Skip to main content

टॉमॅटो राईस

लेखक स्नेहश्री यांनी शनिवार, 13/09/2008 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अतिशय आवडीचा आहे. घरात पुलावासाठी जर भाज्या नसतील तर हा राईस सोप्पा करायला. साहित्यः १) तांदुळ २) टॉमॅटोचा रस ३) खडा मसाला ४) तुप ५) २ कांदे चिरुन ६) लसुण पाकळी वाटुन ७) लाल तिखट ९) मीठ क्रुती:- प्रथम तांदुळ धुवुन निथळत ठेवावे. नंतर तुपात खडा मसाला टाकुन परतावा त्याचा छान सा वास आला की त्यात बारीक वाटलेला लसुण टाकुन परतावे नंतर त्यात चिरलेला कांदा घालावा व नंतर कांदा पारदर्शक झाल्यावर त्यात तांदुळ घालुन व्यवस्थित रंग बदलेपर्यंत परतावेत. इतके की प्रत्येक तांदुळाचा दाणा व्यवस्थित मोकळा झाला पाहिजे. नंतर त्यात टॉमॅटोचा रस व आवश्यक वाटल्यास पाणी घालावे. त्याबरोबर चवीप्रमाणे लाल तिखट व मीठ घालावे. व नंतर दणदणीत वाफ आणावी. व भात व्यवस्थित शिजवुन घ्यावा. आवडत असल्यास कांदा कणिक पेरुन तळुन घ्यावा.

वाचने 6520
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

कांदा कणिक पेरुन तळुन घ्यावा म्हणजे कांदा बराच वेळ कुरकरीत रहातो. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

सह्ही पाकृ! स्नेहश्री, लौकरच तुझ्या घरी हा भात खायला आले पहिजे... :) येऊ द्या अजूनही अश्याच उत्तम पाकृ.... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नक्की या .... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

वा स्नेहश्री, सोपी आणि झकास पाककृती. यात सोडे घातले तर फारच रूचकर होईल असे वाटते. आपला, (मासेखाऊ) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||

स्नेहश्री, हा भात उद्या करुन बघते, मग सांगते. :)

In reply to by यशोधरा

आवडला का घरी? त्याला जर coal smoke दिला ना तर अजुन धमाल येते. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

नक्की करेन हा भात. एकदमच सोपा आहे. पालक पुलाव सारखा.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

एकदम सोप्पा आहे ह....त्यात अजुन तु डेकोरेशन साठी मटार्,कॉर्न वगैरे वापरु शकतेस ......... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

In reply to by प्राजु

एकदम सोप्पा आहे ह....त्यात अजुन तु डेकोरेशन साठी मटार्,कॉर्न वगैरे वापरु शकतेस ......... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

कालच केला ... घरातील सगळ्यांना (चक्क माझ्या मुलाला सुद्धा - तो भात आणि त्याचे विविध प्रकार यांचा विरोधी आहे ) टोमॅटो राइस आवडला ..

In reply to by मनीषा

हे लै भरी झाल ताई.... अनेक अनेक धन्यु...!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

In reply to by सहज

लवंग, दालचिनी, मिरी, आणि तमालपत्र ह्याला खडा किंवा अख्खा मसाला म्हणतात. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

In reply to by स्नेहश्री

लवंग, दालचिनी, मिरी, आणि तमालपत्र ह्याला खडा किंवा अख्खा मसाला म्हणतात. नाही. कुठलाही आख्खा गरम मसाला (पावडर न केलेला), त्याला 'खडा' मसाला म्हणतात.

खुपच छान रेसिपी आहे...मी त्यात तळलेले काजु घातले...छान लागत होता राईस.. जिथे कमी तिथे आम्ही ..:)

खुपच छान रेसिपी आहे...मी त्यात तळलेले काजु घातले...छान लागत होता राईस.. जिथे कमी तिथे आम्ही ..:)

साहित्याचं प्रमाण तुम्ही दिलेले नाही. टोमटोचा रसाचे प्रमाण सांगा.

In reply to by झंडू बाम

१ वाटी तांदुळाला २ टोमॅटो चा रस. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

मला अशा टाइपची १ डीश महिती आहे पन त्यात थोडा फरक आहे कान्द्याऐवजी तळलेल्या कान्द्याची पेस्ट आणि आल-लसून पेस्ट घालतात. हि डीश अशा प्रकारे करुन बघावी खूप छान लागते.