आज आहे २१ जून. वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र. खरतरं दरवर्षीच ही तारीख येते आणि जाते. भारतातही काही प्रमाणात दिवस रात्रीच्या वेळेतील हा फरक जाणवतो मात्र भारत विषुवृत्ताच्याही एकदम जवळ नाही आणि भूमध्याच्याही फारसा जवळ नाही. दिवस रात्र किंवा ऋतूमानातील बदल याभागात म्हणजे विषुवृत्ताजवळ जेवढ्या प्रखरपणे जाणवतात किंवा भूमध्याजवळ फारसे जाणवतच नाहीत तसा प्रकार भारतात घडत नाही.
मध्यरात्रीचा सूर्य: नॉर्वे शाळेच्या पुस्तकात हा धडा वाचल्यपासूनच 'कसा असेल मध्यरात्रीचा सूर्य?' हे कुतुहल शालेय दिवसांपासून मनात होते. मॉस्कोमध्ये असल्यामुळे अगदी मध्यरात्रीचा सूर्य नसला ला तरी २१ डिसेंबर ला सर्वात सर्वात लहान दिवस अनुभवल्या नंतर (म्हणजे सकाळी दहा वाजता सूर्योदय होतो आणि दुपारी ४.५५ सूर्यास्त). यानंतर मात्र हळू हळू दिवस मोठा होत जातो. दिवस रात्रीच्या वेळातही मोठा फरक पडू लागतो फेब्रुवारी पासून हा फरक जाणवायला लागतो. साडे सहा- सात पर्यंत दिवस उगवून संध्याकाळी ६ पर्यंत दिवस मावळायला लागतो. मे महिन्यापासून तर हा फरक ठळक होतो आणि जून मध्ये जवळपास रात्री १०.३० पर्यंत लख्ख सूर्यप्रकाश आणि त्यानंतर ११.३० पर्यंत संधीप्रकाश असे चित्र बघायला मिळते.. मागच्या वर्षी बरोबर २१ जूनलाच काही कारणामुळे भारतवारी झाल्यामुळे तो दिवस मॉस्कोत अनुभवता आला नव्हता. आज मात्र अगदी कामेरा घेऊन पहाटेपासून हा दिवस अनुभवायचं ठरवलं होतं.
आजचा सूर्योदय होता सकाळी ४ वाजून ४४ मिनिटांनी आणि सूर्यास्त आहे रात्री १०. १८ मिनिटांनी म्हणजे तब्बल १७ तास ३४ मिनिटांचा दिवस. पहाटे चारच्याही आधी उजेडायला सुरुवात होते. हा दिवस अनुभवण्यासाठी आणि कॅमे-यात बंद करण्यासाठी लवकरच उठलो पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी काढलेल्या या फोटोत दिवस उजाडायला लागलेले सहज जाणवेल..
आता कोठे पहाटेचे ४.३० झाले आहेत. मात्र सर्वत्र छान उजाडले आहे.
सूर्योदय पहाटे ४.४४. माझ्या घरातून अगदी स्पष्ट सूर्योदय दिसत नाही हे मात्र खरं आहे.
सकाळी सव्वापांच पर्यंत कोवळे उन यायला सुरुवात झाली
लवकर उठलोच आहे तर सकाळचा फेरफटका घेण्यासाठी नेहमीपेक्षा लवकर सहा वाजतांच निघालो. आता सूर्यदेव चांगलेच वर आले होते. ही ६.१० पासून सात पंधरा पर्यंतची काही क्षणचित्रे.
१.
२.
३. रशियन संसद भवनः ड्यूमा सकाळी ६.५०
४. रॅडीसन हॉटेलची देखणी ईमारत. एखादी व्यक्ती एवढी सुंदर असते की तीचा फोटो नेहमीच अप्रतिम येतो मला तसंच काहीसं या इमारती बद्दल वाटतं. सकाळी ७.००
आता साधारण दिवस सुरु झाला होता. नियमित कामे वाट पहात आहेत परंतू दिवस मावळणार आहे मात्र खूप उशीरा. आज संध्याकळी परत आल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर पडुन आजचा दिवस मनात साठवावा असा विचार करून दैनंदिन कार्यक्रमाची सुरुवात केली.
-क्रमशः
वाचने
12012
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान प्रयोग.
रॅडीसन..
In reply to छान प्रयोग. by चित्रगुप्त
छान
मजा करतात..
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान
छान.. इथे पण साधारण सकाळी ४
मस्त
अप्रतिम !!!!!!!!!
या उलट इकडे
व्वा! सुंदर फोटो. धन्यवाद
खूपच छान
हा घ्या दुवा
In reply to खूपच छान by अनिरुद्ध प
धन्यवाद,
In reply to हा घ्या दुवा by लाल टोपी
जबरी. रशिया अजून मिपावर कुणी
धन्यवाद!
In reply to जबरी. रशिया अजून मिपावर कुणी by बॅटमॅन
माहितीकरिता बहुत धन्यवाद
In reply to धन्यवाद! by लाल टोपी
-
-
फोटो चान चान.
राहवले नाही म्हणून
आमच्याकडे पण आज सकाळी ५.४५ ला
मस्त..
जगाच्या कानाकोपर्यातून असे
२१ जून ला रशियात दिवस मोठा अन
हो, खरयं..
In reply to २१ जून ला रशियात दिवस मोठा अन by पाषाणभेद
जावूद्या. प्रभुगुर्जी पाहिजे
In reply to हो, खरयं.. by लाल टोपी
समजलो!!
In reply to जावूद्या. प्रभुगुर्जी पाहिजे by पाषाणभेद
मस्त!
मस्त
मस्त फोटो.
संकल्पना आवडली
संकल्पना आवडली
बाब्बोय!
हो पण जर फोटोत टाईमस्टँप असता
In reply to बाब्बोय! by धमाल मुलगा
अहो पाभे,
In reply to हो पण जर फोटोत टाईमस्टँप असता by पाषाणभेद
लालजी तुम्ही फारच मनाला लावून
In reply to अहो पाभे, by लाल टोपी
जरुर
In reply to लालजी तुम्ही फारच मनाला लावून by पाषाणभेद
सर्वांचे..
सर्वांचे..