तुतारी वाजली आहे, रणशिंग फुंकले गेले आहे, आजपासून विम्बल्डन २०१३ सुरु झाले आहे. मला ह्या, साहेबाच्या देशातल्या हिरव्यागार हिरवळीच्या मैदानावर होणार्या टेनिसचे अपार कौतुक आहे. टेनीसमधल्या अमेरिकन, फ्रेंच आणि ऑस्ट्रेलियन ओपन ह्या इतर स्पर्धाचे आकर्षण जरी असले तरीही ह्या विम्बल्डनची मजा काही औरच असते. साहेबाचा 'जेंटलमंस गेम' असे बिरुद मिरवणारा क्रिकेट हा खेळ जेंटल,शिस्तबद्ध आणि पारंपारिक राहिला नसला तरीही टेनीस हा खेळ विम्बल्डनवर अजूनही आपली परंपरा जपून आहे, पारंपारिक पोषाखामध्ये स्टार खेळाडूंनी काही झगमगते 'स्टारडम' आणण्याचा प्रयत्न केला असला तरीही. त्यामुळेच अजुनही विम्बल्डनची जादू मनावर अजूनही भुरळ घालतेच आहे.
महिलांच्या एकेरी स्पर्धेत शारापोवाने अपेक्षित विजय मिळवून स्पर्धेतील रंगत वाढवली आहे.
आता नुकताच राफेल नदाल आणि स्टीव्ह डोर्सिस ह्यांच्यातला सामना संपला. स्टीव्ह डोर्सिसने सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवून एका खळबळजनक विजयाची नोंद विम्बल्डन २०१३ मध्ये केली आहे.
तुम्हीही ह्यापुढे जमतील त्या मॅचेस बघून ह्या स्पर्धेचा आढावा घ्यायचा प्रयत्न करा. त्या त्या मॅचेसवर आणि आपापल्या आवडत्या खेळाडूंवर चर्चा करुयात.
सामना सुरु झाला आणि जोकोवीचची सर्वीस असूनही मरेला ब्रेक पॉइंट मिळुन गुण घ्यायची संधी होती घालवली बेट्याने. १-०. मरेची सर्वीस आली तेव्हा बिनतोड खेळ करत त्याने गुण मिळवले.१-१
जोकोवीची सर्वीस. मरेनं जोकोवीचला दमवलं. मरे पुन्हा ब्रेक पॉइंटला पोहचलाय...ड्युस. अॅदव्हेन्टेज. ड्युस. मरेला अॅडव्हेन्टेज. ड्युस. पुन्हा मरेला अॅडव्हेन्टेज. श्या, ड्युस. व्वा भाई वा. काय पॉइंट घेतलाय..पुन्हा अॅडव्हेंटेज मरे.. आणि घेतला एकदाचा ब्रेक पॉइंट... वॉव. मरे २ :१
सामना संपल्यावर करुच चर्चा... मरेचा खेळ पाहता मरे वरचढ दिसतोय... अर्थात अजून खेळ खूप बाकी आहे तेव्हा माझ्या शुभेच्छा. मरेला. :)
- दिलीप बिरुटे
मरे पहिला सेट जिंकल्यानंतर दुसरया सेट मधे सर्व्हिस राखू शकला नाही, दुस-या सेट मधे मरे 1:4 असा पिछाडीवर पडला. चांगला खेळ तोय पण........पाहु आगे आगे कया होता है
अॅ.मरे अखेर पुरुष एकेरीतील विजयी ठरला. सुरेख खेळला. तिसर्या रंगतदार आणि म्हटलंच तर एकतर्फी सामन्यात अॅ.मरेने बाजी मारली. ६:४ अशा फरकाने तिसरा सेट जिंकला. चार वेळेस मॅच पॉइंटला झुंजावं लागलं. जोकोवीच त्या तुलनेत लढलाच नाही, असे वाटले. मजा आली.
-दिलीप बिरुटे
उपांत्य सामन्यातल्या डेल पोट्रो विरुद्ध झालेल्या कडव्या लढतीमुळे जोकोविचची बरीच दमछाक झाल्याने त्याच्या खेळावर परिणाम झालेला असावा. यंदाच्या स्पर्धेतील तीच सर्वोत्तम लढत असावी.
मरेने त्याचा सर्वोत्तम खेळ फायनल साठी राखून ठेवलेला असावा
मरेचे अभिनंदन.
आजच हे वाचलं...
Murray is indeed the first Brit to win Wimbledon in 77 years unless you think women are people........
Four British women have won Wimbledon women's singles since Fred Perry (1936)...
Dorothy Round Little in 1937
Angela Mortimer in 1961
Ann Haydon-Jones in 1969
... Virginia Wade in 1977
http://www.guardian.co.uk/sport/shortcuts/2013/jul/08/virginia-wade-wimbledon-champion-tennis
आणि हे ही पहा कन्फर्म करायला...
http://en.wikipedia.org/wiki/List_of_Wimbledon_ladies%27_singles_champions
चार ब्रिटीश महिला जिंकल्या आहेत हे ही आजच कळलं. (समालोचकाने हे सांगितलं होतं का ते आठवत नाही आणि वर्तमानपत्रातल्या हेडलाईन्सने पण अशीच दखल घेतली होती) दुर्दैवाने असा भेदभाव अगोदरपासून आहे. मला आठवतय, मागे स्त्री आणि पुरुष विजेत्यांची बक्षिसाची रक्कम समान नसण्यावरून गाजावाजा झाला होता.
हल्ली वेळ मिळेल तसे विम्बल्डन पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. स्टार स्पोर्ट्स { Star Sports HD 4 आणि दुसरा बहुतेक. नक्की नब्बर परत पहायला हवा ! } चॅनलवर पाहतो आहे.
Djokovic ची मॅच पहायला मजा आली, त्याचा उडी मारुन रिव्हर्स हॅड मारलेला शॉट फारच आवडला. :)
बाकी सुंदर लेडीज टेनिस प्लेअर्सच्या सामन्यांची अर्थातच वाट पाहतो आहे. ;)
अवांतर :- सध्या बीबीसीच्या न्यूज देणार्या रिपोर्टस पैकी एका अफगाणी सौदर्यांच्या प्रेमात पडलो आहे ! ;) तिचे नाव यालदा हकिम आहे. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- حلا الترك و مشاعل بنيتي الحبوبة
प्रतिक्रिया
मरेला माझी पसंती
चला...सामना सुरु होतोय. निवडा आपापला खेळाडु...
मरे भारी पडतोय असे वाटते...
मरेला ब्रेक मिळाला एकदाचा.
च्यायला हा मरे चांगला खेळतोय.....
स्वतःची सर्व्हिस वाचवत ५-३ ने
मरे पहिला सेट जिंकल्यानंतर
वाव... वाट अ गेम
विम्बलडन विजेता.
उपांत्य सामन्यातल्या डेल
मरेचे अभिनंदन!
मरे विन्स!
+१
+१
+१
काय पण खेळला मरे …. एकदम
आजच हे वाचलं...
ह्म्म!
(No subject)
हल्ली वेळ मिळेल तसे विम्बल्डन
आयला...माशाल्ला :)
Pagination