माझ्या कृष्ण या रचनेवर कधीतरी लिहावे असे मनात होते. बहुदा, ह्या रचनेचा मला अभिप्रेत असलेला अर्थ मी रचनेतून योग्य रित्या पोहचवू शकलो नाही. अर्थात हा माझाच एक कवी म्हणून पराभव म्हणायला लागेल. कुठलीही रचना करतांना ती सुबोध आणि सहज व्हावी हाच उद्देश असतो, पण कां कोण जाणे हि रचना तशी झाली नाही. मग विचार केला, थोड लिहाव यावर आणि सांगाव कि मला नक्की काय अभिप्रेत आहे ते. म्हणून हा लेखनप्रपंच.कृष्ण ह्या व्यक्तिरेखेला अगणित पदर आहेत. प्रत्येकाला तो वेगळा दिसतो आणि यातच व्यासांच्या अतुलनीय प्रतिभेचे यश आहे. महाभारतासारखे महाकाव्य घडवतांना, त्यातील प्रत्येक घटनेला नेहमीच दोन बाजू असतील याची पुरेपुर काळजी व्यासांनी घेतली आहे. मग त्यातली कुठलीही बाजू योग्य वा अयोग्य ह्याचा निर्णय त्या रचनेचा आस्वाद घेण्यार्यावर व्यासांनी सोडून दिला आहे. आता यामुळे यावर बरेच वाद आहेत. जसे कि, राधा हे पात्र मुळ महाभारतात आहे कि नाही? कृष्ण हा खरचं 'देव' आहे कि नाही? वगैरे वगैरे. पण समजा आपण असे मानले कि, महाभारत फक्त एक महाकाव्य किंवा काव्यातून सांगितलेली एक भव्य कादंबरी आहे, तर त्यातून काही नवे पदर उलगडतात. मग त्यातली सगळी पात्रे हि 'लार्जर दॅन लाइफ' या पातळीवरुन 'मानवी' पातळीवर येतात आणि मग त्यांची सगळी सुख दुखः स्पष्ट दिसायला लागतात. असं म्हणतात, कुठलीही साहित्यिक रचना हि जीवनातूनच प्रेरित झालेली असते, मग महाभारत तर महाकाव्य, महर्षी व्यासांसारख्या महाप्रचंड प्रतिभावान कवीच्या प्रतिभेतून उतरलेले, ते याला अपवाद कसे असेल? आणि महाभारताबद्दल तर अनेक विचारवंतानी हे सांगितलेलेच आहे कि, मानवी मनाचा असा कुठलाही पदर नाही जो महाभारतात सापडणार नाही. असा सगळा विचार करत असतांना, मला असे वाटले, कि त्याच व्यक्तिरेखांना मानव्य पातळीवर आणले असता, मला महाभारतील प्रसंग, पात्रे, त्यांच्या आजुबाजुची परिस्थिती हे सगळे कसे प्रतित होईल? आणि महाभारतात सगळ्यात महत्वाचे पात्र कुठले? तर कृष्ण. मग त्याच्याच अवतीभवतीने महाभारत अनुभवणे गरजेचे झाले. म्हणून मग माझी हि पहिली रचना:
कृष्ण - १ कधी कधी वाटते कृष्ण होण्यापेक्षा राधा व्हावे पहाटेच्या चांद्रवैभवाचे रुपेरी चांद्रकण गाळणार्या कदंब वृक्षाखाली उदात्त युगातीत प्रेमाची भरजरी शाल पांघरावी सुंदर मोरपिसांच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांची नक्षी असलेली म्हणजे मग द्रौपदीच्या अब्रूचे धिंडवडे निघतांना साध्या सुती साडीच्या दोन हात तुकड्याची चिंता करण्याची गरज उरत नाहीआता या रचनेत, कृष्णाच्या दोन महत्त्वाच्या बाजू आहेत, एक, द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस धावून जाणारा दिव्य देवत्व उंची ल्यालेला कृष्ण आणि निरागस, अल्लड तारुण्यसुलभ प्रेमाचा उत्कट अविष्कार अनुभवणारा कृष्ण. निरागसता आणि प्रेम हा त्याचा मुळ स्थायीभाव, पण समोर येणार्या परिस्थितीमुळे पोक्त आणि सारासार विचार करुन येणार्या प्रसंगाला सामोरे जाणाराही तोच कृष्ण. या त्याच्या व्यक्तिमत्वाच्या दोन ठळक बाजू इथे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. तुमच्या आमच्या सारख्या साध्या सरळ माणसांनी कितीही ठरवले तरी नेहमीच उदात्त किंवा तथाकथित सात्विकतेने वागता येतेच असे नाही. आपल्या जगण्याला व्यवहाराची रुक्ष आणि विरस बाजूही असते, तशीच ती कृष्णाच्या जगण्यालाही होती. पण तरी आपण त्याला देवच मानतो, कां?
