✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (दोन)

स
संजय क्षीरसागर यांनी
Mon, 07/01/2013 - 23:40  ·  लेख
लेख
कृष्ण आणि अर्जुनाकडे महाभारतातल्या व्यक्तिरेखा म्हणून पाहू नका. त्या प्रत्येक व्यक्तीच्या, सदैव उपस्थित असलेल्या दोन चित्तदशा आहेत. अर्जुन ही संभ्रमित चित्तदशा आहे आणि कृष्ण ही शांत आणि स्थिर स्थिती आहे. जीवनाच्या रथाचं सारथ्य अर्जुनाकडे आहे, मनाकडे आहे त्यामुळे अस्वास्थ्य आहे. krishna रथाचं सारथ्य कृष्णाकडे, स्वत:कडे घेण्याचं साहस करण्याचा फक्त अवकाश , तुम्ही स्वच्छंद व्हाल. __________________________ बिफोर वी गो, पहिल्या लेखात म्हटलंय विषय कसा पुढे न्यावा याची कोणतीही योजना मनात नाही. तुमचे प्रतिसाद आणि प्रश्न लेखनाची दिशा ठरवतील. प्रथम तुमच्या सर्व प्रतिसादांची एकसंध मांडणी करून लेखमालेच्या संदर्भात त्याची उत्तरं देतो म्हणजे पुढे जाता येईल. अनेकांचा प्रश्न असायं की मनापलीकडे जाऊन काय साधतं? खरं तर याचं उत्तर लेखातच आहे : जेव्हा तुम्हाला मनाची समग्र प्रक्रिया समजेल तेव्हा तुमच्या वैचारिक आवर्तनांचा कालावधी कमीकमी होऊ लागेल. तुम्ही पुन्हापुन्हा वर्तमानात येऊ लागाल. मनाच्या एका महत्त्वाच्या दालनावर तुमची हुकुमत चालायला लागेल. मनाच्या अनेक प्रभागांपैकी एका व्यापक प्रभागापासनं तुम्ही मुक्त व्हाल. निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल. आणखी थोडं विस्तारानं सांगतो (सुरुवातीचा भाग लेखात आहे) : संवेदना ही मनाची कारक आहे म्हणजे कोणतीही संवेदना मन सक्रिय करते. जेव्हा आपण मनाची प्रक्रिया जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा 'पहिली संवेदना' हा अत्यंत बेसिक फॅक्टर आहे हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मन सक्रिय झाल्याबरोबर आपण स्मृती चक्रात अडकून अनेकानेक गतकालीन प्रसंगातून आणि अनुभवातून फिरायला लागतो. हे इतक्या वेगानं घडतं की सुरुवात नक्की कुठून झाली हे लाखातला एखादाच जाणू शकतो. आपलं मन (किंवा मेंदू) प्रत्येक संवेदनेचं डिकोडींग करत असतो आणि त्यामुळेच आपल्याला संवेदनेचा अर्थ कळतो. हे डिकोडींग स्मृतीच्या आधारे चालू असतं. तुम्ही कधीही शांत डोळे मिटून बसलात तर तुम्हाला हा अनुभव येईल. समजा कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला तर प्रथम तो उलगडा होतो (श्रवणसंस्था सक्रिय होऊन स्मृतीन्वये तो आवाज कुणाचा ते कळतं ). मग स्मृतीचा दृक भाग सक्रिय होतो आणि डोळ्यासमोर आपल्याला ज्ञात असलेल्या कुत्र्याची प्रतिमा येते. त्यानंतर कुत्र्याविषयीच्या सर्व स्मृती सक्रिय होतात. समजा लहानपणी कुत्रा पाळला असेल (किंवा कधी चावला असेल) तर त्याच्या स्मृती. कुणाला कुत्र्याच्या मालकिणीविषयी काही अनुभव असेल तर त्या स्मृती. कुणाला कुत्री आवडत नसतील तर कॉर्पोरेशनच्या डॉगस्कॉडमध्ये तक्रार करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करावा याचा प्लॅन. आणि असं करत करत कुत्र्याचं जिणं चांगलं का वाईट? आणि सरते शेवटी, आपलं जिणं कसं आहे? अश्या प्रकारे विचारचक्रात पूर्णपणे अडकून आपण स्मृतींच्या अनंत विस्तारात फिरत राहतो. काही वेळानंतर लक्षात येतं की अरे! आपण घरात शांत बसलेलो आहोत. हे इतकं सविस्तर लिहिण्याचं कारण की कोणताही निर्णय घेताना, कुणाशीही वागताना किंवा एखादी कृती करताना आपण स्मृतीच्याच अधीन होऊन जगत असतो. स्मृतीचा वापर करणं ही अत्यंत वेगळी गोष्ट आहे आणि तिच्या अधीन होऊन जगणं बंधन आहे. पण स्मृतीची प्रक्रिया इतकी वेगवान आहे आणि आपण इतके बेसावध असतो की 'स्मृती (किंवा मन) निर्णय घेतं आहे' याची शेवटच्या क्षणापर्यंत कल्पनाच येत नाही! तुम्हाला वाटेल की