती पण मी त्याला निक्षून सांगितले कि विनाआरक्षण मी तुला पाठवणार नाही. आपले आरक्षण दाखव आणि मगच तुला डिसचार्ज देईन. त्यावर मी त्याला एक सरकारी कागदावर रेल्वे च्या आरक्षण पर्यवेक्षकाला आरक्षण देण्यास विनंती करणारी चिट्ठी लिहून दिली कि हा सैनिक कारगिलला जात आहे त्याला आरक्षण देण्यात यवे.श्रीनिवास वेंकटला घेऊन विशाखापटणम रेल्वे स्टेशन वर गेला. दुर्दैवाने तो आरक्षण पर्यवेक्षक सुट्टीवर होता. त्यावर वेंकट त्याला घेऊन एका TTE कडे गेला. त्या TTE ने त्यांच्या कडे दोनशे रुपये मागितले. वेंकट ने त्याला वारंट आणि मी दिलेली चिट्ठी दाखवली आणि सांगितले कि हा युद्धासाठी चालला आहे सुट्टीवर मजेसाठी नाही त्यावर त्या TTE ने त्याल हे सांगितले कि तुला आरक्षण हवे असेल तर दोनशे रुपये दे आतातर आमचा पैसे कमावण्याचा काळ आहे(मी महिन्याच्या सुट्टीचा काळ) तर उगाच जास्त वाद घालू नकोस. मला वेळ नाही. दोनशे रुपये काढ आणि परवाचे आरक्षण घेऊन जा.
यावर ते दोघे दोनशे रुपये देऊन ते आरक्षण घेऊन आले. श्रीनिवास नाही नाही म्हणत असतानाही वेंकट ने मला हि गोष्ट सांगितली. संतापाने माझ्या अंगाची अतिशय लाही लाही झाली. पण माझा संताप नपुंसक होता. माझ्या मनात श्रीनिवासला दोनशे रुपये द्यावे असे आले. पण एकतर त्याने ते घेतले नसते आणि त्याचा अपमानही झाला असता. अधिकारी असूनही मी एका सैनिकाला मदत करू शकलो नाही याची लाजही वाटत होती.याच वेळी माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला कि सर्वसामान्य भारतीय म्हणुन आपले चारित्र्य काय आहे?
तेथेच काम करीत असताना आमच्याकडे समुद्रावरील चांदीपूर आणी गोपालपूर(chandipur on sea आणी GOPALPUR on sea) येथून सैनिक रुग्ण म्हणून येत असत. हा भाग ITR (INTERIM TEST RANGE) म्हणून अग्नी पृथ्वी इत्यादी क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यासाठी होता. हा भाग समुद्राच्या जवळ असल्याने दलदलीचा होता त्यामुळे तेथे डास खूप होते आणी पूर्ण काळजी घेऊनही थोडे फार सैनिक मलेरियाची शिकार होत. दुर्दैवाने तेथे FALCIPARUM मलेरिया फार होता आणी मधून मधून एखादा सैनिक मेंदूत मलेरिया झाल्याने किंवा मलेरियाचा मूत्रपिंडावर प्रभाव झाल्यानेBlackwater fever( http://en.wikipedia.org/wiki/Blackwater_fever) तेथील रूग्णालयातून आमच्या कडे अतीव दक्षता विभागात स्थानांतरीत होऊन येत असे. असा तातडीचा रुग्ण येत असे तेंव्हा तो रुग्णवाहिकेतून येत असे त्यावेळेला बहुतांशी त्याची पत्नी त्याच्या बरोबर येत असे. आता हा माणूस अतिदक्षता विभागात भरती झाला कि त्याच्या बायकोला त्या विभागातील रुग्णाच्या नातेवाईकांना असलेल्या विश्रामगृहात खोली दिली जात असे या खोल्यांचा प्रभारी अधिकारी मी होतो. बर्याच वेळेला या स्त्रीया नेसत्या वस्त्रानिशी आलेल्या असत आणी काही दिवसात त्यांचे पैसे संपत. नवरा अतिदक्षता विभागात खिशात पैसे नाहीत रूग्णालयात ओळख नाही अशा बिकट परिस्थितीत मी पाच सहा स्त्रियांना तीनशे चारशे रुपये खिशातून काढून दिले होते. १९९९ साली हि रक्कम मला पण कमी नव्हती परंतु एकाही स्त्रीने माझे पैसे बुडवले नाहीत. महिन्या दोन महिन्यांनी का होईना पण कोणातरी सैनिकाच्या हाती हे पैसे येत असत( हे अंतर सहाशे ते साडे सहाशे किमी असावे).