कृष्ण - २ पण मग नंतर वाटते राधा होण्यापेक्षाही मीरा व्हावे कृष्णाच्या निळाईने भरलेल्या सहवासाची स्मरणे आयुष्यभर वाहण्यापेक्षा कधीतरी मी त्या गिरिधराला अर्पण होईन ही भावना नाही... ही "आशा" जास्त सुखदायी आहेआता मीरा हे असेच एक वादग्रस्त पात्र, तसं तर महाभारततले हे पात्रच नव्हे, पण तरी कृष्णाशी जिवाशिवाचं नातं सांगणार. मग परत एकदा इथे मला साध्या माणसांच्या नैसर्गिक स्वभावाचा पैलू इथे दिसतो. तो मी असा मांडला आहे. माणसाला एखादी हवीहवीशी वाटणारी वस्तू म्हणा वा व्यक्ति म्हणा एकदा मिळाली कि माणूस त्यात समाधानी राहत नाही, तर त्याला अजून कुठलीतरी नविन आस लागते. आणि दुर्दैवाने जर एकदा प्राप्त झालेली वस्तू हरवली वा प्रिय व्यक्तिशी कायमची ताटातूट झाली कि माणसाला जास्तच दु:ख होते. हा माणसाचा स्थायीभाव. अर्थात तो वाईट अजिबातच नाही, त्यामुळेच कदाचित माणसाची प्रगती झाली असे म्हणता येईल. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये माणसाचे समाधान हरवते. म्हणूनच कदाचित माणसाला एखादी इच्छा प्रत्यक्ष पूर्ण होण्यापेक्षाही ती इच्छा पूर्ण होणार आहे हि भावना, हि आशा जास्त सुखदायी असते.
कृष्ण - ३ कधी कधी असही वाटते कृष्ण होण्यापेक्षाही अर्जुन व्हावे बृहन्नडा होऊन एखाद वर्ष नाचावे लागेल परंतु घनघोर रणसंगर चालू असतांना काम, क्रोध, मद, मत्सर या चार घोड्यांचे लगाम हातात घेऊन नुसते बसून तर राहावे नाही लागणारआता या रचनेकडे जरा या दृष्टीने पहा. मला नेहमीच असं वाटत आले आहे, कि विधात्याने सृष्टीची, माणसाची रचना केली आणि काही नियम ठरवले. नियम कशाचे तर जिवन नावाच्या खेळाचे. जिवनाच्या पटावर माणसांची, प्राण्यांची आणि इतर सजिव-निर्जिवांची प्यादी सोडून दिली आणि मग फक्त दुरुन हा खेळ तो पहात बसला. तो ह्या खेळात ढवळाढवळ करत नाही. आणि त्याचे नियम कोणीच मोडूच शकत नाही. तुमचे आयुष्य किती असावे याचे नैसर्गिक गणित आहे. तुमचे हृदय किती ठोके देणार हे इथे आल्यावर तुम्ही कसे वागता यावर ठरत असते. जसा एखादा कपडा तुम्ही कसा वापरता यावर त्याचे आयुर्मान ठरते, तसेच. पण आपणचं तयार केलेला कपडा, स्वतःचीच ओढाताण करुन घेतो आहे आणि स्वतःच्याच नाशाला कारणीभूत होत आहे आणि त्याला वाचविण्याची ताकद असून सुद्धा त्याला त्याच्या कर्मफळावर सोडून देणे हे भयंकर अवघड काम आहे. अहो, आपल्या स्वतःच्याच मुलांचे उदाहरण घ्या. त्यांना इजा होणार हे आपल्या लक्षात आले की आपण त्यांना त्यापासून वाचविण्याचा प्रयत्न करत नाही कां? पण विधाता तसं करत नाही, तो सगळं तुमच्यावर सोडतो. हे वाटते तितके सोपे काम नाही. म्हणून वरील रचनेत, मनुष्याचे प्रतिनिधित्व अर्जुन करतोय तर विधात्याचे कृष्ण. अर्जुनाने जे काही केले ते आपले कर्तव्य मानून आणि कृष्ण फक्त साक्षिदार. तो त्या कर्माचा साथिदार नाही. तो फक्त कर्म समजावून सांगतो, ज्याला मी मगाशी जिवनाचे नियम म्हटले. हा जिवनपट कायमच घनघोर रणसंगर असतो आणि तो मांडणारा एक विधाता असतोच आणि त्यावर प्याद म्हणून अर्जुन असतातच अन् दुर्योधनही असतात. पण म्हणून या खेळात विधाता ढवळाढवळ करत नाही, तो फक्त पाहत असतो. आपल्याच रचनेकडे इतकं तटस्थपणे पहायला देवत्वाचीच उंची हवी.