असं काही नाहीये पण मानवी अस्वास्थ्याचं मूळ कारण तेच आहे. आयुष्यात प्रथम आपण सेटल होण्याचा प्रयत्न करतो ( ते अपरिहार्य आहे) पण एकदा सेटल झाल्यावर आपण तोच दिवस (अगदी किरकोळ फरकानं ) पुन्हापुन्हा जगतो. अस्तित्वात प्रत्येक क्षण नवा आहे पण वी लीव द सेम रूटीन. आपला दिवस आठवड्याच्या माळेत गुंफल्यानं त्यात थोडाफार पॅटर्न वाटतो इतकंच. मग असं जगतजगत एक दिवस आपण संपून जातो. ज्यांना याची वेळीच कल्पना येते ते चौकट लंघायचा प्रयत्न करतात, पण बहुसंख्यांना वाटतं लाईफ असंच आहे. ते 'एक उनाड दिवस' सारखा पिक्चर पाहतात (फार तर अधेमधे ट्रेक करतात किंवा सहलीला जातात) आणि ‘कल्पना उत्तम आहे’ अशी स्वतःची समजूत घालून विसरून जातात. नाऊ कमिंग टू द पॉइंट, जर तुमचं आयुष्य यापेक्षा वेगळं असेल किंवा तुम्हाला तसं वाटत नसेल तर तुम्हाला या लेखांचा काही उपयोग नाही. तुम्ही लेख वाचण्याच्या, प्रश्न विचारण्याच्या आणि वाद घालण्याच्या फंदात पडू नका. इथे असा गैरसमज आहे की पब्लिक फोरमवर कुणीही काहीही विचारू शकतो. हे म्हणजे रस्त्यावरच्या सगळ्या पाट्या वाचत आणि प्रत्येक दुकानदाराशी बोलत सुटण्यासारखं आहे. ज्यांना माझं म्हणणं पटलं असेल आणि हरक्षणी उत्स्फूर्ततेनं जगायचं असेल त्यांना लेखमालेचा उपयोग आहे. _________________________ दुसरी गोष्ट, मनावर नियंत्रण मिळवायला तुम्ही इतर कोणताही मार्ग अवलंबत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला नामसाधना योग्य वाटत असेल तर चालू ठेवा. मनाच्या अवलोकनानं रिझल्ट मिळत असेल तर उत्तम आहे. मी स्वतःचं आकलन मांडतोय, आणि जे लिहितोय ते जगतोय त्यामुळे मला कोणत्याही साधनेची गरज नाही. तस्मात, तुम्ही तुमच्या मार्गानं जाणं उत्तम. ते मार्ग रिझल्ट देत नाहीत असं मी का म्हटलं याचा सविस्तर उहापोह पहिल्या लेखात आणि इतर अनेक प्रतिसादात झाला आहे त्यामुळे त्यावर आता पुन्हा चर्चा होणे नाही. _____________________ सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखनाचा उद्देश इंटरेस्टेड लोकांचं आयुष्य आनंदाचं व्हावं असा आहे आणि तो निव्वळ वाचन किंवा चर्चेचा विषय नाही; जगण्याचा आहे. त्यामुळे जोपर्यंत बॅकट्रॅक या पहिल्या लेखात सांगितलेल्या प्रक्रियेचा तुम्ही स्वतः प्रयोग करून अनुभव घेत नाही (किंवा शंका निस्तरत नाही) तोपर्यंत पुढचे लेख लिहिण्यात अर्थ नाही. कारण स्मृती हा मनाचा व्यापक प्रभाग आहे. त्याची प्रक्रिया उलगडल्याशिवाय पुढे तादात्म्य, धारणा, अंतःप्रेरणा, भय, कल (अ‍ॅप्टीट्यूड) , माइंड-बॉडी को-ऑर्डिनेशन, नाती आणि सरते शेवटी संगृहित मनाचा परिपाक म्हणजे व्यक्तिमत्त्व या गहन पैलूंचा उलगडा होणं अशक्य आहे. तुमच्या प्रतिसादातून आणि प्रश्नातून तुम्ही प्रक्रिया करून पाहिली की नाही हे लक्षात येतं आणि इथे एक सोडता कुणीही प्रक्रियेविषयी काही प्रतिसाद दिलेला नाही. आधी जे दोन प्रतिसाद आले होते त्यांनी प्रक्रिया करून पाहिलेली नाही हे त्यांच्या नंतरच्या प्रतिसादांवरून कळलं. ____________________ शेवटची गोष्ट, प्रत्येक वॅलीड प्रश्नाला मी उत्तर दिलं आहे. काही प्रश्न खरोखरी विषयाशी संबंधित होते : उदाहरणार्थ 'हे तरी आम्हाला कसे कळावं की आम्ही तुमची साधना विश्वासानं करून पाहवी?' आणि उत्तर आहे : मला किती कळलंय ते तुम्हाला साधना यशस्वी झाल्या क्षणी कळेल!. आणि, अर्थात साधना सोपी आणि निर्धोक आहे. तुम्हाला त्यासाठी कुठेही जायची गरज नाही की त्यात फारसा कालापव्यय नाही. किंवा : तुम्ही सततच्या चिंतनानं मन भ्रम निर्माण करतं आणि व्यक्ती भ्रमिष्ट होते.