मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजस्थानी मिश्र डाल आणि बेसन पुरी

प्रभाकर पेठकर · · अन्न हे पूर्णब्रह्म

Rajasthani-Dal-Puri मिश्र डाळीसाठी साहित्यः चणा डाळ १/४ वाटी अख्खे मसूर १/४ वाटी उडीद डाळ १/४ वाटी तूर डाळ १/४ वाटी मुग डाळ १/४ वाटी हळद १/२ लहान चमचा (टी स्पून) तिखट १ लहान चमचा जीरं १ लहान चमचा आलं १" टोमॅटो १ मध्यम कोथिंबीर मुठभर मीठ चवीनुसार. साजूक तुप २ ते ३ मोठे चमचे (टेबल स्पून) तयारी: सर्व डाळी धुवून घ्या. आलं बारीक चिरून घ्या. टोमॅटो बारीक चिरून घ्या. कोथिंबीर चिरुन घ्या. कृती: सर्व डाळी + हळद कुकर मध्ये घालून त्यात ५ वाट्या पाणी घाला आणी ५ शिट्ट्या होऊ द्या. डाळी शिजल्यावर जरा (जास्त नाही) घोटून घ्या. मीठ घालून ढवळा. आता एका फ्राय पॅन मध्ये साजूक तूप घेऊन ते तापले की त्यात जीरे घाला. जीरे तडतडले की त्यात आलं घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. नंतर त्यात टोमॅटो घालून परता. तिखट घाला. त्यावर कोथिंबीर घालून परता. हे सर्व आता डाळीवर ओतून नीट मिसळा. पुर्‍यांसाठी साहित्यः बेसन १ वाटी जीरं १/२ लहान चमचा कलोंजी १/४ लहान चमचा हिंग १/४ लहान चमचा तिखट १ लहान चमचा आमचुर पावडर १ लहान चमचा. कोथिंबीर मुठभर राईचे तेल १ मोठा चमचा (टेबल स्पून) कृती: सर्व जीन्नस मिसळून आवशक्यतेनुसार पाणी घालून घट्टसर पीठ मळा आणि पुर्‍या लाटून तळा. लोणच्याबरोबर सादर करा. शुभेच्छा..! ही डाऴ चवीला कांही ग्रेट लागत नाही. पण सर्व डाळींचे मिश्रण असल्याकारणाने आरोग्यदायी आहे. आठवड्यातून एकदा करावीच. पुर्‍यांचा आनंद घेण्यासाठी डाळ हवीच असे नाही. ह्या पुर्‍या नुसत्या लसणाच्या चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर, चहाला साथसंगत म्हणूनही, मस्तं लागतात.


वाचने 36937 वाचनखूण प्रतिक्रिया 20

कपिलमुनी Mon, 08/05/2013 - 17:06
पावसापाण्याचं गरम गरम पुर्‍या आणि चटणी ! अहाहा ... पाणी सुटले ! मस्तच पाकृ !!

त्रिवेणी Mon, 08/05/2013 - 17:07
काका या पुर्‍यांमध्ये गव्हाचे पीठ बिलकुलच नाही टाकायचे का? या महिन्यात कास पठारला जाणार आहे तेव्हा पुर्‍यांची शिदोरी घेवून जाईन. (पुरी प्रेमी)त्रिवेणी

In reply to by त्रिवेणी

प्रभाकर पेठकर Mon, 08/05/2013 - 17:11
नाही. ह्या आपण करतो त्या खार्‍यापुर्‍या नाहीत. गव्हाचे पीठ अजिबात घालायचे नाही. ह्या पुर्‍या जास्त फुगत नाहीत पण फार खुसखुशीत होतात. चवीत वेगळेपणा आणायचा असेल तर आलं-लसूण पेस्ट आणि एखाद चमचा (टेबल स्पून) दही घालायला हरकत नाही. पण मुळ राजस्थानी पाककृतीत ते नाही.

रेवती Mon, 08/05/2013 - 17:11
छान फोटो व पाकृ. पुर्‍या करताना अनेक जिन्नसांमधील एक म्हणून बेसन माहित होते पण फक्त बेसनाच्या पुर्‍या ही नवीन पाकृ आहे. डाळीचा फोटू आवडला.

@ह्या पुर्‍या नुसत्या लसणाच्या चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर,चहाला साथसंगत म्हणूनही,मस्तं लागतात.> या वर्णनामुळे भयंकर वाट लागल्या गेली आहे! http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/hungry.gif

दिपक.कुवेत Mon, 08/05/2013 - 19:39
मला सुद्धा आत्ताच्या आत्ता पुर्‍या उचलुन खाव्याश्या वाटत आहेत. आल्याच्या चहाचे घोट घोट पित हा प्रतिसाद लिहितोय.....