उंदरांची शर्यत
काल माझ्याकडे एक लहान मुलगी आली होती वय वर्षे ३. मुत्र्मार्गाला जंतुसंसर्ग झाला( URINARY INFECTION) म्हणून बालरोग तज्ञांनी मुत्र मार्गाची तपासणी करण्या साठी सोनोग्राफी साठी पाठविले होते. तिची आई फारच काळजीत होती कारण तिला असे दुसऱ्यांदा झाले होते. आणी असे दोन दिवस शाळा (?) बुडल्याने तिच्या "पर्फोर्मंस"वर परिणाम होतो असे आईचे म्हणणे होते. हि मुलगी नर्सरीत होती.
कालच एक माझी जुनी रुग्ण( म्हणजे प्रसुतीच्या वेळेस ३ - ४ वेळेस सोनोग्राफी साठी आलेली) सिझेरियन झाल्यानंतर टाके दुखतात म्हणून आली होती. तिच्या ४ वर्षाच्या मुलाला नाव विचारले तो म्हणाला अर्णव. मग विचारले कि कोणत्या शाळेत जातोस तर तो म्हणाला किंग जॉर्ज आणि सिल्वर क्रेस्ट. त्यावर त्याचे वडील म्हणाले कि अरे शाळा किंग जॉर्ज आणि ट्युशन सिल्वर क्रेस्ट असं सांगायचं. हा मुलगा ज्युनियर के जी त आहे.
तसेच कालच आमच्या सौभाग्यावतींकडे एक बाई आल्या होत्या त्यांची मुलगी बाळंतीण झाली होती. मुलीला सासू नाही म्हणून आई आली होती आणि आई सांगत होती कि मुलगी माहेरी येण्यास तयार नाही मला दुसरी मुलगी आणि यजमान आहेत ते बीडला आहेत. मला इथे फार दिवस राहता येणार नाही.मी तिला सांगते आहे कि तू मुलाला घेऊन माहेरी चल मी तुझे बाळंतपण तेथे व्यवस्थित करते.आमच्या सौ नि मुलीला विचारले तू माहेरी का जात नाहीस? तिचे म्हणणे मुलाची शाळा बुडवणे शक्य नाही. मुलगा साडे तीन वर्षांचा आहे आणि नर्सरीत जातो.
एकाच दिवशी तीन मुले पाहून माझ्या मनात एकाच विचार आला कि वय वर्षे ३ ते ५ या वयातील मुलांना शाळा इतकी महत्त्वाची आहे का? आणि ४ वर्षाच्या मुलाला ट्युशन ची गरज आहे का ( त्याला शिकवणी म्हणायचे नाही ते डाऊन मार्केट वाटते) आमच्या लहानपणी जी मुले अभ्यासात कमी असत त्यांना शिकवणी लावली जात असे.
शिवाय इतक्या कमी वयात यांच्या खांद्यावर एवढे अपेक्षांचे ओझे टाकले तर हि मुले पुढे काय करणार. परत आता हि मुले घोका आणि ओका असा अभ्यास करतील पण एका विशिष्ट पातळीनंतर त्यांना हे झेपेनसे झाले कि त्यांचे गुण कमी होतात आणि यानंतर आई वडील अभ्यास कमी पडतो म्हणून अजून त्यांच्या डोक्यावर बसणार.
हे कुठवर चालणार आहे.
माझा मुलगा पहिला आलाच पाहिजे या हव्यासात तुम्ही त्याला या उंदरांच्या शर्यतीत(rat race) पळवत आहात पण हि शर्यत जिंकली तरी शेवटी तुम्ही फारतर उंदराचा राजा( ace rat) होता.
माणूस कधी होणार?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कटु सत्य आहे
त्या शाळांचा अभ्यास तुफान
माझ्या प्रतिष्ठेला शोभेल का?
+१११
शर्यतीत धावून पहिले यावे हि
शर्यतीत धावून पहिले यावे हि
वाक्य आवडलं
प्रवाहाच्या दिशेनेच पोहण्याची
+७८६
आजच्या जमान्यात अंगात इतर
ऑफिसमधून विडिओ दिसत नाही..
कॉलेजांचा अभ्यासक्रम उद्योगाभिमुख करणे
अशा गोष्टी आय आय टी किंवा
एम बी ए
बरोबर
एम बी ए कॉलेज
सौंदाळा
पूर्ण वेळ तबलजी होणे म्हणजे
पूर्ण वेळ तबलजी होणे म्हणजे
मुलीदेखिल लग्न करताना नोकरी
मुलगी का नाही करू शकत
हा हा
आँ..!
(No subject)
आयला लय भारी.....
मला वाटते,
सी बी एस ई, आय सी एस सी
पुणे विद्यापीठ
अभ्यासक्रम मोठा आणि परिक्षा
स्पा,
माझ्या मते "शाळा बुडणे" हे
तस नाहिये.माझ्य तिन्हि
तुम्हाला येथे वावरताना बराच
+११११११११११११११११११११११११.
सहमत.
हे कधीतरी
हे कितीही कानी कपाळी ओरडून
वेडझव्यांची दुनिया आहे
वेडझव्यांची दुनिया आहे
लोल
(No subject)
घ्या की आक्षेप. माझा त्याला
त्याचे काय आहे कि,मुलाचा
उंदरांच्या शर्यतीतून स्वत:ला
भयानक पीअर प्रेशर यावं अशी परिस्थिती ? जोक आहे काय हा ?
घरात खायची वनवा असति तर
रिक्षा वरचे अण्णांची कृपा !
कोण बरे असावेत??
वडील म्हणायचं असेल बहुधा.
अध्यात्मिक गुरू?