> असे लिहिलं आहे. हे कसं काय? आईन्स्टाईनबद्दल किंवा तश्याच अनेक शास्त्रज्ञांबद्दल देखिल तुमचे हेच मत आहे का? आणि उत्तर आहे : शास्त्रज्ञ अस्तित्वागत प्रश्नांवर (उदा, गुरुत्वाकर्षण) चिंतन करतात, रामावर नाही. आणि त्यांच्या चिंतनातून ते प्रश्नांची उकल साधतात. राम भेटावा हा त्यांच्या चिंतनाचा हेतू नसतो त्यामुळे ते भ्रमिष्ट होत नाहीत. मला वाटतं हा प्रश्न स्वतः विचार केला तरी सुटण्यासारखा आहे. आणि प्रश्न विचारताना किमान तेवढा विचार करावा अशी अपेक्षा आहे म्हणजे चर्चा विस्तारणार नाहीत. काही ठिकाणी उपहास करण्याचा अटोकाट प्रयत्न झालयं, उदा. हा प्रश्न : जाणीवेची स्थिर अवस्था म्हणजे कोमा का? अश्या प्रकारे उपहास करताना आपलं हसूं होतं इतकं लक्षात आलं तर बरं. कारण ‘कोमा’चा अर्थ ‘हँग झालेला कंप्युटर’. व्यक्तीची जाणीव स्थिर झालीये पण मेंदू निकामी झालयं, तो आता संवेदना डिकोड करू शकत नाही. सिद्धाची जाणीव स्थिर आहे आणि मेंदू फुल्ली फंक्शनल आहे. थोड्याफार प्रमाणात अशीच परिस्थिती धाग्याचा खरडफळा करणार्‍यांची आहे पण ती जवाबदारी सं.मं.ची आहे. त्यामुळे कुणाचे प्रतिसाद वाचायचे आणि कुणाचे नांव पाहून स्क्रोल करायचे इतकंच माझ्या हातात आहे. पण काही ठिकाणी सदस्य इतके असंबद्ध प्रतिसाद देतात की आश्चर्य वाटतं उदा. 'अवांतर: तुम्ही कायम हे असे पराभूत, हल्ले, हुकुमत अश्या प्रकारचे शब्द का वापरता'? त्यामुळे मला फार हसू येतं'. साधारण मराठी पाचवी-सहावीपर्यंत कुणालाही हे शब्द गेलेले असावेत अशी (निदान मराठी संकेतस्थळावर तरी) अपेक्षा आहे. अनाहत नाद या अत्यंत गहन विषयावर मी म्हटलंय : "मन शांत झालं की देह, मन आणि विश्वशांती यांची एकरूपता साधते कारण शांतता एकसंध आहे. तिचं विभाजन होऊ शकत नाही. या स्थितीत आपण अखिल विश्वाशी एकरूप होतो (म्हणजे मुळात आहोतच पण त्याची प्रचिती येते). त्याला सत-चित-आनंद (अ‍ॅबसल्यूट-काँशसनेस-इक्सटसी) म्हटलंय". त्यावर असा प्रतिसाद देणं : "कसेही असलं तरी जर मूळ्स्वरुप कायम तसेच राहणार आहे तर त्यापर्यंत जायचे कशाला? जिथे काहितरी बिघडतय तिथे जौन दुरुस्त करायला नको का?" म्हणजे एखाद्या शास्त्रीय संगीताच्या रंगलेल्या आणि क्लायमॅक्सला आलेल्या मैफिलीत अचानक कुणाचा सेलफोन यावा आणि 'हाताला धरलं या' हा रिंगटोन वाजावा तसं आहे. अशामुळे आपला शास्त्रीय संगीतातला रस तर दिसतोच पुन्हा चारचौघात अभिरुची उघड होते. एखाद्याला त्याची फिकीर नसणं शक्य आहे पण इतरांचा रसभंग होतो हे नक्की. अश्या वेळी सेल स्वीच ऑफ असणं उत्तम. या लेखावरील प्रतिसादांमुळे सदस्यांचा वैचारिक कल, त्यांचं आध्यात्मिक आकलन याची पूर्ण कल्पना आलेली आहे. त्यावरनं एक सांगावंस वाटतं, मनापलीकडे जाणं म्हणजे वैचारिक उहापोहातनं बाहेर पडून जाणिवेनं जगणं. अर्थात, जोपर्यंत स्मृती सक्रिय होण्यापूर्वी कोणती संवेदना होती ते लक्षात येत नाही तोपर्यंत जाणीव म्हणजे नक्की काय याचा उलगडा होत नाही. आणि जाणीव हा आपला अस्तित्वाशी संपर्क बिंदू आहे. तो अंतःप्रेरणेचा स्रोत आहे. थोडक्यात अस्तित्वाशी समरूप होऊन जगायला (किंवा अस्तित्वाची इच्छा समजायला) स्मृतीऐवजी संवेदना उपयोगी आहे. स्मृती (किंवा मनाच्या) अधीन असणं म्हणजे व्यक्तिमत्त्वात बंदिस्त होऊन जगणं आणि जाणिवेनं जगणं म्हणजे स्वच्छंद जगणं असा अर्थ आहे. स्वच्छंद जगताना आपण स्मृतीचा उपयोग करतो, पण अनुसरण करत नाही. ते आयुष्य एका नव्या डायमेन्शननं जगायचं साहस आहे. सर्व लेखन हा माझा वैयक्तिक अनुभव आहे तस्मात, निष्फळ चर्चा आणि वादविवाद करण्यापेक्षा तुम्हाला काही काळ तरी प्रामाणिकपणे माझ्या बरोबर वाटचाल करावी. एकदा आपल्या अनुभवात समन्वय आला की मैफिल रंगत जाईल. नंतर जीवनाच्या रथाचं सारथ्य कृष्णाकडे म्हणजे स्वत:कडे घेण्याचं साहस केल्याचा आनंद, तुमचा अनुभव होईल .

