वाटल्या डाळीचे लाडू फार चविष्ट लागतात. हे बनवायचे असल्यास तूमच्याकडे निवांत वेळ हवा कारण डाळ परतायला भरपूर वेळ लागतो व हातांना ही चांगला व्यायाम मिळतो ;)
साहित्यः
४ वाट्या भिजवलेली चणा डाळ (मी छोटी वाटी वापरली आहे)
३-१/२ वाट्या साखर
दीड वाट्या पाणी
१ वाटी साजूक तूप
१/४ वाटी दूध
१ टीस्पून वेलचीपूड
१/४ टीस्पून केशर
बेदाणे+बदाम्+पिस्त्याचे काप सजावटीसाठी
पाकृ:
भिजवलेली चणाडाळ मिक्सरवर कमीत-कमी पाणी घालून वाटून घ्यावी.
नॉन-स्टीक कढईमध्ये तुपावर वाटलेली डाळ मंद आचेवर परतायला घ्यावी.
डाळ सतत परतत रहावी म्हणजे कढईला तळाला चिकटणार नाही.
आधी डाळ गोळा होऊ लागेल , वाटल्यास आणखीन थोडे तूप घालावे.
हळू-हळू डाळ हलकी सोनेरी होऊ लागेल.
साधारण तासभर परतल्यावर डाळ मोकळी होऊ लागेल.
खमंग भाजल्यावर एका ताटात काढून घ्यावी.
वेगळ्या भांड्यात साखर+पाणी+केशर एकत्र करून दोन तारी पाक तयार करावा.
पाक तयार झाला की त्यात दूध, सुकामेवा व वेलचीपूड घालून एकत्र करावे.
हा पाक डाळीच्या मिश्रणात घालून एकत्र करावा.
२-३ तास पाक चांगला मुरला व मिश्रण लाडू वळण्यास योग्य झाले की लाडू वळवून्/बांधून घ्यावे.
(इथे वातावरण गार असल्यामुळे मिश्रण लगेच तयार झाले)
पाक छान मुरला की लाडू चवीला रुचकर लागतात.
दूधाऐवजी थोडा परतलेला खवा ही घालू शकता.
फ्रिजमध्ये ठेवल्यास ७-८ दिवस चांगले टिकतात.

वाचने
16105
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
वॉव !
राघवदास लाडूंमध्ये
In reply to वॉव ! by सस्नेह
राघवदास मध्ये बेसन अन रवा
In reply to राघवदास लाडूंमध्ये by सानिकास्वप्निल
राघवदास लाडू भिजवलेली
In reply to राघवदास मध्ये बेसन अन रवा by स्पंदना
मी हा आणि ह्याच्या वरचा
In reply to राघवदास लाडू भिजवलेली by सस्नेह
राघवदास, तंबीट अशा लाडूंविषयी
In reply to राघवदास मध्ये बेसन अन रवा by स्पंदना
राघवदास लाडु बनवताना
In reply to राघवदास मध्ये बेसन अन रवा by स्पंदना
ओहोहोहो!
ओहोहोहो!
अहाहा! काय मस्त लाडु आहेत?
In reply to ओहोहोहो! by प्रभाकर पेठकर
अहा! अहा!! भन्नाटम् अतिसुंदरम
लाडू चांगले लागत असतीलही, पण
पारंपारिक पदार्थ आहे हा
In reply to लाडू चांगले लागत असतीलही, पण by बॅटमॅन
तसे नाही, चवीसाठी घटक त्यात
In reply to पारंपारिक पदार्थ आहे हा by सानिकास्वप्निल
सानिका.....
In reply to पारंपारिक पदार्थ आहे हा by सानिकास्वप्निल
हांगाश्शी तेच बघा दीपक!!!!
In reply to सानिका..... by दिपक.कुवेत
+१ टु बॅटमॅन आणि दिपक कुवेत
In reply to हांगाश्शी तेच बघा दीपक!!!! by बॅटमॅन
मित्रा वाटल्या डाळीचं या
In reply to हांगाश्शी तेच बघा दीपक!!!! by बॅटमॅन
हम्म ते आहे म्हणा. डोक्यात एक
In reply to मित्रा वाटल्या डाळीचं या by सूड
इनोव्हेशन्स नसून
In reply to हम्म ते आहे म्हणा. डोक्यात एक by बॅटमॅन
बरोबर आहे सानिकातै मी
In reply to इनोव्हेशन्स नसून by सानिकास्वप्निल
म्हंजे त्या न्युटन सारखं
In reply to बरोबर आहे सानिकातै मी by बॅटमॅन
ओ पण्णास.. बॅटमॅनासमोर
In reply to म्हंजे त्या न्युटन सारखं by ५० फक्त
हो
In reply to ओ पण्णास.. बॅटमॅनासमोर by मोदक
एकदम बरोबर पण्णासराव, पूर्ण
In reply to म्हंजे त्या न्युटन सारखं by ५० फक्त
वश्शाड मेलो !!
In reply to एकदम बरोबर पण्णासराव, पूर्ण by बॅटमॅन
दिपक, बॅटमॅन
In reply to सानिका..... by दिपक.कुवेत
आवडले!!
मस्तच लाडू !!
वन बाय वन..स्टेप बाय स्टेप...
अच्छा लगेच खाय्चे लाडु आहेत
काय जब्राट तकाकी...
अप्रतिम...अन्नपुर्णे!!!
खुप्च मस्त दिसतयात लाडु..
अप्रतिम !!!!!!!!!
अह्ह्हा!
आम्ही बेफिकीर
In reply to अह्ह्हा! by स्मिता.
आम्ही जाड म्हणूनि काय वदसी?
In reply to आम्ही बेफिकीर by तिमा
खपलो !!!
वाटळी डाळ किंवा मोकळं तिखट हा
:)
सानिके, काय हे? अफाट सुंदर!
सुरेख
नारायणदास,राघवदास वगैरे
आम्ही लाडू काहीही न वाचता
मस्त
नशीब आधी नाही पाहिले..
अगदी ठार झालो