Skip to main content

पनीर मिक्सव्हेज रोल

लेखक नेहरिन यांनी शनिवार, 22/06/2013 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- २०० ग्रॅम पनीर ,१वाटि बारिक चिरलेला फ्लॉवर, १ वाटी बारीक चिरलेला श्रावण घेवडा , १ मध्यम आकाराचे गाजर बारीक चिरून, ८-१० पुदिन्याची पाने , १ वाटि बारिक चिरलेली कोथिंबीर , १वाटि स्वीट कॉर्नचे दाणे , २ टेबलस्पून Cornflower , ८-१० पालकाची पाने , ११/२ टीस्पून बारीक वाटलेले आले ,२ टीस्पून जिरे पावडर, ११/२ टीस्पून मिरे पावडर , ३/४ हिरव्या मिरच्या वाटून , १ लिंबाचा रस .११/२ वाटि ब्रेड crumb , मीठ ,तळण्यासाठी तेल . कृति :- प्रथम गाजर , श्रावण घेवडा , फ्लॉवर, कोर्न थोडेसे वाफवून घ्यावे ( पूर्ण शिजवायचे नाही ). नंतर ते सर्व एका मोठ्या बाउल मध्ये घेऊन त्यात मीठ , वाटलेली मिरची कोथिंबीर, पनीर ,बारीक चिरलेला पुदिना, वाटलेले आल , जिरे पावडर, मिरे पावडर ,कॉर्न फ्लोअर, पालकाची पाने बारीक चिरून घालावी.आणि लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे . https://lh3.googleusercontent.com/-j1DX1i-AXc4/UcU_pokj9dI/AAAAAAAABLQ/IrKSzBUmwgo/s640/21062013%2528006%2529.jpg तयार मिश्रणाचे गोळे करून त्याला थोडासा रोल सारखा आकार देऊन breadcrumbs मध्ये घोळवून घ्यावे https://lh3.googleusercontent.com/-Khb0qcnT-bw/UcU_p7ZCa4I/AAAAAAAABLU/vidqGcbzxY0/s640/21062013%2528009%2529.jpg नंतर गरम तेलात मंद आचेवर तळून घ्यावे आणि TomaTo केचप बरोबर गरम गरम सर्व्ह करावेत https://lh6.googleusercontent.com/-sI5PsAZJoBI/UcU_sJtMDwI/AAAAAAAABLc/JE702_yXrSw/s640/21062013%2528012%2529.jpg

वाचने 8860
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

नंतर ते सर्व एका मोठ्या बाउल मध्ये घेऊन त्यात मीठ , वाटलेली मिरची कोथिंबीर, पनीर ,बारीक चिरलेला पुदिना, वाटलेले आल , जिरे पावडर, मिरे पावडर, कॉर्न फ्लोअर, पालकाची पाने बारीक चिरून घालावी.आणि लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे .

In reply to by नेहरिन

तुम्ही स्वत: मिपावर लॉगइन करून हा धागा उघडलात की धाग्याच्या सुरुवातीला "द्रश्य" आणि "संपादन" अशी दोन बटणे दिसतील. "संपादन" बटणावर टिचकी मारून तुम्हाला तुमचा मूळ लेख संपादित (एडिट) करता येईल.

छान दिसतय कि. उकडलेला बटाटा न घालता नुसतं कॉर्न फ्लोअर घालुन बाईंन्ड होतं म्हणजे कमाल आहे. एकदा ट्राय करुन बघीन.

चहाबरोबर गरमागरम खायला मजा येत असणार! मस्त चटपटीत पदार्थ दिसतोय!

ह्या रोल्सना अजुन चटपटित बनवण्यासाठि तळुन काढल्यावर त्यावर चाट मसाला भुरभुरावा....

इतक्या भाज्या घातल्याहेत म्हणजे नक्कीच टेस्टी असणार. करायला सोपीही आहे पाकृ. उद्याच करते.

एकदम तोंपासू चित्रे पाहून.

फोटू आणि पाकृ आवडले. अश्या रोल्समध्ये बटाटा वापरलेला बरेचदा बघितला आहे पण या पाकृमध्ये नाहीये तरी व्यवस्थित बांधले गेलेत.

व्वा..वा..वा... मिश्र भाज्यांचे मुटकुळे. गरमागरम असतानाच दह्या बरोबर खास लागतील. पाकृ आणि छायाचित्र दोन्ही लाजवाब आहे.