Book traversal links for रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (दोन)

  • ‹ `रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (एक)
  • Up
  • रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (तीन) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
18666 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

मागच्या भागात ओशोंचा फोटो

मदनबाण
Mon, 07/08/2013 - 12:55 नवीन
मागच्या भागात ओशोंचा फोटो होता... आणि एक वाक्य होते :- मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है ! : ओशो (अष्टावक्र महागीता) आता ओशो संपूर्ण अनुभूती बद्धल काय म्हणतात ते सुद्धा सर्वांनी वाचा. इतर काही चांगले वाचनिय दुवे:- १३२. देवशोधन गीता क्षीरसागरजी हे लेख आवार्जुन वाचण्याचे कष्ट घ्या म्हणजे तुमचा भ्रम दूर होईल !
  • Log in or register to post comments

तुम्हाला खरं तर तुमच्या

अग्निकोल्हा
Mon, 07/08/2013 - 14:30 नवीन
तुम्हाला खरं तर तुमच्या मनाविरूद्ध जाऊन एकच निर्णय घ्यायचा आहे : `जे आहे त्याचा बेशर्त स्विकार' आणि तोच खरा चायलेंज आहे.
हिच तर खरि मेख आहे. सगळ्यात भ्रामक गोश्ट हि आहे कि एखादी गोश्ट बेशर्त स्विकारली आहे हे मानणे. हा अनुभव वा प्रक्रियाच मुळात एक कर्मठ सशर्त स्थिती आहे. आणि ति जर तशी सशर्त स्थिती /प्रक्रिया नसेल तर मुळात "स्विकार करणे" हि प्रोसेसच उरणार नाही, जि खरि मुक्ति असेल (मनोव्यापारातुन वगैरे वगैरे वगैरे).
  • Log in or register to post comments

मला लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीचं नेहेमी आश्चर्य वाटतं

संजय क्षीरसागर
Mon, 07/08/2013 - 15:33 नवीन
सगळ्यात भ्रामक गोश्ट हि आहे कि एखादी गोश्ट बेशर्त स्विकारली आहे हे मानणे.
यात भ्रम कुठे आहे? प्राप्त परिस्थिती स्विकारण्याचा निर्णय घेतला, पुन्हा त्यावर वैचारिक उहापोह नाही असं मनाला बजावलं, आपण कामाला लागलो, विषय संपला!
हा अनुभव वा प्रक्रियाच मुळात एक कर्मठ सशर्त स्थिती आहे.
नाही. ते स्वतःच्या निर्णयावर विश्वास असण्याचं द्योतक आहे.
आणि ति जर तशी सशर्त स्थिती /प्रक्रिया नसेल तर मुळात "स्विकार करणे" हि प्रोसेसच उरणार नाही, जि खरि मुक्ति असेल (मनोव्यापारातुन वगैरे वगैरे वगैरे).
स्विकार ही सशर्त स्थिती नाही. एका क्षणात मनाचं `मेंटल शटलींग' थांबवून निर्णय स्वाधिन करण्याचा तो सर्वोत्तम उपाय आहे. ती अत्यंत निर्णयात्मक स्थिती आहे. `आय हॅव अ‍ॅक्सेप्टेड माय वर्क अँड आय वील ब्रींग कलर्स टू इट' असा कमालीचा कॉन्फिडन्स आहे. अर्थात ते करायला स्वतःवर विश्वास हवा किंवा आपल्या कामात आपल्याला मजा येत नाही हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा तरी हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