गेली तीन वर्षे मी मुंबईत व्यवसाय करीत आहे. २०१० मध्ये माझ्याकडे एक निम्न स्तरातील माणूस आपल्या मुलाबरोबर आला. मुलाला एकशे चार ताप होता. त्याची सोनोग्राफी केली तर त्याला डेंग्यू आहे असे मला जाणवले. त्याच्या यकृताला सूज आली होती छातीत आणी पोटात पाणी झाले होते.मी त्या बापाला सांगितले कि मुलाला ताबडतोब महानगरपालिकेच्या रुग्णालयात घेऊन जा मुलगा गंभीर आहे. त्याच्या जवळ सहाशे रुपयेच होते माझे बिल नउशे होते. तो म्हणू लागला कि माझा मोबाईल ठेवून घ्या. मी त्याला सांगितले कि माझे पैसे महत्त्वाचे नाहीत मुलाला ताबडतोब घेऊन जा सहाशे रुपये तुला आत्ता लागतील आणी मोबाईल पण घेऊन जा त्याची पण गरज पडेल.माझे पैसे तुला सवड होईल तेंव्हा तुझ्या फामिली डॉक्टर कडे दे यावर हा माणूस गायब झाला तो आजतागायत दिसलेला नाही. त्याच्या मोबाईल वर फोन केला तर उचलत नाही. एवढेच नव्हे तर ते पैसे द्यायला लागू नयेत फामिली डॉक्टर कडे पण गेलेला नाही. आणी माझ्यामूळे आपला रुग्ण गेला म्हणून फामिली डॉक्टरने मला दुषणे दिली ती वेगळीच.
असाच एक बांधकाम क्षेत्रातील एक मजूर माझ्याकडे आला होता डॉक्टर मित्राच्या सांगण्यावरून मी बाराशे रुपयाचा कलर डॉपलर मी त्याला दोनशे पन्नास रुपयात करून दिला तर जाताजाता तो मला विचारात होता कि एक हजार रुपयाचे बिल करून देता का? साहेबांकडून परतावा घेता येईल
भरपूर पैसे मिळवणाऱ्या कित्येक रुग्णांनी दोनशे रुपये कमी, तीनशे रुपये कमी आहेत उद्या आणून देतो म्हणून दिलेच नाहीत.सभ्य आणी सुसंस्कृत दिसणाऱ्या लोकांनी हजार रुपये सुद्धा बुडवले आहेत. अशाच उच्चभ्रू लोकांकडून बिल दुसर्याच्या नावावर करून देण्याची " विनंती" केली जाते. सर्रास सगळे वरिष्ठ नागरिक सवलत मागतात आणी नंतर आमच्या मुलाला बिलाचा परतावा आहे म्हणून बिल मागतात. ( मी शंभर टक्के लोकांना जेवढ्याचे आहे त्याचेच बिल देतो).
मी रुग्णांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे बरीच सवलत देत असे.(फमिली डॉक्टर ने सांगितले तर फुकट सुद्धा) पण माझे अनुभव फारसे चांगले आलेले नाहीत. लोक सवलतीसाठी फमिली डॉक्टरशी सर्रास खोटे बोलतात असा अनुभव आहे
एक पाटील साहेब मला बायकोचे बिल सुनेच्या नावावर करून देण्याची विनंती करीत होते कारण सुनेला वैद्यकीय खर्चाचा परतावा आहे. मी नकार दिल्यावर वैतागून कमीत कमी श्रीमती पाटील असे बिल द्या म्हणून मागे लागले. ते मी अनिच्छेने का होईना पण दिले (कारण त्यात बेकायदेशीर काही नव्हते).
पहिली दोन वर्षे मी नवा होतो (तिसर्या वर्षी) २०१२ साली हिशेब केला तर माझे वीस हजार रुपये असे बुडाले आहेत.त्यांची एक फुलस्केप भरेल अशी यादी केली आहे आता २०१३ मध्ये मी न लाजता पैसे घेऊन या आणी रिपोर्ट घेऊन जा असे सांगतो. आमच्यावर विश्वास नाही का असे विचारणाऱ्या रुग्णांना हि यादी दाखवतो आणी सरळ सांगतो कि माझा विश्वास आता राहिला नाही.
असो. माझ्या मूळ प्रश्नांचे उत्तर मला अजून मिळालेले नाही.
आताशा माझी समाजसेवा करण्याची आंतरिक उर्मी बरीचशी कमी झाली आहे
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हतबल दाता.
नका डॉक्टर मनाचा पिंड नका
way too filmy !!
LOL
I could but you might not
च्यायला !
जरा वर बघ की कुणाला प्रतिसाद
तरीही माझे तेच मत अजुनही.
वाह !
नाही परा. एव्हढी महान गोष्ट
डॉक्टर साहेबानसारखे लोक
तुमचे अनुभव वाचून वाईट वाटले.
त्या TTE ने त्यांच्या कडे
अनुभव वाचुन वाईट वाचले !
बाणा,
गोपाळराव हो ते तसच हव आहे.
अजुन किती सैनिकांचे बळी द्यायचे ?
लुंग्या अँटोन्याची शाब्दिक
चारित्र्य आणि भ्रष्टाचार
सहमत..
फार सुंदर लेख, डॉक्टर.
इस्पीकचा एक्का
निश्चितच उत्तम केलेत...
