Skip to main content

फॅन्टसी

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 27/05/2013 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
Fantacy साहित्यः १. स्ट्रॉबेरीचे तुकडे - १ कप २. रेडिमेड व्हॅनीला आईसक्रिम - २ मोठे चमचे ३. किवीचे तुकडे - १/२ कप ४. साखर - १ ते २ चमचे ४. ऑरेंज जेली ५. बर्फाचे खडे - ३ ते ४ ६. सजावटिसाठि पुदिना पान, किवी/स्ट्रॉबेरी काप/फोडि यापैकि काहिहि कॄती: १. जेली पाकिटावर दिलेल्या सुचनेनुसार ऑरेंज जेली सेट/तयार करुन ठेवा २. किवीचे तुकडे, साखर आणि ३-४ बर्फाचे खडे मिक्सर मधे घेउन त्याची प्युरे/पल्प तयार करुन घ्या (पाणि न घालता) ३. आता एका बाउल मधे स्ट्रॉबेरीच्या फोडि आणि व्हॅनीला आईसक्रिम घेउन हॅन्ड मिक्सरने किंवा मिक्सर मधे मिक्स करुन घ्या. किवी प्युरेचच भांड वापरणार असाल तर स्वच्छ धुवुन घ्या म्हणजे फळांचे रंग एकमेकात मिसळणार नाहित ४. आता सर्विंग ग्लास मधे प्रथम स्ट्रॉबेरी-व्हॅनीलाचं मिश्रण घाला ५. ग्लास हलकासा टॅप (सपाट पृष्ठभागावर किचन टॉवेल ठेवा व ग्लास हलकासा आदळा) करुन घ्या म्हणजे मिश्रण सेट होईल ६. आता ग्लासला हळुवारपणे गोलाकार फिरवत एका दुसर्‍या चमच्याने किवीचा पल्प ग्लासच्या कडेकडेने गोलाकार घाला (Same like Magic Layers steps). मी कलर कॉस्ट्रास्ट साठि किवी पल्पवर परत स्ट्रॉबेरी-व्हॅनीलाचं मिश्रण घातलं ७. तयार ऑरेंज जेलीचे तुकडे लेयरवर हळुवारपणे सेट करा. माझे जेलीचे तुकडे मिक्स झाले :D ८. मनाप्रमाणे सजावट करुन फॅन्टसी ग्लास पेश करा :) ९. वरील फॅन्टसी ग्लास तयार झाल्यावर मी शील्लक राहिलेल्या पल्प पासुन हा दुसरा ग्लास तयार केला. ग्लास मधे आधी तळाला जेली घातली. मग किवी/स्ट्रॉबेरीचं मिश्रण घातलं आणि शेवटि व्हॅनीला आईसक्रिमचे स्कुप घालुन किवीची चकती आणि स्ट्रॉबेरीच्या फुलानी सजवलं (हे उरलेल्या मिश्रणापासुन बववलय त्यामुळे ग्लास अर्धाच का? हा प्रश्न कृपया टाळावा) Fantacy 2 टिपा: १. स्ट्रॉबेरी किंवा किवीएवजी आपल्याला आवडतील/ जी सीजनल फळं उपलब्ध असतील ती घ्या पण आईसक्रिम व्हॅनीलाच घ्या म्हणजे त्या फळाची मुळ चव बदलणार नाहि. २. जेलीची स्टेप आवडत नसेल तर वगळा किंवा आवडत असेल त्या फ्लेवरची जेली घ्या (कलर कॉम्बीनेशनच्या दॄष्टिने)

वाचने 6849
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

गणेशा, ५० फक्त आदि सदस्यांनी एकदा पुणे गेट नावाचे हॉटेल ठरवून तिथे कट्टा घडवून आणला होता.. त्यात फ्रूट पंच नावाचा प्रकार अगदी अशाच प्रकारचा होता. अजूनही त्याची चव जिभेवर आहे. मस्त पाकृ.. लगे रहो.

In reply to by गवि

तिथे मिसळपावचे एक उत्तुंग व्यक्तीमत्व (माजी) भेटले होते. ;) दिपकशेठ कुवेतवाले ह्यांना उत्तमोत्तम पाकृ सादरीकरणाबद्दल हार्दिक शुभेच्छा.

दारुण शुंदर....दिपक राव ,आपने तो मार ही डाला.

मगाचपासून हा धागा उघडायचं टाळत होते. दिपक दुष्ट आहे.

अहाहा! बाहेर उन तापवतय आणि मिपा उघडल्यावर ही थंडक मनाला लई भावली. आज पिनाकोलाडा बनवायची अतूट इच्छा मनांत आहे. त्यामुळे आज नाही पण ह्या आठवड्यात नक्कीच प्रयत्न करण्यात येईल.

जीवघेणे आईस्क्रीमचे प्रकार हल्ली फोटोतच बरे वाटतात !! ;)

अप्रतिम वाटतेय. नक्की करुन पाहू !

हे इतकं करत बसायला वेळ कुठे आहे? (पुण्यात) कुठे मिळते ते सांगा लगेच निघतो.