यात भ्रम कुठे आहे? प्राप्त

अग्निकोल्हा
Mon, 07/08/2013 - 15:53 नवीन
यात भ्रम कुठे आहे? प्राप्त परिस्थिती स्विकारण्याचा निर्णय घेतला, पुन्हा त्यावर वैचारिक उहापोह नाही असं मनाला बजावलं, आपण कामाला लागलो, विषय संपला!
हे असलं बजावणे अन कामाला लागणे याला तुम्हि बेशर्तपणा म्हणता ?
नाही. ते स्वतःच्या निर्णयावर विश्वास असण्याचं द्योतक आहे.
नाहि तो स्वतःच्या निर्णयावर अढळ रहायचा अट्टहास आहे. यातली कोणतिच गोश्ट बेशर्त नाही. पुरेसा विरोधि रेटा निर्माण झाल्यास हा अट्टहास फाजिलही ठरु शकतो. अर्थात त्यावेळी माझि मर्जी म्हणत पळ काढुन दुसरा अट्टहास जवळ करायचा मार्ग जो आपण सुचवला आहे तो कोणत्याही प्रकारे स्वतःच्या निर्णयावर विश्वास असण्याचं द्योतक दाखवत नाही.
स्विकार ही सशर्त स्थिती नाही. एका क्षणात मनाचं `मेंटल शटलींग' थांबवून निर्णय स्वाधिन करण्याचा तो सर्वोत्तम उपाय आहे. ती अत्यंत निर्णयात्मक स्थिती आहे. `आय हॅव अ‍ॅक्सेप्टेड माय वर्क अँड आय वील ब्रींग कलर्स टू इट' असा कमालीचा कॉन्फिडन्स आहे.
कामाच्या ठिकाणी/ मनोव्यापाराच्या ठि़काणी स्किल्स, चॅलेंज व ऑब्लिगेशनचा रेशो व्यवस्थित संभाळा हा एकमेव दिर्घकाळ आनंदाने कार्यरत राहण्याचा राजमार्गे आहे. यु डोन निड टु गिव अ डाइम अबॉट ब्रिंगिंग कलर्स टु इट, यु विल एंजॉय व्हटेवर कलर्स इट हॅज आलरेडी गाट. दॅट्स व्हॉट रिअल अक्सेप्टन्स इज आल अबॉउट.
अर्थात ते करायला स्वतःवर विश्वास हवा किंवा आपल्या कामात आपल्याला मजा येत नाही हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा तरी हवा.
ख्खिक्क! कोण माणूस कामात मजा येत नसताना मजा येतेय अस मानुन जगत असतो ? राहिलि गोश्ट विश्वासाचि यु डोंट निड इट अ‍ॅट ऑल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही तुमचा पहिल्या प्रतिसादातला बेसिक मुद्दाच विसरलात!

संजय क्षीरसागर
Mon, 07/08/2013 - 16:52 नवीन
तिथे तुम्ही लिहीलंय :
केवळ अन केवळ ओब्लिगेशनच कामातलि मजा कमि करतं जात, म्हणूनच आवडत्या कंपनित लागलेल्या जॉबचा पहिला दिवस जितका आनंददायी अन उत्साहदायि असतो तितका सहावा महिना असेलच असे नाही भलेही कंपनी पगार/ जॉब प्रोफाइल बदलला नसेल, पण आता तुम्ही तुमच्यासाठी जॉब, पण काम मात्र कंपनीसाठि करत असता, पण सुरुवातिला जॉब अन काम दोन्हि स्वतःसाठी असते. अलमोस्ट विदाउट ओब्लिगेशन.
आणि मी म्हणतो `आहे त्या कामाचा अस्विकार हेच बंधन आहे' तुम्ही पुढे काय लिहीलंय त्याला काही एक अर्थ नाही कारण तुमच्या विचारसरणीनं गेलं तर दर सहा महिन्याला नोकरी बदलण्याचा प्रसंग येत राहील. पुढे तर त्याहून गोंधळ आहे :
आता तुम्ही तुमच्यासाठी जॉब, पण काम मात्र कंपनीसाठि करत असता, पण सुरुवातिला जॉब अन काम दोन्हि स्वतःसाठी असते. अलमोस्ट विदाउट ओब्लिगेश
`जॉब आणि काम यातला फरक' असा गोंधळ होतो का दर सहा महिन्यानी? वरच्या प्रतिसादात शेवटी म्हटलंय :
कोण माणूस कामात मजा येत नसताना मजा येतेय अस मानुन जगत असतो ?
= तुमच्या कामात मजा येण्यासाठी शर्ती किती आहेत ते पाहा म्हणजे मजा येतीये किंवा नाही ते कळेल : १ ) स्किल्स, चॅलेंज व ऑब्लिगेशनचा रेशो व्यवस्थित संभाळा २) ठिक आहे मग या प्रक्रियेचा सारांश काय ? तो हाच की ज्या कामात तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट घेउ शकता फक्त तेच काम आनंददायी असतं. आता दुसरी शर्त पूर्ण व्हायला तर फक्त एकच अट आहे : ज्या कंपनीत तुम्ही नोकरी करता ती सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून हवी आणि तीनं कर्मपूर्तीसाठी तुमच्या एंट्री आणि इग्झिटची वाट बघावी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

Everybody is replaceable.