कृष्ण - ४ कृष्ण होणेही तसे फार अवघड नाही अहो,अंधारकोठडीत जन्मत: मृत्यू पावणार्या सात भावांच्या पाठीवर जन्माला यायला कां भाग्य लागतेवरिल रचनेबद्दल सांगायचे तर, मुळात यात एक उपरोधिक प्रश्न आहे. जी व्यक्ति जन्मालाच मुळात अंधारकोठडीत येते, त्याच व्यक्तिने जगाला प्रकाशाची ओळख करुन देणे हा एक भन्नाट काव्यमय न्याय व्यासांनी साधला आहे असे मला वाटते. जिवनात रुढार्थाने ज्याला आपण सुख सुख म्हणतो असे काहीच प्राप्त न झालेला असा तो कृष्ण. सख्खे आई बाप भेटायला वयाची १४-१५ वर्षे जावी लागली. आयुष्यभर मित्र कमी आणि भक्तच जास्त मिळाले. पहिल्या प्रेमाची ओळख होता होताच प्रेयसीशी दुरावा. जिथे लहानाचा मोठा झाला तो प्रदेश, तिथल्या आठवणी तेथेच ठेवून, सोडून जावे लागले. अर्थात हे आपण कृष्णाला आपण मानवी पातळीवर आणून विचार केला तर जाणवणारी दु:खे आहेत. कृष्ण व्हायला सात भाऊ मरायलाच हवे असे नाही, पण जन्मत: मृत्यू पावणार्या सात भावांच्या पाठीवर जन्माला येणं, आणि समज आल्यानंतर ते कळणं, हे किती जिवघेणे असेल? आयुष्याच्या अखेरीस सुद्धा आपल्याच वंशाचा सर्वनाश आपल्याच डोळ्यांनी पाहणे नशीबी आले त्याच्या. आपण नेहमीच आपल्या इवल्या इवल्या दु:खांचे गोडवे गात बसतो, मग कृष्णाने काय करावे? म्हणून मी उपरोधाने म्हणतोय, कि कृष्ण होण तसे फार अवघड नाही.पण मग त्याच कृष्णाची दुसरी अत्यंत महत्वाची सकारात्मक बाजु अशी कि, याच कृष्णाने स्वबळावर, स्वचातुर्यावर आपल्या आजुबाजुच्या प्रतिकुल परिस्थितिवर मात करुन वासुदेवपदापर्यंत पोहचणे ह्यातच त्याच्या देवत्वपदाचे रहस्य असावे.
वाचने
6240
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा!! अतिशय सुंदर मुक्तक
द्रौपदी वस्त्रहरण
जिथे कृष्णाने अतिशय
In reply to द्रौपदी वस्त्रहरण by अग्निकोल्हा
तर मग प्रश्नच मिटला. पण...
In reply to जिथे कृष्णाने अतिशय by प्रचेतस
नक्कि कोणति प्रत व्यासांचे
In reply to तर मग प्रश्नच मिटला. पण... by अग्निकोल्हा
व्यनि करतो.
In reply to नक्कि कोणति प्रत व्यासांचे by प्रचेतस
पण अल्टिमेट देवत्वाच निसंदिग्ध प्रदर्शन
In reply to द्रौपदी वस्त्रहरण by अग्निकोल्हा
२ नंबर भिडली.
मला सगळीच कविता आवडली होती.
मिका, छान.
खूप छान लिहिलंय मिका. अतिशय
+१
In reply to खूप छान लिहिलंय मिका. अतिशय by प्रचेतस
सुंदर काव्यमनोगताची सुंदर उकल...
+१
In reply to सुंदर काव्यमनोगताची सुंदर उकल... by डॉ सुहास म्हात्रे
मनुष्याणां सहस्रेषु
मस्त लिहिलंस रे!
पर्देके पीछे
कविता आवडली, विवेचनही.
आता मीरा हे असेच एक वादग्रस्त पात्र,लोक वाद घालतात म्हणून ते व्यक्तिचित्र वादग्रस्त होत नाही, लोक वादग्रस्त असतात :-)लोक वाद घालतात म्हणून ते
In reply to कविता आवडली, विवेचनही. by आतिवास
खण्ण ऽ ऽ ऽ...
In reply to कविता आवडली, विवेचनही. by आतिवास
+१.
कविता आवडली...
हेच तर कृष्णाचं वैशिष्ट्य आहे
In reply to कविता आवडली... by मनिम्याऊ
प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं
In reply to हेच तर कृष्णाचं वैशिष्ट्य आहे by प्यारे१
बॅट्या __/\__!!
In reply to प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं by बॅटमॅन
हे असं आहे बहुतेक :---
In reply to हेच तर कृष्णाचं वैशिष्ट्य आहे by प्यारे१