अर्धा किलो दोडकी. (शिराळी)
दोन वाट्या बासमती तांदूळ.
१ वाटी ताक
१ वाटी पाणी
४ हिरव्या मिरच्या
२" आलं
२ चमचे (टी-स्पून) धण्याची पावडर
१चमचा (टी-स्पून) जिर्याची पूड
मीठ चवीनुसार.
फोडणीसाठी तेल आणि मोहरी.
ओलं खोबरं
कोथिंबीर.
साजूक तुप
प्रथम तांदूळ तासभर भिजत घालावेत, नंतर निथळवून घ्यावेत.
दोडक्याच्या शिरा काढून दोडकी किसून घ्यावीत.
आलं आणि मिरच्या वाटून घ्याव्यात. (मिक्सर मधून काढाव्यात)
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून मोहरीची फोडणी करावी आणि त्यावर दोडक्यांचा किस टाकून परतून घ्यावा.
चवीनुसार मिठ घालावे. एक वाफ येऊ द्यावी.
आता त्यावर निथळविलेले तांदूळ घालून परतावे.
आलं -मिरच्यांचं वाटण, धणे-जिर्याची पुड, ताक आणि पाणी घालून नीट एकत्र करावं आणि घट्ट झाकण लावून अतिमंद आंचेवर जवळ-जवळ अर्धा तास भात शिजवावा. (मधे एकदा हळूवार हाताने वरखाली करावा)
भात शिजला की त्यावर साजूक तूप घालावे.
वाढताना कोथिंबीर आणि नारळाने सजवावा.
शुभेच्छा.
मस्तच!
फोटो मस्तच!!
मला वाटतयं,
In reply to फोटो मस्तच!! by स्वाती राजेश
मस्त सुवास येत आहे..
सुंदर
सही...
छान पाकृ
वेगळी पाककृती!
मस्त.