लंबूटांग
Mon, 07/08/2013 - 16:58 नवीन
Everybody is replaceable. कंपनी तुमच्यावर अवलंबून असेल तर तुम्ही गेल्यावर मग कोणाला replace करायला कंपनीच राहणार नाही. मी तर अगदी उलट विचाराने काम करतो. उद्या मी ही नोकरी सोडली तर माझ्यानंतर जो हे काम करेल त्याला कमीत कमी कष्ट झाले पाहिजेत. असो. ज्याची त्याची विचारसरणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ति जर तशी सशर्त स्थिती

कवितानागेश
Mon, 07/08/2013 - 16:18 नवीन
ति जर तशी सशर्त स्थिती /प्रक्रिया नसेल तर मुळात "स्विकार करणे" हि प्रोसेसच उरणार नाही > you got it!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

चहुं वेदी जाण षटशास्त्री कारण

चेतन माने
Mon, 07/08/2013 - 16:31 नवीन
चहुं वेदी जाण षटशास्त्री कारण । अठराही पुराणे हरिसी गाती ॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥
एक हरी आत्मा जीव शिव सम । वाया दुर्गमी न घाली मन ॥
ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥
  • Log in or register to post comments

तुमच्या कामात मजा येण्यासाठी

अग्निकोल्हा
Mon, 07/08/2013 - 17:19 नवीन
तुमच्या कामात मजा येण्यासाठी शर्ती किती आहेत ते पाहा म्हणजे मजा येतीये किंवा नाही ते कळेल :
त्या शर्ति पाळा अन करत असलेल्या कामाचा लुफ्त उठवा. कारण मि बेशर्तपणाचा ना फसवा भ्रम निर्माण करतोय ना दुसर्‍यांना त्याला बळि पडायला भाग पाडतोय. त्यामुळे व्हॉट डु वि क्नो अँड व्हॉट हॅव वि लर्न अबॉट वर्क/प्रोसेस हॅपिनेस इज= १ ) स्किल्स, चॅलेंज व ऑब्लिगेशनचा रेशो व्यवस्थित संभाळा - स्किल्सेटच्या प्रमाणातच चॅलेंजही वाढवा, हे बिघडल तर फ्रेस्ट्रेशन अथवा बोअरड्म (भयानकही) उसळेल, व ऑब्लिगेशन्स रिड्युस करत चला... म्हणजेच कामाचा/प्रक्रियेचा कंटाळा कधिच येणार नाही. व ऑब्लिगेशन्सच्या लयसोबत मुक्तिचा मार्ग मोकळा होइल :) २) ज्या कामात तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट घेउ शकता फक्त तेच काम आनंददायी असतं. - बरोबर. जेव्हां पाहिजे तेव्हां काम केलं, अन नको असेल तर नाहि केल केवळ हेच सर्वात आनंददायि असतं. समरसुन केलेलं असतं पण हाय रे दैवा.. आफ्टर अ‍ॅल हॅपिनेस इज नॉट एव्हरिथिंग जबाबदारि,गरज, निकड या आवश्यक गोश्टि सुध्दा प्रक्रिया/काम करायला भाग पाडतात अशावेळी समजा विलिंगफुली एंटर-एग्झिट शक्य नसेलही पण काम करताना स्किल्स, चॅलेंज व ऑब्लिगेशनचा रेशो व्यवस्थित संभाळणे हमखास उपयोगि पडुन आनंद निर्माण करतो.
  • Log in or register to post comments

आता कसे लाईनीत आलात!

संजय क्षीरसागर
Mon, 07/08/2013 - 19:03 नवीन
पण हाय रे दैवा.. आफ्टर अ‍ॅल हॅपिनेस इज नॉट एव्हरिथिंग जबाबदारि,गरज, निकड या आवश्यक गोश्टि सुध्दा प्रक्रिया/काम करायला भाग पाडतात
म्हणजे तुमच्या
विलफुल एंट्री आणि इग्झिट
या कामात आनंद देणार्‍या महत्त्वाच्या शर्तीची पहिल्यांदाच वाट लागली! तुम्ही कारणं काहीही सांगा, आहे ती नोकरी बंधन झालं. आता दुसरी शर्त :
स्किल्सेटच्या प्रमाणातच चॅलेंजही वाढवा
म्हणजे: एकतर कंपनीनं कर्मपूर्तीसाठी तुमच्या एंट्री आणि इग्झिटची वाट बघायची. परत तुमच्या म्हणण्याप्रमाणे फक्त पहिल्या दिवशी तुम्ही आनंदात असणार कारण
" सुरुवातिला जॉब अन काम दोन्हि स्वतःसाठी असते."
यानंतर तुम्ही म्हटलंय तशी मानसिक कोलांटी उडी
("पण आता तुम्ही तुमच्यासाठी जॉब, पण काम मात्र कंपनीसाठि करत असता")
दुसरा दिवस ते सहामहिने या कालावधित केव्हाही बसू शकते. तसं होऊ नये कारण त्यामुळे तुमचं
फ्रेस्ट्रेशन अथवा बोअरड्म (भयानकही) उसळेल"
या भीतीनं कंपनीनं तुमच्या स्किलसेटसच्या प्रमाणात तुम्हाला चायलेंजेसही प्रोवाइड करायचे (थोडक्यात तुम्ही फ्रस्टेट किंवा बोअर होऊ नये म्हणून तुम्हाला दर चारसहा महिन्याला प्रमोट करत राहायच ) आणि दरम्यानच्या काळात तुमचा सल्ला काय तर
"ऑब्लिगेशन्स रिड्युस करत चला"
(थोडक्यात कंपनीला केव्हाही टांग मारता येईल अशी परिस्थिती निर्माण करा!) शाब्बास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

