हिंदुस्थानात क्रिकेट आणि राजकारण या विषयावर सार्वजनिक ठिकाणी चर्चा करू नये म्हणतात. कोण कुणाचा सहानुभुतीदार असेल आणि कसा दुखावला जाइल ते सांगता येत नाही. उद्याचा पंतप्रधान कोण ? या प्रश्नावर एरवी कुणी विचारलं तर आम्ही गप्प राहणेच पसंत करतो. पण चर्चा केल्याशिवाय आणि विचारंथनाशिवाय अमृत हाताला कसे
लागणार ? म्हणून हा काथ्याकूट...
राहुल गांधी- ही व्यक्ती अशा घराण्यात जन्मली आहे की जिथे त्यांना काही कर्तुत्त्व गाजविण्यापूर्वी जन्मतःच एक ओळख मिळालेली आहे. कुणाचा नातू, कुणाचा सुपुत्र इ.
अनेक वर्षे खासदार आहेत. पक्षाचे स्टार कँपेनर आहेत. बंगालच्या निवडणूकीत सहभागी झाले आणि कित्येक दशकांची कम्युनिस्टांची सत्ता उलथवून टाकली. महाराष्ट्र असो की उत्तर प्रदेश कुठेही गरीबाच्या झोपडीत जाऊन पिठले भाकरी खाऊ शकतात. अतिशय साधे आहेत. मोठ्या प्रमाणावर जनताही पाठीशी आहे.
शरद पवार - जवळ जवळ ५० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. केंद्रात मंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री होते. देशात सर्वात कमी वयाचे दुसरे मुख्यमंत्री. कुशल प्रशासक. निरनिराळ्या प्रश्नांची सखोल माहिती. यांची भाषणे अतिशय माहितीपूर्ण असतात. राजकारणाव्यतिरीक्त अनेक विषयांचा अभ्यास आहे. देशातील अनेक संस्थांचे आधार. भारतीय क्रिकेट संघटना यांच्या कारकीर्दीत भरभराटीस आली. दोन विश्वचषक जिंकले. सर्व पक्षात मित्रमंडळी. देशातील अनेक राज्यांमधे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. माहीतगारीमुळे जाणता राजा असा उल्लेख होतो.
मनोहर पर्रीकर - एका छोट्या राज्याचा मुख्यमंत्री. पण किर्ती केव्हाच राज्याबाहेर पोहोचली आहे. कुशल प्रशासक. स्वच्छ प्रतिमा. गोव्यातील अनेक बलदंड राजकारण्यांना, खाणमाफीयांना चाप लावला आहे. आय आय टी चे इंजिनीयर. जनतेत अत्यंत लोकप्रिय.
गोपीनाथ मुंडे - पक्षातला ज्येष्ठ नेता. अनेक चढउतार पचवलेले आहेत. इतर पक्षात पवारांचे जे अनेक मित्र पसरले आहेत त्यापैकी एक. दोघेही एकमेकांच्या साम्राज्याला हात लावीत नाहीत. राज्याचे उर्जामंत्री असताना सत्तेचा खरा उपयोग करून दाखवला. प्रमोद महाजन गेल्यानंतर पक्षात गॉडफादर राहीला नाही. मराठवाड्याचा लाडका नेता.
सुशीलकुमार शिंदे - अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून वर आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री होते. उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार होते. गृहमंत्री असताना कसाब, अफजल गुरु यांच्या फाशीची अंमलबजावणी केली आणि मोठीच लोकप्रियता मिळाविली. श्रेष्ठींचे लाडके.
अरुण जेटली - निष्णात कायदेतज्ञ, उत्तम वक्ते. अनेक प्रश्नांवर सरकारच्या नाकी नऊ आणले होते. पांढरपेशा वर्गात लोकप्रिय. पण तळागाळातील कार्यकर्त्याशी संपर्क कमी.
सुषमा स्वराज - प्रभावी वक्त्या, सुप्रीम कोर्टातील यशस्वी वकील. भारतीय महिलांना अतिशय भावणारे व्यक्तिमत्त्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही पंतप्रधापदासाठी स्वराज यांनाच पसंती होती.
नरेंद्र मोदी - अनेक वर्षे राष्ट्रीय राजकारणात होते. पण गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून खर्या अर्थाने चर्चेत आले. विकासपुरुष म्हणून प्रतिमा आहे. देशात सर्वत्र अत्यंत लोकप्रिय. देशाचे नेते झाले तर अपेक्षांचे ओझे प्रचंड असेल.
मनमोहनसिंग - जाणकार अर्थतज्ञ. मुक्त आर्थिक धोरणाचे शिल्पकार. दहा वर्षे पंतप्रधान. पक्षातील ज्येष्ठ व आदरणीय व्यक्तिमत्त्व. वय ८० वर्षे. तरीही पुढील पाच वर्षे पंतप्रधान बनण्याची घोषणा केली आहे. इच्छाशक्ती दांडगी दिसते. व्यक्तिगतरीत्या कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले नाहीत.
मुलायमसिंग यादव - देवीगौडांप्रमाणे निरुपाय म्हणून का होइना काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधान होवू शकतात. अनेक वर्षे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री होते. काँग्रेसेतर पक्षांमधील एक प्रमुख उमेदवार. मुलाकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद देवून केंद्रीय राजकारणातच रस असल्याचा संदेश नेताजींनी सर्वांना दिला आहे.
चंद्राबाबू नायडू - कुशल प्रशासक, उत्तम संघटक. युवक काँग्रेसचा दांडगा अनुभव. त्याच आधारावर मुख्यमंत्री झाले. त्यातही स्वतःचा ठसा उमटवला. पण ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्याची टीका झाली. तिसर्या आघाडीचे पसंतीचे नाव.
जाणकारांनी यावर आपले मत मांडावे... जेणेकरून मतदार राजालाही मार्गदर्शन होइल.
वाचने
4583
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
निषेध!
+१
In reply to निषेध! by कापूसकोन्ड्या
राहुल गांधी - अतिशय साधे आहेत
जर कॉन्ग्रेस आली तर
घोडेमैदान फार लांब नाही
चिदम्बरन
चिदंबरम
भावी पन्तप्रधान कोण??
दिग्गीराजा नसल्याने पास !
असेच म्हणतो. दिग्गीराजांचा
In reply to दिग्गीराजा नसल्याने पास ! by मालोजीराव
खरे आहे पण...
In reply to असेच म्हणतो. दिग्गीराजांचा by बॅटमॅन
आयो...जबरी उत्तर एकदम!!!
In reply to खरे आहे पण... by विकास
माझ्या नातवाच्या वयाची मुले
In reply to आयो...जबरी उत्तर एकदम!!! by बॅटमॅन
पिग्विजय हे नाव नव्यानेच
In reply to माझ्या नातवाच्या वयाची मुले by मालोजीराव
मोदी झाल्यास मोद होईल
दिग्गीराजा नसल्याने पास !
अरे रे रे. माजी 'लोहपुरुषांच'
साबरमतीवाले रेसमध्ये आल्याने
In reply to अरे रे रे. माजी 'लोहपुरुषांच' by पिंपातला उंदीर
पायावर कुऱ्हाड
बहन मायावतींचे आणि नवीन
मुंडे???
तीच गोष्ट मनोहर पर्रीकरांची.
In reply to मुंडे??? by श्रीरंग
मायवती / जयललीता / ममता यांची
.