साहित्यः
नारळ - २ नग.
पिठी साखर - ३ मोठे चमचे (टेबल स्पून).
अननसाचा रस - ८५० ग्रॅम्स.
अननस सिरप - ५ मोठे चमचे.
व्हॅनिला आईस्क्रिम - १/२ लिटर.
पाणी - ६ कप (चहाचे कप)
नारळ खवून घ्यावा. आता नारळात ६ कप पाणी घालून थोडा वेळ भिजत ठेवायचे. नंतर मिक्सर मध्ये भरपूर फिरवून एखाद्या पातळ कपड्याने (जसे: धोतराचा तुकडा) गाळून घ्यायचे. ह्या दुधात पिठी साखर मिसळून फ्रिजमध्ये थंड करावयास ठेवायचे. साधारण २ तास ठेवल्यास चांगले थंड होईल.
आता, थंड केलेले नारळाचे दूध, अननसाचा रस, अननस सिरप, व्हॅनिला आईस्क्रिम हे सर्व मिक्सर/ब्लेन्डर मध्ये घालून नीट मिसळून घ्यावे.
व्हर्जिन पिना कोलाडा तयार आहे. एखाद्या काचेच्या उंच ग्लासात पिना कोलाडा भरून ग्लासच्या कडेला अननसाचा तुकडा लावून त्यावर, टूथपिकच्या साहाय्याने, एक लालबुंद चेरी लावून ग्लास सजवावा.
टिव्ही समोर बसून सावकाश एक एक घुटका घेत स्वर्गिय आनंद घ्यावा.
सुचवणी:
१) अननसाचा ताजा रस घेता आला तर उत्तम पण नाहीतर तयार अननस रसही चालेल.
२) अननस सिरप तयार मिळाल्यास ते वापरावे अन्यथा, साखरेचा एकतारी पाक करून त्यात अननसाचा अर्क (पायनॅपल एसेन्स) आणि किंचीत पिवळा रंग मिसळावा. अननस सिरप तयार.
शुभेच्छा....!
वाचने
7641
प्रतिक्रिया
25
मिसळपाव

प्रतिक्रिया
मस्त मस्त!!
त्यात टकीला अॅडवावी
छानच.
हाय! काय तो उंच उंच जाणारा
एकदम सह्हिच!
मित्राची कलाकारी.
In reply to एकदम सह्हिच! by दिपक.कुवेत
छान दिसतोय पिनाकोलाडा
या..............हू...........
नक्किच
मी याच पाकृच्या शोधार्थ होते.
माझे फेवरेट मॉकटेल... प्रचंड
जबरदस्त दिसते आहे हे प्रकरण.
विकीपिडिआ.
In reply to जबरदस्त दिसते आहे हे प्रकरण. by चित्रगुप्त
झकास पेय आहे.. धन्यवाद..
In reply to विकीपिडिआ. by प्रभाकर पेठकर
पिनाकोलाडा.
In reply to झकास पेय आहे.. धन्यवाद.. by गवि
मस्त! फक्त फोटो का दिसत नाही?
मिपाकरोंपे 'लिक्विड वेपनसे'
वाह!!!!!!!!!!
सॉल्लिड !!!!!!!!
आवडीचे पेय
कृती आणि फोटो दोन्ही मस्त.
क्लास
भारीच !!!
क्लास !!
व्हर्जिन पिना कोलाडा से ग्लास