ब्रुटसची खंजीर
अजर आहे अमर आहे
ब्रुटसची खंजीर.
प्रत्येक युगात करते
सीजरचा घात ही.
रात्र वैऱ्याची आहे
जागत राहा सीजर.
वेश घेऊन विश्वासाचे
वावरत आहे ब्रुटस इथेच.
अभिमंत्रित, अपराजित
ब्रुटसची खंजीर आहे.
बेसावध सीजरच्या
रक्ताची तहान आहे.
आज ही तळपते गगनी
सीजरच्या रक्ताने माखलेली.
राक्षसी विजयाची दंदुभी जणू ही
वज्राहून कठोर, ब्रुटसची खंजीर ही.
मस्त.......
अनुवादित ?
हम्म