येडचाप नीतीशकुमार उर्फ जे डी यू
आपण 'लास्ट रिसोर्टऑफ स्काऊंड्रल्स ' च्या भानगडीत पडायचे नाही. उमेदवार पसंत नसला तर मतदानाचा हक्कच बजावायचा नाही हे म्या पक्के ठरवूनशान टा़कले आहे. पण मधेच घोटाळा झाला. मनोहर जोशी सर तिरकी मान करून म्हणाले आपल्या देशाची वाटचाल हळू हळू अराजकते कडे चालू आहे आणि आपले कलाम साहेब तर २०२० साली आपण जागतिक महासत्ता होणार असे म्हणत होते. त्यांच्या सुरात आपले परमपूज्य अर्थज्ञ नरेंद्र जाधव हेही आपला सूर मिसळत होते. असो . आमच्या मते घोटाळा यानी भारताला समजण्यात केलेला नाही .आम्हाला राजकारंणाच्या चर्चेच्या चर्हाटात ओढण्याचे खरे काम नीतिशकुमार या आमच्या मते येडचाप असलेल्या माणसाने केलेय.खरे खोटे देव जाणे पण एका चानल ने असे म्हटले आहे की नीतीशबाबूनी एक मुलाखत दिली त्यात पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी नसतील अशी ग्वाही द्या तर भाजपबरोबर रहातो अशी अट टाकली आहे म्हणे. आता आपल्याला सगळ्याना माहीत आहे की आपल्या लोकशाहीत जर अरूण गवळी निवडून येऊ शकतात तर त्यावेळी त्यांची निवड रद्द व्हावी म्हणून नीतीमान नीतीशकुमारानी जनहित याचिका का दाखल केली नाही ?१६२ खासदारांवर गुन्हेगारीच्या केसेस असताना ते कसे याना चालते ? ज्या अर्थी नरेंद्र मोदी अजून त्या १६२ खासदारांसारखेच तुरुंगाबाहेर आहेत त्याअर्थी ते लोकसभेत येऊन काही भूमिका बजविण्यास पात्र नाहीत असे नाही का? की असेच आहे ?
भारतीय घटनेचा उदोउदो करणार्यानी एक गोष्ट ध्यानात घेतली पहिजे की पंतप्रधान या पदावर बसवायची व्यक्ति ५४३ खासदार निवडतात १२० कोटी लोक नव्हे.त्या पदासाठीची निवडणूक ही प्रत्यक्ष होतच नाही. सबब लोकसभा अस्तित्वात आल्याखेरीज त्या पदाचा विचारच होउ शकत नाही. खरे तर २७३ वा खासदारच ( चुकभूल देणे घेणे या आकड्याबद्द्ल) या देशाचा पंतप्रधान ठरवू शकतो.
आम्हीही स्वतः ला समाजवादी विचाराचे समजतो. पण १९७७ चा इतिहास आठवला की हे समाजवादी कसे नुसते भांडकुदळ पणा करून तुला ना मला घाल सत्ता कुत्र्याला अशा चालीचे आहेत हे आताही आठवते आहे. आता हे सारे नरेंद्र मोदीना वाळीत टाकल्यासारखे भाषा करीत आहेत. त्यांच्या खर्या वा आभासी विकासाला भुलून जर तरूणानी स्त्रॅटेजिक मतदान केले व नरेंद्र मोदी गवळी सारखेच निवडून आले तर मग कलहप्रिय समाजवाद्यांचे काय म्हणणे असणार आहे ? आपल्या घटनेने राष्ट्रपति व प्रधान मंत्री या दोन्ही पदांपैकी एकाची तरी निवड थेट जनतेतून करण्याचा द्रष्टेपणा दाखविला असता तर ? तुम्ही पाच वर्षातून एकदा मतदान करा व हातावर हात ठेवून व मूग गिळून बसा हाच घटनेचा आपल्याला शुभ संदेश आहे असे आपण म्हणायचे का ?
वाचने
4834
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
>>नीतीशबाबूनी एक मुलाखत दिली
.
रीयली काथ्याकुट
In reply to रीयली काथ्याकुट by प्रसाद गोडबोले
अवांतर
समाजवाद !!!
पण १९७७ चा इतिहास आठवला की हे समाजवादी कसे नुसते भांडकुदळ पणा करून तुला ना मला घाल सत्ता कुत्र्याला अशा चालीचे आहेत हे आताही आठवते आहे.वाह ! स"माज"वाद्यांचा बिहार / यु.पी वगळता झालेला सर्वनाश हे भारतीय लोकशाहीला लाभलेले लेणे आहे !त्यांच्या खर्या वा आभासी विकासाला भुलून जर तरूणानी स्त्रॅटेजिक मतदान केले व नरेंद्र मोदी गवळी सारखेच निवडून आले तर मग कलहप्रिय समाजवाद्यांचे काय म्हणणे असणार आहे ?एकाच वाक्यात असत्य कथन , अतिशयोक्ती , कल्पनाविलास , उपमा , तुलना आणि राम्शास्त्रीपणा वाचून मन भरून आले आहे ! जरा गण्या-गीण्याचे लिहा हो चौ रा साहेब ! हे राजकारण जावू दे **** *** !In reply to समाजवाद !!! by तर्री
खरंच की
विश्वासघात
In reply to विश्वासघात by रमेश आठवले
पण मग झारखंडचे काय?
In reply to विश्वासघात by रमेश आठवले
चुकीची दुरुस्ती
In reply to चुकीची दुरुस्ती by श्रीगुरुजी
धन्यवाद
राजकारणात
'हाय रिस्क हाय गेन'
भाजप एक ऑपॉर्च्युनिस्ट पक्ष
>>>> भाजप एक ऑपॉर्च्युनिस्ट
In reply to >>>> भाजप एक ऑपॉर्च्युनिस्ट by श्रीगुरुजी
+१
भाजप व कांग्रेस
भाजपाने कांग्रेसी कल्चर
>>>> भाजप एक ऑपॉर्च्युनिस्ट