तुम्हाला एक सांगावसं वाटतं,

संजय क्षीरसागर
Mon, 07/08/2013 - 20:11 नवीन
माझ्या लेखनावर "पावलापावलाला त्रुटि दाखवुनही" किंवा "तुमच्या बर्‍याच चुका दाखवुनही तुम्ही चुकिचे लेखन/धागे/प्रतिक्रिया का देताय ?" वगैरे आवेशात विचारण्यापूर्वी; तुमचा सल्ला तुम्हाला तरी उपयोगी ठरला आहे का ते जरूर पाहा. नाही तर तुमच्या या सल्ल्यान्वये :
ऑब्लिगेशन्सच्या लयसोबत मुक्तिचा मार्ग मोकळा होइल smiley
नक्कीच होईल, पण नोकरीतनं मुक्त होऊन घरी जायचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हा प्रतिसाद लिहुन समाधान झालं असेल तर..

अग्निकोल्हा
Mon, 07/08/2013 - 20:31 नवीन
जर मुद्याच अन विषयानुरुप बोलाल की अवांतरच खरडत रहाणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मी आवांतर लिहीतोय?

संजय क्षीरसागर
Mon, 07/08/2013 - 23:11 नवीन
तुमच्या प्रतिसादाला दिलेली उत्तरं वाचा आणि त्यामागे पुढे आलेले इतर सदस्यांचे प्रतिसाद पाहा. काय लिहीलंय त्याचा तुम्हाला अंदाज येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

सोबत इतरांची कशाला फरफट करताय ?

अग्निकोल्हा
Mon, 07/08/2013 - 23:28 नवीन
तुमच्या प्रतिसादाला दिलेली उत्तरं वाचा आणि त्यामागे पुढे आलेले इतर सदस्यांचे प्रतिसाद पाहा. काय लिहीलंय त्याचा तुम्हाला अंदाज येईल.
शब्द शब्द अन शब्द पोकळता. काय हो तुमच्या त्या प्रक्रिया/अनुभव वगैरे वगैरे मी तुम्हाला ठेवेन त्या परिस्थितीत तुम्हाला चिदानंदि वगैरे वगैरे ठेवु शकतिल काय ? आहे का वास्तवाला सामोरे जायची तयारी ? असेल तर तयार व्हा, नायतर सर्वांना स्पश्ट करा कि तुमचे लिखाणे हे निव्वळ "साहित्य" आहे, वास्तव न्हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मी आहे त्या परिस्थितीत मजेत आहे आणि वास्तविकातच जगतोय

संजय क्षीरसागर
Mon, 07/08/2013 - 23:56 नवीन
तुमचे सर्व युक्तीवाद आणि प्रतिसाद फोल ठरलेत म्हणून असे उद्विग्न होऊ नका. आणि नुसत्या वाचण्यात तुमची इतकी फरफट झाली असेल तर लेखाकडे दुर्लक्ष करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

हा हा हा.

अग्निकोल्हा
Tue, 07/09/2013 - 03:57 नवीन
घाबरलात ना आव्हान स्विकारायला. वाटलच होतं जेव्हा प्रत्यक्ष कृतिची वेळ येइल असा मैदानातुन पळच काढाल. माझे युक्त्तिवाद (?) व प्रतिसाद फेल गेल्याचे तुम्हि जाहिर करत असालही पण पळ कोणि काढला हे सगळ्यांनाच दिसत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हाहाहा

लंबूटांग
Mon, 07/08/2013 - 19:54 नवीन
प्रमोट करणे म्हणजे चॅलेंज करणे हा निष्कर्ष कुठून काढलात?
  • Log in or register to post comments

एक नम्र शंका

पैसा
Mon, 07/08/2013 - 20:39 नवीन
जीवनाच्या रथाचं सारथ्य अर्जुनाकडे आहे,
असं कुठे वाचलं नाही कधी. कदाचित माझा अभ्यास कमी असेल. पण उदाहरण म्हणूनही हे पटलं नाही.
  • Log in or register to post comments

असं कुठे वाचलं नाही कधी!

संजय क्षीरसागर
Mon, 07/08/2013 - 23:21 नवीन
कसं वाचणार? इथेच प्रथम लिहीलं गेलंय ते. आपल्या जीवनात मन निर्णय घेतंय आणि आपण मनाचं अनुसरण करतोय अशी परिस्थिती आहे. टॅगलाईन त्या परिस्थितीचं वर्णन करते आणि लेख विश्लेषण करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

शब्द..

प्रभाकर पेठकर
Mon, 07/08/2013 - 20:43 नवीन
शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द... एन्ट्री-एक्झीटचा हक्क वापरून वाचनातून एक्झीट घ्यावी म्हणतो. इथे कांहीच समजत नाही, कांहीच सिद्ध होत नाही.
  • Log in or register to post comments

त्याचं कसं आहे पेठकर,

संजय क्षीरसागर
Mon, 07/08/2013 - 23:47 नवीन
भाषेतला प्रत्येक शब्द हा नुसता निर्देश आहे. नाहीतरी चंद्र या शब्दाला तो न समजणार्‍यासाठी काय अर्थ आहे? ज्याला अर्थ समजतो तो चंद्राकडे पाहतो आणि हरखून जातो. ज्याला समजत नाही तो शब्दांची माळ लावतो इतकाच फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

भारंभार शब्दच नुसते.