काही अतिशयोक्ती (जी बर्याच बोधकथांमधे असते) सोडली तरी...मी तर तो विंचू असला तर कदाचित पाण्यातून काढण्याच्या भरीसही पडणार नाही. मी त्याला चिमट्याने वाचवले तरी तो नंतर इतर कुणा अनावधानी माणसाला चावू शकेल ना. आणखी एक भर : "...मला झेपेल इतकाच आर्थिक भार उचलून ..." हे "...मला झेपेल इतका आर्थिक भार उचलून आणि माझ्या सारासार विवेक बुद्धीला पटेल त्यालाच..." असे लिहायला हवे होते, म्हणजे ते वाक्य जास्त योग्य झाले असते. गडबडीत प्रतिसाद लिहीताना राहून गेले. सो कोल्ड हुच्च मंडळीच अरेरावीने बोलून पैसे न देणे हा आपला हक्क आहे असे समजतात आणि ते या बाईसारखे तडक अथवा "देउ नंतर" असे छुप्या पद्धतिने सांगतात. तेव्हा त्या बाईसाहेबांच्या बाबतीत योग्यच केलेत. कारण ते दान नक्कीच "अपात्री" झाले असते. माझ्यातर्फे +१११.भारतीय चारित्र्याचे काय
उत्तम लेख
खरे साहेब,
भन्नाटच.
+१११
त्यातल्या त्यात अनुभव असा की खेड्यातला, मजूर, लो सोशिओइकॉनॉमिक स्टेटमधला पेशंट सहसा पैसे बुडवत नाही. हप्त्याने का होईना आणून देतोच...हा अगदी नियम असल्यासारखा आहे. आणि "पैसे कुठे चाललेत साहेब. आम्ही काय पैसे बुडवणार आहोत का?" असे अरेरावीने बोलणारे हुच्च स्तराचे लोक हमखास पैसे बुडवतात हाही नियमच असल्यासारखा आहे !सोशिओइकॉनॉमिक स्टेट
खरे काकांनी त्यांच्या
सुबोध सर, नेकी करो दर्या में डालो.
नेकी कर कुवें में डाल दे
लेखन आवडले पण...
आपल्याला राष्ट्रीय चारित्र्य आहे का ?
आपल्याला राष्ट्रीय चारित्र्य आहे का ?हया प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचणे अशक्य आहे. सर्वसाधारण पणे पैसे बुडवण्याचा कल वाढीस लागला आहे हे मान्य आहे. पण असे अनुभव हे प्रातिनिधिक असतात. जगाचा विचार करता - आपली एकंदर वैद्यक व्यवस्था (सत्ता ?) अत्यंत तकलादू आहे. एखाद्या औषध विक्रेत्या प्रतिनिधीस गाठले तर तो तथाकथित यशस्वी डॉक्टरांच्या व्यावसाईक गैर वर्तणुकीच्या सुरस आणि चमत्कारिक कथा सांगेल. अगदी प्रिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी "बाई" ची सोय करण्यापर्यंत ही मजल पोहोचली आहे. औषध कंपन्या ह्याही असली आमिषे पुरवण्यात अग्रेसर आहेत. तेंव्हा असे अनुभव सर्व क्षेत्रात येतात. त्या उलट एकदा वनवासी कल्याण आश्रमाला भेट दिली की जग किती उदार आहे - याची कल्पना येते. मला वाटते आपण व्यवसाय आणि समाजसेवा याची गल्लत करतो म्हणून अश्या अनुभवातून टोकाचे निष्कर्ष काढायचे धारिष्ट्य करतो. व्यवसाय करताना आपली फी किती असावी / ती कशी द्यावी ह्याचे पूर्ण स्वातंत्र्य व्यावसाइकला असावे. त्याने ते घेताना मुळीच भावनिक होवू नये. जर दान करणे , आर्थिक मदत करणे ही "करणाऱ्याची " भावनिक गरज असेल - तर त्याने एस. आय. पी. प्रमाणे नियमित एखाद्या संस्थेला / व्यक्तीला मदत करावी. मग व्यावसाईक फी मागताना गल्लत होत नाही आणि रु.२०० चा डोसा खाताना "गरिबांच्या" घरच्या थाळी चे दैन्य आठवून वाईट ही वाटत नाही. हल्ली चांगल्या संस्था सापडणे मुश्कील झाले आहे. माझा पिंड हा रा.स्व.संघाचा आहे. वनवासी कल्याण आश्रम आणि वात्सल्य ट्रस्ट हया दोन संस्था ना दिलेली मदत समाधान देते . दिवसाच्या कन्सल्टन्सीची फी रु.१०,००० सांगायला मला कोणाच्या बापाची भीती वाटत नाही.इतके दिवस डॉक्टर मंडळींचा
डॉ. खर्यांशी सहमत
डॉक .. डॉक
अतिशय कटु सत्य
त्यांना महानगरपालिकेच्या
अगदी खरं
डॉ संजीव मंगरुळकरांच्या ब्लॉग
एवढे कच्चे आहोत का आपण .....?
हे आवडलं ! पूर्ण सहमत !!
आपण नाही नाउमेद व्हायचं. एवढे कच्चे आहोत का आपण ?+१११