मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साबुदाणा वडा(इन अप्पेपात्र)

त्रिवेणी · · पाककृती
साहित्य- भिजवलेला साबुदाणा- २ वाटी उकडलेले बटाटे- २ छोटे दाण्याचे कुट - २ टे. चमचे, लिंबु- अर्धा, लाल तिखट- २ चमचे, मीठ- चवीनुसार, साखर- १ चमचा, (जिर व कोथंबीर- मी उपवासाला खाते, ज्यांच्या उपवासाला चालते त्यांनी जरुर वापरावी.), तेल. क्रुती- भिजवलेला साबुदाण्यात बटाटे किसुन मिक्स करावे. वरील सर्व साहित्य-दाण्याचे कुट+लिंबु+लाल तिखट+मीठ+साखर+ जिर व कोथंबीर साबुदाणा व बटाट्यात घालुन चांगले मिक्स करावे. 1 आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवुन घ्यावे. 2 अप्पे पात्रात थोडे तेल टाकुन त्यात साबुदाण्याचे छोटे वडे टाकावे. 3 दोन्ही बाजुंनी चांगले फ्राय करावे. 4 खरच सांगते खुप कमी तेल लागते. मी एकुण ३५ वडे केले त्याला ४ चमचे (पोह्याचा चमचा)तेल लागले. 5 6

वाचने 17977 वाचनखूण प्रतिक्रिया 37

राघवेंद्र Fri, 07/19/2013 - 22:35
आज सकाळी हा पदार्थ खुप तेलगट असल्याने नको ( असे बायको म्हणाली :) ) . पण तुम्हि छान पाकक्रुती दिल्याबद्दल धन्यवाद. संध्याकाळी वडे मिळाले तर फोटो टाकेलच.

शिल्पा ब Sat, 07/20/2013 - 02:52
छान आहे. सकाळी फेबुवर साबुदाण्याच्या खिचड्यांचे फोटो बघुन साबुदाण्याची खिचडी करुन खाल्ली. १ कप साबुदाण्यात ५४४ कॅलरीज असतात. कदाचित म्हणुनच "उपासाला" खात असावेत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्रिवेणी Sat, 07/20/2013 - 08:24
हो वड्यांची साईज छोटी होती. माझे अप्पेपात्र थोडे छोटे आहे आणि हे वडे छोटे असल्याने कमी तेल असुनही आत पर्यंत चांगले शिजतात.

garava Sat, 07/20/2013 - 07:01
'मायबोलीवर' ही टिप मागेच कोणीतरी दिली होती, बटाटेवडे आप्पे पात्रात केल्याचं लिहिलं होतं. मी तेव्हाचं ह्यात साबुदाणे वडे करून पाहिले. खरंच तेल कमी लागतं. पण आकार खूपच छोटा ठेवावा लागतो वड्यांचा.

पैसा Sat, 07/20/2013 - 09:50
सध्या बरेच प्रयोग सुरू दिसतायत! पण हा कमी तेलाचा वडा आवडला. बाकीचे तळकट पदार्थ असे करायला हरकत नाही!

इरसाल Sat, 07/20/2013 - 10:19
मस्त आवडलं. पण त्या उपवासाच्या साबुदाणावड्यांच्या मधे ते अंड का ठेवले आहे अर्ध कापुन ?

garava Sat, 07/20/2013 - 10:29
नाही, मी बटाटेवडे try नाही केले. साबुदाणे वडे मला थोडे कच्चे वाटले आतून. जास्त वेळ ठेवले तर बाहेरून कडक झाले. पण बटाटे वड्याला हा प्रॉब्लेम बहुतेक येणार नाही. कारण आपण बटाटा आधीच शिजवून घेतो. फक्त वरचं cover कच्चं राहत नाही ना हे बघायला हवं.

त्रिवेणी Mon, 07/22/2013 - 09:16
मी मुगाची भजी केली होती, ती मस्तच झाली होती.मेदुवडे लहान साईजमध्ये तळावे लागेल, म्ह्णजे आत पर्यंत शिजतील. आता एक दिवस मेदुवड्यांचा प्रयोग करुन बघते.

In reply to by सस्नेह

त्रिवेणी Mon, 07/22/2013 - 13:38
वड्यांचा आकार लिंबाएवढाच ठेवा. बटाटा आणि दाणे कुट टाकला होता ना? आणि नाहीच जमले कुरकुरीत तर माझ्याकडे या माहेरपणाला मी करुन खाऊ घालीन.

आजकाल साबुदाणा चांगला मिळत नाही. खीचडी पण चिकट्ट कशीतरी होते. चांगला साबुदाणा घेताना कसा ओळखायचा हे कोणाला माहिती आहे का?