प्रभाकर पेठकर
Tue, 07/09/2013 - 02:13 नवीन
ज्याला समजत नाही तो शब्दांची माळ लावतो इतकाच फरक आहे.
मग कशाला लावताय उगी शब्दांची माळ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

वाजतेय ना?

प्यारे१
Tue, 07/09/2013 - 17:43 नवीन
वाजतेय ना? आवाज येतात, मनरंजन होतं, काही आतषबाजी देखील होतेम काही काळ बरं वाटतं. चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

गुरुदेव म्हणाले:

विजुभाऊ
Tue, 07/09/2013 - 02:27 नवीन
गुरुदेव म्हणाले: हू आर यू? यू आर आय इन द यू इन द आय इन द यू? आमचा मात्र चंद्रशेखर झाला......... ( संद्रभ : असा मी असामी )
  • Log in or register to post comments

काही वेळाने गुरुदेव अन कुत्रा

बॅटमॅन
Tue, 07/09/2013 - 02:52 नवीन
काही वेळाने गुरुदेव अन कुत्रा माझ्याचकडे बघताहेत असं मला वाटलं. माझी हाय अन लो ब्लडप्रेशरं दोन्ही एकाच वेळेला वाढू लागली. बर्‍याच वेळाने पाहतो तर कोणीतरी मला हलवून जागं करीत होतं. "शंकर्‍या ऊठ! तिकडं जाऊन झोप! काय पण लोळतात कार्टी!" असं ओरडलो तर कायकिणी गोपाळराव मला हलवून जागे करीत होते. "समाधी लागलं म्हंजे तुमचं पूर्वपुण्याई ग्रेटच असलं पाहिजे हो धोंडोपंत!" ते म्हणाले. आता अशी समाधी रात्री ताकभात खाल्ल्यावर मला दररोज लागते हे त्याला कशाला सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

आध्यात्माची चढली झिंग

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/09/2013 - 10:56 नवीन
आध्यात्माची चढली झिंग टकिन रोज एकेक पिंक तू आणी मी,मी आणी तो नसला तरी आहेच म्हणीन,भले नंतर होऊ दे चो ================================== अत्ता आमचं मन इतकच चाल्ललं,म्हनून इथेच थांबलो... कदाचित कामाहून आल्यावर,अजून चाल्लं तर अजून लिहू... त्यामुळे---विश्रामशः
  • Log in or register to post comments

काय ते ठरलं का शेवटी

कवितानागेश
Tue, 07/09/2013 - 19:02 नवीन
काय ते ठरलं का शेवटी? स्वेच्छेनी हव्वं तस्सं जगायचं की 'सब स्विकार है' म्हणून मुकाट्यानी जगायचं? की आधी स्वेच्छेनी जगायचं आणि लोकांनी फटके दिले की मग मुकाट्यानी सगळं स्विकारुन जगायचं? की आधी सगळं स्विकारुन जगायचं आणि वैताग आला की स्वेच्छेनी जगायचे? की स्वेच्छेनी जगतोय असं दाखवायचं आणि खरं तर सगळं स्विकारुनच जगायचं? की सगळं स्विकारुन मुकाट्यानी जगतोय असं दाखवत हळूच स्वेच्छा पुढे सरकवत रहायची? ... त्यापेक्षा सोप्पे म्हणजे स्वतः स्वेच्छेनी जगायचं आणि आजूबाजूच्या लोकांना सांगायचं आहे त्याचा स्विकार करुन जगा! कसे? काय ते ठरलं की मला कळवा बरं का सगळ्या चर्चापटूंनी.
  • Log in or register to post comments

अगडम् बगडम् बम् चिकी बम्

अग्निकोल्हा
Tue, 07/09/2013 - 19:12 नवीन
अगडम् बगडम् बम् चिकी बम् गोलगोल फुग्याचा लाललाल गोल
हे काय आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

या इअथल्या चर्चापटूंना

कवितानागेश
Tue, 07/09/2013 - 19:27 नवीन
या इअथल्या चर्चापटूंना अवांतराचीच काळजी फार. मुद्द्याचे बोला सिवाजी, मुद्द्याचे! बाकी, ते एक बालगीत आहे, गोल गोल लाल लाल फुग्याबद्दलचे. ......फू फू फुगा, फुट्ला ढम्म!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

की आधी स्वेच्छेनी जगायचं आणि

निवांत पोपट
Tue, 07/09/2013 - 19:45 नवीन
की आधी स्वेच्छेनी जगायचं आणि लोकांनी फटके दिले की मग मुकाट्यानी सगळं स्विकारुन जगायचं? की ................. जगा! कसे?
अरे बापरे! हे एवढं अवघड आहे ठरवणं? हा The Paradox of Choiceआहे काय? मॅट्रिक्स मध्ये निओ किंवा (आणि कोणीतरी) म्हणतो तेच खरं असावं Man cannot go beyond his choices! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा